Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2997

पंतप्रधानांनाच मिळेना जन्मदाखला; नेमका काय आहे ‘हा’ प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपल्या जन्माचा दाखला आपल्याजवळ असावा असे वाटत असते. तो मिळवण्यासाठी अनेकवेळा हेलपाटेही घालावे लागतात. असाच अनुभव ‘राष्ट्रपती’ आणि त्यानंतर आता ‘पंतप्रधानांच्या’ बाबतीत आला आहे. पंतप्रधानांचा जन्म दाखला दिला जात नसल्याने त्यांच्या पालकांवर दाखला मिळवण्यासाठी आरोग्य केंद्रात हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान हे नाव संविधानिक असल्याचे कारण सांगत हा जन्म दाखला लाल फितीच्या कारभारात अडकून राहिला आहे. हा प्रकार एका दाम्पत्याच्या बाबतीत घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात चिंचोली भुसणी या ठिकाणी एका दाम्पत्य राहते. त्या दाम्पत्यांना दोन मुले झाली असून त्यांनी पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती आणि दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान असे ठेवले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या चिंचोलीचे दत्ता आणि कविता चौधरी या दाम्पत्याने 19 जून 2020 या दिवशी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले. या नावाचा जन्म दाखला त्यांना मिळाला त्याचे या दाम्पत्याने आधार कार्डही बनवले.

काही महिन्यापूर्वी या दाम्पत्याला बोरामणी जिल्हा सोलापूर येथे 10 नोव्हेंबर 2019 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसरे बाळ झाले. त्यांनी या बाळाचे नाव पंतप्रधान असे ठेवले. बाळाचा नामकरण विधी पार पडल्यानंतर बाळाचे वडील दत्ता चौधरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात पंतप्रधान नावाचा जन्म दाखला मिळावा यासाठी 27 नोव्हेंबरला अर्ज सादर केला. मात्र, त्याच्या नावाचा दाखला काही मिळाला नाही.

बाळाच्या नावावरून अधिकारीही चक्रावले

दत्ता चौधरी यांनी आपल्या मुलाचे नाव पंतप्रधान असे ठेवल्याने व त्याच्या जन्माचा दाखला मिळावा अशी मागणी केल्यास समजताच अधिकारीही चक्रावून गेले. पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे याबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी आरोग्य केंद्र सोलापूरच्या जिल्हा निबंधक जिल्हा मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक डिसेंबरला पत्र पाठवले आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून दत्ता चौधरी याने केलेल्या जन्म दाखल्याच्या अर्जाला आता एक महिना उलटून गेला तरी काहीच उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुलाच्या पालकांकडून जन्म दाखल मिळवण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये हेलपाटे घातले जात आहेत.

हृदयद्रावक ! धावत्या रेल्वेतून पडून मायलेकाचा दुर्दैवी अंत

dead

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मायलेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत झाला आहे. हे दोघेजण रात्रीच्या रेल्वेने नागपूरहून रेवा या ठिकाणी येत होते. यादरम्यान देव्हाडा माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी रेल्वेचे कर्मचाऱ्यांना मायलेकाचा मृतदेह सापडल्यानंतर हि धक्कादायक घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि करडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पूजा इशांत रामटेके असं मृत पावलेल्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर अथर्व इशांत रामटेके असं दीड वर्षाच्या मृत चिमुकल्याचं नाव आहे. इशांत रामटेके हे लष्करात जवान आहेत. ते गेले काही दिवस सुट्टीवर आले होते. सुट्टी संपल्यानंतर ते पुन्हा नागपूरहून आपल्या कुटुंबीयांसह रेवा या ठिकाणी जात होते. हे कुटुंब रात्रीच्या सुमारास रेल्वेने प्रवास करत होते.

