Monday, December 29, 2025
Home Blog Page 2946

आता औरंगाबादहुन मुंबई, हैदराबाद, दिल्लीला चला विमानाने, कारण…

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. रेल्वेबरोबरच शहराला दिल्ली, मुंबई आणि हैदराबादबरोबर हवाई कनेक्टिव्हिटीदेखील आहे. अनेक जण या शहरांत कमी वेळेत पोहोचण्यासाठी विमानसेवेला प्राधान्यक्रम देत आहेत. कारण विमानाचे तिकीट हे रेल्वेच्या एसी भाड्याहून कमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विमानसेवेला काहीसा फटका बसला. परंतु दुसऱ्या लाटेनंतर औरंगाबादची विमानसेवा पूर्वपदावर आली. सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादशी विमानसेवेने जोडलेले आहे.

इंडिगोने 1 डिसेंबरपासून सकाळच्या वेळेत दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू केली. यामुळे दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य आहे. त्याबरोबरच दिल्लीहून कनेक्टिंग फ्लाईटने पाटणा, जयपूर, डेहराडून, श्रीनगर इ. ठिकाणी जाणेही शक्य झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा विमानसेवेला काही प्रमाणात फटका बसत आहे. या परिस्थितीला सामोरे जात विमानसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न विमान कंपन्या आणि विमान प्राधिकरणांकडून केला जात आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विमानसेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादची विमानसेवा पूर्ववत झाली. परंतु बंगळुरू आणि अहमदाबादची विमानसेवा सुरू होण्याची अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. ही दोन्ही विमाने लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

विमानतळावर येणाऱ्या विमानांची आगमन वेळ –
– इंडिगो दिल्ली-औरंगाबाद – सकाळी 7.15 वा.
– एअर इंडिया मुंबई-औरंगाबाद – सायं. 4.45 वा.
– इंडिगो हैदराबाद-औरंगाबाद – सायं. 5.05 वा.
-इंडिगो मुंबई-औरंगाबाद – सांय. 6.30 वा.
– इंडिगो दिल्ली-औरंगाबाद- सायं. 6.55 वा.
– एअर इंडिया दिल्ली- औरंगाबाद – सायं. 7.35 वा.

विमानतळावरून जाणाऱ्या विमानांची उड्डाणाची वेळ –
– इंडिगो औरंगाबाद- दिल्ली- सकाळी 7.45
-एअर इंडिया औरंगाबाद- दिल्ली- सायं. 5.20 वा.
– इंडिगो औरंगाबाद-हैदराबाद- सायं. 5.25 वा.
-इंडिगो औरंगाबाद-मुंबई- सायं. 7 वा.
– इंडिगो औरंगाबाद-दिल्ली- सायं. 7.30 वा.
– एअर इंडिया औरंगाबाद-मुंबई- रात्री. 8.20

मानवी कवटीचे प्रकरण सिव्हिल हाॅस्पीटल आणि पोलिस दडपत आहेत : सुशांत मोरेंचा आरोप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

‘मानवी कवटी’ बाबत सिव्हिल आणि पोलीस प्रशासन हातात हात घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून चौकशीचे आदेश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेली आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयात ‘मानवी कवटी’ आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सदरची बाब गंभीर असून देखील याबाबत जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी या घटनेबाबत हात झटकले आहेत. मानवी कवटी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेला व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस यंत्रणा आणि सिव्हिल प्रशासन हातात हात घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली असून जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे सांगितले आहे.

या मानवी कवटीबाबत शहरात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी कोणतीही कवटी रूग्णालयाच्या आवारात आढळून आली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच जिथे ही कवटी सापडली तेथे जावून पाहणी केली असता तेथेही कवटी नव्हती, असे सांगितले.

आता कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार 20 लाखांपर्यंतचे कर्ज, कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना विविध सुविधा पुरविल्या जातात. जर तुम्ही या सरकारी बँकेत तुमचे सॅलरी अकाउंट उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या बँकेतून सॅलरी अकाउंट उघडणाऱ्या ग्राहकांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेउयात घेऊयात.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक सॅलरी अकाउंट असलेल्या ग्राहकांना होम लोन, एज्युकेशन लोन, कर लोन आणि पर्सनल लोनवर सूट देते. याशिवाय अनेक प्रकारच्या सुविधा ग्राहकांना दिल्या जातात.

