Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3734

अतिवृष्टीच्या आसमानी संकटात सरकार जावलीच्या मदतीला कर्तव्यबद्ध : ना. बाळासाहेब पाटील

जावली | सातारा जिल्ह्यातील अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील वाई, पाटण, महाबळेश्वर तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे तीन तालुक्यामध्ये भूस्खलनाने मोठी जीवित व आर्थिक नुकसान केले आहे. सातारा जिल्ह्यावरील आसमांनी संकटात राज्याच्या महाविकास आघाडी सरकार कडून दुर्गम जावलीच्या मदतीला कटीबद्ध असल्याची ग्वाही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जावली येथील रेगडी येथे भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना दिला.

यावेळी रेंगडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, सभापती जयश्री गिरी, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, विजयराव मोकाशी, कांताराम कासुर्डे, शिवराम सपकाळ, रविकांत सपकाळ, आतिष कदम, संकेत पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, रेंगडी येथील चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले ही दुर्दैवी घटना आहे. आपतिग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितली असून जिल्ह्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करू. वाहून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करू,अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देऊ.

बेवारस वाहनांच्या कारवाईचे मिशन फतेह; पहिल्याच दिवशी उचलले 6 वाहने

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली.

या भंगार बिनकामी वाहनांवर सात दिवसांची नोटीस लावण्यात येईल आणि सात दिवसानंतर वाहने उचलली नाही तर महानगर पालिकेकडून वाहने जप्त केली जाणार असल्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले होते. तरीही काहींनी ही नोटीस गरजेची समजली नाही म्हणुन त्यांच्यावर सात दिवस उलटल्यानंतर म्हणजेच सोमवारी हे वाहने जप्त करण्यात आले. यापैकी तीन वाहन मालकांनी कारवाई टाळण्यासाठी 12,000 रुपये दंड जमा केला.

आस्तिक कुमार पांडे यांनी या वाहनांचा तपशील आरटीओकडे पाठवण्याची सूचना दिली आणि वाहन नोंदणीची कागदपत्रे आणि त्याच्या मालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस केली होती. आज कारवाईच्या पहिल्याच दिवशी महापालिका, पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी या मोहिमेला हाथभार लावला. महापालिकेने अतिक्रमणविरोधी पथक, यांत्रिक विभाग, पोलिस सुरक्षा आणि नागरिक मित्र पथक यांच्या कर्मचाऱ्यांसह ही मोहीम फतेह केली आणि मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सहा वाहने उचलली असल्याचे कार्यवाहक प्रभाग अधिकारी संजय सुरडकर यांनी सांगितले. महापालिका यांत्रिकी विभाग, अतिक्रमण हटाव विभाग, पोलीस, आरटीओ यांच्यावतीने ही कारवाई आजपासून करण्यात येणार आहे. निहाय झोन क्रमांक एक 48, झोन क्रमांक दोन 99, झोन क्रमांक तीन 6, झोन क्रमांक चार 18, झोन क्रमांक पाच 22, झोन क्रमांक सहा 5, झोन क्रमांक सात 28, झोन क्रमांक आठ 14 झोन क्रमांक नऊ 37 या ठिकाणी एवढे बेवारस वाहने उभी आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हाॅकी संघाचे स्वप्न भंगले, बेल्जियमचा 5-2 ने विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलमध्ये भारताची गाठ पडलीय बेल्जियमसोबत लढत झाली. तब्बल चार दशकानंतर भारताने सेमी फायलन गाठल्याने, त्यामुळे भारत मॅच जिंकून पदक पक्कं करणार का?, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले होते. अखेर या अटीतटीच्या झालेल्या लढाईत भारताचे ऑलिम्पिकमध्ये स्वप्न भंगले. या सामन्यात बेल्जियमने 5-2 असा मोठा विजय मिळविला. मात्र अद्याप कास्यंपदकासाठी भारत जिंकणार का आता याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहणार आहे.

मॅचच्या सुरुवातीला बेल्जियमने पेनल्टी कॉर्नर घेतला. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जियमच्या लुपर्टने गोल करुन बेल्जियम संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली गेलेला होता. मात्र बेल्जिमय विरोधात मॅचमध्ये भारताला 7 व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. यावेळी हरमनप्रीतने शानदार ड्रॅग फ्लिक करुन गोल केला आणि त्याचबरोबर भारताचं गोलच खातंही उघडलं. यामुळे भारत- बेल्जियम 1-1 असा बरोबरीत सामना आला होता.