काय घडले नेमके ?
इशांत यांची पत्नी पूजा यांना लघुशंका लागल्याने त्या आपल्या पतीला सांगून डब्यातील प्रसाधनगृहाकडे गेल्या होत्या. यावेळी दीड वर्षांचा अथर्व आईच्या पुढे धावत गेला. काही कळायच्या आतच तो तोल जाऊन माडगी व देव्हाड दरम्यान असलेल्या वैनगंगा नदीवरील रेल्वेपुलावरून नदीत पडला. यावेळी अथर्वच्या पाठीमागे आलेल्या पूजा यांनी चिमुकल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये त्यांचादेखील तोल जाऊन त्या धावत्या रेल्वेतून खाली पडल्या. या दुर्घटनेत दीड वर्षाच्या अथर्वचा नदीच्या पाण्यात बुडून तर आईचा पुलावरील खांबाला धडकुन मृत्यू झाला आहे.

ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने कोणालाच या घटनेचा पत्ता लागला नाही. बराच वेळ होऊनही पत्नी आणि मुलगा परत आले नाहीत, म्हणून सैनिक इशांत रामटेके यांनी धावत्या रेल्वेत पत्नी आणि मुलाची सगळीकडे शोधाशोध केली. पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. यानंतर इशांत यांनी गोंदिया पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता वैनगंगा नदीत मुलाचा तर रेल्वे पुलावर महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ; निफ्टी-सेन्सेक्स दोन्हीही वाढले

Share Market

नवी दिल्ली । 2022 चा दुसरा व्यापार दिवस देखील भारतीय शेअर बाजारात उत्साही होता. मंगळवारी सेन्सेक्स 672.71 अंकांच्या किंवा 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 59855.93 स्तरावर बंद झाला. निफ्टी 50 179.60 अंकांनी किंवा 1.02 टक्क्यांनी वाढून 17805.30 च्या पातळीवर बंद झाला आहे. त्याचप्रमाणे निफ्टी बँक 1.15 टक्क्यांच्या वाढीसह 36840.20 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीने 418.30 अंकांची वाढ नोंदवली.

एनटीपीसी, ओएनजीसी, एसबीआय, पॉवर ग्रिड आणि टायटन कंपनी मंगळवारी निफ्टीमध्ये टॉप गेनर्समध्ये होते, तर टाटा मोटर्स, कोल इंडिया, सन फार्मा, टाटा ग्राहक उत्पादने आणि श्री सिमेंट्स टॉप लुझर्समध्ये होते.

आजच्या ट्रेडिंगमध्ये मेटल आणि फार्मा शेअर्स वगळता सर्व सेक्टरल इंडेक्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले. पॉवर, बँका, ऑइल अँड गॅस सेक्टर सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, मिडकॅप इंडेक्स सपाट पातळीवर बंद झाला, तर स्मॉलकॅप इंडेक्स 0.39 टक्क्यांवर बंद झाला.

Cryptocurrency Price: क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण, पण PAPPAY ने 2 दिवसात दिला 1800% रिटर्न

Online fraud

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या दबावाखाली असून सोमवार, 4 जानेवारी 2022 रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जवळपास एक टक्क्यांची घसरण झाली. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट गेल्या 24 तासांमध्ये 0.82% ने खाली आला आहे. कालच्या तुलनेत आज क्रिप्टोकरन्सी मार्केट व्हॅल्युएशन 221 ट्रिलियन डॉलर्सवर घसरले आहे. काल 224 ट्रिलियन डॉलर्स होते. यामध्ये, Bitcoin चे वर्चस्व 39.6% आहे आणि Ethereum चे मार्केटमध्ये 20.2% वर्चस्व आहे.

Bitcoin, Solana, Ethereum, Binance Coin, Cardano, XRP आणि Terra Luna या प्रमुख करन्सीज गेल्या 24 तासांत रेड मार्कवर ट्रेड करत आहेत. PAPPAY या छोट्या करन्सीमध्ये मंगळवारी सुमारे 570 टक्क्यांनी वाढ झाली. काल सोमवारीही या करन्सीमध्ये तब्बल 1200 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली.

