Friday, December 12, 2025
Home Blog Page 3775

एक सीन परफेक्ट करण्यासाठी आमिर तब्ब्ल 12 दिवस राहिला होता आंघोळीपासून दूर, चेहऱ्यावर जमा झाली होती घाण आणि …

मुंबई । बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मि. परफेक्शनिस्टची पदवी मिळाली आहे कारण तो त्या भूमिकेला जिवंत करण्यासाठी ती व्यक्तीरेखा अक्षरशः जगतो. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कधी तो वजन तर कधी केस आणि मिश्या वाढवतो. आमिर आपल्या चित्रपटात इतका गुंततो की त्याच्या जिवाचीसुद्धा त्याला चिंता नसते. असं म्हणतात की, त्याच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने एक सीन परफेक्ट करण्यासाठी अक्षरशः जीवच दिला होता. आमिर कमी चित्रपट करतो पण त्याचा तोच चित्रपट इतर कोणत्याही अभिनेत्याच्या इतर चित्रपटांवर भारी पडतो.

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘गुलाम’ या चित्रपटाच्या एका अ‍ॅक्शन सीनमध्ये आमीरला ट्रेनसमोर झेंडा घेऊन पळावे लागते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेन जवळ येण्यापूर्वीच आमिरला उडी मारायला सांगितले होते, पण आमिरने तो सीन परफेक्ट करण्यासाठी अगदी ट्रेनच्या जवळून उडी मारली. याशिवाय या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगसाठी सुमारे 12 दिवस लागले. यामधील एका फाइटिंग सीनमध्ये आमिरला चित्रपटाचा खलनायक बरीच मारहाण करतो, ज्यामुळे आमीरचा चेहरा रक्ताने आणि धुळीने माखला जातो.

माध्यमांच्या वृत्तानुसार, हा सीन पूर्ण होईपर्यंत म्हणजेच, तब्ब्ल 12 दिवस तो बिना अंघोळीचा राहिला होता, कारण त्याला हा सीन परफेक्ट बनवायचा होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या सीनची बरीच प्रशंसा देखील झाली. या चित्रपटात आमिर बरोबर राणी मुखर्जी होती. या चित्रपटाचे ‘आती क्या खंडाला ..’ हे गाणे त्यावेळच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.

आमिर खान ‘कयामत से कयामत’ या चित्रपटात काम करून इतका प्रसिद्ध झाला होता की त्याच्याकडे चित्रपटांची लाईनच लागली होती. आमिरचा चॉकलेट लूक प्रेक्षकांना खूप आवडला. परंतु काळानुसार आमिर खानला एक अभिनेता म्हणून ओळखले गेले ज्याने आपला चित्रपट यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. आमिरच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात प्रेक्षकांना त्याची एक वेगळीच शैली आणि गेटअप दिसेल.

थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट; बिलाची सक्तीने वसुली सुरु

MSEDCL

औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळातील व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 5 लाख 30 हजार 89 ग्राहकांकडे 392 कोटी 66 लाखांचे वीज बिल थकले आहे. ग्राहक विजेचे बिल नियमित भरत नाहीत. त्यामुळे महावितरणने थकबाकीदरांचा विजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर विजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरसमोर पर्याय उरलेला नाही, असे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी सांगितले.

विज बिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिले आहेत. त्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले असून ऑनलाइन शिक्षण कामकाजाचा खोळंबा होत आहे. महावितरणने सर्वत्र यंत्रणा थकबाकी असून थकबाकी विरोधात यापुढेही धडक मोहीम सुरू राहणार आहे. महावितरणने वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्राचा व घरबसल्या ऑनलाइन पेमेंट साठी www.mahadiscom.in या संतोष रावळ किंवा महावितरणाच्या मोबाईल ॲपच्या पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीत औरंगाबाद शहर 1 लाख 71 हजार 999 ग्राहकांकडे 163 कोटी 97 लाख, औरंगाबाद ग्रामीण दोन लाख 17हजार 805 ग्राहकांकडे 105 कोटी 63 लाख, तर जालना शहर व जिल्हा 1 लाख 40 हजार 285 ग्राहकांकडे 123 कोटी 6 लाखांची थकबाकी आहे.

उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो; पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव
ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो अस मोदींनी म्हंटल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना. अस ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात भाजप- शिवसेना युती तुटली असली तरी मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंधात कधीही कटुता आली नाही.

