Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2996

2022 मध्ये कोणकोणत्या क्षेत्रात होईल अधिक कमाई; पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या

नवी दिल्ली । 2021 मध्ये भारतीय शेअर बाजाराने 20% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. या बुल रनमध्ये काही क्षेत्रांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. त्याचबरोबर आता कोणते क्षेत्र भरपूर कमाई मिळवून देईल, हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर कायम आहे.

आता डिजिटल, EV, तंत्रज्ञान, AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) सारखी क्षेत्रे गुंतवणूकदारांसाठी पर्याय म्हणून उदयास आली आहेत. 2020 मध्ये, नवीन तंत्रज्ञान आणि EV सेगमेंटने वाढत्या बाजारपेठेत आपले स्थान कसे मजबूत केले हे बाजाराने पाहिले. आज आम्ही तुम्हाला अशा 4 क्षेत्रांबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढे जाणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीचे प्रमुख पर्याय असतील.

AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)

मल्टीमॉडल आणि लिंग्विस्टिक सेक्टर्समध्ये, 2022 पर्यंत, तांत्रिक प्रगतीला वेग येण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांना कॉल सेंटर एनालिटिक्स, कस्टमायझेशन आणि क्लाउड वापर ऑप्टिमायझेशनमध्ये कमर्शियलाइज्ड AI हवे आहे, ज्यामुळे फंड मिळू शकेल. AI सेक्टर्समध्ये, Tata Elxi, Persistent, Bosch, Oracle, Happiest Minds सारख्या कंपन्या 2022 साठी चांगली ठरू शकतात.

5G Tech

5G ला अजून काही वेळ लागू शकतो. जर तुम्ही अस्थिरता सहन करू शकत असाल, तर गुंतवणुकीसाठी हे एक चांगले क्षेत्र असू शकते. अनेक 5G कंपन्या अजूनही नियोजनाच्या टप्प्यात आहेत. काही नवीन आणि सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होण्यापूर्वी भविष्याचा अंदाज लावत आहेत त्यामुळे आता या व्यवसायांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. गुंतवणूकदारांनी अशा कंपनीत गुंतवणूक करावी ज्याचा यशाचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे.

2022 पर्यंत देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G सर्व्हिस सुरू होण्याचा अंदाज आहे. गुरुग्राम, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता, मुंबई, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, जामनगर, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ आणि गांधीनगर ही शहरे 2022 मध्ये 5G टेक्नॉलॉजी मिळवतील. Jio, Bharti Airtel आणि Vodafone Idea (Vi) यांनी या शहरांमध्ये आधीच 5G ट्रायल साइट्स सेट केल्या आहेत. म्हणजेच भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकल
ईव्ही क्षेत्रात चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. आधीच, भारतातील अनेक राज्य सरकारांनी देशांतर्गत आणि जागतिक पुरवठादारांकडून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, गेल्या वर्षी, भारत सरकारने नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन विकसित केला आहे, ज्याचा उद्देश हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय इंधन सुरक्षा वाढवणे आहे. भारतीय शेअर बाजारात, टाटा मोटर्स, हिरो मोटरकॉर्प, टीव्हीएस, महिंद्रा यांसारख्या ईव्ही क्षेत्रातील काही नावे आहेत.

डिजिटल इंडिया
अर्धा अब्ज इंटरनेट युझर्स असलेल्या डिजिटल ग्राहकांसाठी भारत ही सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. लाखो भारतीयांसाठी, यामुळे कामाचे स्वरूप बदलेल तसेच प्रचंड आर्थिक मूल्य निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. भारताने 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट स्वतःसाठी ठेवले आहे.

भारत सरकारचा “डिजिटल इंडिया” प्रोग्रॅम हा 5 ट्रिलियन डॉलर्स असलेल्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. डिजिटल पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीमुळे GDP चार पटीने वाढण्याची अपेक्षा आहे. IRCTC, Paytm, Jio, CDSL आणि InfoEdge ही या क्षेत्रासाठी काही चांगली नावे आहेत.