बाकीच्या करन्सीबद्दल जाणून घ्या
Bitcoin 1.10% घसरून 46,550.83 डॉलर्सवर ट्रेड करत होता, त्यामुळे त्याची मार्केटकॅप 879 अब्ज डॉलर्स आहे. Bitcoin च्या किंमतींनी आजचा नीचांक 45,835.96 डॉलर्स आणि गेल्या 24 तासांत 47,510.73 डॉलर्सचा उच्चांक गाठला आहे. Ethereum 3,772.82 डॉलर्सवर 1.09% खाली ट्रेडिंग करताना दिसले. Ethereum ने गेल्या 24 तासांत 3,698.05 डॉलर्सचा नीचांक आणि 3,836.20 डॉलर्सचा उच्चांक केला आहे. त्याची मार्केट कॅप सुमारे 448 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आले आहे.

Binance Coin 2.78% घसरले आणि 512.15 डॉलर्सवर ट्रेड करताना दिसले. Tether टोकन गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे आणि फक्त 1 डॉलर्सवर ट्रेड करत आहे. Solana 2.61 टक्क्यांनी घसरला आहे आणि 168.71 डॉलर्सवर ट्रेड करत आहे.

XRP, Cardano, Shiba Inu सुद्धा घसरले
लोकप्रिय करन्सी XRP 1.18 टक्क्यांनी घसरले आणि 0.8314 डॉलर्सवर ट्रेडिंग नोंदवले गेले. Cardano 2.18% खाली 1.33 डॉलर्सवर ट्रेड करत होता. Shiba Inu 2.69 टक्क्यांनी घसरले आणि 0.00003289 डॉलर्सवर ट्रेडिंग नोंदवले गेले.

आज टॉप गेनर क्रिप्टोकरन्सी
जर आपण गेल्या 24 तासांत सर्वात वेगाने वाढणाऱ्या करन्सी /टोकन्सबद्दल बोलायचे झाले तर Shuna Inuverse (SHUNAV) मध्ये 822.66% वाढ झाली आहे तर PAPPAY 570.36 टक्क्यांनी वाढली आहे. काल PAPPAY मध्ये त्याच वेळी 1200 टक्क्यांहून जास्तीची वाढ नोंदवली गेली. म्हणजे दोन दिवसांत PAPPAY मध्ये सुमारे 1800 टक्के वाढ झाली आहे. या दोन व्यतिरिक्त, OBRok Token (OBROK) 267.21 टक्क्यांनी वाढली आहे.

Karad खूनाचा उलगडा : दाजीला अडकविण्यासाठी मेव्हुण्याकडून महिलेचा खून

कराड | सोमवारी 3 जानेवारी 2022 रोजीचे कार्वे (ता.कराड जि. सातारा) गांवचे हद्दीत भैरवनाथ मंदिरा शेजारुन कृष्णा नदीचे पात्राकडे जाणारे रोडवरील अज्ञात महिलेचा खून सातारा गुन्हे शाखा आणि कराड तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे. बहिणीस त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी मेव्हुण्याने सदरील महिलेचा खून केल्याचे तपासात पोलिसांना सांगितले आहे. मयत वनिता आत्माराम साळुंखे (वय – 30 वर्षे रा. महिंद ता. पाटण जि. सातारा) असे खून झालेल्या  महिलेचे नांव असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तर शरद हणमंत ताटे (वय-30, रा. येरवळे, ता. कराड) असे संशयित आरोपीचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कार्वे गांवचे हद्दीत भैरवनाथ मंदिरा शेजारुन कृष्णा नदीचे पात्राकडे जाणारे रोडवरील अज्ञात महिलेचा खून झाला होता. अंदाजे 25 ते 30 वर्षीय महिलेला अज्ञात इसमाने, अज्ञात कारणास्त, अज्ञात साधनाने मारुन तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याकरीता गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा स्त्रीवरील अत्याचाराचा असल्याने स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पथक पाठविण्यात आले होते.

