Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2968

भाजपमधून राष्ट्रवादीकडे गेलो की वर्षातच मागे ईडीची तारीख पे तारीख; एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “भाजपमध्ये असलो कि चांगले बोलतात. मी चाळीस वर्ष भाजपबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आता एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की पाठीमागे ईडी लावतात आणि तारीख पे तारीख सुरु केली आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता केली.

जळगाव येथील रावेर येथे एका कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम केले. या पक्षात काम करत असताना पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर काम केले.

कोणाच्या मागे कशा ईडीच्या चौकशा लावल्या जाता ते सर्वजण पाहत आहेत. 40 वर्षांमध्ये मीभाजप सोबत चांगला होतो. एक वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की मागे ईडी लावता. तारीख पे तारीख सुरु करता. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले आणि आता त्याचा अपमान करता. त्याचे फळे तुम्हाला भोगावे लागतील जनता तुम्हाला येणाऱ्या कालखंडात माफ करणार नाही,असा इशारा खडसेंनी यावेळी दिला.

अनेक लोक घडवले, पक्षाच्या माध्यमातून त्यांना मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनेच ते मोठे झाले. 40 वर्ष रक्ताचे पाणी करत पक्षासाठी फिरत होते. 30 वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढे पक्ष वाढत गेला. गावागावामध्ये पक्ष पोहोचला, काय गुन्हा केला मी? असा सवाल यावेळी यावेळी खडसेंनी केला.

अंबानीचे लाड पुरवण्यासाठी गडचिरोलीचे हत्ती गुजरातला हलवणार? काय आहे प्रकरण जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर वनविभागाच्या हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील प्राणी संग्रहालयात हलविण्यात येणार आहे. कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. ‘अंबानी’ च्या प्रेमापोटी गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव हत्ती कॅम्प बंद करण्याचा घाट राज्य शासनानेच घातल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या ताब्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधून ७ पैकी ४ हत्ती, तर आलापल्लीतील ३ पैकी ३ हत्ती गुजरातला पाठविले जाणार आहेत. चांगले हत्ती गेल्यानंतर कमलापुरात शिल्लक राहणाऱ्या ३ हत्तींची वंशावळ वाढू शकली नाही तर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय गुजरात येथे सुरु करण्यात येत आहे. सुमारे २५० एकर जागेतील या प्राणी संग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मीळ प्राणी नेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरणमंत्रालयाच्या अख्त्यारितील केंद्रीय प्राणी प्राधिकरणाने १२ फेब्रुवारी २०१९ ला रिलायंसच्या या प्राणीसंग्रहालयास मंजुरी दिली आहे.

भयानक : सातारा जिल्ह्यात तरूणाने वृध्द महिलेसह झोपडी पेटवली

दहिवडी | माण तालुक्यातील जाशी येथे पैशासाठी वृध्देला तिच्या झोपडीसह जाळून मारल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या परिसरात अजूबाजूला कोणीच राहत नसल्याने हा प्रकार उशिरा समजला आहे. घटनेनंतर दोन ते तीन दिवसानंतर भेटण्यास आलेल्या भाच्यास झोपडीसह वृध्द महिला जळून खाक झाल्याचे दिसून आले. तेव्हा त्याने दहिवडी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून एका युवकास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली पोलिासाजवळ दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जाशी येथे झोपडीसह एका वृद्धेला जाळून मारल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. त्याने पैशासाठी हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. श्रीमती सीताबाई जयसिंग गलांडे (वय- 72) असे त्या वृद्धेचे नाव आहे. तर नाना दिगंबर गलांडे (वय- 20, रा. जाशी, ता. माण), असे संशयिताचे नाव आहे. जाशी येथील सीताबाई गलांडे ही वृध्दा पतीच्या मृत्यूनंतर एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांच्या घरी कोणीच नसायचे. त्यांच्या शेजारी राहणारा नाना गलांडे हा त्यांना पैशासाठी वारंवार त्रास देत होता.

दि. 5 जानेवारी रोजी रात्री नाना गलांडेने वृध्देची झोपडी पेटवून दिली आहे. जवळपास कोणीच नसल्याने या घटनेची कोणालाच चाहूल लागली नाही. दोन दिवसानंतर वृद्धेचा भाचा तेथे आला असता त्यांना सीताबाई राहत असलेली झोपडी जळाल्याचे दिसले. त्यामध्ये सीताबाई याही जळून मृत झाल्याचे दिसले. त्यानंतर नातेवाईक उत्तम हरिबा चोरमले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीमध्ये पैशासाठी नाना गलांडे त्रास देत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्‍त केला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर दहिवडी पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला दहिवडी न्यायालयाने दि. 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास सपोनि संतोष तासगावकर करीत आहेत.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून टोळक्याने तरुणाला भर रस्त्यावर भोसकले

औरंगाबाद – नातेवाईक महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून टोळक्याने तरुणाला भररस्त्यावर भोसकल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री बाबा पेट्रोल पंप ते कार्तिक चौक या व्हीआयपी रस्त्यावर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम दीपक बागुल असे 25 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुभम हा फर्निचर चे काम करतो. काम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी तो धुळे येथे गेला होता. तेथे एका विवाहित महिलेसोबत तो बोलायचा मात्र त्याच्या नातलगांना दोघांमध्ये काही अनुचित प्रकार असल्याचा संशय होता. तेथील काम आटोपल्यानंतर तो औरंगाबादेत आला, मात्र नातेवाईकांच्या मनात दोघांच्या संबंधाविषयी चीड होती. शनिवारी रात्री धुळे येथील पाच ते सहा जण औरंगाबादेत आले. बालाजीनगर येथून बोलायचे असल्याची थाप मारत एका तरुणाने शुभमला घरा बाहेर आणले व ते व्हीआयपी रस्त्यालगत बोलत उभे असताना त्याचे पाच ते सहा साथीदार तेथे आले व काही कळण्याच्या आतच त्यांनी शुभम वर हल्ला चढवला व धारदार चाकूने छातीवर, पोटावर, अंगावर वार केले या हल्ल्यात शुभम गंभीररीत्या जखमी झाला यानंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला.

शुभमवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस त्याचा जाब जबाब नोंदवत होते. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 8.63 टक्क्यांवर

Corona

औरंगाबाद – मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. रुग्णांचा आकडा शंभरच्या पुढे जात असल्याने शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा 8.63 टक्क्यांवर पोचला असून, ही बाब शहरासाठी चिंताजनक मानली जात आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर करत निर्बंध आणखी कडक केले आहे.

दिवाळी सण, नाताळ सण, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त औरंगाबादेत बाजारपेठा, हॉटेल, रेस्टॉरंटवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीचे पडसाद आता औरंगाबाद शहरात दिसून येत आहे. जानेवारीचा महिना लागल्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. मागील चार दिवसांपासून शहरात शंभरपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नव्याने भर पडत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिल्यास अवघ्या दोनच दिवसांत शहरातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची हजाराच्या घरात जाण्याची भीती पालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. रविवारी दिवसभरात 2168 आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. रविवारी दिवसभरात केलेल्या अ‍ॅन्टिजेन चाचण्यांचे अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

काल दिवसभरात 183 कोरोनाबाधीत आढळल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 664 वर पोचली आहे. यातील सर्वाधिक 108 रूग्ण पालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रूग्णालयात दाखल आहेत. तर, घाटीमध्ये 28 जण उपचार घेत आहेत. खासगी रूग्णालयांत 75 बाधीतांवर उपचार सुरू आहेत.

शिवसेना पक्षात फक्त जनतेची…; आदित्य ठाकरेंचे ट्वीट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेकडून पालिका निवडणुकीत विशिष्ट वयोगटातील उमेदवारांनाच तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा होत आहे. याबाबत पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत या चर्चा खोट्या असल्याचे म्हंटले आहे. “शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळते, असे ठाकरे यांनी म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की,”विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळते.”

राज्यातील महत्वाचे शहर मानले जात असलेल्या मुंबईत सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून कोणाला नगरसेवक म्हणून उमेदवाराची संधी देणार अशा चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेत आता ज्येष्ठांऐवजी तरुणांना संधी देण्याचा विचार असल्याच्याही चर्चा होत होत्या. मात्र या चर्चाना मंत्री आदित्य ठाकरे यांनी पूर्ण विराम दिला आहे.

