Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3733

मृतदेह मिळेल का मृतदेह? गॅस शवदाहिनीच्या ट्रायलसाठी मनपाची शोधाशोध

Dead Body

औरंगाबाद | औरंगाबाद फर्स्ट संघटनेच्या माध्यमातून कैलासानगर येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू केली आहे. या गॅस शवदाहिनीचे ट्रायल घेण्यासाठी आता मनपा मृतदेहाच्या शोधात आहे. त्यासाठी घाटी रुग्णालयाला पत्र दिले असून, एखादा बेवारस मृतदेह आल्यास गॅस शवदाहिनीच्या ट्रायलसाठी द्यावा अशी विनवणी मनपाने केली आहे.

मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराचा मृत्यूदर वाढला होता. याकाळात अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत मृतदेहाच्या रांगा लागत होत्या. याशिवाय बहुतांश वेळा अंत्यसंस्कारासाठी लाकडे मिळणेही कठीण झाले होते. तसेच यामुळे पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळे शहरात विद्यूत व गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. यातुनच शहरातील कैलासनगर स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू करण्यासाठी औरंगाबाद फर्स्ट या संघटनेने पुढाकार घेतला. सद्यस्थितीला ही शवदाहिनी उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे. मात्र दाहिनीचे ट्रायल घेतल्याशिवाय ती अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

यासंदर्भात मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, ट्रायल घेण्यासाठी घाटीकडे मृतदेहाची मागणी करणारे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात शक्यतो बेवारस मृतदेह मिळाला तर बरे, अशी विनवणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप घाटी रुग्णालयाकडून मृतदेह मिळाला नसल्याने ट्रायल लांबणीवर पडले आहे.

पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा, आम्हांला खेळाडूंचा अभिमान; हॉकी संघाच्या पराभवानंतर मोदींची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टोकियो ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलमध्ये भारतीय हॉकी संघाचा बेल्जियम कडून पराभव झाला. अटीतटीच्या या लढाईत भारताचे ऑलिम्पिकमध्ये स्वप्न भंगले. या सामन्यात बेल्जियमने 5-2 असा मोठा विजय मिळविला. दरम्यान भारताच्या या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिला.तसेच आम्हांला आमच्या खेळाडूंचा गर्व आहे असेही मोदी म्हणाले.

मोदींनी ट्विट करत म्हंटल की, “पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा आहे. टोकियो 2020 मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघानं आपली सर्वश्रेष्ठ खेळी केली आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. संघाला पुढचा सामना आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे.”

कोट्यावधी भारतीयांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज सकाळपासून हा सामना लाइव्ह पाहत होते. मोदींनी सात वाजून ३७ मिनिटांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये मोदींनी, “मी भारत विरुद्ध बेल्जियमदरम्यानचा पुरुष हॉकीचा उपांत्य फेरीचा सामना पाहत आहे. मला आपल्या संघाचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात भारतानं दोन गोल डागले, तर बेल्जियमनं पाच गोल डागत भारतावर मात केली. त्यामुळे भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.

सातारा जिल्ह्यात नवे 622 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 237 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 622 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 237 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 7 हजार 110 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 8.7 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 705 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 20 हजार 950 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 7 हजार 85 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 327 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 15 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यासाठी आज जिल्हाधिकारी काढणार नवा आदेश ?

ज्या 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील. त्यामुळे सातारा जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी काय आदेश काढणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत देशातील राजकीय परिस्थिती आणि महाराष्ट्रातील राजकारण यावर चर्चा झाली असून राहुल गांधी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर अत्यंत समाधानी आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटल.

राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले.” असं संजय राऊत यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

राहुल गांधी दोन वर्षांत महाराष्ट्रात आलेले नाहीत. ते लवकरच राज्यात येणार आहेत. त्यांनी मला राज्यातील राजकारणाबद्दल काही प्रश्न विचारले. त्याबद्दल मी त्यांना माहिती दिली. बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीबद्दल त्यांना कुतूहल आहे. त्यांनी इतकी मोठी संघटना कशी उभी केली, ती कशी चालवली याबद्दलची माहिती राहुल यांनी जाणून घेतली,’ असं राऊत यांनी सांगितलं.

सावधान ! कोरोना नंतर आता म्युकरमायकोसिसचा धोका

औरंगाबाद | कोरोना महामारी चा प्रादुर्भाव सर्व देशभर दिसत आहे. आता कोरोना महामारी ची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचे संकट अजूनही आहे. म्युकरमायकोसिसने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे.

म्युकरमायकोसिसचे दररोज चार ते पाच रुग्ण आढळून येतात. गेल्या दीड महिन्याचा म्युकरमायकोसिसचा अहवाल पाहता आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहाच्या आत आली असली तरीही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतच आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसचे दररोज चार ते पाच नवीन रुग्ण दाखल होतात. 15 जून ते 31 जुलाई या कालावधीमध्ये शहरात म्युकरमायकोसिसचे 41 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 115 वर गेली असून 37 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण संख्या 1231 झाली आहे.

