Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2975

BSE मधील लिस्टेड छोट्या कंपन्यांची मार्केट कॅप 50,000 कोटींच्या पुढे; जाणून घ्या अधिक तपशील

Stock Market Timing

नवी दिल्ली । बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेज (SME) प्लॅटफॉर्मवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने शुक्रवारी पहिल्यांदाच 50,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. सध्या BSE च्या SME प्लॅटफॉर्मवर 359 कंपन्या लिस्टेड आहेत. त्यापैकी 127 कंपन्या मुख्य बोर्डाकडे ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत.

BSE SME चे एकत्रित मार्केट व्हॅल्युएशन 50,538 कोटींवर पोहोचले आहे
शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्राअखेर या कंपन्यांची एकत्रित मार्केट व्हॅल्युएशन 50,538 कोटी रुपयांवर पोहोचले. अजय ठाकूर, प्रमुख, BSE SME आणि Startups म्हणाले, “हा खरोखर आमच्या इतिहासातील एक संस्मरणीय क्षण आहे आणि आम्हाला याचा खूप अभिमान आहे. स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेज हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्यातील झपाट्याने होणारा विकास हे देशाच्या प्रगतीचे द्योतक आहे.”

EKI Energy ने 1 अब्ज डॉलर्सच्या मार्केट कॅपचा माईलस्टोन गाठला
अलीकडेच BSE च्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्टेड EKI Energy ने इतिहास रचला आहे. या कंपनीची मार्केट कॅप 1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. ही कंपनी BSE च्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्टेड झालेली पहिलीच कंपनी आहे, जिने हे व्हॅल्युएशन गाठले आहे. या कंपनीने लिस्टिंग केल्यानंतर आतापर्यंत 6 हजार टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे.

2011 मध्ये सुरू झालेली, EKI Energy Services ही भारतातील कार्बन क्रेडिट इंडस्ट्री मधील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी एडवाइजरी, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिझनेस एक्सलन्स एडवाइजरी आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटमध्ये सेवा देते. मात्र, कार्बन क्रेडिटचा व्यापार करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे.

आर्थिक संकटावेळी पर्सनल लोन ठरू शकते अधिक फायदेशीर; जाणून घेऊया याचे फायदे

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरदार लोकांच्या जीवनात मोठ्या प्रसंगी पैशांची गरज भासते. मुला-मुलीचे लग्न असो, कुणाचे आजारपण असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीकडून महागड्या व्याजावर कर्ज घेण्यापेक्षा बँकेकडून पर्सनल लोन घेणे चांगले. कोरोना महामारीमुळे अनेक लोकं आर्थिक संकटात अडकले आहेत. अशा परिस्थितीत पर्सनल लोन हा एक चांगला पर्याय असू शकतो.

SBI आणि पंजाब नॅशनल बँकेनेपर्सनल लोनवर प्रोसेसिंग फीस न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज आणि स्वस्तात लोन मिळू शकते. पर्सनल लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत. येथे आम्ही तुम्हाला ‘या’ फायद्यांविषयी सांगत आहोत.

सिक्योरिटीची गरज नाही
पर्सनल लोन हे अनसिक्योर्ड लोन आहे आणि त्यामुळे अर्जदाराला लोनसाठी कोणतीही सिक्योरिटी देण्याची गरज नाही. बँका साधारणपणे कर्जदाराचे उत्पन्न, कॅश फ्लो, क्रेडिट स्कोअर आणि री-पेमेंट कॅपॅसिटीच्या आधारे ही कर्जे देतात. या आधारे कर्जाची रक्कम आणि व्याजदर ठरवले जातात. चांगली री-पेमेंट कॅपॅसिटी, चांगला क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न यामुळे अर्जदाराला कमी व्याजाने लोन मिळते.

आपल्या पद्धतीने पैशांचा वापर करा
तुम्ही तुमच्या गरजेनुसार पर्सनल लोनचे पैसे वापरू शकता. कोरोनाच्या काळात तुमचा वैद्यकीय खर्च किंवा इतर गरजा भागवण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज असल्यास, तुम्ही पर्सनल लोन घेऊन या गरजा पूर्ण करू शकता. पर्सनल लोनची रक्कम थेट कर्जदाराला वितरित केली जाते. पर्सनल लोन घेण्यामागचा उद्देश सांगण्याची देखील गरज नाही.

