Friday, January 2, 2026
Home Blog Page 3010

देव दर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; एकाच कुटुंबातील 11 जखमी

औरंगाबाद – जेजुरीहून दर्शन करून जळगावकडे जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीला अचानक समोर आलेल्या कार धडकल्याने झालेल्या अपघातात क्रूझरमधील 11 जण जखमी झाले.सर्व जखमी एकाच कुटुंबातील होते. ही घटना शुक्रवारी पहाटे 3 च्या दरम्यान छावणी भागातील लोखंडी पुला जवळ घडली. अपघातानंतर कारचालक जखमींची मदत करण्याऐवजी वाहन सोडून पसार झाला होता. कार्तिकी ज्ञानेश्वर दुढे (वय-4 वर्षे), वात्सलबाई काशीनाथ गावंडे (वय-65), भगवान काशीनाथ गावंडे, कविता सुनील क्षीरसागर (वय-28), गजानन भगवान गावंडे (वय-26), सविता भगवान गावंडे (वय-45), संगीता भगवान गावंडे (वय-18), रत्ना गजानन गावंडे (वय-18), कांताबाई रघुनाथ सोनवणे, ज्ञानेश्वर राजीव दुढे (वय-35), ज्योती ज्ञानेश्वर दुढे अशी जखमींची नावे आहे.

या अपघात प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच गावंडे कुटुंबात विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे गावंडे कुटुंब व नातेवाईक दर्शनासाठी (एम.एच.19 बी.यु.4461) या क्रूझरने जेजुरी येथे गेले होते. दर्शन करून पुन्हा ते जळगावकडे जात असताना शुक्रवारी पहाटे 3 च्या सुमारास छावणी भागातील लोखंडीपुला जवळ होलीक्रॉस शाळेच्या बाजूने (एम.एच.20 इ.जे.1313) या क्र.ब्रेझा कार भरधाव वेगात येऊन क्रूझरला धडकली. क्रूझरच्या चालकांचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर पलटी झाली.

अपघात होताच ब्रेझाकारचा चालक पसार झाला. या घटने प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोरेगाव-भिमा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी हि माहिती दिली तसेच कोरोना संदर्भात राज्य सरकारची भूमिका देखील स्पष्ट केली

अजित पवार म्हणाले, राज्यात फक्त ५ दिवसांचे अधिवेशन भरवले होते तरीही आत्तापर्यंत १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहीजे, असं अजित पवार म्हणाले.

नव्या वर्षात राज्याला करोनामुक्त करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची बैठक झाली. साधारण दररोजचा आकडा लक्षात घेऊन किती पटीत रुग्णांची संख्या वाढतेय, ते बघून त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. पण रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली, तर नाईलाजाने अजून कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ शकते. असेही अजित पवार यांनी म्हंटल

भरधाव बसची ओमानी कारला भीषण धडक, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

सांगली |  इस्लामपूर रोडवर आष्टा लायनर्स प्रा. लि. समोर ओमनी कार, एस.टी. बस व मोटारसायकल असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तिघे युवक रोहित रघुनाथ पाटील, अमर रघुनाथ पाटील व संस्कार अनिल पवार सर्व हे जखमी झाले आहेत. अपघात स्थळी आष्टा पोलीस तात्काळ दाखल झाले.

एस. टी. बस क्रमांक ही इस्लामपूरहून सांगलीकडे चालली होती. या दरम्यान ओमनी कार ही एस टी बसच्य आडवी आली. बस ओमनीला धडकून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मोटारसायकलला समोरून धडकली यात मोटारसायकलवरील तीन युवक जखमी झाले. सदर घटनेचे फुटेज सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान बघ्यानी सदर ठिकाणी गर्दी केली होती. जखमींना सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

एस टी चालकाने ओमनी चालक महेश मानसिंग आटूगडे याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे व तक्रारीत म्हंटले आहे की ओमनी चालक आटूगडे याने ओमनीचा वेग अचानक कमी करीत गाडी डावीकडे घेतली व पुन्हा वेग वाढवीत गाडी उजवीकडे वळवली. त्यामुळे बसची कंडक्टर सायडची बाजू ओमनीला धडकली. व बस समोरून येणाऱ्या मोटारसायकल ला धडकली. तिन्ही वाहनाचे मिळून सुमारे 70 हजाराचे नुकसान झाले आहे.

