Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3746

सहाजणांना अटक : व्हॉटसअप ग्रुपवर गाडी विकणे आहे फोटो टाकल्याने एकास मारहाण

crime

फलटण | फलटण तालुक्यातील बरड येथे व्हॉटसअप ग्रुपवर चार चाकी गाडी विकणे आहे, असा फोटो का पाठवला म्हणून एकास 7 जणांनी जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील सहाजणांना अटक करण्यात आली असून एकजण अल्पवयीन आहे. याबाबत अक्षय पिलाजी आवटे (वय 18, व्यवसाय शिक्षण) यांनी फिर्याद दिलेली आहे. विशाल सुरेश मदने, पवन मधुकर जाधव, रमेश मधुकर जाधव, करण पांडुरंग कोळी, ऋषिकेश भगवान कोळी, वाघेश्वर आडके (सर्व रा. बरड) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवार दि. 29 जुलै रोजी रात्री बरड गावच्या हद्दीत खंडोबा मंदिरा जवळ फिर्यादी व त्याचा मित्र प्रसाद लोंढे बसले होते. दरम्यान, तेथे संशयित मोटार सायकलीवरुन आले. त्यांना फिर्यादी होलार समाजाचा आहे हे माहीत असताना तू आमचे रॉयल रामोशी ग्रुप बरड या व्हॉटसअॅप वर मनोज काशिद यांचे ईको गाडी विकणे आहे असे लिहन (एम एच 12 एच व्ही 6724) या गाडीचा फोटो का टाकला, असे विचारले.

तसेच विशाल मदने, ह्याक पवन जाधव, रमेश जाधव या तीघांनी फिर्यादीला हाताने व सर्व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला उचलून जमीनीवर आपटले. त्यावेळी तेथे हजर असणारे करण कोळी, ऋषिकेश कोळी, वाघेश्वर आडके यांनी याला आता सोडू नका, जोरात मारा, याला कोण सोडवायला येत नाही. आम्ही बघतो असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे करत आहेत.

शिवसेना भवन फोडू अस म्हणलंच नाही; प्रसाद लाड यांची कोलांटीउडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आता पलटी मारली आहे. मी अस बोललोच नसून माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरीही यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणाले.

प्रसाद लाड म्हणाले, आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही.

माझं स्पष्ट म्हणनं होतं की, माहिममध्ये जेव्हा येतो तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. ती बातमी विपर्यास करून दाखवली आहे.माझं हे स्पष्टीकरण आहे, मला कुठल्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बाधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणाले.

दहिवडी पोलिसांची कारवाई : चोरीला गेलेल्या 10 जनावरांसह 5 जणांना अटक

दहिवडी | दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जनावरे चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते, त्या अनुषंगाने अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिस पथकाने चोरीला गेलेल्या 10 जनावारांसह पाचजणांना अटक केली असून 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, जनावरांची ओळख पटवून संबंधित मालकांना त्यांची जनावरे परत केली.

या प्रकरणात सागर जालींदर पाटोळे (वय- 28, रा. वेजेगाव ता. खानापूर जि. सांगली), भगवान ज्ञानदेव चव्हाण (वय- 60, रा. हतीत, ता. सांगोला जि.सोलापूर), संतोष छगन चव्हाण (वय- 25, रा. आंधळी, ता. माण जि. सातारा), संजय माणिक अडके (वय- 35, रा. आंधळी, ता. माण जि. सातारा), राजेंद्र छगन चव्हाण (वय- 40, रा. आंधळी ता.माण जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार भुजबळ, स. फौ प्रकाश हांगे, स.फौ अशोक हजारे, पो.हवा.संजय केंगले, पो.ना.रविंद्र बनसोडे, पो.ना.सजगने, पो.कॉ प्रमोद कदम व होमगार्ड तानाजी मुळीक यांच्या पथकाने केली. तपास पो. हवा. संजय केंगले करत आहेत.

दोनवेळा चोरी : फलटणच्या सभापतीच्या बंगल्यातील 15 लाखांवर चोरट्याचा डल्ला

Crime

फलटण | फलटण तालुक्यातील आसू येथील बंगल्यातून 15 लाख रूपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. एकाच बंगल्यात आठवड्यात दोनवेळा चोरी करत ही रक्कम लंपास केली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर यांच्या आसू येथील बंगल्यातून चोरट्यांनी हा मुद्देमाल लंपास केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरट्यांनी ही चोरी दोन टप्प्यांत केली असून चोरट्यांनी त्याचा मागमूसही लागू दिलेला नाही. चोरीची पहिली घटना 12 जुलै तर दुसरी घटना 19 जुलैला घडली आहे. आठवडाभरात दोनदा पैशाची माहित असणारानेच चोरी केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. आसू येथे शिवरुपराजे खर्डेकर यांचा बंगला आहे. शेतीच्या कामासाठी पैशांची गरज असल्याने दि. 6 जुलै रोजी त्यांनी 7 लाख रुपये रक्कम आपल्या रूममधील कपाटात आणून ठेवली होती. कपाटातील पैसे काही दिवसात चोरट्यांनी लंपास केले, मात्र त्यांना याची त्यांना कल्पनाही नव्हती. कपाटातील 7 नाखांची रक्कम गायब झाल्याचे त्यांना सोमवार दि. 12 जुलै रोजी लक्षात आले.

दरम्यान, त्यांनी पैशाबाबत घरातील सर्वांना विचारले. रक्कम गायब झाल्याची बाहेर कोठेही वाच्यता केली नाही. काही दिवासांनंतर म्हणजेच गुरुवार दि. 29 जुलै रोजी त्यांच्या सुनबाईंच्या रुममधील कपाटातून 5 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकारानंतर मात्र शिवरुपराजे खर्डेकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून अज्ञाता विरोधात फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलिस निरीक्षक नितिन सावंत करत आहेत.

वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

shivsena bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेवर टीका करताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं आहे. ते मुंबईत दादर येथे भाजपा कार्यालयाच्या उदघटनावेळी बोलत होते.

शिवसेनेला एवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू”, असं विधान प्रसाद लाड यांनी केले.

भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे हे आपण गेल्या २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेले होते. तोच प्रामाणिक कार्यकर्ता आजही भाजपसोबत आहे. आता तर ‘सोने पे सुहागा’ झालेला आहे. याचे कारण म्हणजे नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा स्वाभीमानीचा मोठा गट भाजपत आलेला आहे. त्यामुळे भाजपची ताकद दुप्पट झाली आहे, असे लाड म्हणाले

कराड नगरपालिकेकडून स्थलांतरित लोकांची अवहेलना, गैरसोयी असताना पूरग्रस्तांना शाळेतून बाहेर काढले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याला गेल्या काही दिवसात पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यात पडत मुसळधार पावसाचा तडाखा कराड शहरालाही बसलेला आहे. कराड शहरातील पाटण काॅलनीत झोपडपट्टीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या भागातील लोकांना काही दिवस नगरपालिकेने नगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरीत केले होते. परंतु झोपडपट्टीतील लोकांना स्थलांतरीत ठिकाणावरून गैरसोयी असताना पुन्हा झोपडपट्टीत पाठवले आहे. नगरपालिकेने या लोकांची अवहेलना सुरू केली असून कोणीही झोपडपट्टीतील लोकांची चाैकशी करत नसल्याचा आरोप तेथील लोकांनी केला आहे.

मुसळधार पावसाने शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे तेथील लोकांचे स्थलांतर नगरपालिका शाळेत करण्यात आले होते. सध्या पाटण कॉलनीमध्ये अनेक झोपडपट्ट्यांमध्ये चिखल, गाळ तसेच कचरा साचलेला आहे. अद्याप या ठिकाणावरील स्वच्छता करण्यात आलेली नाही. झोपडपट्टीमध्ये पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेने स्थलांतरित केलेल्या लोकांना नगरपालिकेच्या शाळेतून बाहेर पुन्हा झोपडपट्टीमध्ये जाण्यास सांगितले आहे.

पाटण काॅलनीतील झोपडपट्टीतील गैरसोयी असल्याने व नगरपालिकेने जबाबदार झटकल्याने रहिवाश्यांच्यतून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती कोणीही या भागात फिरकले नाही. झोपडपट्टीतील भागातील पंचनामाही अद्याप केला नाही. नगरपालिकेने आम्हांला झोपडपट्टीच्या जागेवर घरे बांधून द्यावीत, तसेच सध्या पंचनामे लवकरात लवकर करण्याची मागणी रहिवाशी नागरिकांनी केली आहे.

एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात तरी उतरले का? दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राटील पूरस्थिती वरून विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. संजय राऊत रिकामटेकडे दौरे करतायत की टीका करतात हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटल.

प्रवीण दरेकर म्हणाले, एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?, कुठे पाहणी करायला गेले का?’ असा सवाल करत संजय राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगावं. आणि सर्वसामान्य जनतेचा कानोसा राऊतांनी घ्यावा,’ असा सल्ला दरेकरांनी दिला.

केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांची अश्रू पुसणं वेगळं आहे, तसेच, तौक्ते वादळातही आम्ही साईटवर होतो. आताही होतो. त्यामुळे रिकामटेकडे दौरा करतात की फक्त टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे, असं दरेकर म्हणाले.

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त तळबीड पोलिस ठाण्यात वृक्षारोपण

कराड | राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तासवडे ग्रामस्थांनी “तळबीड पोलिस स्टेशन” परिसरात वृक्षारोपण केले. पर्यावरण संरक्षणासाठी वक्षसंवर्धन करणे गरजेचे असून त्यांची जपणूकही तेवढीच गरजेची असून तळबीड पोलिसांकडून या वृक्षांची काळजी घेतली जाईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटिल, ह.भ.प. महाराष्ट्र राज्य युवा वारकरी महामंडळ कराड तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, सनी दिक्षित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कराड दक्षिण उपाध्यक्ष सागर देसाई, रोहित कांबळे, राजेंद्र पवार, दत्तात्रय निकम, आरोह कुलकर्णी, अथर्व साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कराडच्या बालगृहातही खाऊ वाटप

कै. क्रांतीवीर माधवराव जाधव मुलांचे बालगृह (निरीक्षणगृह) कराड, येथे मुलांना मास्क व लहान मुलांचे खाऊ वाटप करण्यात आले. अनाथ मुलांना कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचे वाटप करण्यात आले. तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊचेही वाटप करण्यात आले.

पूरग्रस्तांची परिस्थिती पाहून जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकरांना रडू कोसळले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जावली तालुक्यातील वाहिटे येथे जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे वाटप प्रसंगी बंडातात्या कराडकर भावूक झालेले होते, तेव्हा त्यांना रडू कोसळले. मुसळधार पावसाने लोकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची पाहणी करत जिद्दीने उभे राहण्यासाठी बंडातात्या कराडकर यांनी धीर दिला.

साताऱ्यातील जावली तालुक्यातील दऱ्या-खोऱ्यात राहणारा शेतकरी अतिवृष्टीच्या प्रकोपामुळे पुरता उध्दवस्त झाला आहे. त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांनी जावली तालुक्यातील वाहिटे येथे झालेल्या नुकसानीची कार्यकर्त्यांसमावेत पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत सुपूर्द केली. बंडातात्या कराडकर शेतकर्‍यांना धीर देत असताना, भयानक परस्थिती पाहून ते भावूक झाले.

बंडातात्या कराडकर म्हणाले, तुमच्यावर कोसळलेले हे दुःख इतके मोठे आहे की तुमचे अश्रु कोणीच पुसण्याचा प्रयत्न करताना आम्हांला आनंद होत असतो. पण तुम्हांला जिद्दिने सावरायलाच हवे आणि पुन्हा उभे रहायलाच हवे. आम्ही तुमच्या दुःखाची वाटणी करू शकत नाही. व्यसनमुक्त संघटना एवढ्या मदतीने थांबणार नाही, यापुढे येऊ तुमच्या खाद्यांला खादा लावून काम करू.

अर्धे शटर उघडून दुकान चालवणे पडले महागात; हजारोंचा भरावा लागला दंड

manpa karwai

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवार पूर्णतः संचारबंदी असताना देखील अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडे ठेवताना दिसत आहेत. आज महानगर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत संचारबंदी दरम्यान दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांकडून पंचवीस हजाराचा दंड वसूल केला.

दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास सुमारास पैठण गेट, रॉक्सी टाकी परिसरातील मोबाईल व इतर दुकाने सर्रास पद्धतीने चालू होती. महानगरपालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत या तब्बल 25 हजार रुपयांचा दंड छुप्या पद्धतीने दुकान चालवणाऱ्या दुकानदाराकडून वसूल केला आहे.

रविवार आणि शनिवार विकेंड लॉकडाऊन असतानाही मोबाइल दुकान चालक स्थानिक प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत दुकानाचे अर्धे शटर उघडून दुकान चालवताना मनपाच्या पथकाला आढळून आले. तर चक्क काही दुकान चालक आम्ही मनपाच्या पथकाला खिशात घेऊन फिरतो असेही उद्गार करण्यात आले. हॅलो महाराष्ट्रच्या बातमीनंतर महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दुकानदारांवर कारवाई केली.