सदर पथकानें कराड येथे जावून कराड तालुका पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांच्या सोबत गुन्हयाच्या घटनास्थळास भेट दिली. तेथील परिस्थितीची माहिती घेवून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तेथे तपास केला असता मयताच्या अंगावर एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीमध्ये “एका इसमाचे नांव नमुद होते व त्याने मला लग्न करतो म्हणून आणले, माझ्याशी संबंध ठेवले व माझ्या बरोबर लग्न करत नसून मला मारहाण करून माझ्याशी संबंध ठेवले आहेत मी जीव दिला किंवा मला काय झाले तर त्यास तो जबाबदार आहे वगैरे मजकूर लिहला होता” तसेच चिठ्ठीमध्ये नांव नमुद असलेल्या इसमाच्या मेव्हुण्याकडे कौशल्याने तपास केला असता. त्याने सदरचा खून असल्याचे निष्पन झाले. असून त्याच्या चिठ्ठीमध्ये नांव नमुद असलेला इसम त्याच्या बहिनीस चिठ्ठीमध्ये नाव असलेला इसम  मारहाण करून त्रास देत असल्याने त्यास खूनाच्या गुन्ह्यात अडकविण्याकरिता आरोपीने मयत वनिता आत्माराम साळुंखे (वय ३० वर्षे रा. महिंद ता. पाटण जि. सातारा) या महिलेचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधोक्षक सातारा अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड डॉ. रणजित पाटील यांच्या सूचनाप्रमाणे व पोलीस निरीक्षक किशोर घुमाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तसेच पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो.हवा. शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, रोहित निकम, विशाल पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत कांबळे, पो. हवा. धनंजय कोळी, संजन जगताप, उत्तम कोळी यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईमध्ये सहभागी होते.

रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद उत्तमप्रकारे सांभाळू शकतात; शिवसेना नेत्याच्या विधानाने चर्चाना उधाण

Uddhav Thackeray Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असे मोठं विधान शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने इतर कोणाकडे तरी मुख्यमंत्रीपदाचा कारभार देण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू असतानाच सत्तार यांच्या वक्तव्याने नवे संकेत तर मिळाले नाहीत का अशी शंका उपस्थित होते.

अब्दुल सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात. रश्मी ताईची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू आहे. आज त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असतं. कारण त्या साहेबांच्या सोबत राहतात.

अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, महिलांना फक्त चूल आणि मुल न करता, त्यांना सक्षम कसं करायला पाहिजे यासाठी रश्मी ताईसाहेबांचं काम मोठं आहे. उद्धव साहेबांचा आदेश असेल तर मला वाटतं काहीही होऊ शकतं. जर उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर मला वाटतं त्यांच्यावर जबाबदारी देऊही शकतात असे अब्दुल सत्तार यांनी म्हंटल.

नांदेडमध्ये प्रेमीयुगुलाने व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून ‘या’ प्रकारे केला आपल्या लव्ह स्टोरीचा शेवट

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगाव याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका प्रेमीयुगलाने विष प्राशन करून आपल्या लव्ह स्टोरीचा भयानक शेवट केला आहे. या संबंधित तरुणाने मध्यरात्री आपल्या मोबाइलवरून स्वत:च्या श्रद्धांजलीचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटसला ठेवून हे टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी पहाटे काही मित्रांनी त्याचं स्टेटस पाहून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही फोन उचचला नाही. यानंतर हि सगळी घटना उघडकीस आली.

संबंधित प्रेमीयुगुलाने रविवारी मध्यरात्री वडगाव येथील शेतशिवारात जाऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास या दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच तामसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
हदगाव तालुक्यातील वडगाव या ठिकाणच्या एका 22 वर्षीय तरुणाचे गावातील एका 18 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण घरच्यांचा या दोघांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे हे प्रेमीयुगुल मागच्या काही दिवसांपासून चिंतेत होते. याच कारणामुळे नैराश्येत जाऊन त्यांनी रविवारी रात्री वडगाव येथील शेतशिवारात जाऊन विष प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला. मारण्याअगोदर दोघांनीही आपापल्या फोनवरून स्वत:च्याच श्रद्धांजलीचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी या प्रेमीयुगुलाच्या काही मित्रांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर हि घटना उघडकीस आली. तामसा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