Bitcoin ने पूर्ण केली 13 वर्ष, त्याचा आतापर्यंतचा प्रवास जाऊन घेउयात

नवी दिल्ली । बिटकॉइनला 13 वर्ष पूर्ण झाली आहे. किशोरावस्थेत प्रवेश करणारी ही पहिलीच क्रिप्टोकरन्सी ठरली आहे. बिटकॉइनची श्वेतपत्रिका (Whitepaper of Bitcoin) सतोशी नाकामोटो यांनी 28 ऑक्टोबर 2008 रोजी जारी केली होती, मात्र अनेकांच्या मते त्याच्या प्रिंटिंगची तारीख 3 जानेवारी 2009 आहे. त्यानुसार 3 जानेवारी हा त्याचा वाढदिवस मानला जातो. जर आपण 2009 पासून गणना केली तर ही करन्सी आता 13 वर्षांची झाली आहे.

Mudrex चे CEO आणि सह-संस्थापक एडुल पटेल म्हणतात की,” जगभरातील क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनच्या उदयामागे बिटकॉइन आधार स्तंभ आहे. बिटकॉइनचा हा 13 वर्षांचा प्रवास एखाद्या रोलर-कोस्टर राईडसारखा आहे. पण खरे वास्तव हे आहे की, बिटकॉइनने जबरदस्त रिटर्न दिला आहे. इतर कोणत्याही असेट्सने क्वचितच इतका रिटर्न दिला असेल.

करन्सी अस्तित्वासाठी लढत आहे
Itsblockchain चे संस्थापक हितेश मालवीय म्हणतात की,” आपल्या 13 वर्षांच्या प्रवासात बिटकॉइन अनेक वेळा जवळ जवळ गेल्यातच जमा होता. तसेच अजूनही तो आपल्या अस्तित्वासाठी लढतच आहे.” ते म्हणाले की,”गेल्या दोन वर्षांत बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या प्रकारात मोठा फरक पडला आहे. भविष्यात कमी अंदाजित रिटर्नच्या शक्यतेमुळे, या स्तरावर किरकोळ विक्रीपेक्षा संस्थात्मक गुंतवणूकदारांचे हित जास्त दिसते. रिटेलमध्ये काम करणाऱ्यांना बाजारात इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.”

बिटकॉइनची रिटर्न हिस्ट्री
मात्र, बिटकॉइन लाँच झाल्यापासून, त्याचे उत्पन्न मोजता येत नाही. कारण जेव्हा ते सादर केले गेले तेव्हा त्याची किंमत शून्य होती. 2010 मध्ये त्याची किंमत $0.09 पर्यंत वाढली. त्यानंतर, जर आपण त्याच्या किंमतीच्या सर्वोच्च पातळीबद्दल बोललो, तर नोव्हेंबर 2021 मध्ये ते $ 68,790 पर्यंत वाढले होते.

13 वर्षांच्या प्रवासात बिटकॉइनने इतका रिटर्न दिला आहे की, त्यावर विश्वास ठेवणे सोपे नाही. टक्केवारीत मोजून हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. मात्र तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की जर तुम्ही त्यात ₹ 1000 ची गुंतवणूक केली असती, तर तुमच्याकडे बिटकॉइनच्या सर्वोच्च स्तरावर 76.43 कोटी रुपये जमा झाले असते.

अर्थात, बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे, तरीही त्याचे रिटर्न पाहिले तर खूप चांगले आहेत. आजच्या किंमतीनुसार जरी हिशोब केला तरी तुम्हाला असे आढळेल की, तेव्हाचे 1000 रुपये आता 51 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

14 लाखांचे कॅमेरे घेऊन छायाचित्रकार बेपत्ता; शहरातील फोटोग्राफर मंडळीत खळबळ

औरंगाबाद – शहरातील सात छायाचित्रकारांचे महागडे कॅमेरे घेऊन अलिबाग येथे प्रीवेडिंग व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी गेलेल्या युवकाच्या विरोधात 14 लाख 55 हजार 640 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला. विशेष म्हणजे, ज्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला, तो युवक बेपत्ता असल्याची तक्रार एक दिवस आधी पुंडलिकनगर ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विशाल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश रतन गोत्राळ (वय 27, रा. गजानननगर, पुंडलिकनगर) यास अलिबाग येथे लग्नाच्या व्हिडीओ शूटिंगची मोठी ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्याने छायाचित्रकार विशाल वाघमारे यांच्या 1 लाख 35 हजार रुपयांच्या कॅमेऱ्यासह गजानन कचरू वेळंजकर यांचा 3 लाख 40 हजाराचा, सूरजकुमार मनोज इंगळे यांचा 4 लाख 4 हजारांचा, सोहेल शहा हुसेन शहा यांचा 1 लाख 67 हजार 640, श्रेयस लक्ष्मीकांत बुजाडे यांचा 79 हजारांचा, गजेंद्र बाबूराव मते यांचा 1 लाख 60 हजारांचा, राहुल विजय पवार यांचा 1 लाख 70 हजार रुपयांचा कॅमेरा दीड ते तीन हजार रुपये प्रति दिवस भाडेतत्त्वावर घेऊन गेला होता.