शिवम्ं प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी महेश मोहिते

कराड | घारेवाडी (ता. कराड) येथील शिवमं प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी महेश मोहिते, सचीवपदी प्रताप भोसले तर खजीनदारपदी प्रताप कुंभार यांची निवड झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी ही कार्यकारणी जाहीर केली.

शिवम्ं प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष डॉ. शंतनु कुलकर्णी, अरविंद कलबुर्गी, संजय पाटील, संभाजी देवकर, डॉ. प्रकाश शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. नवी कार्यकारणी इंद्रजीत देशमुख यांनी जाहीर केली. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचीव, खजीनदार यांच्यासह विश्वनाथ खोत, डॉ. अशोक सावंत, यतीन सावंत, देवेंद्र पिसाळ, धनंजय पवार, सलीम मुल्ला, भगवान नलवडे, डॉ. सुशांत मोहिते, सुहास पाटील, विजयालक्ष्मी शेट्टी, सुनिता गरुड यांचा समावेश आहे.

यावेळी नुतन विश्वस्तांचा सत्कार माजी विश्वस्तांच्या हस्ते झाला. निवडीनंतर श्री. देशमुख यांनी शिवम्ं प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सुरु असलेल्याय कार्यामध्ये सर्वांचेच मोठे योगदान आहे. शेती, आरोग्य, शिक्षण या विषयावर प्रतिष्ठान यापुढे काम करेल. नाम फाऊंडेशनच्या मदतीनेही प्रतिष्ठानच्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबवले जात आहे. प्रतिष्ठानच्या कार्याला समाजातील सर्वाची साथ मिळावी, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सीएम साहेब, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल; मनसेचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे तर जिथे कोरोना रुग्णसंख्या कायम आहे त्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबई लोकलही अद्याप सुरू होणार नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर मनसेने खोचक टोला लगावला आहे.

सीएम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत, बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करु शकता, आमचा सीएम जगात भारी” असे खोचक ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

मुंबई लोकल बाबत मुख्यमंत्री काय म्हणाले-

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. पहिल्या टप्प्यात लोकलचा निर्णय घेणं कठिण आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यासाठी केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल होते.

दरम्यान, राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 22 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध कायम राहणार आहेत. नव्या नियमानुसार 22 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल.

सांगोला- मिरज रोडवर ट्रक -ओमनीचा अपघात, 3 ठार तर 13 जखमी

सोलापूर | भरधाव आलेल्या मालट्रकने ओमनी कारला समोरुन जोराची धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातामध्ये कार चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. तर कारमधील लहान मुले, महिला, पुरुष असे 13 जण जखमी झाले. हा अपघात सांगोला – मिरज रोडवरील करांडेवाडी उड्डाणपुलाजवळील सर्विस रोडवर घडला.

ही घटना सोलापूरच्या सांगोला -मिरज रस्त्यावर घडली आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की घटनेत चारचाकी ओमनीचा पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या भीषण अपघातात कारचालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (वय- 42 रा.उदनवाडी ता.सांगोला), कावेरी मनोज हरीजन (वय- 7) रा.निरलगी ता.ताळेकोटी जि.विजापूर) व गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय-8, रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

या अपघतात मनोज महादेव आप्पा हरीजन (वय-40),भारती मनोज हरीजन (वय-30 दोघेही रा.निरलगी ता.ताळेकोटी जि.विजापूर) , मानतेश मगिरी (वय-32) ,चंद्रकांत दुराण्णाप्पा मगिरी (वय-25), ताराबाई चंद्रकांत मगिरी (वय-30), अंबिका मानतेश मगिरी (वय-28), मुत्तूराम चंद्रकांत मगिरी (वय-2), चिन्नू चंद्रकांत मगिरी (वय-5), दिपा मानतेश दुराण्णाप्पा मगिरी (वय-16), लक्ष्मी चंद्रकांत मगिरी (वय-6), कृष्णात शिवाप्पा मगिरी (वय-30 सर्वजण रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा), शरणू हिरगप्पा मगिरी (वय-28) व परशू शरणाप्पा चलवादी (वय-28) अशी जखमींची नावे आहेत.

भाजप मंत्री म्हणतात बीफ खावा; बीफ वरील बंदी उठली काय? म्हणत शिवसेनेने सोडला टिकेचा बाण

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिकन मटण खाण्यापेक्षा बीफ खावा अस वादग्रस्त वक्तव्य भाजप मंत्री सणबोर शूलाई यांनी केल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर जोरदार टीका केली आहे. बीफ वरची बंदी उठली काय असा सवाल करत बीफ प्रकरणी ज्यांचे झुंडबळी गेले …ज्यांना बीफ बाळगले म्हणून अपमानित केले त्या सर्वांची माफी मागा अशी मागणी शिवसेनेने केली.

भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. मेघालयात भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुलाई सांगतात, ‘लोकहो, चिकन, मटण, मासे कसले खाता? बीफ खा बीफ! गोमांस खा. त्यातच मजा आहे!’ गोमांस भक्षणाची ही अशी तरफदारी करणाऱ्या भाजप मंत्र्यांनी असे हिंदुत्वविरोधी वक्तव्य करूनही या महाशयांचा बालही बाका झाला नाही. हे असे विधान भाजपची सत्ता नसलेल्या एखाद्या राज्यात झाले असते तर एव्हाना त्या मंत्र्याच्या घरास घेराव घालून त्यास बडतर्फ करण्याच्या मागण्या सुरू झाल्या असत्या. इतकेच काय, ज्या सरकारातला मंत्री गोमांस भक्षणाचे समर्थन करतोय ते सरकार पक्के देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी असल्याचे सांगत त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही झाली असती, पण भाजपच्या मंत्र्याने गाई कापून खा असे बेताल विधान करूनही एकाही भाजप प्रवक्त्याने गोमातेच्या सन्मानार्थ प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही. असा टोला शिवसेनेने लगावला.

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर गोव्यात ‘बीफ’ कमी पडू दिले जाणार नाही. वाटल्यास बाहेरुन बीफ मागवू व गोवेकरांच्या गरजा भागवू, अशी भूमिका घेतली होती. पर्रीकर हे काय साधेसुधे असामी नव्हते. त्यांच्या विचारांची नाळ हिंदुत्वाशी घट्ट जोडली होती व ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर ‘सेवक’ होते. पण त्यांनी आपल्या राज्यात गोमांस विकायला व खाण्यास पूर्ण सूट देऊनही हिंदुत्ववाद्यांचे मन पेटून उठले नाही.

गाईंना ‘डोके’ असते तर गोवा, ईशान्येकडील राज्यांत गाईंचे शिष्टमंडळ राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटले असते व इतर राज्यांत ज्याप्रमाणे गोवंश हत्याबंदी आहे तसा कायदा लावून आमच्या कत्तली थांबवा अशी मागणी करणारा हंबरडा त्यांनी फोडला असता किंवा ज्या राज्याचे मंत्री ‘बीफ’ खाण्याचा प्रचार करतात त्या राज्यांतून गाय जमातीस हिंदुत्ववादी राज्यांत स्थलांतरित करा, अशीही मागणी गाईंच्या संघटनेने करायला मागेपुढे पाहिले नसते. पण शेवटी गाईच त्या. मुक्या-बिचाऱ्या. कोणीही हाका आणि कोणीही कापा अशीच त्यांची अवस्था झाली आहे असे शिवसेनेने म्हंटल.

आश्चर्यकारक! अंत्यसंस्कारासाठी सरणावर ठेवलेली महिला बसली उठून

Smashan

औरंगाबाद | डॉक्टरने मृत घोषित केल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आणून महिलेला सरणावर ठेवले खरे, परंतु डोळ्यावर पाणी पडताच ही महिला जिवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपस्थितांत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ही घटना कन्नड तालुक्यातील आंधानेर येथे काल संध्याकाळच्या सुमारास घडली. जिजाबाई गोरे (रा. अंधानेर) असे या ७५ वर्षीय वृध्द महिलेचे नाव आहे.

आजारी असल्यामुळे उपचार करण्याकरिता सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिजाबाई गोरे यांना नातेवाईकांनी गावातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. या महिलेची तपासणी केल्यानंतर तिला डॉक्टर मृत घोषित केले. त्यानंतर सर्व जवळच्या नातेवाईकांना या महिलेच्या निधनाची वार्ता कळविण्यात आली. पाहुणे मंडळी गावात आल्यानंतर गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूतीत अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी करून कन्नड शहरातून स्वर्गरथ मागविण्यात आला. त्यानंतर घरी सर्व क्रिया करण्यात येऊन वाजत गाजत या महिलेला रात्री नऊ वाजता स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यानंतर महिलेस लाकडाच्या सरणावर ठेवण्यात येऊन चारी बाजूने रॉकेलचा शिडकावा करण्यात आला. शेवटी पाणी पाजण्याची क्रिया सुरू असताना या महिलेच्या डोळ्याच्या पापणीवर पाणी पडले. त्यानंतर मात्र महिलेने डोळ्याची उघडझाप केली. हा सर्व प्रकार स्मशानभूमीत अंधार असल्याने लवकर दिसला नाही. परंतु एका व्यक्तीने बॅटरीचा उजेड केल्यानंतर ही महिला जिवंत असल्याचे निदर्शनास आले. लगेच पुढील कार्यक्रम थांबविण्यात आले. महिलेच्या अंगावर रचलेली लाकडे काढण्यात आली.

यामुळे महिलेची हालचाल वाढली अन् चक्क ती महिला उठून बसली. यामुळे सुरू असलेली नातेवाईकांची रडारड थांबली. महिलेस सरणावरून खाली घेण्यात येऊन तत्काळ शहरातील डॉ. मनोज राठोड यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता आणले. ही महिला जिवंत असून हृदय सुरू आहे मात्र, ब्रेन डेड असून त्या कोमात गेल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.