Friday, December 12, 2025
Home Blog Page 3774

‘त्या’ पाटबंधारे अधिकाऱ्याचा अटकपूर्व जमिनीसाठी प्रयत्न

औरंगाबाद : लिपिकाचा बदलीचा अर्ज पुढे सरकवण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता संजीवनी गर्जे (वय 27) या अद्याप फरार आहेत. शनिवारी रात्री त्यांच्या सर्व वरिष्ठ लिपिक मनसुब रामराव बावस्कर दोघांना एसीबीने रंगेहात पकडले होते. नियमानुसार महिलांना रात्री अटक करता येत नसल्याने गरजे यांना घरी पाठवले होते. 25 जुलै रोजी सकाळी पुन्हा वेदांत नगर पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती.

मात्र घरचे हजर न राहता गायब झाल्या आता अटक पूर्व जमिनीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तक्रारदार पाटबंधारे मंडळाच्या जालना कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. आईच्या आजारामुळे त्यांना औरंगाबादला बदली हवी आहे तसा अर्ज त्यांनी औरंगाबाद पाटबंधारे मंडळ कार्यालयात दिला. मात्र हा अर्ज वरिष्ठांकडे ठेवण्यासाठी तेथील वरिष्ठ लिपिक मनसू बावस्कर यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली. सहाय्यक अधीक्षक अभियंता संजीवनी गर्जे यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे पैसे घेतल्याचे शनिवारी सिद्ध झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आदी वरिष्ठ लिपिक बावस्कर ला तक्रार बाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.

गर्जे या 25 जुलै रोजी सकाळी पोलिस ठाण्यात हजर न राहता त्या पसार झाल्या. आता त्यांची अटक पूर्व जमीनीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रसार झाल्यामुळे उलट गर्जेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गर्जे हजर होईपर्यंत बावस्करला दोन दिवसाच्या पोलीस कोठडी नंतरही जामीन मिळणे कठीण जाईल, अशी माहिती मिळत आहे.

चोराच्या घरी तपास करण्यासाठी गेले पोलीस, सापडले महिलांचे तब्ब्ल 400 अंडरगारमेंट्स आणि …

वॉशिंग्टन । अमेरिकेच्या अलाबामा येथील एका आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांना धक्काच बसला. या आरोपीच्या घरातून महिलांचे एकूण 400 अंडरगारमेंट्स सापडले. पोलिस आता शोध घेत आहेत की इतक्या अंडरगारमेंट्स त्याच्याकडे कोठून आल्या.

डेली मेलच्यारिपोर्टनुसार बलात्कार आणि चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिस 27 वर्षीय जॉन थॉमसला अटक करण्यासाठी पोलिस दाखल झाले होते. जॉन थॉमसवर बलात्काराचा प्रयत्न, चोरी, गंभीर गुन्हेगारी, पाळत ठेवणे, क्रेडिट कार्ड फसवणूक यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतकेच नाही तर पोलिसांच्या एका महिलेची काही पर्सनल छायाचित्रेही सापडली आहेत जी या आरोपीची सहकारी असल्याचे सांगितले जाते. पोलिस आता तपास करीत आहेत की, आरोपीने महिलांचे अंडरगारमेंट्स चोरले की विकत घेतले? अधिकाऱ्यांनी सांगितले की, थॉमसवर 2019 मध्येही महिलांचे अंडरगारमेंट्स चोरल्याचा आरोप झाला होता.

थॉमस हा एक चाणाक्ष गुन्हेगार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. जुलैच्या सुरुवातीला त्याने दरोडा आणि बलात्काराच्या उद्देशाने एका महिलेच्या घरात प्रवेश केला होता. मात्र, त्या महिलेने त्याला पकडले आणि दोघांमध्येही जोरदार भांडण झाले. तथापि, जॉन थॉमस पळून गेला. यानंतर पीडितेने पोलिसांना बोलावून संपूर्ण घटना सांगितली.

बिलाद्वारे आरोपीकडे पोहोचले पोलिस
पोलिसांना घटनास्थळावरून एक बिल सापडले, त्यावर आरोपीचे नाव लिहिलेले होते. अशा प्रकारे ते त्याच्याकडे पोहोचले. जॉन थॉमसला पोलिसांनी 10 जुलै रोजी अटक केली होती. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याचवेळी महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे आणि तिने थॉमसवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

कराड तालुक्याचे प्रमाण जास्त : सातारा जिल्ह्यात नवे 874 पाॅझिटीव्ह तर 10 हजार 992 उपचार्थ रूग्ण

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्ह्यात काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनूसार काल जिल्ह्यात 874 बाधितांची वाढ झाली आहेत. आजपर्यंत 2 लाख 15 हजार 531 एवढे एकूण बाधित झाले, तर 2 लाख 1 हजार 725 जण कोरोनामूक्त झाले आहेत. आजपर्यंत 5 हजार 183 जणांचा मृत्यू झाला आहे .काल 10 हजार 756 नमुने घेण्यात आले होते. जिल्ह्यात 10 हजार 992 उपचार्थ रूग्ण आहेत. कराड तालुक्यात गेल्या 24 तासांतील बाधित व मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात सर्वात जास्त आहे.