तुमच्या हेल्थ पॉलिसीमध्ये ओमायक्रोन उपचारांचा देखील समावेश?? IRDA म्हणते की…

Post Office

नवी दिल्ली । विमा नियामक IRDA ने सोमवारी सांगितले की, Omicron व्हेरिएन्टच्या संसर्गाच्या उपचाराचा खर्च देखील कोविड-19 च्या उपचारांना इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जाईल. Omicron व्हेरिएन्टची वाढती प्रकरणे लक्षात घेता, IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांना ही सूचना जारी केली आहे.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने एक प्रेस नोट जारी करताना म्हटले आहे की, “सर्व सामान्य आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांनी जारी केलेल्या सर्व हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ज्यात कोविड-19 च्या उपचाराचा खर्च समाविष्ट आहे त्या पॉलिसीच्या अटी आणि नियमांनुसार आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएन्टचे उपचार देखील कव्हर करेल.”

उत्तम समन्वयासाठी मार्गदर्शक तत्त्वे
IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांना त्यांचे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि रुग्णालये यांच्यात आणखी चांगला समन्वय निर्माण करण्यास सांगितले आहे, जेणेकरून विमाधारकांना रुग्णालयात दाखल झाल्यास जलद कॅशलेस सुविधा मिळू शकेल. एप्रिल 2020 मध्ये, IRDA ने स्पष्ट केले होते की, सर्व इन्शुरन्स पॉलिसींमध्ये कोविड-19 संसर्गामुळे हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाचा समावेश असेल. देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि ओमिक्रॉनची प्रकरणेही वाढत आहेत. सोमवारी, देशात ओमिक्रॉनची 1700 प्रकरणे नोंदवली गेली.

Omicron प्रकरणे सतत वाढत आहेत
केवळ एका महिन्यात, ओमिक्रॉन संसर्गाची 1,700 हून जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 510 प्रकरणांसह महाराष्ट्र आघाडीवर आहे तर दिल्ली (351), केरळ (156), गुजरात (136), तामिळनाडू (121) आणि राजस्थान (120) मध्येही त्याचा संसर्ग वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, संसर्गाच्या संख्येत वाढ झाल्याने एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1.45 लाखांहून जास्त झाली आहे.

शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद होणार?; उदय सामंत म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “आजच्या बैठकीत कोविड 19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. या संदर्भात उद्या निर्णय जाहीर करू,” असे सामंत यांनी ट्विटद्वारे सांगितले.

मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे आज पार पडलेल्या बैठकीतीळ चर्चेबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आज सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाईन पार पडली. कोविड 19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. या संदर्भात निर्णय उद्या सायंकाळी 4 वाजता जाहीर करू, असे ट्विटमध्ये सामंत यांनी म्हंटले आहे.

सध्या राज्यातील अनेक महाविद्यालयांच्या परीक्षा सुरु आहेत. तसेच अभ्यासक्रम आणि महाविद्यालयेही सुरु आहेत. कोरोनाचे प्रमाण जास्त वाढले तर या ठिकाणी महाविद्यालये ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याबाबत आता मंत्री उडत सामंत यांच्याकडून उद्या माहिती दिली जाणार आहे.

कराड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक बिनविरोध, आठसाठी रणागंण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्या असून, 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आठ ग्रामपंचायतीच्या जागा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली.

तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत होती. त्या अखेरच्या दिवशी तालुक्यातील गणेशवाडी, डेळेवाडी, घोलपवाडी, करंजोशी, पाचुपतेवाडी, कचरेवाडी, यादववाडी, तारुख, आणे, शिंदेवाडी- विंग, शेळकेवाडी, अंबवडे, पाचुंद या 13 ग्रामपंचायतींसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने त्या जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील वानरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, चिंचणी, घराळवाडी, हवेलवाडी, शिंगणवाडी, भरेवाडी या ग्रामपंचायतींच्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत, तर शेळकेवाडी- येवती, शितळवाडी, जुजारवाडी, मुनावळे, लटकेवाडी, शेवाळवाडी- उंडाळे, हरपळवाडी, खोडजाईवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यासाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे.