Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3740

प्रशासनाच्या नियमांना हरताळ; मायणीत बैलगाडी शर्यतींचे थाटात आयोजन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राज्यावर कोरोनाचे संकट आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना अद्यापही याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते. सातारा जिल्ह्यातील मायणी येथे प्रशासनाचे सर्व नियम धुडकावून बैल गाडी शर्यतीचे थाटात पार पडल्या. विशेष म्हणजे बैलगाडी शर्यतीला उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना देखील ही शर्यत आयोजित करण्यात आली. याकडे मात्र, प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे.

राज्यात बैलगाडी शर्यतींवर बंदी असताना देखील मायणी परिसरात बैलगाडी शर्यतींचा अक्षरशः धुरळा उडाल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचे सर्व नियम धुडकावून हजारो नागरिक या ठिकाणी एकत्र आले होते. या ठिकाणी अजूनही बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जात आहे. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असताना प्रशासन मात्र अजून ढिम्मच आहे.

एकीकडे सामान्य लोकांना प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या नियमानाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारच्या शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोक एकत्र येऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. विशेष म्हणजे मायणी पोलीस ठाण्यापासून अवघ्या 5 किमी अंतरावर पार पडणाऱ्या या शर्यतींकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आजपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर कारवाईचे आदेश काही दिवसांपूर्वी प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे.

आज पासून दोन क्रमांक एक पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. ही मोहीम महापालिकेने हाती घेतली असून महिनाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला बेवारस वाहने उभी केलेली आढळतात.
या भंगार बिनकामी वाहनांवर सात दिवसांची नोटीस लावण्यात येईल आणि सात दिवसानंतर वाहने उचलली नाही तर महानगर पालिकेकडून वाहने जप्त केली जाणार असल्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले होते. यापैकी काहींनी ही वाहने हटवली परंतु अद्याप 279 बेवारस वाहने उभी आहेत. असे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डिके पंडित यांनी सांगितले.

महापालिका यांत्रिकी विभाग, अतिक्रमण हटाव विभाग, पोलीस, आरटीओ यांच्यावतीने ही कारवाई आजपासून करण्यात येणार आहे. निहाय झोन क्रमांक एक 48, झोन क्रमांक दोन 99, झोन क्रमांक तीन 6, झोन क्रमांक चार 18, झोन क्रमांक पाच 22, झोन क्रमांक सहा 5, झोन क्रमांक सात 28, झोन क्रमांक आठ 14 झोन क्रमांक नऊ 37 या ठिकाणी एवढे बेवारस वाहने उभी आहेत.

खोटं बोल पण रेटून बोल असा सरकारचा कारभार; सदाभाऊंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने विरोधकांकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अजित पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिलेला होता की ३१ जुलै च्या अगोदर राज्यातील MPSCच्या सर्व जागा भरू आणि रखडलेल्या नियुक्त्या सुद्धा दिल्या जातील असा शब्द सभागृहाला दिला होता. तसेच MPSCसाठी जो आयोग आहे त्यावरील सदस्य सुद्धा तातडीने त्यांचीही नियुक्ती करू.परंतु एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही. खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. असे सदाभाऊ खोत यांनी म्हणलं

अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत कारण हे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. १५ ऑगस्ट पर्यंत MPSC च्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत.व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही व आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर १५ ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू.असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटल

शाळा स्थलांतर करण्याबाबत शिक्षण विभागाकडून नवीन निकष जारी

औरंगाबाद | शालेय शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षिका निकष निश्चित करण्यात येत आहे शालेय शिक्षण विभागाने शाळा स्थलांतर धोरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यांनी दिलेल्या नवीन निकषानुसार थोर कारण व अत्यावश्यक कागदपत्र असल्यास शाळा स्थलांतर करता येणार आहे.

