Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2976

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ED कडे तक्रार

औरंगाबाद – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात 22 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकऱणी ईडीकडे तक्रार आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांची देखील ईडीकडून चौकशी होऊ शकते.

अब्दुल सत्तार यांच्याविरोधात काही गैरव्यवहार केल्या प्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्तार यावर नेमकी काय प्रतिक्रीया देतात हे पाहावं लागणार आहे.

गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते ईडीच्या रडारवर आले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपल्या घरी सरकारी पाहुणे येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली होती.

जनधन खातेधारकांसाठी खुशखबर !! 2.30 लाखांपर्यंत मोफत सुविधा; कसे ते जाणून घ्या

Jandhan Account

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या काही वर्षांत तिप्पट झाली आहे. मार्च 2015 मध्ये खात्यांची संख्या 14.72 कोटींवरून 43 कोटींवर गेली आहे. मोदी सरकारची ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरली आहे. आज आपण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा जाणून घेऊयात.

प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे गरीब लोकांसाठी बँकांचे दरवाजे उघडले गेले आहेत आणि त्यांना जन धन खाते पासबुक आणि रुपे कार्डची नवीन सुविधा दिली आहे. या योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर, प्रत्येकाला स्वस्त विमा, पेन्शन आणि इतर आर्थिक उत्पादनांची सुविधा देखील दिली जाते.

2.30 लाखांचा लाभ मिळेल

जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. खातेदारांना 1,00,000 रुपयांचा अपघाती विमा आणि 30,000 रुपयांचा सामान्य विमा दिला जातो. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. अशा प्रकारे जन धन खातेधारक 2.30 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकतात.

खाते कसे उघडायचे ?

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. मात्र, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. तुमचे दुसरे सेविंग खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यातही वळवू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून जास्त आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ?

जन धन खाते उघडण्यासाठी KYC अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी केली जाते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या कागदपत्रांचा वापर करून जन धन खाते उघडता येते.

‘या’ बँकांमध्ये उघडता येतात खाती

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाती उघडली जातात. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जन धन खाते उघडू शकता. मात्र, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता.

कोणत्या खाजगी बँकांमध्ये जन धन खाते उघडू शकता

धनलक्ष्मी बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, फेडरल बँक, आयएनजी वैश्य, कोटक महिंद्रा, कर्नाटक बँक, इंडसइंड बँक हे देखील जन धन खाते उघडण्याची सुविधा देतात.

बिझनेस डील्समध्येही 2021ची बाजी; तब्बल 115 अब्ज डॉलर्सचे विक्रमी 2224 डील्स

मुंबई । 2021 हे वर्ष बिझनेस डील्सच्या बाबतीतही आघाडी वर आहे. गेल्या वर्षी व्हॅल्यू आणि व्हॉल्युम या दोन्ही बाबतीत विक्रमी बिझनेस डील्स झाले. या दरम्यान, एकूण 115 अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीच्या 2,224 हून जास्त डील्स झाल्या. 2020 च्या तुलनेत २०२१ मध्ये 37 अब्ज डॉलर्स आणि 867 डील्स जास्त झाल्या .

ग्रँट थॉर्नटनच्या आकडेवारीनुसार, अहवाल कालावधीत 499 विलीनीकरण आणि अधिग्रहण (M&A) डील्स झाल्या. त्यांची एकूण रक्कम 42.9 अब्ज डॉलर्स होती. याव्यतिरिक्त, 48.2 अब्ज डॉलर्स किमतीचे 1,624 खाजगी इक्विटी डील्स होत्या. 23.9 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचे 101 IPO आणि QIP (पात्र संस्थात्मक प्लेसमेंट) होते. एकट्या IPO मधून विक्रमी 17.7 बिलियन डॉलर्स जमा झाले.

मोठ्या डील्सचे प्रमाण जास्त

गेल्या वर्षी, मोठ्या डील्सच्या बाबतीतही एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आणि प्रत्येकी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या 14 डील्स होत्या. 15 डील्स 50 कोटी डॉलर्स ते 99.9 कोटी डॉलर्स दरम्यान होते. याशिवाय 135 डील्स 10 कोटी डॉलर्स ते 49.9 कोटी डॉलर्स दरम्यान होते.