मॅचच्या 8 व्या मिनिटाला मनदीप सिंगने रिव्हर्स स्लॅप शॉटसह गोल करत भारतासाठी दुसरा गोल केला. त्यामुळे भारताने आघाडी घेतली होती. भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला ​​दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारताने गोल करण्याची संधी दिली नाही. मात्र, 18 व्या मिनिटाला सापडलेल्या कॉर्नरने बेल्जियमच्या संघाला बरोबरीची संधी दिली. अलेक्झांड्रे हेंड्रिक्सने स्पर्धेचा 12 वा गोल केला. बेल्जिमयमच्या हेंड्रिक्सने 49 व्या मिनिटाला तिसरा गोल करत 3-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर 54 मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवरून बेल्जियमच्या खेळाडून गोल करत 4-2 अशी आघाडी विजयी घाैडदाैड केली होती. शेवटची 6 सेंकद बाकी असताना बेल्जियमने 5 वा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

दिलासादायक! महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या अँटीजन चाचण्यामध्ये फक्त तीन रुग्ण कोरोनाबाधित

Antigen test

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण आणि कोविड चाचण्या केल्या जात आहेत.

सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अँटीजन चाचणी केली असता फक्त तीन रुग्ण आढळले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोविड सेंटर मध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी या चाचण्या केल्या होत्या. महापालिकेच्या कोविड सेंटर मध्ये 22 अँटीजन चाचण्या करण्यात आल्या. यावेळी एकही रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह निघाला नाही. त्याचबरोबर शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये मोबाईल टीमने 1,418 अँटीजन चाचण्या केल्या असून आरटी-पीसीआर चाचण्यांसाठी 400 संशयितांचे स्वॅब नमुने गोळा केले.

सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 07 आणि खाजगी प्रयोगशाळांद्वारे 78 आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यावेळी, जीएमसीएच (डेंटल) ने 53 अँटीजन चाचण्या घेतल्या आणि खाजगी प्रयोगशाळांनी 35 अँटीजन चाचण्या केल्या असता कोणताही पॉसिटीव्ह रुग्ण आढळला नाही. AMC लवकरच सर्व RT-PCR चाचण्यांचा अहवाल प्राप्त करणार आहे.

औरंगाबाद : शहरात 6 आणि ग्रामीण मध्ये 14 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 20 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 6,तर ग्रामीण भागातील 14 रुग्णांचा समावेश असून 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 463 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 659 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3504 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 24 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यामध्ये शहरातील 7 आणि ग्रामीण मधील 17 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील कांचनवाडी येथे 1 तर इतर ठिकाणी 5 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात औरंगाबाद 5, कन्नड 1, गंगापूर 1,सोयगाव 1, पैठण 4, वैजापूर 2 रुग्ण आढळले आहे. गंगापूर येथील 58 वर्षीय पुरुषाचा, पैठण येथील 65 वर्षीय पुरुष आणि 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

राज्यमंत्री सत्तारांच्या माफीनाम्याच्या स्पष्टीकरणावर खंडपीठ असमाधानी

औरंगाबाद | जमिनीच्या फेरफार प्रकरणामध्ये अधिकार नसतानाही दिलेल्या स्थगिती आदेशावरून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. सत्तार यांनी शपथपत्र सादर करून न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एन. ला यांच्या पीठासमोर माफीही मागितली. मात्र, माफीनाम्यात दिलेल्या स्पष्टीकरणावर खंडपीठाने असमाधान व्यक्त केले. सत्तार यांनी यापुढे कायद्याच्या तत्त्वाचे पालन करावे आणि प्रशासकीय अधिकाराचा वापर करून अर्धन्यायिक आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यापासून दूर राहावे, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

राज्यमंत्र्यांना प्रदान केलेल्या अधिकाराच्या कार्यकक्षेत कार्यवाही करणे अभिप्रेत आहे. संबंधित प्रकरणातील अर्धन्यायिक स्वरूपाच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची तरतूद असताना राज्यमंत्र्यांनी दिलेले स्थगिती आदेश गरजेचे नव्हते. या संदर्भातील आदेश हे अयोग्य, अनावश्यक, कार्यक्षेत्र व अधिकार विरहित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मे. जयेश इन्फा आणि भागीदार यांच्या बाजूने दिलेल्या निकालाविरुद्ध आक्षेपकर्ता मिझ युसूफ बेग सांडू बेग यांनी औरंगाबादच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलेले अपील फेटाळत औरंगाबादच्या ( ग्रामीण ) तहसीलदारांचे आदेश न्यायालयाने कायम केले.