24 डिसेंबरला नेलेले हे कॅमेरे 1 जानेवारी रोजी परत आणून देण्याची बोली होती. मात्र 3 जानेवारीपर्यंत 14 लाख 55 हजार 640 रुपये किमतीचे कॅमेरे परत आणून देण्यात आले नाहीत. आरोपी योगेशसह फिर्यादी आणि इतर सर्वजण एकमेकांचे मित्र आहेत. योगेशवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.

BUDGET 2022-23: जाणून घेऊया अर्थसंकल्पाशी संबंधित 10 मनोरंजक गोष्टी

नवी दिल्ली । अर्थसंकल्प म्हणजे सरकारचे वार्षिक आर्थिक विवरण असते ज्यामध्ये महसूल, खर्च, वाढीचे अंदाज तसेच त्याची आर्थिक स्थिती यासारखे डिटेल्स असतात. सरकारच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशेब सर्वसाधारण अर्थसंकल्पात असतो. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 ला देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी जाणून घेऊयात आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पाबद्दलच्या काही खास गोष्टी

अर्थसंकल्पाशी संबंधित 10 मनोरंजक गोष्टी

1. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी 28 फेब्रुवारी 1950 रोजी सादर केला होता.

2. आर्थिक व्यवहार विभागाच्या dea.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 या साडेसात महिन्यांच्या कालावधीसाठी होता.

3. चेट्टी यांनी 1948-49 च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच अंतरिम (Interim) या शब्दाचा वापर केला. तेव्हापासून ‘अंतरिम’ या शब्दाचा वापर अर्थसंकल्पासाठी केला जाऊ लागला.

4. भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाची सुरुवात 1967 मध्ये सुरू झाले. यापूर्वी आर्थिक वर्ष 1 मे ते 30 एप्रिल असे होते.

5. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी 1970 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. सोबतच अर्थमंत्रालयाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता.

6. स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पात, अर्थसंकल्पाचा महसूल 171.15 कोटी रुपये आणि खर्च 197.29 कोटी रुपये होता.

7. सन 2000 पर्यंत इंग्रजी परंपरेनुसार संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात होता. 2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने ही परंपरा मोडीत काढली. आता सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू झाली.

8. देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला. ते 6 वेळा अर्थमंत्री आणि 4 वेळा उपपंतप्रधान होते.

9. वर्ष 2017 पूर्वी, अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केला जात असे. सन 2017 पासून, ते 1 फेब्रुवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या कामकाजाच्या दिवसापासून सुरू केले गेले.

10. यापूर्वी रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केले जात होते. 2017 च्या अर्थसंकल्पापासून केंद्रातील मोदी सरकारने रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात समायोजित करून आणखी एक प्रयोग केला. या दोघांना एकत्र सादर करण्याची परंपरा 2017 मध्ये सुरू झाली.

मुलाने सुपारी देऊन केला जन्मदात्याचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलघडा

सोनीपत : वृत्तसंस्था – हरियाणातील सोनीपतमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला आहे. वडिलांवर नाराज असलेल्या मुलाने आपल्या मित्रांना वडिलांचा खून कऱण्यासाठी पैसे दिले. किरकोळ वादातून त्याने हि हत्या केली आहे. त्याने अत्यंत शांत डोक्याने हि हत्या केली. त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला.