बऱ्याच शाळांची इमारत धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे. शाळेतील सोयी सुविधा, विद्यार्थी संख्येत वाढ होत असल्यास जागा मालकाकडून भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर भाड्याच्या इमारतीमधून स्वतःच्या जागेत शाळा बांधणे अशा कारणांमुळे शाळेचे स्थलांतर करावे लागत आहे. शाळेचे स्थलांतर केल्यानंतर त्याची माहिती शिक्षा विभागाला द्यावी लागते. शाळा स्थलांतर करण्याबाबत शासनाने नियमावली दिली आहे.

‘विद्यार्थ्यांची स्थलांतर करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, शैक्षणिक व भौतिक सुविधांचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. ज्याठिकाणी शाळा स्थलांतरित केली जाणार आहे. ते ठिकाण प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेकरिता 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर नको असे निर्बंधही घालण्यात आले आहेत. शाळेचे स्थलांतरित झाल्यानंतर पटसंख्या सरासरी हजेरी यामध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही.’ असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव यांनी आदेशात म्हटले आहे.

औरंगाबाद : आज ‘या’ चार ठिकाणी होणार लसीकरण

औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे. आज शहरात फक्त चार ठिकाणी लसीकरण होणार आहे. महापालिकेकडे कोविशिल्ड लसींच्या फक्त 602 असून कोव्हॅक्सीन लसींचा 2200 डोसचा साठा उपलब्ध आहे. रविवारी उशिरापर्यंत शासनाकडून लसींचा नवीन साठा उपलब्ध झालेला नाही.

क्रांती चौक, राज नगर आणि एमआयटी हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर 200 लसी उपलब्ध राहणार असून प्रोझोन मॉल मध्ये ड्राइव्ह इन लसीकरण सुरूच राहणार आहे. या ठिकाणी 300 कोविशिल्ड लस दिली जाणार आहे.

शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी 80 केंद्रावर लसीकरण सुरू होते. परंतु आता लसीकरण केंद्राची संख्या 4 वर आलेली आहे.

उद्धव ठाकरेंनी स्वतःला झेपेल येवडच बोलावं; राणेंचा टोला

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी झापड मारु की कोणी उठणार नाही” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिल्यानंतर आता भाजपकडून देखील उद्धव ठाकरेंच्या विधानावर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःला झेपेल येवडच बोलावं असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री हे एका जबाबदार पदावर आहेत. ते काय बोलत आहेत याचा त्यांनी विचार करून बोललं पाहिजे. ज्या व्यक्तीने एक माशी मारली नाही किंवा कॅमेरा उघडण्यापलिकडे काही केलं नाही, त्या उद्धव ठाकरे यांनी मोठीमोठी इशाराची भाषा करू नये”, स्वतःला जेवढं झेपेल तेवढच त्यांनी बोलावं असा टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले-

आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

कोरोनाचे नियम पाळायला सांगणाऱ्यांकडून कोरोना नियम पायदळी; मनपा पथकाचे मात्र वराती मागुन घोडे

Municipal Squad

औरंगाबाद | कोरोनाची तीसरी लाट येणार आहे, ती खुप धोकादायक आहे, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा असे आरोग्य अधिकारी वारंवार सांगत आहेत. मात्र या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवत सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा शल्य चिकित्सकांना काल एका हॉटेलमध्ये निरोप देण्यात आला. यावेळी कोरोना नियम अक्षरशः पायदळी तुडवण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चा तर पुरता फज्जा उडाला असल्याचे पहायला मिळाले. याविषयी एका सजग नागरिकाने मनपाकडे तक्रार केल्यावर मनपाचे पथक आले खरे मात्र तोपर्यंत गर्दी पांगली होती.

औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी हे काल जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून सेवा निवृत्त झाले. यानिमित्ताने विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अनेक जबाबदार अधिकारी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे शनिवार व रविवारी औरंगाबाद शहरात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे, असे असूनही या कार्यक्रमाचे आयोजन करुन एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. एकीकडे प्रशासनाने विवाह समारंभाला उपस्थितीतांची मर्यादा घालून दिली आहे. तोच दुसरीकडे या कार्यक्रमाला मात्र एखाद्या विवाह सोहळ्यापेक्षा जास्त गर्दी जमली होती. यावेळी पुष्पगुच्छ देऊन आपला फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे अक्षरशः धिंडवडे उडाले होते.

• साहेब, नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच का ?
सामान्य नागरिकांनी जर कोरोनाचे नियम तोडले तर प्रशासन नागरिकांवर दंडात्मक कारवाई करते, काही प्रसंगी तर गुन्हे देखील दाखल करण्यात येतात. परंतु हीच कारवाई आता या अधिकाऱ्यांवर देखील होणार का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी, अधिकारी हे वारंवार कोरोना नियम पायदळी तुडवतात परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे साहेब नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहेत का ? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

शिवसेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना खांद्यावरच जाण्याची वेळ येईल; सामनातून भाजपवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सातत्याने टीका केली जात आहे. आधी गोपीचंद पडळकर, मग नारायण राणे आणि आता प्रसाद लाड यांच्याकडून शिवसेनेवर शाब्दिक हल्ला होत असताना शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच आहेत अशी जळजळीत टीका सामनातून करण्यात आली आहे.

‘शिवसेना भवन फोडू’ अशी भाषा भाजपमधील काही बाटम्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढान्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही. जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षातील मराठी लोकांत आहे. शिवसेना आहे म्हणूनच मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने व कण्याने उभा आहे हीच त्या सगळ्यांची भावना आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत दादर मुक्कामी असलेल्या शिवसेना भवनाच्या दर्शनी भागी जसा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे तसा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचाही तेजस्वी पुतळा आहे. त्या भवनावर शिवरायांचा भगवा झेडा डौलाने फडकत आहे. या भगव्या झेंडय़ाचा पोटशूळ काही मंडळीना उठल्यामुळेच शिवसेना भवन फोडण्याची मस्तवाल भाषा त्यांनी केली. खरेतर या मंडळींची दखल घ्यावी व त्या टिनपाटावर इथे काही लिहिण्या बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्याची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे. अशी टीका शिवसेनेने केली.

भारतीय जनता पक्षातील बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच! कशात काही नसताना झुरळांच्या तांडय़ासारखे आपापल्या खुराडयाच्या गच्चीवर येऊन नरडी फुगवून प्रवचने झोडणारे हे पोंगा पंडित! कालपर्यंत पुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी पुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळींच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही.

शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच… असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावरच जाण्याची वेळ येईल. त्यास ‘येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे!

बॉलिवूडला औरंगाबादचे आकर्षण; जिल्ह्यात होणार अनेक वेबसिरीजचे चित्रीकरण

Aurangabad airport

औरंगाबाद| महानगरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच शूटिंगला वेळेची येणारी बंधन यामुळे हिंदी, मराठी चित्रपट व वेबसिरीजच्या मोठमोठ्या बॅनरला ‘औरंगाबाद शहरा’चे आकर्षण दाले आहे. वर्षभरात पाच चित्रपट व दोन वेबसिरीजचे चित्रीकरण जिल्ह्यात झाले. शिवाय येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये एक हिंदी व दोन मराठी चित्रपटांसह काही मोठ्या वेबसिरीजचे २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण जिल्ह्याच्या विविध ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे तसेच त्यात भर घालणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हिंदी, मराठी चित्रपटासह वेबसिरीजचे प्रोडक्शन हाऊस येथे शूटिंगसाठी सेट लावत आहेत. शहरात नुकतेच ज्येष्ठ अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या काही दृश्‍यांचे चित्रीकरण झाले. यात केवळ दहा तासांसाठी तीस लाखांचा खर्च आला. यातून स्थानिकांनाही रोजगार मिळाला. भविष्यात असे अनेक चित्रपटांचे जिल्ह्यात चित्रीकरण होणार असल्याचे एट अवर्सचे संचालक किशोर निकम यांनी सांगितले. यासाठी औद्योगिक, सामाजिक संस्था, स्थानिक कलावंत, शासकीय अधिकारी, नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

