Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3735

साताऱ्यात पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करून विक्री करणारी टोळी जेरबंद

सातारा | पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही इसम पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संबंधित इसमास टोळीला जेरबंद केले. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 4 फूट लांबीचे, दीड फूट रुंदीचे एका पट्टेरी वाघाचे कातडे व वरच्या जबड्यात 13 दात व खालच्या जबड्यात 16 दात, एक मोटारसायकल व 4 मोबाईल फोन असे एकूण 5 लाख 26 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 1 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकास पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही इसम पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे सारोळा ब्रिज येथे पथकाने सापळा लावून वाघाच्याकातडी विक्रीसाठी आलेल्या 4 इसमाना ताब्यात घेतली. यामध्ये दिनेश अशोक फरांदे (वय 38, रा. ओझर्डे, ता. वाई जि. सातारा), हसन रज्जाक मुल्ला (वय 35, रा. ओझर्डे, ता. वाई), गणपत सदू जुनगरे (वय 45, रा. देवदेव ता.जावळी, जि. सातारा), सुनील दिनकर भिलारे (वय 52′ रा. भिलार ता.महाबळेश्वर) यांना अटक केली.

त्यानंतर संबंधित पथकाने नसरापूर वन विभागचे वन्य जीव रक्षक अधिकारी यांना याची माहिती दिली. आरोपींना पुढील कारवाई कामी राजगड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासाची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यकी पोलीस निरीक्षक माने, पोलीस नाईक अमोल गोरे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर क्षीरसागर, पोवीस नाईक गुरू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, पूनम गुंड, चालक प्रमोद नवले यांनी केली आहे.

राज्यातील 25 जिल्ह्यासाठी नवी नियमावली जारी; दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढविल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील दुकाने दुपारी 4 पर्यंतच चालू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यात असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून सौंकाळी नवी नियमावली जरी करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली असून दुकानांच्या वेळा रात्री आठ वाजेपर्यंत वाढविण्यात आलेल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली इथे ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा विचार केला जात असून ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असे सांगितले होते. तसेच या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असही त्यांनी स्पष्ट केलं होत.

दरम्यान, आज सायंकाळी राज्य सरकारच्यावतीने नियमावली जारी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील २५ जिल्ह्याना  निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर हे जिल्हे तिसऱ्या टप्प्यात असल्याने या ठिकाणी निर्बंध अजूनही कायम ठेवण्यात आलेले आहेत.

नव्या नियमावलीत हे आहेत महत्त्वाचे निर्णय –

1) सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे.

2) सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

3) सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

4) जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.

5) कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

6) जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी आहे.

7) जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद राहतील.

8) मुंबईतली लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंदच, नव्या नियमावलीत लोकल सोडण्यावर कुठलेही भाष्य नाही.

9) मुंबई, उपनगर आणि ठाण्याचा निर्णय आपत्कालीन विभागच घेणार आहे.

‘मित्रांसोबत संबंध ठेव, नाहीतर पैसे दे; प्रियकराच्या धमकीनंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Rape

लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात धोखा दिल्याचं एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणात रुग्णालयात भर्ती असलेल्या तरुणीनं आपल्या प्रियकरावर आणि त्याच्या मित्रांवर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. या पीडित तरुणीने या सर्व जाचाला कंटाळून जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. हि घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद या ठिकाणी घडली आहे.

पीडित तरुणीने सांगितले कि, आरोपी प्रियकर शादाब याच्यासोबत तिची काही दिवसांपूर्वी मैत्री झाली होती. शादाबनं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगत तिला प्रपोज केलं आणि हे नातं मैत्रीवरुन प्रेमात रुपांतरित झालं. यानंतर शादाबने दोघांचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले आणि आता ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो देत आहे. तसेच शादाबने हे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या मित्रांनाही पाठवले असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

हि गोष्ट जेव्हा या तरुणीच्या घरच्यांना समजली तेव्हा तिनं पोलिसांत तक्रार करत आरोप केला, की शादाबनं तिला म्हटलं, की माझ्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेव अन्यथा 50 हजार रुपये दे. असं न केल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. यानंतर तरुणीनं पाण्यात उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. यानंतर तरुणीनं आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शादाब, आरिफ, सद्दाम आणि राशिद या चौघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कराड पोलिसांची कामगिरी : जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी एकाचा खून, आरोपी झारखंडमधून ताब्यात