20 लाखांपर्यंत लोन मिळेल
ग्राहक गरजेनुसार बँकेच्या कस्‍टमाइज्‍ड पर्सनल लोन प्रॉडक्टचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये 20 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन (टर्म लोन) त्वरित उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना कमीत कमी कागदपत्रे द्यावी लागतील. पगारदार ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या या पर्सनल लोन प्रॉडक्ट्सना कोणत्याही सिक्योरिटी किंवा गॅरेंटीची आवश्यकता नाही.

कर्जाचा लाभ कोणा-कोणाला मिळेल ?
>> कस्‍टमाइज्‍ड पर्सनल लोन साठी, ग्राहकाचे कोणत्याही शाखेत सॅलरी अकाउंट असणे आवश्यक आहे.
>> मिनिमम नेट मंथली सॅलरी 15,000 रुपये असावी.
>> लोनसाठी अर्ज करणारी व्यक्ती केंद्र, राज्य किंवा निम-सरकारी, केंद्र किंवा राज्य PSU, कॉर्पोरेट किंवा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांची कर्मचारी असावी.
>> कर्ज अर्जदाराचे वय 21 ते 58 वर्षे दरम्यान असावे.

व्याजदर काय आहेत ?
या कर्जाचा व्याजदर 9.60 टक्क्यांपासून सुरू होऊन 11.10 टक्के प्रतिवर्ष असेल. यामध्ये ग्राहकांना कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध
बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधाही उपलब्ध आहे. या सुविधेत ग्राहकांना 2 महिन्यांची सॅलरी ऍडव्हान्स मिळते.

धक्कादायक ! ‘या’ क्षुल्लक कारणावरून लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दारूच्या आहारी गेलेल्या लहान भावाने वडिलांकडे पैसे मागितले हे पाहून मोठ्या भावाने त्याला हटकले. याचा लहान भावाला राग आला म्हणून त्याने रागाच्या भरात मोठ्या भावाची हत्या केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी शहरातील घाटी बेघर परिसरात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

दीपक ज्योतिराम गेडाम असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे तर दिलीप गेडाम असे आरोपी लहान भावाचे नाव आहे. लहान भाऊ दिलीप गेडाम याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे तो दारूसाठी नेहमी आई-वडिलांकडे पैसे मागत होता. एवढेच नाहीतर आईवडिलांनी पैसे दिले नाहीतर त्यांना त्रास देत होता. घटनेच्या दिवशीसुद्धा आरोपी दिलीपने आईकडे पैसे मागितले. पण आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पैशासाठी दिलीपने आपल्या आईलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी मोठा भाऊ दीपक गेडाम याने लहान भावाला समाजवण्याचा प्रयत्न केला. आई-वडिलांना त्रास का देत आहेस असे म्हणून त्याने लहान भावाला हटकले. यानंतर या दोघां भावांमध्ये मोठा वाद झाला. यानंतर रागाच्या भरात लहान भाऊ दिलीपने मोठ्या भावावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे दीपक जागेवर कोसळला. यानंतर दिपकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर घाटंजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी दिलीपला अटक केली. घाटंजी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मुंबई जिल्हा बँक निवडणूकीत भाजपला झटका; राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे अध्यक्षपदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव करत कांबळे अध्यक्ष झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून प्रवीण दरेकर आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

शिवसेना +राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे ११ संचालक सदस्य झाली आहे. तर  भाजपकडे आता ९ संचालक आहे. त्यामुळे सिद्धार्थ कांबळे यांनी 11 विरुद्ध 9 असा विजय मिळवला आहे. उपाध्यक्ष पदाची निवडणूक मात्र टाय झाली. यानंतर ईश्वर चिठ्ठीने याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उपाध्यक्ष पद विठ्ठल भोसले यांच्याकडे गेलं आहे. थोडक्यात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे गेलं आहे.

काही वेळापूर्वी सह्याद्री अतिथिगृहात अर्थ मंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई बँकेतील प्रतिनिधीची एकत्र बैठक पार पडली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबई बँकेवरील भाजपचं वर्चस्वाला धक्का देत सत्ता परीवर्तन करण्याची रणनिती आखली.