एखाद्या चित्रपटाचे शूटिंगचे काम पूर्ण तसेच चित्रपट रिलीज होईपर्यंत चित्रपटासंदर्भातील माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येते. परंतु, शूटिंगसाठी आलेले अभिनेत्यांचे फोटो स्थानिक नागरिक काढून फेसबुक व इतर समाजमाध्यमांवर शेअर करतात. त्यांच्या या फोटोच्या दहा लाइकमुळे चित्रपटाच्या शूटिंगची माहिती सर्वत्र पसरते आणि चित्रपट रिलीज होण्याआधीच चर्चेत येतो. यामुळे चित्रपट प्रोडक्शन हाऊसला याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे स्थानिक नागरिक व कलावंतांनी चित्रपट शूटिंगचे चित्रफीत व फोटो काढणे टाळावेत.

चित्रीकरणाची ठिकाणे राज्याची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. यात जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद किल्ला, दौलताबादचा घाट, खुलताबाद, चारोळा तसेच शहरातील जुने वाडे, मंदिर, मशीद, चर्च, जुने शासकीय कार्यालयाच्या इमारती अशा ठिकाणी आतापर्यंत डझनभराहून अधिक चित्रपटांचे शूटिंग झाले. भविष्यातही होणार आहे. यापूर्वी झाले शूटिंग बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांचा ‘पाकिजा’, ‘बुरा आदमी’- प्राण, ‘लाडला’ चित्रपटाची शूटिंग व्हिडिओकॉन कंपनीत झाली होती. ‘एम. एस. धोनी दी अनटोल्ड स्टोरी’साठी सुशांतसिंह राजपूत यांची शूटिंग औरंगाबाद लेणी तर चाईना देशातील चाईनीच चित्रपटाची अजिंठा, वेरूळ लेणीला १५ दिवस शूटिंग झाली. वर्षभरात ‘जून’ हा मराठी चित्रपट औरंगाबाद लेणी, ‘रे’ या वेबसिरीजचे शूटिंग हे वेरूळ लेणी, छावणीचे चर्च, स्मशानभूमी येथे करण्यात आली; तसेच शहराच्या विविध ठिकाणी विविध वस्तू, बॅंकांच्या जाहिरातीचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

बनावट विदेशी दारू बनवून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Exposing a gang

औरंगाबाद| बनावट विदेशी दारू बनवून विक्री करणाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पर्दाफाश करण्यात आला आहे. तसेच जालना जिल्ह्यातील बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई देखील करण्यात आली. यासोबतच शनिवारी चारचाकी वाहनातून हिच बनावट दारु विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल सात लाख रुपयांचा बनावट दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना रविवारी न्यालयालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक संशयित चरचाकीची तपासणी केली असता, त्यात सहा लाख ८४ हजार ५४० रुपये किंमतीची बनावट विदेशी दारू आढळून आली, यासह प्रदीप सर्जेराव जायभाये (रा. क्रांतीनगर, गणेश चौक, मखमनाबाद रोड पंचवटी नाशिक, हल्ली मुक्काम डोणगाव, ता.अंबड, जि.जालना) व नामदेव एकनाथ घुगे (रा. टाका, ता.अंबड, जि. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी केली असता, त्यांच्या घरी तपासणी करण्यात आली. यात बनावट दारू बनवणारे स्पिरिट, दारूच्या बॉटलला लावण्याकरिता लागणारे झाकणे, दारूमध्ये मिळवण्यासाठी लागणारे अर्क, विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटल्स असा एकूण १८ हजार १८० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. यामुळे एकूण कारवाईत ७ लाख २ हजार ७३० रुपये किंमतीचे माल जप्त करण्यात आले आहे.

दोन्ही आरोपीला रविवारी (ता.एक) ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही करावाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचाल उषा वर्मा, औरंगाबाद विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक एस.एल.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही.व्ही. रोकडे, निरीक्षक जावेद कुरेशी, स्टाफ निरीक्षक अरुणकुमार चव्हाण, दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे, जवान युवराज गुंजाळ, भास्कर काकड, रवींद्र मुरुडकर, मोतीलाल बहुरे, शेख निसार, धनंजय डीडुळ, शेरेक कादरी, संजय गायकवाड आदींनी पार पाडली.