Friday, December 12, 2025
Home Blog Page 3772

जावलीतील अतिवृष्टीत मृत पावलेल्या वारसांना शासनाकडून मदतीचा धनादेश सुपूर्द

जावली | रेंगडी (ता. जावली) येथील चार व वाटंबे येथील एक असे 5 जण केळघर घाटातील ओढ्याला आलेल्या पुरातुन वाहुन गेले होते. यामध्ये पाचही जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे शासनाच्या वतीने या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाचा मदतीचा धनादेश सपुर्द करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारकडुन लवकरात लवकर मदत मिळावी म्हणुन सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आ. शिवेंद्रराजे भोसले याचा पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे.

महाराष्ट्रराज्याचे उपमुख्यमत्री अजितपवार यांनी महाविकास आघाडी सरकार कडुन सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मृतांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती. जावलीमध्ये रेगडी येथे घटना घडल्यापासुन जावलीच्या तहसिलदारांना मृत झालेल्या कुटुंबाला आर्थीक मदतीचे प्रस्ताव सादर करावे याबाबत पाठपरुरावा केला होता. जावलीतील रेगडी येथील घटनेमध्ये मृतांना प्रत्येकी 9 लाख देण्यात येणार आहेत. यापैकी 5 लाख रुपायाचा प्राथमिक टप्पा मृताच्या नातेवाईकांना देण्यात
आला आहे .

यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांतअधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतिष बुद्धे, ज्ञानदेव रांजणे, जि .प . सदस्य  राजु भोसले, सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जेष्ठ शिवसेना नेते एस. एस. पार्टे, सरपंच बाबुराव कासुर्डे,  तलाठी मकरध्वज डोईफोटे, ग्रामसेवक रविकांत  सपकाळ , सागर धनावडे, प्रमोद घाडगे यांचे प्रमुख उपस्थितीत धनादेश सपूर्द करण्यात आले.

पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेचे आदेश

सातारा | कोयना धरणाच्या पट्ट्यातील दरडग्रस्त मिरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. आज त्यानी स्वतः जाऊन या जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतींची पाहणी केली. त्यानंतर त्यानी या वसाहतींची डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करून त्यात या 150 कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ठाण्याहून पुरग्रस्तांसाठी मदत घेऊन आलेले नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर, शशिकांत जाधव आणि स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. नगरविकास मंत्र्यांनी तातडीने इथे येऊन मीरगाव आणि हुम्बराळे या गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या गावकऱ्यांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. श्री. शिंदे यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत असून तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही त्यानी यावेळी बोलताना दिली.

त्यासोबतच या ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, चादरी, कपडे, सतरंज्या, चटया, छत्र्या अशी मदत दिली. यासोबतच शासनाची मदत देखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असेही त्याना सांगितले. नंतर या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला. कोयनानगर परिसरातील या वसाहती कोयना धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. आज त्यांची अवस्था दयनीय आहे.

मात्र या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल यावर एकमत झाल्याने त्यानी तातडीने हे डागडुजीचे काम हाती घेण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच या दरदग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने ते देखील लवकरच करू असे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.

आंबेघरमधील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील मुलांची शिक्षणाची जबाबदारी “खिदमत ए खल्क” ने स्वीकारली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आमचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला असून तुम्ही एकटे नाही. आम्ही सर्व तुमच्या कुटुंबातील सदस्य आहोत. निःसंकोचपणे काहीही जबाबदारी असल्यास पार पाडू. तसेच आंबेघर गावातील आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबियांना गरजेच्या वस्तू दिल्यानंतर ज्या 9 कुटुंबियातील व्यक्तीचा मृत्यू भुस्खलनामुळे झाला आहे. त्या कुटुंबातील सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च खिदमत ए खल्क कमिटी पै नजीर अब्बास खान स्कॉलरशिपच्या माध्यमातून करणार असल्याचे सादिकभाई शेख यांनी जाहीर केले.

सातारा शहर मुस्लिम जमातच्या वतीने अमीर सहाब, अनिसभाई तांबोळी यांच्या सूचनेनुसार खिदमत ए खल्क च्या मोहसीन बागवान, मुबिन महाडवाले, सलीम यांच्या मार्गदर्शनानुसार आरिफ खान असिफ फरास ,इम्रान सुमो ,पिंटूशेठ सुतार ,सलीम पाळणेवाले ,अज्जूभाई घड्याळवाले ,तौसिफ बागवान ,हाफिज मुराद ,मोहसीन ,जावेद बागवान समीर मोबाईल ,सलमान भाईजि असिफ खान व इतर बांधवानी परिश्रम घेतले.

माणुसकीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या साताऱ्यातील मुस्लिम शहर समाजावतीने कार्यरत असणाऱ्या खिदमत ए खल्क कमिटीने मोरणा भागातील अपत्तीग्रस्त व दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या गरजा जाणून ज्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. त्यांच्या दुःखात सामील होत तात्पुरत्या पुनर्वसनाचे किट भेट दिले. आंबेघर येथील 9 कुटुंबांच्या सर्व सदस्यांना कपडे, अन्नधान्य देण्यात आले.

सातारा शहर मुस्लिम समाजाच्या वतीने खिदमत ए खल्क माध्यमातून दोन दिवस केलेले उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खिदमत ए खल्क च्या सर्व सदस्यांचे आभार माजी जि. प. सदस्य बशीर खोंदू यांनी मानले.

श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांना स्थानबध्द प्रकरणी पोलिस प्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागावी : डाॅ. भारत पाटणकर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले ते व्यक्तिस्वातंत्र्याला मारक आहे. लोकशाही आणि घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे, कोणतेही कारण नसताना स्थानबध्द केले असल्याने पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना पाटणकर म्हणाले, कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास आम्ही तयार नाही हे म्हणणं चुकीच आहे. या सरकारच्या हातात ही जमीन असून ती लपवण्याच काम चालु आहे. तेव्हा जमीन लपविण्याचं काम चालू उपमुख्यमंत्र्यांनी हाणून पाडलं पाहिजे. कोयनेच्या पाण्यावर जिथे बागायत झाली आहे, ती जमीन तातडीने धरणग्रस्तांना दिली पाहिजे.

पूर्वीच्या मुख्यमंत्र्यासोबत दोन आताच्या उपमुख्यमंत्र्याच्या सोबत तीन बैठका झाल्या आहेत. तेव्हा कोयना धरणग्रस्तांच पुनर्वसन करण्याची आमची तयारी आहे. मात्र हे पुनर्वसन उपाशी मरण्याच्या ठिकाणी करु नये, तर कोयना धरणाच्या पाण्यातून बागायत झालेल्या ठिकाणी मिळावी, अशी मागणी भारत पाटणकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून 700 कोटींची मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना 700 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबत घोषणा केली.

संसदेत कृषिमंत्री तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. “आम्हाला नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने ७०० कोटीं रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे, ” असे तोमर म्हणाले. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत जाहीर केली आहे

महाराष्ट्र सरकारनं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्रानं आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीनं राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 701 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचं नरेंद्र तोमर म्हणाले आहेत

पूरग्रस्तांनी खचून जावू नये महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

तांबवे गावातील लोकांना पावसाळ्यात पूराचा नेहमीच सामना करावा लागत आहे. तरीही येथील लोक धीराने तोंड देत आहेत. प्रशासनाने लोकांच्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी योग्य पध्दतीने लवकरात लवकर पंचनामे करावेत. पूरग्रस्तांनी खचून जावू नये महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कराड तालुक्यातील तांबवे गावात पुरग्रस्त, पडझड झालेल्या ठिकाणाला भेट दिली. यावेळी प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखाना रामचंद्र पाटील, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पाटील, उपसरपंच विजयसिंह पाटील, माजी सरपंच जावेद मुल्ला, संभाजी पाटील, सदस्य धनंजय ताटे व तांबवे ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील म्हणाले, तांबवे- सुपने भागात ज्या कुटुंबाना तसेच शेतीला फटका बसलेला आहे. तेथील एकही कुटुंब प्रशासनाने चुकवू नये. प्रशासनाने लोकांच्यावर हे मोठे संकट आलेले आहे. तसेच प्रत्येक वर्षी आमच्या गावाला पूराचा सामना करावा लागत आहे.

संरक्षण भिंत बांधणे हा उपाय नाही, पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवा; फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात 171 किमीची संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या संरक्षण भिंतीचा काहीही उपयोग होणार नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कल्पनेला विरोध केला आहे. भिंत बांधण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी भागात वळवा अशी मागणी त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले, संरक्षण भिंत बांधणे हा त्याच्यावरचा उपाय नाही कारण भिंत बांधली तरी त्याच्यावरून हे पाणी येणार आहे कारण त्या पाण्याचा वेग आणि दाब इतका प्रचंड आहे कि भींत बांधून उपयोग होणार नाही त्यापेक्षा पुराचे पाणी आपण दुष्काळी भागात वळवले पाहिजे कारण लॉन्ग टर्म सोलुशन तेच आहे असं म्हणत हे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी फडणवीसांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा पूरग्रस्त भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की आमचे दौरे महत्त्वाचे आहेत कारण आम्ही गेलो तरच शासकीय यंत्रणा जागी होते आणि कामाला लागते. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते असे फडणवीसांनी म्हंटल.