Mutual Fund : 2022 साठी टॉप 5 लार्ज कॅप योजना ज्या कोणत्याही गोंधळाशिवाय चांगला रिटर्न देऊ शकतात

Mutual Funds

नवी दिल्ली । नवीन वर्ष म्हणजेच 2022 मध्येही कोरोनाची भीती कायम आहे. एकीकडे अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू सुरू असताना शेअर बाजारातही कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या बचतीच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यावर चांगला रिटर्न मिळण्याबाबतही भीती निर्माण झाली आहे.

तुम्ही देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल किंवा SIP करत असाल तर घाबरण्याची गरज नाही
नकारात्मक बातम्यांमुळे किंवा बाजारातील कोणत्याही मोठ्या घडामोडींमुळे झालेली घसरण कायमस्वरूपी नसते किंवा दीर्घकाळ नसते. परिस्थिती सुधारताच बाजार रिकव्हरी मोडमध्ये प्रवेश करतो. अशी घसरण अल्पावधीत हानिकारक ठरू शकते मात्र दीर्घकाळासाठी खरेदी आणि गुंतवणूक करण्याची ही उत्तम संधी आहे.

बाजारातील घसरण खरेदीची संधी
गेल्या वर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. ज्या लोकांनी त्यावेळी मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते त्यांना आज भरघोस रिटर्न मिळत आहे. शेअर बाजारातील त्या तेजीचा फायदा तुम्हाला घेता आला नसेल, तर यावेळी लक्ष ठेवा.

तुम्हाला शेअर बाजाराचे ज्ञान नसेल तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. तुमचे पैसे म्युच्युअल फंडातील तज्ञांनी गुंतवले आहेत, जे सखोल संशोधनानंतर पैसे कुठेतरी गुंतवतात. दुसरे म्हणजे, लार्ज कॅप स्टॉक्सप्रमाणे, लार्ज कॅप फंड (ते त्यांचे बहुतेक पैसे लार्ज कॅप फंडमध्ये गुंतवतात) देखील सुरक्षित असतात. कोणत्याही टेन्शनशिवाय त्यात पैसे गुंतवून तुम्ही चांगले रिटर्न मिळवू शकता. 2022 पासून गुंतवणूक सुरू करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांचे डिटेल्स घेऊन आलो आहोत. या सर्व फंडांनी 2021 मध्येही चांगला रिटर्न दिला आहे.

2022 पासून सुरू होणारे टॉप 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड आणि त्यांचा 5 वर्षांचा वार्षिक सरासरी रिटर्न

कोटक ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन : 17.1 टक्के
इनवेस्को लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन : 17.3 टक्के
मिरे एसेट लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन : 18 टक्के
बीएनपी परिबा लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन : 18.2 टक्के
एक्सिस ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन : 21 टक्के

कोटक ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन कोटक ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन हा सर्वोत्तम सर्वोत्तम फंडांपैकी एक मानला जातो. त्याचा 3 वर्षांचा वार्षिक सरासरी रिटर्न 18.7 टक्के आहे. स्थापनेपासून या फंडाचा वार्षिक सरासरी रिटर्न सुमारे 15.1 टक्के आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षभरात सुमारे 26 टक्के रिटर्न दिला आहे.

इन्वेस्को लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन इन्वेस्को लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन लाँच झाल्यापासून दरवर्षी सरासरी 15.8 टक्के रिटर्न देत आहे. त्याचा तीन वर्षांचा वार्षिक सरासरी रिटर्न 18 टक्के आहे आणि 1 वर्षाचा रिटर्न सुमारे 30.5 टक्के आहे.