तसेच राज्यमंत्री सत्तार यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सातबारातील इतर अधिकारातील नोंदी तत्काळ रद्द करण्याचेही आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी पारित केले आहेत. न्यायालयाने २७ जुलै रोजी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

तक्रारींचा तत्काळ निपटारा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

औरंगाबाद | नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमिवर लोकशाही दिनी प्रत्येक विभागाने त्यांच्या अंतर्गत प्राप्त तक्रारींवर तत्काळ योग्य ती कार्यवाही करून निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज झालेल्या लोकशाही दिनात दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देशित केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी (साप्रवि) रिता मेत्रेवार, जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या लोकशाही दिनात एकुण 5 तक्रारी दाखल झाल्या. यात जिल्हा परिषद-1, पोलीस विभाग-1 व महसूल विभाग-3 अशा एकुण 5 अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. तर इतर 13 निवेदने अर्जदारांमार्फत सादर करण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यात तालुका स्तरावर निपटारा न झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनात आपली तक्रार घेऊन आलेले अर्जदार सुरेश काळे यांनी कोरोना प्रतिबंधक नियमाचे म्हणजे चेहऱ्याला मास्क लावण्याचे पालन न केल्याने तत्काळ 500 रू. दंड लावण्याचे आदेश दिले. तसेच यापुढे सर्व नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागृत राहतांना कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्ष रहावे व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

नात्याला काळिमा ! नागपूरात काकाचा 7 वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरात एका व्यक्तीनं आपल्या सात वर्षीय पुतणीवरच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी काकानं दारुच्या नशेत आपल्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यामुळे आरोपी काकाचे हे विकृत कृत्य समोर आले. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी नराधम काकाला चांगलाच चोप दिला आहे. यानंतर या लोकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

हि घटना नागपूर शहराच्या सीमेवर असणाऱ्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या आरोपीने काल सायंकाळी दारुच्या नशेत आपल्या सात वर्षाच्या पुतणीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर परिसरातील व्यक्तींनी संताप व्यक्त केला. यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपी काकाला अर्धनग्न करून मारहाण केली आहे.

आरोपी काका हा दारुच्या नशेत असल्यानं स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं आहे. या आरोपी काकाने केवळ आपल्या पुतणीवरच नव्हे, तर परिसरातील अन्य महिलांचीही छेड काढण्याचा अनेकवेळा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. यानंतर परिसरातील अनेकांनी संबंधित आरोपीचा कायमचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत.

बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा हटवली म्हणुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला भाजप कार्यकर्त्यांना चोप

marhan

औरंगाबाद | औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत नुकत्याच झालेल्या उपसभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच भाजप कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हटवल्याने राडा झाला. कॉंग्रेस सोडून भाजपत प्रवेश करत पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवणाऱ्या अर्जुन शेळके यांना त्यांच्या दालनात मारहाण झाल्याची घटना आज दुपारी घडली. कॉंग्रेसच्या दोन पंचायत समिती सदस्यांसह सात ते आठ कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याची माहिती माजी विधानसभा अध्यक्ष भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/511464719921813/

याविषयी अधिक माहिती अशी की, अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून शेळके निवडून आले. यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. २९ जुलैला रोजी औरंगाबाद पंचायत समितीच्‍या कार्यालयात झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अनुराग शिंदे यांना ९ मते तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जुन शेळके यांना १० मते मिळाली. यानंतर सोमवारी दुपारी नूतन उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात कॉंग्रेसचे दोन सदस्य आणि सात ते आठ जण आले.

बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा का हटवली म्हणत अचानक त्यांनी शेळके यांच्यावर हल्ला केला. दालनातील खुर्च्या-टेबलची तोडफोड केली. दालनाच्या खिडक्यांची तोडफोड केली. यात शेळके यांच्या डोक्याला मार लागला आहे.

IND vs ENG : पहिल्या टेस्ट आधी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू सिरीजमधून बाहेर

Team India

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण ही टेस्ट सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर मयंक अग्रवाल याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. सराव करत असताना मोहम्मद सिराजचा बाऊन्सर मयंक अग्रवालच्या डोक्याला लागला. या सिरीजमधून मयंक अग्रवाल बाहेर झाल्यामुळे आता टीम इंडियापुढे ओपनिंगला कोणाला खेळवायंच हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या अगोदर शुभमन गिल,वॉशिंग्टन सुंदर,आणि आवेश खान हे तीन खेळाडू आधीच टेस्ट सीरिजमधून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. यानंतर मयंक अग्रवाल शुभमन गिलऐवजी ओपनिंगला खेळेल, असं सांगितलं जात होतं. पण आता मयंक अग्रवालही बाहेर गेल्यामुळे केएल राहुल रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. केएल राहुलने सराव सामन्यामध्ये शतक केलं होतं, त्यामुळे तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

सूर्या-पृथ्वी कधी पोहोचणार?
दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्या कोरोनाच्या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. यामुळे या दोघांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे दोघेजण पुढच्या 24 तासांमध्ये इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही या दोघांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यानंतरच ते टीममध्ये प्रवेश करू शकतील. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या टेस्टपासून उपलब्ध होणार आहेत.