आजपासून जिल्ह्यातील गर्दिवर 9 भरारी पथके करणार नियंत्रण

sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. असे असताना नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नाही. शिवाय अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात 1 या प्रमाणे नऊ भरारी पथकांची नियुक्ती करुण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकांद्वारे गर्दीच्या ठिकाणचे चित्रीकरण करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रादेशिक प्रमुखांची आढावा बैठक शनिवारी रात्री घेण्यात आली. यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, डॉ. भारत कदम, प्रभोदय मुळे, संगीता सानप, संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी रोडगे, स्वप्नील मोरे, विधाते तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथकांच्या माध्यमातून मंगल कार्यालय, हॉटेल्स, भाजी मंडई आदी ठिकाणांवर लक्ष ठेवल्या जाणार आहे. शिवाय भरारी पथकांच्या माध्यमातून गर्दीचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

घरच्यांना Video कॉल करत तरुणाने उंच पुलावरून नदीत उडी घेतली अन्…

nashik crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक हृदय पिळवटुन टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील गिरणा नदीपात्रात एका तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्याअगोदर आपल्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून नदीपात्रात उडी घेतली. या तरुणाच्या नाका तोंडात पाणी शिरून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सुनील भगवान माळी असे आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मृत सुनील हा सटाणा तालुक्यातील उमाजीनगर येथील रहिवासी होता. शुक्रवारी मृत सुनीलने देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील एका पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. याअगोदर या तरुणाने आत्महत्या करण्याअगोदर व्हिडीओ कॉल करून आपल्या कुटुंबाशी संवाद साधला होता. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या तरुणाने घरगुती भांडण आणि दारुच्या नशेत हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळल्यानंतर देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने सुनीलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घरातील किरकोळ वादातून 32 वर्षीय सुनीलने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. देवळा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मुरुडमध्ये रिक्षाला अपघात ! यामध्ये डोंबिवलीच्या दाम्पत्याचा दुर्दैवी अंत

रायगड : हॅलो महाराष्ट्र – रायगडमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात घडला आहे. या अपघातात डोंबिवलीतील एका दांपत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे तर रिक्षा चालक अपघातातून थोडक्यात बचावला आहे.

नेमका कसा झाला अपघात ?
रायगड जिल्ह्यामधील मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील भोईघर फाट्यापासून काही अंतरावर हा भीषण अपघात घडला आहे. बामणकोंडी वळणावर रिक्षा पलटी झाल्यामुळे त्यातून प्रवास करणाऱ्या दांपत्याचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. डोंबिवली सोनारपाडा या ठिकाणी राहणारे जगदीश मोतीराम वणे आणि ज्योत्स्ना जगदीश वणे हे दोघे पती – पत्नी मुरुड तालुक्यातील काजूवाडी या ठिकाणी रिक्षाने आले होते.

घटनेच्या दिवशी हे दांपत्य रात्री साडेआठच्या सुमारास काजूवाडी ते भोईघर मार्गे बोर्लीकडे येत होते. यावेळी अचानक रिक्षा बामणकोंडी वळणावर पलटी झाली. यानंतर जखमींना तातडीने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुदैवाने रिक्षा चालक अभिषेक चंद्रकांत राजापरकर हे या अपघातातून बचावले आहेत. रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गणेश म्हात्रे हे या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात ! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले अन्….

ratnagiri rape

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरीमध्ये एका अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. यामध्ये सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मित्राने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पीडित मुलीने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

काय आहे नेमके प्रकरण
पीडित मुलीची आणि आरोपी तरुणाची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर या तरुणाने तिच्याशी मैत्री केली. यानंतर हळूहळू हि मैत्री फुलत गेली आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर या तरुणाने लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. मागच्या चार महिन्यांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. हा तरुण पीडित तरुणीला धमकी देऊन मारहाणसुद्धा करत होता.

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर राजीवडा येथील 20 वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली. रत्नागिरी शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात विविध कालमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यानंतर कोर्टाने या आरोपी तरुणाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या तरुणाने सप्टेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत पीडित तरुणीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले होते. रत्नागिरी शहर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.