Gold Price : सोन्याचा भाव 123 रुपयांनी घसरला तर चांदी 206 रुपयांनी झाली स्वस्त, आजचे नवीन दर तपासा

gold silver
gold silver

नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 27 जुलै 2021 रोजी सोन्याच्या भावात घसरण झाली. यासह सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,500 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत आज घट नोंदविण्यात आली. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,628 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो 65,916 रुपयांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे, तर चांदीच्या किंमतींमध्ये कोणतेही विशेष बदल झाले नाहीत.

सोन्याची नवीन किंमत
मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 123 रुपयांची घट नोंदली गेली. राजधानी दिल्लीत आज 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत 46,505 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,800 डॉलरवर गेली.

चांदीची नवीन किंमत
चांदीच्या दरातही आज घसरण दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर मंगळवारी 206 रुपयांनी घसरून 65,710 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत कोणतेही विशेष बदल झाले नाहीत आणि ते प्रति औंस 25.16 डॉलरवर पोचले.

सोन्याचे भाव का कमी झाले?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की,” आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींवर सतत दबाव येत असल्याने अस्थिरता कायम आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार अतिरिक्त खबरदारी घेत आहेत.” त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की,” अमेरिकन फेडरल रिझर्वच्या बैठकीत निर्णय घेण्याच्या प्रतीक्षेत गुंतवणूकदार सावध असतात.”

‘नादिया के पार’ फेम अभिनेत्री सविता बजाज यांना नाही मिळाली वृद्धाश्रमात जागा, ‘या’ अभिनेत्रीने दिला आसरा

मुंबई । ‘नादिया के पार’ फेम अभिनेत्री सविता बजाज या आजकाल चर्चेत आहे. सविता बजाज यांची तब्येत ढासळली तेव्हा त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अभिनेत्री नुपूर अलंकारने सांगितले की,”त्यांना ओल्ड एज होममध्ये जागा मिळत नाही.”

मीडिया रिपोर्टनुसार सविता बजाज यांच्या डिस्चार्ज नंतर नुपूर अलंकार म्हणाली की,”आम्ही येथे शेवटपर्यंत सर्व वृद्धाश्रमांशी संपर्क साधला आहे, परंतु त्यांची स्थिती लक्षात घेता कोणीही त्यांना घेण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत ती त्यांना रुग्णालयातही सोडू शकत नाहीत. अशा परिस्थितीत माझी बहीण जिग्यासा आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी घेत आहोत. सध्या सविताजी केवळ ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. जेव्हा त्यांची तब्येत सुधारेल आणि त्या ऑक्सिजनशिवाय तीन ते चार तास राहू शकतील, तेव्हाच आम्ही त्यांना शिफ्ट करू.”

नुपूर पुढे म्हणाली,”आम्ही काही विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. एकतर त्यांना वृद्धाश्रम मिळत नाही आहे. दुसरे म्हणजे, त्यांच्या जुन्या घराचे कॉन्ट्रॅक्ट देखील संपले आहे. तिसरे म्हणजे जिग्यासाचे घर रुग्णालयाच्या जवळ आहे. जर त्यांची तब्येत ढासळली तर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले जाऊ शकते.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सविता बजाज म्हणाल्या होत्या की,”आता मला बरे वाटू लागले आहे. देवाने माझ्यासाठी नुपूरला पाठवले आहे. तिने मला खात्री दिली की ती माझ्याबरोबर राहील आणि तिने आपला शब्द पाळला. ती मला भेटायला रोज दवाखान्यात येत असत. नुपूर आणि तिची बहीण जिज्ञासा मला त्यांच्या घरी घेऊन आले आहेत. हे चमत्कार असल्यासारखे दिसते. मला वाटते की, मला एक नवीन आयुष्य मिळाले आहे.”

पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा 29 जुलै पासून

BAMU
Ambedkar

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईनच पद्धतीने होणार आहेत. 29 जुलैपासून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. अशी माहिती मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी दिली आहे.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च-एप्रिल 202 च्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे. मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर विद्यार्थ्यांना पेपर देता येणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाची नुकतीच बैठक होऊन परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार, 29 जुलैपासून बीए, बीएस्सी, बी कॉम द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तर 10 ऑगस्टपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा होतील. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 17 ऑगस्ट पासून घेण्यात येतील तर अभियांत्रिकी फार्मसी सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा 20 ऑगस्ट पासून होणार आहे.