जिल्ह्यात 874 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 39(9253),कराड 212 (33995), खंडाळा 27 (12901), खटाव 75 (21349), कोरेगांव 93(18732), माण 78 (14488), महाबळेश्वर 11(4489) पाटण 24(9485), फलटण 116 (30446), सातारा 151(44655), वाई 37(14128) व इतर 11(1610) असे आज अखेर एकूण 215531 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 1(196), कराड 7 (1010)खंडाळा 0 (161), खटाव 0(504), कोरेगांव 1(401), माण 1 (295), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2(325), फलटण 7(508), सातारा 5 (1309), वाई 2 (317) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5183 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर- सांगलीतील पूर अलमट्टी धरणामुळे नव्हे तर…; अजित पवारांनी सांगितले नेमकं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 4 दिवसात राज्यात मुसळधार पावसामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर येथे जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान, अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पूर येत नाही असे म्हणत अजित पवारांनी पूरस्थितीचे नेमकं कारण सांगितले.

कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा धोका वाढलाय, असे म्हटले जाते. परंतू मागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळच्या सरकारने एक समिती नेमली होती की खरोखरच अलमट्टीमुळे या दोन जिल्ह्यांना पूर येतो का, तर या समितीचा अहवाल आला, त्यामध्ये अलमट्टीमुळे पूर येतो असं काही म्हटलेलं नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, राधानगरी, दूधगंगा, वारणा असेल, तारळी, मुरुडी अशी अनेक छोटी मोठी धरणं आहेत. या सगळ्या धरणांचं पाणी कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नद्यांना जातं. ते पाणी खाली जातं. त्यावेळी तिथं वॉटर लेक होतं आणि त्याचा फटका नागरिकांना होतो.  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अलमट्टी धरणातील आवक आणि जावक याबाबत समन्वय ठेवला आहे असेही त्यांनी सांगितले.

कोंढावळे, देवरूखकरवाडी येथील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांच्या मदतीचे वाटप

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

वाईच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे कोंढावळे व देवरूखकरवाडी येथील घरांवर कोसळली. तसेच पावसाच्या पाण्याबरोबर भल्या मोठ्या दरडी आणि मातीचा काही भागही कोसळला. देवरुखवाडीवर, कोंढावळे येथील भूस्खलनामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आज राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून तातडीची मदत म्हणून 4 लाख रुपयांचा धनादेश आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वाई तालुक्यात आमदार पाटील य‍ांच्या हस्ते तातडीची मदत म्हणून हे धनादेश वारसांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी संगिता राजापुरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता अमर किर्दत, नगरसेवक चरण गायकवाड, राजेश गुरव, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

य‍ावेळी कोंढावळे येथील भुस्खलनात मृत झालेल्य‍ा वामन बाबाजी जाधव यांचे वारस यशवंत वामन जाधव, राहिबाई मारुती कोंढाळकर य‍ांचे वारस रामचंद्र मारुती कोंढाळकर व भिमाबाई सखाराम वाशिवले य‍ांचे वारस पार्वती दत्तात्रय शिळीमकर य‍ांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लवकरच एक लाखाचा धनादेश देण्यात येईल, असे यावेळी तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

गाडीवर घरी सोडतो म्हणत तरुणीवर केला अत्याचार

Rape

नांदेड | बस स्थानकात बसची वाट पाहणाऱ्या एका तरुणीला घरी सोडतो. असे म्हणून दुचाकीवर बसवले आणि तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितिने दिलेल्या फर्यादीवरुन लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव माळ्याचे येथे एक तरुणी घरी जाण्यासाठी बस स्थानकावर उभी होती. रवी राठोड (रा. माळेगाव) हा तिच्याजवळ गेला. आणि तिला बोलायला लागला तुला कुठे जायचे आहे? मी माझ्या गाडीवर तुला घरी नेऊन सोडतो. असे सांगून तिला त्याच्या गाडीवर बसवले आणि घरचा रस्ता सोडून आणि दुसऱ्याच रस्त्याने गाडी घेऊ लागला बदनामीची धमकी देत त्यांनी तिच्यावर अत्याचार केला.