कर्जाचा कालावधी
पर्सनल लोन फ्लेक्सिबल री-पेमेंट कालावधीसह येतात जे सहसा 12 महिने आणि 60 महिन्यांदरम्यान असते. अशा परिस्थितीत, तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ज्या कालावधीसाठी लोन घ्यायचे आहे ते तुम्ही निवडू शकता. पर्सनल लोनशी संबंधित प्री-पेमेंट आणि प्री-क्लोजर चार्जेस देखील आहेत.

पूर्व-मंजूर केल्यावर लोन सहज उपलब्ध होते
तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, बँक तुम्हाला पूर्व-मंजूर पर्सनल लोन देऊ शकते. यामध्ये कमीत कमी कागदी कामासह झटपट कर्ज उपलब्ध आहे. कर्जाचा अर्ज बँकेने दिलेल्या लिंकद्वारे किंवा ऑनलाइन बँकिंगमध्ये लॉग इन करून करता येतो. तुम्ही स्वीकारल्यानंतर, काही मिनिटांत रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. हे कर्ज तुम्हाला सहज आणि कमी व्याजदरात मिळू शकते.

टॅक्स सूट मिळू शकते
पर्सनल लोनवर टॅक्स आकारला जात नाही, कारण कर्जाची रक्कम उत्पन्न मानली जात नाही, मात्र हे लक्षात ठेवा की तुम्ही बँक किंवा NBFC सारख्या कायदेशीर स्रोताकडून लोन घेतले आहे. तथापि, लोनवरील कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला अनेक कागदपत्रे दाखवावी लागतील. यामध्ये खर्चाचे व्हाउचर, बँकेचे सर्टिफिकेट, सॅंक्शन लेटर आणि ऑडिटर लेटर इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.

पंजाब नॅशनल बँक आणि एसबीआयने प्रोसेसिंग फीस माफ केली
पंजाब नॅशनल बँकेने 31 डिसेंबरपर्यंत होम लोन, व्हेईकल लोन, माय प्रॉपर्टी लोन, पर्सनल लोन, पेन्शन लोन आणि गोल्ड लोन यांसारख्या प्रॉडक्ट्सवर प्रोसेसिंग फीस न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्सने पार केला 60 हजारांचा टप्पा

Recession

नवी दिल्ली । नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी चांगली झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सेन्सेक्सने पुन्हा 60 हजारांचा टप्पा पार केला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,490.83 अंकांच्या (2.55 टक्के) वाढीसह 59,744.65 वर बंद झाला, तर निफ्टी 458.65 अंकांनी (2.6 टक्के) वाढून 17,812.70 वर बंद झाला.

कोरोना पार्श्वभूमी असून देखील परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) खरेदी केली. यासोबतच बँकिंग तसेच ऑइल अँड गॅस शेअर्स मध्येही जोरदार खरेदी झाल्याने बाजाराला दिलासा मिळाला मिळाला . बीएसई लार्ज-कॅप इंडेक्स 2.5 टक्क्यांनी वाढला. ग्रासिम इंडस्ट्रीज, पिडिलाइट इंडस्ट्रीज आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन प्रत्येकी 10 टक्क्यांनी वाढले तर कॅडिला हेल्थकेअर, टेक महिंद्रा, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज आणि इन्फोसिस 4-6 टक्क्यांनी घसरले. .

स्मॉल कॅप इंडेक्स 2 टक्क्यांनी वाढला

BSE स्मॉल-कॅप इंडेक्स 2 टक्क्यांनी वाढला, ज्यात BGR एनर्जी सिस्टम्स, जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स, टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र), 63 मून टेक्नॉलॉजीज, डीबी रियल्टी, उर्जा ग्लोबल, जेपी इन्फ्राटेक, ग्रीव्हज कॉटन, स्टील एक्सचेंज इंडिया आणि जेबीएम ऑटोमध्ये 25 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली.दुसरीकडे, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, स्पंदना स्फुर्टी फायनान्शियल, सूर्या रोशनी, धानुका एग्रीटेक आणि ब्रिगेड एंटरप्रायझेस 10 टक्क्यांहून अधिकने घसरले.

एयू स्मॉल फायनान्स बँक, राजेश एक्सपोर्ट्स, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, फेडरल बँक आणि पेज इंडस्ट्रीज आघाडीवर असताना बीएसई मिड-कॅप इंडेक्स 2 टक्क्यांनी वाढला तर एबॉट इंडिया, बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट, एमफेसिस, टोरेंट फार्मास्युटिकल्स आणि ग्लेनमार्क फार्मा घसरले.

रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप सर्वाधिक वाढले

जर आपण बीएसई सेन्सेक्सवर नजर टाकली तर, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात सर्वाधिक वाढली, त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजला मार्केटकॅपच्या बाबतीत सर्वाधिक फटका बसला.

FII ने 1,082.83 कोटी रुपयांची इक्विटी खरेदी केली

इतर क्षेत्रांकडे पाहिल्यास, बँकेक्स आणि ऑइल अँड गॅस इंडेक्स अनुक्रमे 6.3 टक्के आणि 5.3 टक्के वाढले, तर हेल्थ सर्व्हिसेस आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इंडेक्स 1-2 टक्क्यांनी घसरले.

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) 1,082.83 कोटी रुपयांची इक्विटी खरेदी केली आणि देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 3,293.28 कोटी रुपयांची इक्विटी खरेदी केली. भारतीय रुपया 7 जानेवारी रोजी 74.30 प्रति डॉलर वर उभा राहिल्याने गेल्या आठवड्यात बहुतांशी अपरिवर्तित राहिला. तर भारतीय रुपया 31 डिसेंबर रोजी 74.33 वर बंद झाला.

कुत्रा समजून घरी आणला ‘हा’ प्राणी; सत्य समजताच बसला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कुत्रा हा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो, त्यामुळे जगात अनेकजण स्वरक्षणासाठी कुत्रा पाळतात. चीन मध्ये असाच एक माणसाने घरी एक कुत्र्याचे पिल्लू आणलं होत मात्र नंतर ते कुत्र्याचे पिल्लू नसून चक्क उंदीर आहे हे समजल्यावर त्याला धक्काच बसला.

चीनमधील शांघाई शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एक कुत्र्याचं पिल्लू घरी आणलं होतं. हे पिल्लू मोठं झाल्यावर घराचं रक्षण करेल असा त्याचा विश्वास होता. परंतु या पिल्लात कुत्र्यासारखी कुठलीच लक्षण नव्हती. त्याला मग संशय येऊ लागला. कारण ते इतर कुत्र्यांप्रमाणे चालत नाही, पळत नाही, आणि भुंकत देखील नाही. गडबड कय आहे? याचा शोध घेण्यासाठी अखेर तो डॉक्टरांकडे गेला. तेव्हा खरा प्रकार त्याच्या लक्षात आला.

हा उंदीर सेम कुत्र्यासारख दिसत असलं तरी ते उंदराचे पिल्लू असल्याचे समजताच त्याला धक्काच बसला. हा उंदीर त्या व्यक्तीला एका डोंगराळ भागात सापडला होता. चीनमध्ये अशा प्रकारच्या उंदराच्या प्रजाती आढळून येतात. चीनमध्ये यापूर्वी देखील एका व्यक्तीने कुत्रा समजून ३ वर्ष अस्वल पाळले होते

GDP वाढीचा अंदाज 9.2 टक्के; सरकारने जारी केले एडवांस इस्टीमेट

नवी दिल्ली । मार्च 2022 ला संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP 9.2 टक्के राहण्याचा अंदाज सरकारने वर्तवला आहे. सरकारने जाहीर केलेला पहिला अंदाज दर्शवितो की, भारतीय अर्थव्यवस्था कोविड-19 च्या संकटातून बाहेर येत आहे आणि गती मिळवत आहे.

सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेला GDP वाढीचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अंदाजापेक्षा कमी आहे. RBI ने 9.5 टक्के GDP वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत GDP 8.4 टक्क्यांनी वाढला आहे. अशा प्रकारे भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे.

काय आहे अंदाज

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणीने एका निवेदनात म्हटले आहे की, 2021-22 मध्ये वास्तविक GDP किंवा कॉन्स्टंट प्राइस (2011-12) मध्ये GDP 147.54 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तर 31 मे 2021 रोजी जाहीर झालेल्या आर्थिक वर्ष 2020-21 साठी GDP चा तात्पुरता अंदाज 135.13 लाख कोटी रुपये होता. 2021-22 मध्ये वास्तविक GDP 9.2 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, 2020-21 मध्ये 7.3 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याच वेळी, 2021-22 मध्ये रिअल GVA 8.6 टक्क्यांच्या वाढीसह 135.22 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. जो 2020-21 मध्ये 124.53 लाख कोटी इतका होता

लग्न सोहळ्यातून नवरीचे चोरी केलेले 25 लाखांचे दागिने जप्त

औरंगाबाद – महिनाभरापूर्वी बीडबायपास येथील सुर्यालॉन्समधील लग्नातून ३६ लखाचे दागिने पळविणाऱ्या चोरट्याकडून स्थनिक गुन्हेशाखेच्या पथकाने हिरेजडित हारासहित 25 लखाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

6 डिसेंबर रोजी बीडबायपास येथील सुर्यालॉन्स या मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यातून आरोपी अभिषेक विनोद भानुलिया याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने नजरचुकवत 36 लखाचे दागिने लंपास केले होते. गुन्हेशाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने या टोळीचा माग काढत आरोपीला अटक केली. त्यांच्या ताब्यातून 42 तोळे वजनाचे 24 लाख 77 हजार 850 रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहे.

मध्यप्रदेश राज्यातील टोळीने नागपूर, अमरावती, नाशिक, अकोला, ठाणे, पुणे, मीरा भाईंदर या ठिकाणी लहान मुलांचा उपयोग करून चोरी केली आहे. लग्न सोहळ्यात अनोळखी लहान मुलांकडून मौलवण वस्तू सांभाळावे असे आवाहन पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी केले आहे.

राज्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेण्याची शक्यता

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली असून तब्बल 1 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील अनेक नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा चिंताजनक आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लॉकडाउन चा निर्णय घेणार की निर्बंध अजून कडक करणार याकडे जनतेचे लक्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधल्यानंतर सविस्तर चर्चा करून राज्यात लॉकडाउन लावायचा की निर्बंध अजून कडक करायचे याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील अस समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील नाईट कर्फ्यु बाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील अस म्हंटल होत.

राज्यात रात्रीच्या वेळी फिरणे, अतिरिक्त गर्दी करणे, धार्मिक स्थळे , चित्रपटगृह, मंदिरे यावर निर्बंध लागू होऊ शकतात. कोरोना रुग्णसंख्या अशीच दिवसेंदिवस वाढत गेली तर लॉकडाऊन केल्याशिवाय सरकारकडे पर्याय उपलब्ध नसेल.त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता वाढली आहे.

सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या थायलंडमधील मुलींचा धक्कादायक खुलासा, ‘या कामासाठी आम्ही पुरुषांना…’

इंदूर । इंदूरमध्ये नुकत्याच पकडलेल्या सेक्स रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. यामध्ये पकडल्या गेलेल्या थायलंडमधील मुलींपैकी 4 मुली आधी पुरुष होत्या. लिंग बदल झाल्यानंतर त्या भारतात आल्या. त्यांच्या पासपोर्टवरही पुरुष असे लिहिलेले होते. हे सर्वजण स्पा सेंटरमध्ये काम करण्याच्या नावाखाली देहविक्री करायचे. पोलिसांनी स्पा ऑपरेटरसह या सर्व मुलींना तुरुंगात पाठवले आहे.

महिला स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी सांगितले की, सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळाल्याने छापा टाकल्यानंतर सर्व मुलींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. यापैकी परदेशी तरुणींचे पासपोर्टही दिसले. त्यावेळी चार मुलींच्या पासपोर्टवर पुरुष लिहिलेले असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते पहिले पुरुष असल्याचे समोर आले. त्यानंतर लिंग बदलून ते सेक्स वर्कर बनले.

आधी अटक केलेल्या मुलींनी कारण सांगितले
पोलिसांनी सांगितले की, मसाज पार्लरमधून अटक करण्यात आलेल्या दोन मुलींना यापूर्वीही अटक करण्यात आली आहे. स्पा सेंटरचा मॅनेजर संजय वर्मा यालाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे. मुलींनी सांगितले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा सेक्स रॅकेटमध्ये पकडले गेले तेव्हा कायदेशीर कारवाईसाठी त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले. खटला संपेपर्यंत त्या देश सोडून जाऊ शकत नाही, या अटीवर त्यांना जामीन मिळाला. अशा परिस्थितीत जामिनावर बाहेर येणे आणि जीवन जगणे हे आव्हान आहे. कारण पासपोर्टशिवाय ते त्यांच्या देशात जाऊ शकत नाहीत. म्हणूनच जीवन जगण्याशिवाय देहविक्री शिवाय पर्याय नाही.