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील गोळेश्वर याठिकाणी नदीकडे असलेल्या उसाचे शेतामध्ये पाचोळ्यात सडलेल्या अवस्थेत १३ जुलै २०२१ रोजी एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह मिळून आलेला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद झालेली होती. या तपासात इस्माईल शताबुद्धीन शेख (वय २५, मुळ रा. बालुग्राम ता. राधानगरी जि.साहबगंज, झारखंड) या पुरुषाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या खुनातील आरोपीना शोधून काढले असून जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी खून झाल्याचे समोर आले असल्याची माहिती सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक बन्सल म्हणाले की, कराड येथील खुनाचा उलघडा करण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख (वय २३, रा. इर्शादटोला, ता. राजमहल जि. साहेबगंज राज्य झारखंड) याला कराड पोलिसांनी १ जुलै २०२१ रोजी रात्री अटक केलेले आहे.

या खुनातील आरोपीचा शोध घेणे हे पोलीसांसमोर एक आव्हान होते. तरीही कराड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. तसेच गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत त्याला झारखंड येथून ताब्यात घेतली त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जुगारात हरलेल्या पैशाचा राग मनात धरून इस्माईल शेख यास चाकूने वार करून जीवे ठार केले. तसेच त्याचे जवळील ९ हजार ५०० रुपये काढून घेतल्याची कबूल संबंधित आरोपीने दिली.

तुटलेल्या चांदीच्या चेनवरून खूनाचा उलगडा –

घटनास्थळी मिळालेल्या वस्तुत एक तुटलेल्या चांदीची चेन होती. हि चेन यातील मृत्यू झालेल्या व्यक्तीची नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राप्त चेन वरून कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस नाईक एम. एम. खान, संदीप पाटील या पथकाने धागेदोरे लावून मृत्यू झाल्याच्या गावी झारखंड येथे जावून मृत्यूच्या तपासकामी संबंधीत काही इसमांना कराड येथे बोलवले होते. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता. त्यातील मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख याने जुगारात हरलेल्या पैशाचा राग मनात धरून इस्माईल शेख यास चाकूने वार करून जीवे ठार केले आहे तसेच त्याच्या जवळील ९ हजार ५०० रुपये काढून घेतले असल्याची कबुली दिली. त्यानंतर संबंधित आरोपी मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख (वय २३, रा. इर्शादटोला, ता. राजमहल जि. साहेबगंज राज्य झारखंड) यास १ ऑगस्ट रोजी रात्री अटक केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे हे करत आहेत.

१२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 12 वीचा निकाल उद्या जाहीर होणार असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. जाहीर होईल.असे वर्षा गायकवाड यांनी म्हंटल

बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले असल्यानं निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.

अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

https://msbshse.co.in

hscresult.mkcl.org

Maharashtra.nic.in

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

दि.२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.

एसटीची सुरक्षा कठड्याला धडक; अपघातात महिला गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट नजीक दुचाकी आणि एसटीचा सोमवारी अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेने दुचाकी अचानक राष्ट्रीय महामार्गावर आणल्याने दुचाकीला वाचविण्याच्या नादात चालकाने एसटी महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडला असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकवली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सातारा-पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस कोल्हापूरच्या दिशेने जात जात होती. एसटी बॉम्बे रेस्टॉरंट लगत आली असता अचानकपणे सर्व्हिस रोडवरून जात असलेल्या एका महिलेने आपली दुचाकी क्रमांक ( एमएच ११ सी झेड ८०४७) हि महामार्गावर आणली. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकीवरील महिलेला वाचविले.