मिरे एसेट लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन मिरे एसेट लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन हा देखील टॉप लार्ज कॅप फंड आहे. स्थापनेपासून ते दरवर्षी सुमारे 17.7 टक्के रिटर्न देत आहे. त्याच वेळी, त्याचा 1 वर्षाचा रिटर्न 24.2 टक्के आहे आणि 3 वर्षांचा वार्षिक सरासरी रिटर्न 17 टक्के आहे.

बीएनपी परिबा लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन बीएनपी परिबा लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन हा देखील एक शक्तिशाली लार्ज कॅप फंड आहे. स्थापनेपासून ते दरवर्षी सुमारे 15.7 टक्के रिटर्न देत आहे. त्याच वेळी, त्याचा 1 वर्षाचा रिटर्न 21 टक्के आणि 3 वर्षांचा वार्षिक सरासरी रिटर्न 18.2 टक्के आहे.

एक्सिस ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन एक्सिस ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन हा देखील चांगला लार्ज कॅप फंड आहे. स्थापनेपासून ते दरवर्षी सुमारे 16.8 टक्के रिटर्न देत आहे. त्याच वेळी, त्याचा 1 वर्षाचा रिटर्न 19.5 टक्के आणि 3 वर्षांचा वार्षिक सरासरी रिटर्न 19.1 टक्के आहे.

पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांची 74 वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाराष्ट्रासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त पुसेगावमध्ये रथोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि कोरोनाच्या छायेत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. दरवर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथ पूजनाचा सोहळा मंदिराच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. मात्र, कोरोना आणि अोमिक्राॅनमुळे अत्यंत साधेपणाने पुण्यतिथी व रथोत्सव साजरा करण्यात आला.

खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री. सेवागिरी महाराजांची पुण्यतिथी निमित्त सकाळी 11 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रथ पूजन करण्यात आले. नागरिकांनी सोशल डिस्टसिंग पाळत रथातील श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यात्रेला गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. या रथ सोहळ्याला आमदार महेश शिंदे,आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक सोहळ्यातील श्री. सेवागिरी महाराज पुण्यतिथी हा सोहळा असतो. पुण्यतिथीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. परंतु कोरोना आणि अोमिक्राॅनमुळे प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे. शासनाचे नियमांचे उल्लघंन होवू नये, म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार, त्वरित तपास सुट्ट्यांची लिस्ट

Bank Holiday

नवी दिल्ली । नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात विविध राज्यांमध्ये अनेक सुट्ट्या असणार आहेत. सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका जानेवारी 2022 मध्ये एकूण 16 दिवस बंद राहणार आहेत. जानेवारीतील सणांमुळे, RBI ने विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँका बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसे, तुम्ही ऑनलाइन मोडमध्ये बँकिंग सर्व्हिस वापरण्यास सक्षम असाल.

राज्यांमध्ये सणांनिमित्त विविध दिवस सुटी असणार आहेत. बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. खाली दिलेल्या दिवसांचा सर्व बँकिंग कंपन्यांच्या वतीने विचार केला जात नाही. बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या त्या राज्यांमध्ये होणाऱ्या सणांवरही अवलंबून असतात.

दुसरीकडे, जर तुम्ही जानेवारी 2022 मध्ये बँकांमध्ये जाण्याची तयारी करत असाल किंवा ऑफलाइन बँकिंगसाठी तुमच्या शाखेत जात असाल, तर या महिन्याच्या बँक सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट येथे आहे, त्यावरही एक नजर टाका-