या रिपोर्टमधये असे म्हटले गेले आहे की, मोठ्या डील्स केवळ आठ टक्के होते, मात्र त्यांच्याकडून 80 टक्के रक्कम मिळाली. एकूण डील्सपैकी 76 टक्के देशांतर्गत आणि बाकीचे विदेशी डील्स होते.

स्टार्टअप्स आघाडीवर

त्यापैकी 66 टक्के फंड स्टार्टअप्सकडे गेला. त्यानंतर एकूण 32 टक्के ई-कॉमर्सचा क्रमांक लागला. रिटेल आणि ग्राहक, शिक्षण आणि फार्मा खेळाडू सर्वाधिक ऍक्टिव्ह होते. IPO आणि QIP चा विचार केला तर, 2021 मध्ये 6.2 अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचे 36 QIP होते. 2011 पासून अशा प्रकारे फंड उभारणारे हे तिसरे सर्वात मोठे माध्यम बनले आहे.

स्टार्टअप्स, ई-कॉमर्स आणि आयटी कंपन्या 2021 मध्ये IPO आणि पैसे गोळा करण्याच्या बाबतीत प्रमुख डील चालक होते. या वर्षी 33 युनिकॉर्नची वाढ देखील झाली.

कोरोना बाधित तीनशेकडे : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 8 टक्क्यांकडे

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 292 जण बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसापूर्वी शंभराच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येवू लागला आहे. दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित गुरूवार नंतर शुक्रवारीही आले.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 292 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 7. 26 टक्के आला आहे. कोरोना सोबत अोमिक्राॅन आणि व्हायरल आजाराचे प्रमाण वाढलेले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान सामोरे उभे राहताना दिसत आहे. कोरोना चाचणी बरोबर बाधितांचा आकडा वाढलेला दिसून येत आहे.

 

सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; ‘या’ योजनेअंतर्गत मिळवा फायदा

Digital Gold

नवी दिल्ली | सरकार जनतेला स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना 2021-22 – सिरीज-XI च्या अंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (10 ते 14 जानेवारी) खुली असेल. सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड सरकारच्या वतीने RBI जारी करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सरकारी गोल्ड बाँड योजनेच्या 2021-22 च्या नवीन सिरीजसाठी 4,786 रुपये प्रति ग्रॅम किंमत निश्चित केली आहे.

ऑनलाइन खरेदीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळेल

ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट दिली जाईल. अशा गुंतवणूकदारांना ही गोल्ड बाँड योजना 4,736 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने मिळेल.

सॉव्हरेन गोल्ड बॉण्डची खरेदी कुठे करू शकतो?

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे गोल्ड बॉण्डस सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे विकले जातील. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेत हे गोल्ड बॉण्डस विकले जात नाहीत.

जास्तीत जास्त 4 किलो पर्यंत बॉण्ड खरेदीची लिमिट

सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो गोल्ड बाँड खरेदी करू शकते. त्याच वेळी, किमान एक ग्रॅम गुंतवणूक असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, ट्रस्ट किंवा तत्सम संस्था 20 किलोपर्यंतचे बॉण्ड्स खरेदी करू शकतात. अर्ज किमान 1 ग्रॅम आणि त्याच्या पटीत जारी केले जातात.

बहिण-भाऊ थोडक्यात बचावले… झाडीत दबा धरुन बसलेल्या बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग

सांगली । वाळवा तालुक्यात अनेक भागांमध्ये गवा दिसून आल्याने नागरिकात भितीदायक वातावरण आहे. दरम्यान काही दिवसांपासून गायब असलेला बिबटया नेर्ले व कापूसखेड परिसरात सक्रिय झाला आहे. गुरूवारी रात्री नेर्ले ते कापूसखेड दरम्यान मार्गावर मोटरसायकलवरून जाणाऱ्या बहिण-भावंडावर बिबटयाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून मोटरसायकल वेगाने पळवल्याने मोठा अनर्थ टळला. वाळवा तालुक्यातील महामार्गालगत असणाऱ्या डोंगर व शेताच्या परिसरात बिबटयाचे अनेक दिवसांपासून वास्तव्य आहे.