वडिलांसोबत होता वाद
हरियाणातील सोनीपतमध्ये राहणाऱ्या राजेंद्र नावाचे गृहस्थ त्यांच्या मोहित नावाच्या मुलासोबत आणि कुटुंबीयांसोबत राहत होते. या दोघा वडील- मुलामध्ये किरकोळ कारणावरून सतत भांडणं व्हायचे. यामध्ये सर्वात जास्त भांडण पैशांमुळे व्हायचे. आपले वडील आपल्याला पैसे देत नाहीत, याचा राग मोहितच्या मनात होता. यानंतर मोहितने पैसे न देणाऱ्या वडिलांना मारून त्यांची सगळी मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा मोहितने कट रचला.

मित्रांनाच दिली सुपारी
मोहितने त्याच्याच दोन मित्रांना वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. सचिन आणि मनदीप या दोन मित्रांना त्याने 7 लाख रुपयांची सुपारी दिली आणि आपल्या वडिलांचा खून करून त्याचे पुरावे नष्ट करण्यास सांगितले. त्यांना 3 लाख रुपये ऍडव्हान्ससुद्धा दिले होते. त्या पैशातून मित्रांनी ऍडव्हान्स देऊन एक होंडा सिटी गाडी खरेदी केली.

अशा प्रकारे केला खून
ठरलेल्या प्लॅननुसार सचिन आणि मनदीप हे मोहितच्या वडिलांना निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी खून केला. खून केल्यानंतर या दोघांनी मृतदेह होंडा सिटी गाडीत घालून गंगा नदीपात्रात फेकून दिला. मृतदेह वाहत जाईल आणि त्याचा कधीच कुणाला थांगपत्ता लागणार नाही, असे आरोपींना वाटले. यादरम्यान मोहितने आपले वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.

अशा प्रकारे झाला खुनाचा उलघडा
पोलिसांनी मोहितच्या वडिलांचा शोध घेत असताना मोहित आणि त्याच्या काही मित्रांकडे चौकशी केली. यावेळी काही जणांनी संदीप आणि मनजितसोबत त्यांना पाहिल्याचे सांगितले. यानंतर संदीप आणि मनजितची चौकशी केली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी मोहितला अटक करून अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जालन्यात दंगल; परंतू पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

जालना – शहरातील टांगा स्टँड येथे जुन्या वादातून दोन टोळक्यात हाणामारी सुरू झाली. मात्र काही वेळातच या हाणामारीने दंगलीचे स्वरूप घेतले. यात एक जण गंभीर जखमी झाला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती वेळीच आटोक्यात आणत बाजारपेठ पुन्हा सुरू झाली.

टांगा स्टँड येथ दोन जणांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर दंगलीत झाले. दोन समाजाचे काही जण एकत्र येऊन हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरत होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सदर बाजार प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक एम. ए. सय्यद, कदीम जालना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक व इतर पोलिस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत ‘ही’ उपकरणे; ते सुद्धा अगदी कमी किमतीत

नवी दिल्ली । देशात आणि जगभरात कोविड-19 चे रुग्ण वाढतच आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे लोकांच्या मनात दुसऱ्या लाटेच्या भयानक दृश्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा जाणवला.

म्हणूनच आता काळाची गरज आहे की आपल्या घरात असे काही गॅजेट्स असायला हवेत जे आपण आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकू. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही गॅजेट्सबद्दल माहिती देत आहोत जे केवळ स्वस्तच नाहीत तर बाजारातही अगदी सहजरित्या उपलब्ध आहेत आणि ते वापरण्‍यासही सोपे आहेत.

पल्स ऑक्सिमीटर

पल्स ऑक्सिमीटर हे कोविड-19 च्या तपासणीतील एक अतिशय महत्त्वाचे गॅजेट आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी थोड्या थोड्या अंतराने तपासावी लागते. ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे धोकादायक ठरू शकते. हे उपकरण हाताच्या बोटावर ठेवून तुम्ही पल्स रेट जाणून घेऊ शकता. हे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच ते घरात असलेच पाहिजे. पल्स ऑक्सिमीटर बाजारातही अगदी सहज उपलब्ध आहे. त्याची किंमत 500 रुपयांपासून सुरू होते.

ग्लुकोमीटर
हे गॅजेट रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. शुगर असलेल्या रुग्णांसाठी कोरोना अत्यंत जीवघेणा आहे. म्हणूनच कोरोनाच्या या काळात हे गॅजेट घरी असणे अत्यंत गरजेचे आहे. घरात कोणाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली किंवा वाढली तर घरीच तपासणी करून तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणे टाळू शकता. एक चांगला ग्लुकोमीटर 800 रुपयांमध्ये येतो.

कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर
शरीराचे तापमान हे कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर कोरोनाच्या तपासणीत एक अतिशय महत्त्वाचे गॅजेट आहे. याच्या मदतीने तुम्ही एखाद्याच्या शरीराला स्पर्श न करताही त्याचे तापमान मोजू शकता. घरातील कोणीतरी कोरोनाच्या विळख्यात असताना हे फक्त मदतच करत नाही, तर सावधगिरीच्या वापरासाठी देखील ते अत्यन्त प्रभावी आहे. एक चांगला थर्मामीटर हजार रुपयांपर्यंत मिळतो.

रॅपिड अँटीजन टेस्ट किट 
हे गॅजेट कोरोनाविरुद्धच्या युद्धासाठी अत्यंत प्रभावी आहे. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी कोरोनाची रॅपिड अँटीजन टेस्ट करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत आणि तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हॉस्पिटलमध्ये जायचे नसेल, तर घरी प्राथमिक चाचणी म्हणून हा एक चांगला पर्याय आहे. हे किट बाजारात 250 ते 300 रुपयांना मिळते.

नेब्युलायझर मशीन
हे मशीन मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते ऑनलाइनही ऑर्डर करू शकता. रुग्णाला ऑक्सिजन देण्यासाठी नेब्युलायझर मशीनचा वापर केला जातो. ते थेट फुफ्फुसात ऑक्सिजन पोहोचवते.

पॅनकार्ड वापरात असाल तर ‘हे’ काम कराच, अन्यथा 10 हजारांचा होईल दंड

PAN Card

नवी दिल्ली । जर तुमच्याकडेही पॅन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचा पर्मनण्ट अकाउंट नंबर (PAN) आधार कार्ड क्रमांकाशी जोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर या मुदतीपूर्वी तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक केला नाही, तर तुमचे पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह देखील केले जाऊ शकेल. याशिवाय, तुम्हाला आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 1,000 रुपये देखील द्यावे लागतील.

पॅन कार्ड धारकाची अडचण फक्त इथेच संपणार नाही, तर अशी व्यक्ती म्युच्युअल फंड, स्टॉक, बँक खाती उघडणे इत्यादींमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही, कारण तिथे पॅन कार्ड सादर करणे गरजेचे आहे.

‘या’ पॅनकार्डधारकांना 10,000 रुपये भरावे लागतील

पुढे, जर त्या व्यक्तीने तयार केलेले पॅन कार्ड व्हॅलिड नसेल, तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272N अंतर्गत, मूल्यांकन अधिकारी अशा व्यक्तीला दंड म्हणून 10,000 रुपये भरण्याचे निर्देश देऊ शकतात.

अशा प्रकारे ऑनलाइन लिंक करता येईल
>> सर्वप्रथम इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा.
>> आधार कार्डमध्ये दिल्याप्रमाणे नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर टाका.
>> आधार कार्डमध्ये फक्त बर्थ ईअर दिले असल्यास बॉक्समध्ये टिक करा.
>> आता कॅप्चा कोड टाका.
>> आता लिंक आधार बटणावर क्लिक करा
>> तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

तुम्ही SMS द्वारे अशा प्रकारे लिंक करू शकता

तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल.
यानंतर 12 अंकी आधार नंबर टाका.
त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर टाका.
आता स्टेप 1 मध्ये नमूद केलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.

इन ऍक्टिव्ह पॅन कसे ऍक्टिव्ह करावे ?

इन ऍक्टिव्ह पॅन कार्ड कसे ऍक्टिव्ह केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला SMS पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जावे लागेल आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवरून 10 अंकी पॅन नंबर टाकल्यानंतर स्पेस देऊन 12 अंकी आधार नंबर टाका आणि 567678 किंवा 56161 वर SMS करा.

