Sunday, March 26, 2023

रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद उत्तमप्रकारे सांभाळू शकतात; शिवसेना नेत्याच्या विधानाने चर्चाना उधाण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असे मोठं विधान शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने इतर कोणाकडे तरी मुख्यमंत्रीपदाचा कारभार देण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू असतानाच सत्तार यांच्या वक्तव्याने नवे संकेत तर मिळाले नाहीत का अशी शंका उपस्थित होते.

अब्दुल सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात. रश्मी ताईची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू आहे. आज त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असतं. कारण त्या साहेबांच्या सोबत राहतात.

- Advertisement -

अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, महिलांना फक्त चूल आणि मुल न करता, त्यांना सक्षम कसं करायला पाहिजे यासाठी रश्मी ताईसाहेबांचं काम मोठं आहे. उद्धव साहेबांचा आदेश असेल तर मला वाटतं काहीही होऊ शकतं. जर उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर मला वाटतं त्यांच्यावर जबाबदारी देऊही शकतात असे अब्दुल सत्तार यांनी म्हंटल.