मुंबई बँकेवर कोणत्या पक्षाचे किती संचालक?
भाजप संचालक
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
विठ्ठल भोसले
आनंद गाड
कविता देशमुख
विनोद बोरसे
सरोद पटेल
नितीन बनकर
अनिल गजरे
राष्ट्रवादी काँग्रेस संचालक
>> संदीप घनदाट
>> शिवाजीराव नलावडे
>> पुरुषोत्तम दळवी
>> विष्णू गंमरे
>> सिद्धार्थ कांबळे
>> जयश्री पांचाळ
>> नंदू काटकर
>> जिजाबा पखर

शिवसेना संचालक
सुनील राऊत
अभिषेक घोसाळकर
शिल्पा सरपोतदार

उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील लोकांना मूर्ख समजत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या काल पार पडलेल्या बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घराच्या अनधिकृत बांधकामासाठीचा दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने आता शिवसेनेचा आमदार आहे म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ केले आहे. पण, महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या लोकांना मुर्ख समजतात का? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणले की, गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर एक सुनावणी पार पडली होती. त्या सुनावणीवेळी प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यांच्या कडून सगळा दंड व व्याज वसूल करून कारवाई केली जाणार असे ठाकरे सरकारने मान्य केले होते. आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळांनी सरनाईक यांना दिलासा दिला आहे. ठाकरे सरकारचे हे प्रताप महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येत नाही का? उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या लोकांना मुर्ख समजतात का? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

वास्तविक पाहता ठाकरे सरकार चुकीच्या पद्धतीचे काम करत आहे. प्रताप सरनाईक घोटाळेबाज आहेत. तरीही त्यांना मदत का केली जात आहे? पण, मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना चुकीचा संदेश देऊ नका. त्यांना कशाला वाचवता आहात? मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या समोर सांगतात, की आम्ही प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करू. मग ठाकरे सरकार त्यांना का पाठीशी घालतात? असेही यावेळी सोमय्या यांनी म्हंटले.

आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असे म्हणत केलेल्या हल्यात एकाचा खून

फलटण | फलटण शहरात शंकर मार्केट येथे टोपी चौकात एकाचा खून तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सहा जणांवर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात सहाजणांनी तलवार, लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. यामध्ये निलेश हिरालाल चव्हाण (निल्या मच्छली) मयत झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण येथे श्रीराम मंदिराजवळ, श्रीराम पोलीस चौकीसमोर काल, बुधवार, (दि.१२) रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास निलेश हिरालाल चव्हाण (निल्या मच्छली) व त्याचा मित्र भरत फडतरे (रा. मलटन, फलटण) यांना ‘आमच्या गल्लीतील मुलींची छेड का काढतो?’ असे म्हणून सलिम शेख यांनी लोखंडी तलवारीने तर त्यांची मुले सैफुला सलिम शेख व जमिर सलिम शेख (सर्व रा. कुंभारटेक, फलटण) यांनी लोखंडी पाईपने तर बिलाल व राज बागवान आणि एक अनोळखी इसम यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देवून, गंभीर जखमी केले.

या मारहाणीत निलेश चव्हाण हा उपचार सुरू असताना मयत झाला आहे. तसेच भरत फडतरे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची फिर्याद मयत निलेशची आई कांता हिरालाल चव्हाण यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक भारत केंद्रे तपास करत आहेत.

तरुण गुंतवणूकदारांची सर्वात मोठी समस्या: पैसे तर वाचवले पण आता ते कुठे गुंतवायचे

Rapo Rate Hike

नवी दिल्ली । पैसे तर वाचवले पण आता ते कुठे गुंतवायचे ? ही समस्या अनेक तरुण गुंतवणूकदारांना सतावत असते. डिनेरो निओ बँकेला आपल्या एका सर्वेक्षणात हेच आढळून आले आहे. 19-30 वयोगटातील 500 सहभागींपैकी निम्म्याहून जास्त (64 टक्के) म्हणाले की,” त्यांना कुठे गुंतवणूक करावी हे माहित नाही. या वयोगटातील गुंतवणूकदारांची विचारप्रक्रिया समजून घेणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश होता. पैसे वाचवताना ते त्यांचे आर्थिक उद्दिष्ट कसे ठरवतात हे पाहायचे होते.

या 500 सहभागींपैकी, 51 टक्क्यांहून जास्त प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की,” ते मासिक उत्पन्नातून पैसे वाचवतात आणि बाजूला ठेवतात, मात्र ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगवर काम करू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या ज्ञानाचा अभाव आहे. गुंतागुंतीच्या आर्थिक अटी त्यांना गोंधळात टाकतात आणि त्यांना निर्णय घेता येत नाही असे वाटते.”

अल्पकालीन खर्चासाठी बचत
या सर्वेक्षणात असे आढळून आले की, एका निश्चित ध्येयाशिवाय बचत करणे हा आणखी एक अडथळा आहे. एक तृतीयांश पेक्षा जास्त प्रतिसादकर्त्यांनी (33 टक्के) स्पष्ट उद्दिष्ट ठेवल्याशिवाय कोणतीही रक्कम वाचवण्याकडे त्यांचा कल नसल्याचे सांगितले. मात्र, 40 टक्के बचतकर्त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या “अल्पकालीन खर्चासाठी बचत करतात.”

कमी जोखमीच्या गुंतवणुकीचे पर्याय देणारी विश्वसनीय आर्थिक मालमत्ता शोधण्यात सक्षम नसल्यामुळे आवश्यक ज्ञानाचा अभाव आणखी वाढला आहे. उत्तर देणाऱ्यांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त लोकांनी सांगितले की,” त्यांना योग्य मालमत्ता शोधण्यात अडचण आली.”

क्रिप्टोकरन्सी ‘ही’ पहिली पसंती नाही
निवडीचा प्रश्न येतो तेव्हा, क्रिप्टोकरन्सी लोकप्रियतेमध्ये म्युच्युअल फंडाच्या मागे असतात. विशेष म्हणजे, 59 टक्के सहभागींनी सांगितले की,” ते ट्रेंडिंग क्रिप्टोकरन्सीपेक्षा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतील.” जवळपास अर्ध्या (45 टक्के) लोकांनी एकाधिक UPI अ‍ॅप्स वापरून केलेल्या खर्चाचा मागोवा घेण्याऐवजी त्यांच्या खर्चाचा मागोवा घेण्याचा प्राथमिक मार्ग म्हणून त्यांचे बँक स्टेटमेंट वापरल्याचे मान्य केले.”

डिजिटायझेशन निःसंशयपणे वाढले आहे, मात्र तरुण गुंतवणूकदार अजूनही एखाद्या व्यक्तीकडे वळतात जेव्हा गुंतवणूकीसाठी सल्ला किंवा सहाय्य मिळविण्याचा प्रश्न येतो.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.54 लाख कोटी रुपये, रिफंडचे स्टेट्स अशाप्रकारे तपासा

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 10 जानेवारी 2022 पर्यंत 1.59 कोटींहून जास्त करदात्यांना 1,54,302 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंड चा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 53,689 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा रिफंड 1,00,612 कोटी रुपये होता.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट केले की, “CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान 1.59 कोटी करदात्यांना 1,54,302 कोटी रुपयांहून जास्त रिफंड दिला आहे. 1,56,57,444 प्रकरणांमध्ये 53,689 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड आणि 2,21,976 प्रकरणांमध्ये 1,00,612 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे.

गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात जारी केलेल्या 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंडच्या तुलनेत हे 43.2 टक्के जास्त आहे.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन वेबसाइटवरून रिफंडचे स्टेट्स तपासा-
>> सर्वप्रथम तुम्हाला http://www.incometax.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
>> यूझर आयडी आणि पासवर्ड टाका.
>> लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ई-फायलिंगचा पर्याय दिसेल.
>> आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न निवडा
>> त्यानंतर View File Return वर क्लिक करा.
>> आता तुमच्या ITR चे डिटेल्स दाखवले जातील.

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील ‘हे’ नामांकित क्लॉथ सेंटर सील

औरंगाबाद – कोरोना नियमावलीचे पालन करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने जालना रोडवरील आकाशवाणी चौकातील नामांकित कापडाचे दालन राज क्लॉथ आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान सिल केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सहाय्यक कामगार उपायुक्त वाय. एस. पडीयाल, मनपा झोन क्रं. 9 चे अधिकारी संपतराव दराडे व पोलीस अधिकारी, कर्मचारी व मित्र पथकाने या दालनाला भेट दिली असता त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याने मास्क लावले नव्हते, तर चाऱ्याची पहिलीच लस पूर्ण झालेली होती यावरून या दालनाला सिल केले. क्लॉथ स्टोअर मध्ये दीडशे कर्मचारी काम करतात. पुढील आदेशापर्यंत हे दुकान बंद राहणार आहे.

तसेच याविषयी पुढील कार्यवाईची माहिती जिल्हाधिकारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील अस्थापनेत या कार्यवाईमुळे खळबळ उडाली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवणे, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व कोरोना लसीकरण शंभर टक्के झाले पाहिजे यासाठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे.