Friday, January 2, 2026
Home Blog Page 3011

नवीन वर्षात ‘या’ जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू, कोणत्याही कार्यक्रमासाठी आता फक्त 50 जणांनाच परवानगी

सांगली । सध्या राज्यात कोविड-19 विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार झपाट्याने वाढत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात होणार प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी लग्न / विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच उपस्थित राहण्यास परवानगी तसेच इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असल्याचे जाहीर केले असून अंत्यविधी / अंत्ययात्रा बाबतीत उपस्थित व्यक्तींची संख्या 20 पर्यंत मर्यादित केल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

हे नियम सांगली जिल्ह्यात 31 डिसेंबर रात्री 9 वाजल्यापासून अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. राज्य शासनाकडूनप्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत. त्याअनुषंगाने या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.

या आदेशाचे पालन करणार्‍या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 29 नोव्हेंबर 2021 व दि. 25 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

हे तर गल्ली क्रिकेट जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकण्याची भाषा; मलिकांचा राणेंवर पलटवार

Malik Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत दमदार विजय मिळवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता आपले पुढील लक्ष्य महाराष्ट्र सरकार असेल अस म्हंटल होत. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर पलटवार केला आहे. राणेंच विधान म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असे म्हणण्यासारख आहे अशी टीका त्यांनी केली.

नवाब मलिक म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २५ मते ५० मते असतात. अपहरण करणे, पैसे देणे आणि त्याच्यातून एखादी बँक जिंकल्यानंतर आता ते राज्य जिंकण्याचं आव्हान देताहेत. हे म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असं बोलण्यासारखं आहे. अशी टीका नवाब मलिक यांनी केली. तसेच नारायण राणे हे अजित पवार कोण असं विचारताहेत. त्यांनी अजित पवारांना ओळखण्याची गजर नाही. संपूर्ण राज्य, देशाला अजित पवार कोण हे माहिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते-

सिधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीनंतर राणेंनी आपलं पुढच लक्ष्य महाराष्ट्र सरकार असेल अस म्हणत डरकाळी फोडली होती. राज्याला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज असून राज्यातील जनतेच्या सुखासाठी केंद्रप्रमाणे राज्यात भाजपच सरकार हवं आणि त्यासाठी आता आमचं पुढच लक्ष हे महाराष्ट्र सरकार हेच असेल असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला.

रेल्वेकडून मराठवाड्याला नववर्षाचे गिफ्ट

railway

औरंगाबाद – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे बोर्डाच्या वतीने मराठवाडा वासियांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाने नांदेड मनमाड ब्रॉडगेज च्या दुहेरीकरण याला मान्यता दिली असून, दोन टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अंकाई ते औरंगाबाद दरम्यान 98 किलोमीटरवरील रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल दिली. यामुळे मराठवाड्याला ही नववर्षाची भेट ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात अंकाई ते औरंगाबाद व दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड अशी या कामांची विभागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड मनमाड ब्रॉडगेज दुहेरी करण्याची मागणी राजकीय पक्ष व रेल्वे संघटनांकडून केली जात होती. त्यासाठी अनेकदा आंदोलने देखील झाली. परंतु या मार्गावर मालवाहतूक कमी असल्यामुळे दुहेरी करण्याचा प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याची चर्चा होत होती. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन याबाबत रेल्वे विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर अम्ब्रेला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अंकाई ते औरंगाबाद दरम्यान 98 किलोमीटरवरील ब्रॉडगेज दुहेरीकरण आला मान्यता मिळवून दिली.

अम्ब्रेला योजनेत रुंदीकरण, दुहेरीकरण व अन्य काही कामे करण्यास एकत्रितपणे निधी दिला जातो. योजनेत कोणती कामे समाविष्ट करायची याचे सर्व अधिकार रेल्वे बोर्डाला आहेत. तसेच या कामाची रक्कम एक हजार कोटींपेक्षा कमी असावी अशी अट आहे. नांदेड ते मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरण प्रकल्पासाठी एक हजार कोटींपेक्षा अधिक खर्च लागण्याची शक्यता असल्याने त्यासाठी निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर विषय घ्यावा लागणार होता. म्हणून दानवे यांनी हा विषय निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर न जाऊ देता पहिल्या टप्प्यात योजनेअंतर्गत 98 किलोमीटरच्या कामाला रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळवून घेतली. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून याव्यतिरीक्त शिल्लक असलेल्या मार्ग दुसऱ्या टप्प्यात अम्ब्रेला योजनेअंतर्गत घेऊन पूर्ण करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

मिरजेतील विद्यार्थी संसर्गाची मंत्र्यांकडून गंभीर दखल, कोरोना नियमांचे पालन करण्याचे अमित देशमुखांचे आदेश

सांगली । मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या आहेत.वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात.

या मंडळींनाच लागण झाली तर वैद्यकीय सेवा कशी पुरविणार असा प्रश्न उपस्थित करून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत विचारणा केली आहे. वैद्यकीय सेवा देताना घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असणारे मनुष्यबळ बाधित होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

याबाबतचा अहवाल प्राप्त होताच यास जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाईचे संकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना लक्षात घेता राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सतर्क करावे याबाबतच्या सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत.

Gold Forecast : सोन्याची हरवलेली चमक 2022 मध्ये परत येऊ शकेल ?

Digital Gold

नवी दिल्ली । 2021 साली शेअर बाजाराच्या तुलनेत सोन्याने चांगली कामगिरी केली नाही, मात्र येत्या वर्षभरात सोन्याची हरवलेली चमक परत मिळण्याची अपेक्षा आहे. 2022 मध्ये, महामारीची भीती आणि महागाईच्या चिंतेमध्ये सोने 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचू शकते.

2020 मध्ये सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता
2020 मधील कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोन्याने चांगलीच गती पकडली होती आणि हा विक्रम 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता, मात्र 2021 च्या उत्तरार्धात सोन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. 2021 हे वर्ष सोन्यासाठी इतके चांगले वर्ष ठरले नाही. 2021 च्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 46,874 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

सोन्यावरील भावना सुधारू शकतात
कॉमट्रेंड्झचे सह-संस्थापक आणि सीईओ गणशेखर थियागराजन म्हणाले की,”यंदा सोन्याच्या कमकुवत कामगिरीचे मुख्य कारण म्हणजे इक्विटी मार्केटमधील अतिरिक्त लिक्विडिटी. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टचा झपाट्याने प्रसार होण्याच्या भीतीमुळे अनेक युरोपीय देशांमध्ये नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये कोविड निर्बंधांची भीती वाढली आहे. हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करताना अमेरिकन नागरिकांना बूस्टर डोस घेणे, मास्क घालणे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन यूएस आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यागराजन यांच्या मते, दरांचे काटेकोरपणे पालन केल्यास अमेरिकन डॉलर इतर चलनांच्या तुलनेत आकर्षक होईल.

29 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस 1,791 डॉलर्स होता, तर भारतात MCX वर सोने 47,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्यागराजन म्हणाले, “शेअर बाजारातील घसरण आणि सोन्याची चलनवाढ हेज पोझिशन याला उतरती कळा देत आहे. तसेच भू-राजकीय ताणतणाव असल्यास त्याबाबतची भावना सुधारू शकते.”

2022 च्या पहिल्या आणि दुसऱ्या सहामाहीचा हा अंदाज आहे
त्यागराजन म्हणाले, “आम्ही 2022 च्या पहिल्या सहामाहीत 1700-1900 डॉलर्स प्रति औंसच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा करतो आणि दुसऱ्या सहामाहीत ती 2,000 डॉलर्सची पातळी ओलांडण्याची अपेक्षा करतो. देशांतर्गत बाजारात MCX वर, 2022 च्या उत्तरार्धात किंमती 45,000-50,000 च्या श्रेणीत राहतील आणि 55,000 ओलांडतील.”

यूएस चलनवाढ डेटा आणि बॉण्ड यील्ड देखील आणू शकतात
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की,”यूएस चलनवाढीचा डेटा आणि बॉण्ड यील्डची स्थिती देखील सोन्याला तेजी देऊ शकते.” ते म्हणाले, “दीर्घकालीन ट्रेंडबद्दल बोलायचे झाल्यास, 2022 मध्ये त्याला 1,970 डॉलर्सवर थोडा रेझिस्टन्स आहे. MCX गोल्ड फ्युचर्सचा शॉर्ट टर्म रेझिस्टन्स 49,200 रुपये आणि सपोर्ट 45,000 रुपयांवर आहे. दुसरीकडे, पुढच्या वर्षी आम्ही ते 51,800 रुपयांपर्यंत जाण्याची आणि 42,500 रुपयांवर सपोर्ट पाहण्याची अपेक्षा करतो.

हरभजन सिंगचा महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप; म्हणाला की त्याने मला…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर हरभजन सिंगने आपलं मन मोकळं केलं. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केला. मी भारतीय संघातून बाहेर होण्यास धोनीच कारण होता असा थेट आरोप हरभजन सिंह ने केला आहे

हरभजन म्हणाला, मी ३१ वर्षांचा होतो. तेव्हा मी कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट मिळवल्या होत्या. जर मी ३१व्या वयात ४०० विकेट घेत असेन तर पुढील ८-९ महिन्यांत मी कमीत कमी १०० पेक्षा जास्त विकेट घेऊ शकत होतो. मात्र यानंतर मला जास्त सामन्यांमध्ये खेळवले नाही. विशेष म्हणजे मला सिलेक्टही केले जात नव्हते.

तत्कालीन कर्णधार एमएस धोनीला मला संघातून वगळण्याचे कारण विचारले, परंतु माझ्या प्रश्नाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जाब विचारण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच मी पुन्हा कारणे विचारणे बंद केले. खरेतर धोनीकडून जाणून घ्यायचे होते की मला का वगळण्यात आले, पण मला कोणतेही उत्तर शेवटपर्यंत मिळाले नाही, अशी खंत त्याने बोलून दाखवली.

आज PM किसानच्या 10 व्या हप्त्याचे पैसे मिळणार, लवकर करा ‘हे’ काम नाहीतर पैसे अडकतील

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार नवीन वर्षात देशातील शेतकऱ्यांना एक भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12:30 वाजता पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना ट्रान्सफर करतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक थेट (DBT) ट्रान्सफर केले आहेत.

पैसे मिळतील की नाही ते पहा
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

याप्रमाणे लिस्टमध्ये तुमचे नाव तपासा
1. सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
2. त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. Farmers Corner सेगमेंटमध्ये तुम्हाला Beneficiaries List च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्ट मधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर Beneficiaries List दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

‘या’ शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत
ज्या शेतकऱ्यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध असेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे.

हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
तुमचे सर्व तपशील बरोबर असतील आणि त्यानंतरही तुमचे नाव लिस्टमध्ये समाविष्ट नसेल, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांकावर कॉन्टॅक्ट करून तुमचे नाव जोडू शकता. यासाठी 155261 किंवा 011-24300606 या क्रमांकावर कॉल करावा लागेल. इथे तुमची समस्या दूर होईल.

नववर्षावर नवाब मलिकांच्या हटके शुभेच्छा; म्हणाले की….

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना पुन्हा एकदा हटके ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मलिक यांच्या ट्विट चा नेमका रोख कोणाकडे हे मात्र समजू शकत नाही.

नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हंटल की, फर्जीवाड्या विरुद्धची माझी लढाई अशीच सुरु राहील….नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा…. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाद सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे ट्विट मलिक यांनी केलं नाही ना अशी शंका उपस्थित होते आहे.

नवाब मलिक यांनी मागील वर्षात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप केले. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोटं कागदपत्रे सादर केली इथपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड शी संबंध आहेत इथपर्यंत मलिक यांनी अनेक सनसनाटी आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली होती.

Apple ला धक्का, भारतीय स्पर्धा आयोगाने दिले चौकशीचे आदेश; नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । अमेरिकन टेक दिग्गज आणि आयफोन निर्माता कंपनी Apple ला मोठा झटका बसला आहे. खरं तर, देशाच्या विश्वासविरोधी नियामक कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने कथित चुकीच्या व्यावसायिक क्रियाकार्यक्रमांसाठी Apple विरुद्ध तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

इन ऍप पर्चेससाठी 30 टक्के कमिशन आकारण्याचे शुल्क आकारले जाते
असा आरोप आहे की, जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीने थर्ड पार्टी डेव्हलपरशी स्पर्धा करणार्‍या ऍप्सच्या मालकीद्वारे आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केला आहे. इन ऍप पर्चेससाठी 30 टक्क्यांपर्यंत कमिशन आकारण्याचा आणि इतर पेमेंट इंस्ट्रूमेंटना परवानगी न दिल्याचा आरोप कंपनीवर आहे.

स्पर्धा कायद्याच्या कलम 4 मधील तरतुदींचे उल्लंघन
CCI ने आपल्या आदेशात म्हटले आहे की, Apple ने स्पर्धा कायद्याच्या कलम 4 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी मानले आहे, जे एखाद्या एंटरप्राइझद्वारे वर्चस्व असलेल्या पदाचा गैरवापर करतात आणि महासंचालकांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. आदेशानंतर 60 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

ET च्या रिपोर्ट्सनुसार, जयपूरस्थित ना-नफा संस्था टुगेदर वी फाईट सोसायटीने तक्रार केल्यानंतर आयोगाने चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी Apple कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अलीकडेच CCI ने Amazon वर 202 कोटींचा दंड ठोठावला होता
त्याच वेळी, नुकतेच CCI ने Amazon च्या Future Coupons सोबतच्या कराराला दिलेली मंजुरी स्थगित केली. याशिवाय, विश्वासविरोधी नियामकाने काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज Amazon वर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये मंजूर करण्यात आला. आयोगाने आपल्या 57 पानांच्या आदेशात म्हटले आहे की, मान्यता काही काळासाठी स्थगित राहील.

सलग पाचव्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घसरण, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

मुंबई । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग पाचव्या आठवड्यात घट झाली आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 58.7 कोटी डॉलर्सने घसरून 635.08 अब्ज डॉलर्स झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी, 17 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 16 कोटी डॉलर्सने कमी होऊन 635.667 अब्ज डॉलर्स झाले होते. 10 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 7.7 कोटी डॉलर्सने घसरून 635.828 अब्ज डॉलर्स झाला आहे. त्याच वेळी, 3 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ते 1.783 अब्ज डॉलर्सने घसरून 635.905 अब्ज डॉलर्स झाले होते, तर 26 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 2.713 अब्ज डॉलर्सने घसरून 637.687 अब्ज डॉलर्स झाला होता.

FCA 84.7 कोटी डॉलर्सने कमी झाला
शुक्रवारी RBI ने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यातील ही घसरण मुख्यत्वे विदेशी चलन मालमत्ता (Foreign Currency Assets) मध्ये घट झाल्यामुळे झाली, जी एकूण चलन साठ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की रिपोर्टींग वीकमध्ये भारताचा FCA 84.7 कोटी डॉलर्सने घसरून $ 571.369 अब्ज डॉलर्स झाला आहे. डॉलर्समध्ये नामांकित, FCA मध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो.

सोन्याचा साठा वाढला
याशिवाय, रिपोर्टिंग वीकमध्ये सोन्याच्या साठ्याचे मूल्य 20.7 कोटी डॉलर्सने वाढून 39.39 अब्ज डॉलर्स झाली आहे. रिपोर्टिंग वीकमध्ये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये देशाचा SDR (Special Drawing Rights) 2.4 कोटी डॉलर्सने वाढून 19.114 अब्ज डॉलर्स झाला आहे. IMF मधील देशाचा चलन साठा 2.8 कोटी डॉलर्सने वाढून 5207 अब्ज डॉलर्स झाला आहे.