मध्यंतरीच्या काळात बिबटया दिसून येत नव्हता. गुरूवार दि.6 जानेवारी रोजी कापूसखेड येथील महाविद्यालयीन तरूण अनिकेत पाटील व त्याची बहिण मोटरसायकलवरून नेर्ले येथे पाहुण्यांकडे गेले होते. रात्री 9.30 च्या सुमारास कापूसखेड गावी परतताना नेर्ले येथील कदम वस्तीजवळ ऊसातून बिबटयाने अचानकपणे मोटरसायकलवर झेप घेतली. अनिकेत पाटील याने प्रसंगावधान राखून मोटरसायकल वेगाने पळवली. तरीही बिबटया तब्बल दिडशे मीटरपर्यंत मोटरसायकलचा पाठलाग करत होता.

दरम्यान कासेगाव येथील तिघेजण मोटरसायकलवरून कापूसखेड मार्गे नेर्लेकडे जातानाही बिबटयाने युवकांच्या मोटरसायकलचा पाठलाग केला. तिघा तरूणांनी आरडाओरडा केल्याने बिबटयाने ऊसात धूम ठोकली. या प्रकाराने तिघे युवक पुरते घाबरले होते. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी नेर्ले ग्रामस्थांना दिली. कापूसखेड येथे बिबटयाने केलेल्या हल्ल्याची माहिती मिळताच काही धाडसी युवकांनी बिबटयाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कापूसखेड व नेर्ले दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी मोटरसायकलने प्रवास करू नये. प्रवासा दरम्यान सतर्कता बाळगावी असे आवाहन कापूसखेडच्या सरपंच मंदाताई धुमाळे यांनी केले आहे.

मुंबईहून रेल्वेने जालन्यात, विनामास्क ग्रामस्थांशी चर्चा.. दानवे पॉझिटीव्ह आल्यानं ग्रामस्थ चिंतेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. रावसाहेब दानवे यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. परंतु कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी दानवे हे मुंबईहुन रेल्वेने जालन्यात आले होते तसेच ग्रामस्थांशी विना मास्क संवाद साधला. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेच वातावरण आहे.

कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी. असे ट्विट रावसाहेब दानवे यांनी केलं होत.

दरम्यान, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी रावसाहेब दानवे यांनी काल जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधला. जालना ते भोकरदन प्रवासात, माझ्या गावी जाताना वाटेमध्ये लागणाऱ्या राजूर, लिंगेवाडी, बाभुळगाव येथिल गावकऱ्यांशी संवाद साधला तसेच गावकऱ्यांनी देखील आपली मते व्यक्त केली असे ट्विट रावसाहेब दानवे यांनी काल सकाळीच केलं होतं.

मुळामध्ये कोरोनाची लक्षणे असताना दानवे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना चाचणी केल्यानंतर तो रिपोर्ट येईपर्यंत दानवे यांनी काळजी घायला हवी होती. तसेच तोपर्यंत कोणाच्या संपर्कात न येण्याचा प्रयत्न करायला हवा होता. मात्र अनेक लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी इतरांना तात्काळ चाचणी करण्यास सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मास्क वापरा अन्यथा दंड भरा असा नियम घालून सरकारच सामान्य नागरिकांकडून संद आकरुन मास्क वापरण्याची सक्ती करत आहे. पंतप्रधान मोदीही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना प्रशासनाला देत आहेत. मात्र अशात केंद्रीय मंत्रीच स्वत: मास्क घालत नसतील तर याला बेजबाबदारपणा म्हणायचा काय? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

‘हे’ महानगरपालिका क्षेत्र बनतंय कोरोनाचे हॉटस्पॉट

सांगली । राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असले शुक्रवारी जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला. सांगली शहरात आळढलेल्या दोन्ही रुग्ण ओमायक्रॉन कोरोनामुक्त झाले. तर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या तब्बल 92 विद्यार्थ्यांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात नव्याने 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अॅक्टीव्ह रुग्णसंख्येने चारशेचा आकडा ओलांडला. सांगली, मिरज महानगरपालिका क्षेत्र हॉटस्पॉट बनत असून तेथे 43 रुग्ण आढळून आले.

उर्वरित जिल्ह्यात 32 रुग्ण आढळले. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. सांगली शहरातील दोन व्यक्ती ओमायक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यासाठी धोक्याचा इशारा समजला गेल्याने धास्ती निर्माण निर्माण झाली होती. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेतल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले नव्हते. ओमायक्रॉन बाधित व्यक्ती किरकोळ त्रास असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. तब्ब्येत उत्तम झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली, दोन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे सांगली शहरात आळढलेल्या दोन्ही रुग्ण ओमायक्रॉन कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात चोवीस तासात नव्याने 72 रुग्ण आढळून आले. मंगळवारी आढळलेली रुग्णसंख्या काहीसी कमी झाली. मात्र रुग्णसंख्येत विशेष घट दिसून येत नाही. कोरोना संयशित असलेल्या रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या 1040 पैकी 24 बाधित तर 1152 अँन्टीजेन चाचणीमध्ये 56 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रात झपाट्याने रुग्ण वाढत असून हॉटस्पॉट बनत आहे. सांगली शहर 28, मिरज शहरात 15 रुग्ण आढळले.

देशाचा परकीय चलनाचा साठा पुन्हा कमी झाला, सोन्याच्या साठ्यामध्ये झाली वाढ

मुंबई | देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत पुन्हा घट झाली आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 1.466 अब्ज डॉलर्सने घसरून 633.614 अब्ज डॉलर्स झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी, 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 58.7 कोटी डॉलर्सने घसरून 635.08 अब्ज डॉलर्स झाला होता. यापूर्वी, 17 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 16 कोटी डॉलर्सने कमी होऊन 635.667 अब्ज डॉलर्स झाले होते. 10 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 7.7 कोटी डॉलर्सने घसरून 635.828 अब्ज डॉलर्स झाला आहे.

FCA 1.48 अब्ज डॉलर्सने कमी झाला
शुक्रवारी RBI ने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यातील ही घसरण मुख्यत्वे विदेशी चलन मालमत्ता (Foreign Currency Assets) मध्ये घट झाल्यामुळे झाली आहे, जी एकूण चलन साठ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की रिपोर्टींग वीकमध्ये भारताचा FCA 1.48 अब्ज डॉलर्सने घसरून 569.889 अब्ज डॉलर्स झाला आहे. डॉलरमध्ये नामांकित, FCAs मध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा प्रभाव देखील समाविष्ट असतो.

सोन्याच्या साठ्यात वाढ
याशिवाय, रिपोर्टींग वीकमध्ये सोन्याच्या साठ्याचे मूल्य 1.4 कोटी डॉलर्सने वाढून 39.405 अब्ज डॉलर्स झाले आहे. रिपोर्टिंग वीकमध्ये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये देशाचा SDR (Special Drawing Rights) 19.114 अब्ज डॉलर्सवर अपरिवर्तित राहिला. IMF मध्ये देशाचा चलन साठा 5.207 अब्ज डॉलर्स इतका आहे.

धनंजय मुंडेंचा आमच्या पक्षाला पाठिंबा; करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा

Karuna Munde Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली होती. आता तर आपल्या पक्षाला धनंजय मुंडे यांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. तसेच आपल्या मागे अनेक अदृश्य हात असल्याचे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

करुणा मुंडे या अहमदनगर येथून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, मी काही करु शकणार नाही असे वाटणाऱ्या पती धनंजय मुंडे यांचा आमच्या नव्या पक्षाला पाठिंबा व अभिमान असल्याचा दावा त्यांनी केला. एक अदृष्य शक्ती आपल्याकडून हे कार्य करवून घेत असून, महिला व सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

सध्याच्या राजकारणात नैतिकता उरली नाही. पैसा आणि स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणारी ही प्रवृत्ती वाढली आहे. ती दूर करण्यासाठी आपण नव्या पक्षाची स्थापना करत आहोत. भ्रष्टाचार आणि अत्याचारमुक्त महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे असेही करुणा मुंडे यांनी म्हंटल.