‘आमचं प्रेम कुणाला कळलंच नाही’, सुसाईड नोट लिहून प्रेमीयुगालाची आत्महत्या

love sucide

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील रहिवासी असणाऱ्या एका प्रेमीयुगुलाने कोल्हापूरमध्ये येऊन आत्महत्या केली आहे. या दोघांनी आत्महत्या करण्याअगोदर एक सुसाईड नोट लिहिली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोघांच्याही घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे. या दोघानींही 31 डिसेंबरच्या रात्री अंबाबाई मंदिर परिसरातील यात्री निवासामध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना देण्यात आली असून ते या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

राहुल विश्वास मच्छे आणि प्रियांका विकास भराडे असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होते. या दोघांचे गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. या दोघांना एकमेकांशी प्रेमविवाह करायचा होता. पण दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. यामुळे हे दोघे नैराश्यात गेले. यानंतर त्यांनी कोल्हापुरात देवदर्शनासाठी जाऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

यादरम्यान पोलिसांना या प्रेमीयुगलाजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली. या नोटमध्ये ‘आम्ही दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करतो. पण आमचं प्रेम कोणाला कळलंच नाही. या जन्मात एकत्र राहू शकत नाही, पण एकत्र मरू शकतो’ असे लिहिले आहे. पोलिसांनी या दोघांजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे मृत प्रियांका भराडे हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र या दोघांचे त्याच्या अगोदरपासूनच प्रेमसंबंध होते. जुना राजवाडा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

स्वतःचा व्यवसाय सुरु करताय ?? SBI चे ‘हे’ फायदे पहाच

PIB fact Check

नवी दिल्ली । जर तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाची हि खास स्कीम पहाच. एसबीआय गोल्ड करंट अकाउंटवर (SBI Gold Current Account) अनेक सुविधा देते. आता तर SBI गोल्ड करंट अकाउंट वरून व्यवसायासाठीचे फायदेही सांगण्यात आले आहेत. SBI करंट अकाउंट लहान व्यावसायिक, व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना परवडणाऱ्या दरात सर्व वैशिष्ट्यांसह करंट अकाउंट हवे असते

SBI ने ट्विट करून दिली माहिती

SBI ने ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून SBI गोल्ड करंट अकाउंटच्या फायद्यांविषयी माहिती दिली आहे. ही माहिती देताना SBI ने म्हंटल की, तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करंट अकाउंटमध्ये तुमचा व्यवसाय वाढवण्याची सुवर्ण संधी आहे. आता तुमचे अकाउंट उघडताना तुम्ही विविध फायदे घेऊ शकता.

SBI च्या गोल्ड करंट अकाउंटमध्ये ‘हे’ फायदे उपलब्ध आहेत

SBI गोल्ड करंट अकाउंटमध्ये तुमची मासिक सरासरी शिल्लक रुपये 1,00,000 आहे.
या खात्यात तुम्ही दरमहा 25 लाख रुपये फ्रीमध्ये जमा करू शकता.
तुम्हाला दर महिन्याला 300 मल्टीसिटी पानांचे चेकबुक दिले जाईल.
तुम्ही तुमच्या होम ब्रँचमधून कोणतेही शुल्क न आकारता पैसे काढू शकता.
तुम्ही SBI च्या 22,000 पेक्षा जास्त शाखांमध्ये पैसे काढू आणि जमा करू शकता.
जर तुम्हाला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्ही RTGS आणि NEFT फ्रीमध्ये करू शकता.
तुम्ही दर महिन्याला 50 फ्री डिमांड ड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकता.
आपल्याला हवे असल्यास, आपण आपले करंट अकाउंट इतर कोणत्याही शाखेत ट्रान्सफर करू शकता.

याशिवाय, SBI Platinum Current Account ची सुविधा देखील देते. SBI Platinum Current Account मध्ये ग्राहकांना अनेक फायदे देखील मिळतात.

Platinum Current Account चे फीचर्स

>> मासिक सरासरी शिल्लक: 10,00,000 रुपये
>> दरमहा 2 कोटी रुपयांपर्यंत फ्री डिपॉझिट
>> होम ब्रँचमधून अनलिमिटेड कॅश विथड्रॉवल
>> अनलिमिटेड फ्री RTGS आणि NEFT
>> अनलिमिटेड फ्री मल्टीसिटी चेक लीफ
>> अनलिमिटेड फ्री डिमांड ड्राफ्ट
>> दररोज 2,00,000 रुपये काढण्याची लिमिट असलेले फ्री प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड