Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2967

सर्वसामान्यांना धक्का ! एसी आणि फ्रिज महागले, वॉशिंग मशिनच्या किंमतीही 10 टक्क्यांनी वाढणार

नवी दिल्ली । आगामी नवीन वर्षात सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. या वर्षी ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी (FMCG कंपन्या) एअर कंडिशनर्स ( AC )आणि रेफ्रिजरेटर्सच्या ( Refrigerator) किमती वाढवल्या आहेत. कच्चा माल आणि मालवाहतूक शुल्कात वाढ झाल्यामुळे या किमती वाढवण्यात आल्या असल्याचे कंपनी कडून सांगण्यात आले आहे

तसेच या महिन्यानंतर किंवा मार्च 2022 पर्यंत वॉशिंग मशीनही 5-10 टक्क्यांनी महाग होऊ शकतात. पॅनासोनिक, एलजी आणि हायरसह अनेक कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्या आहेत. सोनी, हिताची, गोदरेज अप्लायन्सेस या तिमाहीच्या अखेरीस किमती वाढवू शकतात.

भाव का वाढत आहेत?

हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एनएस म्हणाले, “कमोडिटीच्या वाढणाऱ्या किंमती तसेच कच्चा माल आणि लॉजिस्टिकच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन आम्ही रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन आणि एसी श्रेणींमध्ये आमच्या उत्पादनांच्या किमती 3-5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.पॅनासोनिक इंडियाचे विभागीय संचालक (ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स) फुमियासू फुजीमोरी म्हणाले की, कमोडिटीच्या किमती आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे एसीच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते.

कच्च्या मालाच्या किमतीची चिंता

दक्षिण कोरियातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG ने घरगुती वस्तूंच्या श्रेणीच्या किमती वाढवल्या आहेत. कच्चा माल आणि लॉजिस्टिकच्या किमतीत झालेली वाढ ही चिंतेची बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे उपाध्यक्ष (गृह उपकरणे आणि एसी व्यवसाय) दीपक बन्सल म्हणाले, “आम्ही नाविन्यपूर्ण उपायांद्वारे स्वतःच्या खर्चाची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आता व्यवसाय टिकून राहण्यासाठी दर वाढवणे गरजेचे आहे.”

आता वाढ रोखणे अवघड झाले आहे

जॉन्सनचे नियंत्रण असलेल्या हिताची एअर कंडिशनिंग इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरमीत सिंग म्हणाले की,”आता किमतीतील वाढ टाळता येणार नाही. कच्चा माल, कर आणि वाहतूक यासह उत्पादन खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत, ब्रँड एप्रिलपर्यंत किंमती 10 टक्क्यांनी वाढवेल. टप्प्याटप्प्याने एप्रिलपर्यंत किमान 8 ते 10 टक्के दरात वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊसाच्या ट्राॅल्या सोडविण्यास गेलेल्या मेडिकल व्यावसायिकाचा मृत्यू

पाटण | ऊस वाहतूक करणार्‍या रिकाम्या ट्रॉल्या वेगळ्या करण्याकरिता मदतीसाठी गेलेले उंब्रज (ता. कराड) येथील मेडिकल व्यावसायिकाचा दोन्ही ट्रॉल्यांच्या मध्ये सापडून दुर्दैवी अंत झाला. बहुले (ता. पाटण) येथे शनिवारी ही घटना घडली असून युवकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विकास पांडुरंग काळे (वय- 38 रा. उंब्रज ता. कराड) असे मेडिकल व्यावसायिकाचे नाव आहे. विकास काळे याचा मेडिकल व्यवसाय असून बहुले (ता.पाटण) येथे त्याचे अनेक वर्षापासून मेडिकलचे दुकान आहे. शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास विकास काळे मेडिकलमध्ये बसला होता. मेडिकल समोरील मोकळ्या जागेत ऊस वाहतूक करणार्‍या दोन रिकाम्या ट्रॉल्या उभ्या होत्या.

त्या दोन ट्रॉल्या वेगळ्या करण्यासाठी विकास यास मदतीसाठी बोलवण्यात आले होते. विकास याने त्या ठिकाणी जाऊन ट्रॉलीला लावण्यात आलेली पीन काढली असता ट्रॉली पुढे सरकली. दोन ट्रॉल्यांच्या मध्ये विकास हा जोराने दाबला गेल्याने त्याचा जागेवरच अंत झाला. विकास हा मनमिळावू स्वभावाचा व दुसर्‍याच्या मदतीला धावून जाणारा म्हणून बहुले परिसरात परिचित आहे. त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.’

तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान आज सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नुकतीच फेसबुकवर पोस्ट शेअर करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. “अखेर “कोरोनाने” मला गाठलचं माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्या नंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करीत होते. जेंव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/4751685771587974

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धक होत्या. काही आठवडे घरात राहिल्यानंतर त्या एलिमिनेट झाल्या. तृप्ती देसाई या तब्बल ५० दिवस बिग बॉसच्या घरात होत्या. आता त्या बिग बॉसच्या घरातूनबाहेर आल्या आहेत. बाहेर येताच त्यांना कोरोनाने गाठले आहे.

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा एक तर मराठवाड्यात 8 नवे रुग्ण

Corona

औरंगाबाद – मराठवाड्यात ओमायक्रॉनचा विळखा वाढत असून काल दिवसभरात 8 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक 5 रुग्ण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून, औरंगाबाद, जालना, लातूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील रुग्ण हा 24 वर्षीय तरुण असून तो काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून परतला होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मराठवाड्यात आतापर्यंत उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले होते. यामध्ये रविवारी जालन्याचीही भर पडली, तर औरंगाबादमध्ये आतापर्यंत 2 ‌ रुग्णांचे निदान झाले होते हे दोन्ही रुग्ण उपचार घेऊन ओमायक्रोन मुक्त झाले आहेत परंतु औरंगाबाद मध्ये काल आणखी एका रुग्णाची वाढ झाली.

औरंगाबाद मधील 24 वर्षीय रुग्ण डिसेंबर रोजी अमेरिकेतून परत आला होता. दिल्लीमार्गे औरंगाबाद मध्ये दाखल झाल्यानंतर त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर शहराबाहेर जाण्यासाठी 29 डिसेंबर रोजी कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचा नमुना जिनोमिक सिक्वेंसिंग साठी पाठवण्यात आला. त्याचा अहवाल काल आला असून, त्यातून हा रुग्ण व मायक्रम बाधित असल्याचे निदान झाले आहे. या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुन्हा पाॅझिटीव्ह रेट वाढला : सातारा जिल्ह्यात 373 कोरोना बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 373 जण बाधित आढळले आहेत. गेल्या 24 तासात टेस्टचे प्रमाण कमी व पाॅझिटीव्ह जादा आढळले आहेत. कोरोना पाॅझिटीव्हचा दोन महिन्यातील उंच्चाकी रेट कालच्या रिपोर्टमध्ये आला आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 70 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 373 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 12. 15 टक्के आला आहे. सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार्थ 1 हजार 56 बाधितांची संख्या आहे.

सातारा जिल्ह्यात रविवार सायंकाळपर्यंत 24 लाख 2 हजार 906 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 2 लाख 53 हजार 987 बाधित आढळलेले आहेत. तर आजपर्यंत 6 हजार 501 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्हा आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमामुळे 2 लाख 45 हजार 311 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना लस घेतल्याचं सर्टिफिकेट आता WhatsApp वर; असं करा सोप्या पद्धतीने डाऊनलोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच अनेक लोकांचे लसीकरण देखील झालं आहे. देशात आत्तापर्यंत ८० टक्के जनतेचे लसीकरण झालं आहे. अनेक ठिकाणी प्रवास करताना, तसेच मॉल्स मध्ये शॉपिंग करताना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे गरजेचं बनले आहे

अशा वेळी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र कुठून आणायचं आणि कस डाउनलोड करायचं असा प्रश्न सर्वाना पडतो. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या व्हाट्सअँप द्वारे लसीचे प्रमाणपत्र कसे मिळवायचं हे सांगत आहोत. यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करावया लागतील

सर्वप्रथम 9013151515 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सअॅपमध्ये या नंबर वर जाऊन “सर्टिफिकेट” हा शब्द टाइप करा. त्यानंतर तुम्ही ज्या मोबाईल नंबर वरून नोंदणी केली आहे त्यासाठी एक OTP ओटीपी येईल. तो OTP क्रमांक तिथे टाकताच तुम्हाला कोविड लसीकरण प्रमाणपत्र मिळेल,हा केंद्र सरकारचा एक चांगला उपयुक्त उपक्रम आहे.

 

खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजनांचा खडसेंच्या टीकेला पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे भाजप व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचे वक्तव्य करीत टीका केली. त्यावर महाजन यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलं आहे. त्यामुळे ते वाट्टेल तसं बरळत आहेत, अशा शब्दात महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधत खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी महाजन म्हणाले की, खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे असे उद्योग एकनाथ खडसे यांच्याकडून केले जात आहेत.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे ?

गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना खडसे यांच्यावर मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याच्या वक्तव्यावर टीका करताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते. गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे उत्तर दिले. आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत दाखवायला हवे, असे प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिले होते.

अपघात : पुणे- बंगळूर महामार्गावर परिक्षेला जाताना विद्यार्थी जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

सातारा | पुणे – बेंगलोर आशियायी महामार्गावर वळसे (ता.सातारा) येथे दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी हा अपघात झाला. ऋषिकेश चंद्रकांत गोळे (वय- 21,रा. हिल रेंज माध्यमिक विद्यालय, भिलार, महाबळेश्वर, जि.सातारा, मूळ रा. गोळेवाडी) असे मृत युवकाचे नाव असून अविनाश दिलीप गोळे(रा .करहर,ता.जावली) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वळसे येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीसमोर कराड बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावर होंडा शाईन या दुचाकीला भीषण अपघात झाला. नेमका अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी बोरगाव पोलीस व कराड महामार्ग पोलीस यांनी धाव घेतली.

अपघातानंतर महामार्गावरील वहातुक काही काळ विस्कळीत झाली होती.पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वहातुक सुरळीत केली.अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय देसाई व हवालदार प्रकाश वाघ करत आहेत.

Stock Market : आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी बाजार वाढीने उघडला, निफ्टीने 17900 चा टप्पा पार केला

नवी दिल्ली । आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंगची सुरुवात आज बाजाराच्या तेजीने झाली आहे. निफ्टीने 17900 चा टप्पा पार केला आहे. सेन्सेक्स 402.36 अंकांच्या किंवा 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 60147.01 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 112 अंकांच्या किंवा 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 17924.70 च्या पातळीवर दिसत आहे.

टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक आणि मारुती सुझुकी हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स ठरले आहेत. दुसरीकडे, विप्रो, सिप्ला, नेस्ले, सन फार्मा आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचा निफ्टीच्या टॉप लूजर्समध्ये समावेश आहे. 7 जानेवारी रोजी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत 496.27 कोटी रुपयांची खरेदी केली. त्याच वेळी, या दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 115.66 कोटी रुपयांची खरेदी केली.

NSE वर F&O बंदी अंतर्गत येणारे स्टॉक
10 जानेवारी रोजी, 2 स्टॉक्स NSE वर F&O बंदी अंतर्गत आहेत. यामध्ये डेल्टा कॉर्प आणि आरबीएल बँकेच्या नावांचा समावेश आहे. सिक्युरिटीजच्या पोझिशन्सने त्यांच्या मार्केट वाइड पोझिशन मर्यादेपेक्षा जास्त असल्यास F&O विभागामध्ये समाविष्ट केलेले स्टॉक्स बंदी असलेल्या श्रेणीमध्ये ठेवले जातात.

यूएस नोकरी डेटा सुधारणा
या आठवड्यात अमेरिकेतील जॉब डेटामध्ये सुधारणा दिसून आली आहे. या आठवड्यात 199,000 नवीन नोकऱ्या सापडल्या आहेत. बेरोजगारीचा दर 3.9 टक्क्यांवर आला आहे.

जागतिक संकेत मिश्रित
पुढील आठवड्यात येणार्‍या यूएस आणि चीनच्या चलनवाढीच्या डेटावर तसेच यूएस बॉन्डच्या उत्पन्नावर गुंतवणूकदार लक्ष ठेवतील. अलीकडेच FOMC मिनिटे रिलीझ झाल्यानंतर यूएस बाँडचे उत्पन्न गेल्या आठवड्यात 1.51 टक्क्यांवरून 1.76 टक्क्यांपर्यंत वाढले.

आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार दिसत आहे. SGX NIFTY 0.41 अंकांची वाढ दाखवत आहे. त्याच वेळी, स्ट्रेट टाइम्स 1.04 टक्के वाढ दर्शवत आहे. तैवानचा बाजार 0.23 टक्क्यांनी वाढून 18,212.09 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर हँग सेंग 0.71 टक्क्यांनी वाढून 23,660.43 च्या पातळीवर दिसत आहे. त्याच वेळी, कोस्पीमध्ये 1.15 टक्क्यांच्या घसरणीसह, तो 2,920.90 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, शांघाय कंपोझिटमध्ये फ्लॅट ट्रेडिंग होत आहे.