18 जणांना अटक करण्यात आली
विशेष म्हणजे 6 जानेवारी रोजी सायंकाळी गुन्हे शाखा आणि महिला पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत विजय नगर पोलीस ठाणे हद्दीतील शगुन आर्केडमध्ये सुरू असलेल्या स्पा पार्लरवर छापा टाकला होता. इंदूरचे आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी सूचना दिल्या होत्या. येथे घटनास्थळावरून 18 जणांना अटक करण्यात आली. त्यात काही थायलंडच्या मुली होत्या. पूर्ण सुसज्ज स्वतंत्र केबिन होत्या. केबिनमध्ये एक तरुणी संशयास्पद अवस्थेत उपस्थित होती. सर्व केबिनमध्ये परदेशी मुली होत्या. पोलिसांना पाहताच तरुणी रडू लागल्या. वर्षभरापूर्वी या इमारतीवर गुन्हे शाखेने छापा टाकला होता. त्यानंतरही येथून विदेशी तरुणींना सेक्स करताना पकडण्यात आले होते. मात्र, त्यावेळी पोलिसांनी मुख्य गुंडाची सुटका केली होती. पोलिसांचा कडकपणा कमी झाल्यावर पुन्हा गुंडांनी या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू केले.

चर्चा सुज्ञ नागरिकाची : कराड शहरात पाणी कपातीनंतर पुन्हा बॅनरबाजी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा- कोयना नदीकाठी असलेल्या कराड शहरावर पाणी कपातीची वेळ आलेली आहे. या पाणी कपातीमुळे नागरिकांच्यातून एक सुज्ञ नागरिक बॅनरबाजी करू लागला आहे. या सुज्ञ नागरिकाने बॅंनरबाजीतून आपला हक्क सांगितला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित जबाबदारीची जाणीव करून देताना आपण सेवक आहात… मालक नाही, आम्ही अन्याय सहन करणार नाही, पाणी आमच्या हक्काचं… नाही कुणाच्या बापाचं, पाणी पुरवठा विभागाला अचानक तोटा कसा असे प्रश्न व सल्ले बॅनरमधून दिले आहेत.

नदीकाठी राहूनही कराडकरांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागणार, अशी परिस्थिती या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. काल मुख्याधिकारी कराड यांनी 11 तारखेपासून एक वेळ पाणी येणार नाही, असे निवेदन दिले. या निवेदनामुळे सर्व कराडकरांना धक्काच दिला. या निर्णया विरोधात शहरात आज काही सुज्ञ नागरिकांनी पूर्ण कराडमध्ये या विरोधात गांधीगिरी मार्गाने चौका चौकात बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा अन्यायकारक निर्णय रद्द झाला पाहिजे. ज्या पाण्यासाठी कराड ओळखले जाते, राज्यात कुठेही पाण्याचा तुटवडा पडला तरी कराडमध्ये कमी पडणार नाही असे छाती ठोकून सांगितले जाते. त्याच कराडमध्ये ही लाजिरवाणी बाब होत आहे.

नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कराडचे मुख्याधिकारी यांनी कराडमध्ये 11 तारखे पासून एकवेळच पाणी येणार अशा स्वरूपाचे परिपत्रक काढले. या परिपत्रकामुळे कराडकरांची झोपच उडाली आहे. गेली दोन ते तीन वर्षांपूर्वी शहरात 24 तास पाण्याची पाईपलाईन टाकली गेली आहे. आता नागरिकांना प्रतीक्षा आहे, ती 24 तास पाणी आपल्या दारात येण्याची.

शहरात पाणी कपातीचे कारण…

कराड नगरपालिकेच्यावतीने कराड शहरात सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेस पाणी पुरवठा केला जातो. यासाठी नगरपालिकेला सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च आहे, मात्र तूलनेत उत्पन्न कमी आहे (साडेतीन कोटी). दर महिन्याला पलिकेला एमएसीबीचे बिलावर सर्वात मोठा खर्च करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत नगरपालिकेस ही योजना चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 8 कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा सुरू ठेवत असताना यात साडेचार कोटींचा तोटा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी सध्या नगरपालिकेकडे खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.