सायंकाळी 7 ते मध्यरात्री 2 या काळात कंधार ते पानशेवडी मार्गावरील नवघर येथील ढाब्यावर ही घटना घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात आरोपी रवी विरुद्ध गुरंन. 144/21कलम 366, 376, 506 अॅट्सिटी कलम 3,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करत आहे.

राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यात झालेल्या पूरस्थितीची पाहणी करताना काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे हा अपघात झाला असून 2 पोलीस कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विश्वजित कदम मात्र सुखरूप आहेत.

विश्वजीत कदम हे आपल्या मतदारसंघातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी अचानक गावातील एक इसम त्यांच्या ताफ्याच्या आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन गाडीचा अपघात झाला

दरम्यान, जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एक सीन परफेक्ट करण्यासाठी आमिर तब्ब्ल 12 दिवस राहिला होता आंघोळीपासून दूर, चेहऱ्यावर जमा झाली होती घाण आणि …

मुंबई । बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मि. परफेक्शनिस्टची पदवी मिळाली आहे कारण तो त्या भूमिकेला जिवंत करण्यासाठी ती व्यक्तीरेखा अक्षरशः जगतो. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कधी तो वजन तर कधी केस आणि मिश्या वाढवतो. आमिर आपल्या चित्रपटात इतका गुंततो की त्याच्या जिवाचीसुद्धा त्याला चिंता नसते. असं म्हणतात की, त्याच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने एक सीन परफेक्ट करण्यासाठी अक्षरशः जीवच दिला होता. आमिर कमी चित्रपट करतो पण त्याचा तोच चित्रपट इतर कोणत्याही अभिनेत्याच्या इतर चित्रपटांवर भारी पडतो.

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘गुलाम’ या चित्रपटाच्या एका अ‍ॅक्शन सीनमध्ये आमीरला ट्रेनसमोर झेंडा घेऊन पळावे लागते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेन जवळ येण्यापूर्वीच आमिरला उडी मारायला सांगितले होते, पण आमिरने तो सीन परफेक्ट करण्यासाठी अगदी ट्रेनच्या जवळून उडी मारली. याशिवाय या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगसाठी सुमारे 12 दिवस लागले. यामधील एका फाइटिंग सीनमध्ये आमिरला चित्रपटाचा खलनायक बरीच मारहाण करतो, ज्यामुळे आमीरचा चेहरा रक्ताने आणि धुळीने माखला जातो.

माध्यमांच्या वृत्तानुसार, हा सीन पूर्ण होईपर्यंत म्हणजेच, तब्ब्ल 12 दिवस तो बिना अंघोळीचा राहिला होता, कारण त्याला हा सीन परफेक्ट बनवायचा होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या सीनची बरीच प्रशंसा देखील झाली. या चित्रपटात आमिर बरोबर राणी मुखर्जी होती. या चित्रपटाचे ‘आती क्या खंडाला ..’ हे गाणे त्यावेळच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.

आमिर खान ‘कयामत से कयामत’ या चित्रपटात काम करून इतका प्रसिद्ध झाला होता की त्याच्याकडे चित्रपटांची लाईनच लागली होती. आमिरचा चॉकलेट लूक प्रेक्षकांना खूप आवडला. परंतु काळानुसार आमिर खानला एक अभिनेता म्हणून ओळखले गेले ज्याने आपला चित्रपट यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. आमिरच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात प्रेक्षकांना त्याची एक वेगळीच शैली आणि गेटअप दिसेल.

थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट; बिलाची सक्तीने वसुली सुरु

MSEDCL

औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळातील व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 5 लाख 30 हजार 89 ग्राहकांकडे 392 कोटी 66 लाखांचे वीज बिल थकले आहे. ग्राहक विजेचे बिल नियमित भरत नाहीत. त्यामुळे महावितरणने थकबाकीदरांचा विजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर विजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरसमोर पर्याय उरलेला नाही, असे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी सांगितले.

विज बिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिले आहेत. त्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले असून ऑनलाइन शिक्षण कामकाजाचा खोळंबा होत आहे. महावितरणने सर्वत्र यंत्रणा थकबाकी असून थकबाकी विरोधात यापुढेही धडक मोहीम सुरू राहणार आहे. महावितरणने वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्राचा व घरबसल्या ऑनलाइन पेमेंट साठी www.mahadiscom.in या संतोष रावळ किंवा महावितरणाच्या मोबाईल ॲपच्या पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीत औरंगाबाद शहर 1 लाख 71 हजार 999 ग्राहकांकडे 163 कोटी 97 लाख, औरंगाबाद ग्रामीण दोन लाख 17हजार 805 ग्राहकांकडे 105 कोटी 63 लाख, तर जालना शहर व जिल्हा 1 लाख 40 हजार 285 ग्राहकांकडे 123 कोटी 6 लाखांची थकबाकी आहे.