या अचानक घडलेल्या घडामोडीत तसेच महिलेला वाचविण्याच्या नादात एसटी चालकाने एसटी सर्विस रोडला असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकवली. सुदैवाने बस मधील कोणालाही दुखापत झाली नसून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुचाकीवरील महिला हि अपघातात जखमी झाली असून महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Gold Price : सोने पुन्हा घसरले, चांदी देखील झाली स्वस्त; आजचे नवीन दर पहा

नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 2 ऑगस्ट 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाली. यामुळे सोने प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या खाली पोहोचले. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या सराफा सत्रादरम्यान, दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 47,041 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 66,491 रुपये प्रति किलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या घसरणीचा कल होता, तर चांदीच्या किंमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही.

सोन्याची नवीन किंमत
सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 124 रुपयांची घट झाली. यामुळे मौल्यवान पिवळी धातू प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या खाली पोहोचली. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवी किंमत आज 46,917 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,808 डॉलर प्रति औंस झाली आहे.

चांदीची नवीन किंमत
चांदीच्या दरात आजही घसरण झाली. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती 18 रुपयांनी किरकोळ घटून 66,473 रुपये प्रति किलो झाल्या. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाहीत आणि ते 25.47 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. दरम्यान, रुपया आज डॉलरच्या तुलनेत 9 पैशांनी मजबूत होऊन 74.33 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.

सोन्याचे भाव का कमी झाले?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की,”डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या. त्याच वेळी, न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये स्पॉट प्राइस कमी झाल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव घसरले.”

अजित पवार शब्दाला पक्का माणूस, पण त्यांनी शब्द फिरवणे म्हणजे…;चंद्रकांत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आजवर अनेक वेळा म्हटलं की, अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. अजित पवारांसारखा शब्दाला पक्का माणूस नाही. पण आता शब्द पाळायला हवा होता, मात्र त्यांनी शब्द फिरवणं म्हणजे आश्चर्य आहे”, असं पाटील म्हणाले.

अजित पवारांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. पण आता ते जर आपण दिलेल्या शब्दावरून पलटी मारत असतील तर मग कठीण आहे. महाविकास आघाडी सरकार अत्यंत खोटारडे सरकार आहे. निवडणूक होईपर्यंत हे सर्व चालते, पण नंतर कळते. महाविकास आघाडी सरकारला लोक धडा शिकवतील’, असेही पाटील म्हणाले.

झिका विषाणूच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने महाराष्ट्रात पाठवले उच्चस्तरीय पथक

मुंबई । महाराष्ट्रात झिका विषाणूचे पहिले प्रकरण समोर आल्याने, केंद्र सरकारने सोमवारी परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी उच्च स्तरीय पथक पाठवले, जेणेकरून रोगाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करता येईल. या तीन सदस्यीय केंद्रीय टीममध्ये पुण्याच्या प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (NIMR), ICMR, नवी दिल्लीचे कीटकशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.

निवेदनानुसार, ही टीम राज्याच्या आरोग्य विभागाशी बारकाईने काम करेल, जमिनीच्या परिस्थितीचा आढावा घेईल आणि झिका व्यवस्थापनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कृती आराखडा अंमलात आणला जात आहे की नाही याचे मूल्यांकन करेल. तसेच राज्यातील झिका विषाणूच्या प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची शिफारस करेल, असे निवेदनात म्हटले गेले आहे.

राज्यात झिका विषाणूच्या संसर्गाचे पहिले प्रकरण 31 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात आढळून आले. तथापि, राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की,”संसर्ग झालेली महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाली आहे. तिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत,” विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.

निवेदनानुसार, पुरंदर तहसीलच्या बेलसर गावात राहणाऱ्या 50 वर्षीय महिलेचा तपास रिपोर्ट 30 जुलै रोजी मिळाला. या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, झिका संसर्गाव्यतिरिक्त तिला चिकुनगुनियाचाही त्रास होत होता. 31 जुलै रोजी शासकीय वैद्यकीय पथकाने गावाला भेट दिली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची भेट घेऊन त्यांना प्रतिबंधात्मक उपायांबाबत सूचना दिल्या, असे आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रापूर्वी ते फक्त केरळपुरते मर्यादित होते.

झिका विषाणूची लक्षणे काय आहेत?
डेंग्यू आणि मलेरिया प्रमाणे, झिका हा एक प्रकारचा विषाणू आहे जो डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हे प्रामुख्याने एडीस डासांद्वारे पसरलेल्या विषाणूमुळे होते, जे दिवसा चावतात. डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवण्यासाठी देखील हाच डास कारणीभूत आहे.