जानेवारी 2022 बँक सुट्ट्यांची लिस्ट

1 जानेवारी, शनिवार – नवीन वर्षाचा दिवस (देशभर साजरा केला जाणार आहे)
2 जानेवारी, रविवार – कामकाजाची सुट्टी
4 जानेवारी, मंगळवार – लोसुंग (सिक्कीम)
8 जानेवारी हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे.
9 जानेवारी, रविवार
11 जानेवारी, मंगळवार – मिशनरी डे (मिझोरम)
12 जानेवारी, बुधवार – स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन
14 जानेवारी, शुक्रवार – मकर संक्रांती/पोंगल (अनेक राज्यांमध्ये साजरी केली जाते)
15 जानेवारी, शनिवार – उत्तरायण पुण्यकाल मकर संक्रांती उत्सव/ माघे संक्रांती/ संक्रांती/ पोंगल/ तिरुवल्लुवर दिवस (आंध्र प्रदेश, पुडुचेरी, तामिळनाडू)
16 जानेवारी, रविवार
18 जानेवारी, मंगळवार – थाई पूसम (चन्नई)
22 जानेवारी, महिन्याचा चौथा शनिवार
23 जानेवारी, रविवार
26 जानेवारी, बुधवार – प्रजासत्ताक दिन (देशभर साजरा केला जातो)
30 जानेवारी, रविवार
31 जानेवारी, सोमवार – मी-डॅम-मे-फी (आसाम)

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापेमारी, हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल जप्त

सांगली । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली एम, कर्नाळ, बोरगी याठिकाणी छापे टाकून हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यामध्ये १८६ लिटर हातभट्टी तसेच ६ हजार २२५ लिटर रसायन असा एकूण १ लाख ११ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तीन ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. तसेच वेळेवर आस्थापने बंद करण्यासाठी पथके तैनात केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी दिली.

तसेच ३१ डिसेंबर रोजी देशी दारूचे २१ हजार आणि विदेशी दारूचे ३३ हजार परवाने काढले असल्याचेही त्यांनी सांगितले. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी तसेच तळीरामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. डफळापूर, म्हैसाळ आणि कोत्याबोबलाद याठिकाणी अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी तपासणी नाके लावून पाच पथके तैनात केली होती.

मद्य विक्रीची आस्थापने, हॉटेल, बार, रेस्टोरंट वेळेवर बंद होतील तसेच जिल्ह्यातील अवैध पार्ट्यांवर या पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील कोरोली एम, कर्नाळ, बोरगी आणि आसपासच्या परीसरात अवैध धंद्यांवर छापे टाकून हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यामध्ये १८६ लिटर हातभट्टी तसेच ६ हजार २२५ लिटर रसायन असा एकूण १ लाख ११ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३१ डिसेंबर रोजी देशी दारूचे २१ हजार आणि विदेशी दारूचे ३३ हजार परवाने तळीरामांनी काढले आहेत. या तळीरामांनी परवाने काढले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत होती.

जल जीवन मिशन : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून 5 कोटी 90 लाख रूपये मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रम सन 2021-22 मधून खालील गावांमधील नळ पाणी पुरवठा कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर कामांमुळे संबंधीत गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना त्याचा लाभ होणार आहे. कराड उत्तर मतदार संघातील गावांना 5 कोटी 90 लाख रूपये मंजूर झाल्याचे पालकमंत्री यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

कराड उत्तर मतदार संघातील खालील गावांना मिळणार निधी 

कोरेगाव तालुक्यातील तारगांव, जायगांव, कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर, हेळगाव, नडशी, कामथी, शामगांव, वाण्याचीवाडी, उत्तर कोपर्डे, वाघेरी, भवानवाडी, वराडे, पाचुंद तर सातारा तालुक्यातील खोडद गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेची पुर्नजोडणी करणे कामांचा समावेश आहे. सदर गावांमध्ये अस्‍तित्‍वातील नळ पाणी पुरवठा योजनांची पुर्नजोडणी होणार असल्‍याने ग्रामस्‍थांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, लोकांची सेवा करण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो. यापुढील काळात मतदार संघातील इतर गावांना आवश्यक निधीची पूर्तता करण्याचा प्रयत्न राहील. सहकार क्षेत्रातील कामासोबत समाजातील सामाजिक कामेही पूर्णत्वास जात आहेत.