झिकाचे पहिले दिसून येणारे लक्षण म्हणजे ताप, जो डेंग्यूसारखाच आहे. तथापि, ते पहिल्यांदा ओळखणे फार कठीण आहे. अनेक रुग्ण फ्लूच्या लक्षणांमुळे गोंधळून जातात आणि त्यामुळे त्यांना झिका आहे की नाही हे कळत नाही. झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, पुरळ आणि सांधेदुखी यांचा समावेश होतो. रुग्णांना या विषाणूची लागण होण्यास किंवा लक्षणे दिसण्यास तीन ते 14 दिवस लागतात.

झिका विषाणूचे पहिले प्रकरण भारतात कधी आले?
झिका विषाणू भारतात नवीन नाही. भारतात या विषाणूच्या पहिल्या प्रकरणाची जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2017 मध्येच पुष्टी केली. फेब्रुवारी 2016 मध्ये WHO ने झिकाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. गुजरात हे भारतातील पहिले असे राज्य होते जिथे झिका विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर तामिळनाडू या विषाणूला बळी पडणारे दुसरे राज्य बनले.

पंतप्रधान मोदींनी लाँच केले e-RUPI, ‘या’ कॅशलेस डिजिटल पेमेंट सोल्यूशन बद्दल सर्व जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रुपी (e-RUPI) लाँच केले. पंतप्रधान मोदींनी 2 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे लॉन्च केले. e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट होईल. e-RUPI एक क्यूआर कोड किंवा SMS स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे, जो लाभार्थीच्या मोबाइलवर डिलिव्हरी केला जातो. या एकवेळ पेमेंट सिस्टीमचे युझर्स कार्ड, डिजिटल पेमेंट app किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये प्रवेश न करता सर्व्हिस प्रोव्हायडरवर व्हाउचर रिडीम करू शकतील.

सध्या e-RUPI आरोग्य सेवांशी जोडला जात आहे
e-RUPI लाँच केल्यानंतर, पंतप्रधान मोदी म्हणाले की,” सध्या ते फक्त आरोग्य सेवांशी जोडले जात आहे. आता जर एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन लसीकरण करावयाचे असेल तर त्याला e-RUPI च्या माध्यमातून कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस ट्रांजेक्‍शनची सुविधा मिळेल. नंतर ते इतर आरोग्य सेवांसाठी पैसे भरण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.” ते म्हणाले की,”देशात डिजिटल पेमेंटमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.” यासह, लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय योजनांचा लाभ मिळाला आहे. या दरम्यान, त्यांनी Rupay Card आणि Cowin App च्या यशाबद्दल चर्चा केली.

तंत्रज्ञानाला गरीबांना मदत करण्याचे साधन बनवले
पंतप्रधान मोदी म्हणाले की,” पूर्वी आपल्या देशात काही लोकं असे म्हणत असत की, तंत्रज्ञान फक्त श्रीमंतांसाठीच आहे, भारत हा गरीब देश आहे, तर भारतासाठी तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे? जेव्हा आपले सरकार तंत्रज्ञानाला मिशन बनवण्याविषयी बोलत असे, तेव्हा अनेक राजकारणी, विशिष्ट प्रकारचे तज्ञ त्यावर प्रश्न उपस्थित करत असत. आज त्या लोकांचा विचार नाकारण्याबरोबरच देशाने त्यांना चुकीचे सिद्ध केले आहे. आज देशाचा विचार वेगळा आणि नवीन आहे. आज आपण तंत्रज्ञानाला प्रगतीचे साधन म्हणून गरीबांना मदत करण्यासाठी पाहत आहोत. भारत आज जगाला दाखवत आहे की, तंत्रज्ञान स्वीकारण्यात आणि त्याच्याशी जोडण्यात ते कोणाच्याही मागे नाहीत. जेव्हा नवकल्पना (Innovations) सर्विस डिलीवरीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, तेव्हा भारताकडे जगातील मोठ्या देशांसह जागतिक नेतृत्व देण्याची क्षमता असते.