दरम्यान, राज्यातील पूरस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

तडफडणाऱ्या बिबट्याचा क्रोनिक न्युमोनियाने मृत्यु : वनविभागाकडून शवविच्छेदन करून दहन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील साजूर येथे ऊसाच्या सरीमध्ये बिबटया तडफडत असताना आवाज आल्याने गावातील लोक हातात काट्या घेवून शेताकडे गेले होते. मात्र बिबटया जागेवरच पडून तडफडत होता.  गावकऱ्यांनी प्राणीमित्र रोहित कुलकर्णी यांना फोन लावला, तेव्हा वनविभाग तातडीने घटनास्थळी पोहचेल. परंतु बिबट्याचा मृत्यू झाला होता, बिबट्याच्या फुफुसास मोठया प्रमाणात जवळ जवळ 80% संसर्ग झाल्याने क्रोनिक न्युमोनियाने मृत्यु झाला असल्याचे वनविभागाने सांगितले.

वनविभागाने दिलेली माहीती अशी, मंगळवार दि. 27 जुलै रोजी कराड वनपरिक्षेत्रातील मौजे साजुर येथील शेतमालक अनिल चव्हाण यांचे गट नं. 367 मध्ये, शेतमालक जनावरांसाठी चारा काढत असताना ऊसाच्या सरीमध्ये बिबटया तडफडत असताना आवाज आला. बिबटयाला पाहताच शेतमालक ओरडत घराकडे / गावाकडे पळाले. त्वरीत गावातील काही लोक हातात काटया घेऊन शेताकडे आले. परंतु बिबटया जागेवरच पडून तडफडत होता. तेव्हा काही गावकऱ्यांनी प्राणी मित्रांना फोन लावले. त्यातील प्राणीमित्र रोहीत कुलकर्णी यांनी मानद वन्यजीव रक्षक सातारा जिल्हा रोहन भाटे यांना फोन वरुन माहिती दिली. त्यांनी त्वरीत सहा. वनसंरक्षक विलास काळे यांना कळविले. त्वरीत शासकीय वाहनात पिंजरा चढवून वनरक्षक मलकापूर रमेश जाधवर, वनरक्षक कोळे राठोड त्वरीत घटनास्थळाकडे रवाना झाले. तोपर्यत प्राणीमित्र व रोजंनदारी वनमजूर मयुर जाधव- गमेवाडी, रोहीत कुलकर्णी त्वरीत घटनास्थळी हजर होऊन बिबटयाची पाहणी केली. तेव्हा बिबटया जागेवरच तडफडत होता.

थोडयाच वेळात वनअधिकारी व रोहन भाटे जागेवर पोहचले. तेव्हा बिबटया मृत पावला होता. शरीराचे तापमान जास्त होते. त्यास उचलुन कराड येथे पशुधन विकास अधिकारी/तथा सहा. आयुक्त, पशुधन विकास विभाग यांचे दवाखाण्यात आणून शवविच्छेदन केले. बिबट्याच्या फुफुसास मोठया प्रमाणात जवळ जवळ 80% संसर्ग झाल्याने क्रोनिक न्युमोनियाने बिबट्याचा मृत्यु झाला. कराड वनकार्यालयात सहा. वनसंरक्षक, सातारा व पशुधन विकास अधिकारी यांच्या आदेशाने दहन करण्यात आले. सदर कार्यवाही मध्ये सहा. वनसंरक्षक सातारा विलास काळे, वनक्षेत्रपाल कराड अर्जुन गंबरे, मानद वन्यजीव रक्षक सातारा जिल्हा रोहन भाटे, वनपाल मलकापूर ए. पी. सवाखंडे, वनपाल कोळे बाबुराव कदम, वनरक्षक मलकापूर रमेश जाधवर, वनरक्षक कोळे राठोड, वनरक्षक तांबवे मंगेश वंजारे. आवश्यक कागदपत्रे तयार केली. पंचनामा केला. पुढील तपास चालु आहे.

जागेअभावी 800 लघु उद्योग अडचणीत

Waluj MIDC
Waluj MIDC

औरंगाबाद | औद्योगिक परिसरात जागा मिळत नसल्यामुळे वाळूज मधील 800 लघु उद्योग अडचणीत आले आहेत. जागेअभावी हे उद्योग ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू आहेत. याठिकाणी उद्योगासाठी शासनाच्या सर्व सोयी सुविधा नसल्यामुळे एनएसएमईच्या विकासाला आळा बसला असल्याची खंत मासीओचे अध्यक्ष नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे.

मासीओच्या व्यासपीठावरून लघुउद्योगाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी वीजेची सुविधा नसल्यामुळे अखंड वीजपुरवठा सुरू करण्यात यावा. यासाठी महावितरणचे देखील लक्ष वेधून घेण्यात येत आहे. उद्योगिक वसाहतीमध्ये जागा मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे उद्योग मागील वर्षापासून सुरू आहेत. कमीत कमी 400 ते 500 कोटी एवढी त्यांची उलाढाल आहे. या उद्योगासाठी कोट्यवधी रुपयांचे कर भरावे लागतात. परंतु शासनाकडून सबसिडी दिली जाते त्यापासून हे उद्योग वंचित आहेत.

याबाबत मासियाचे अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले की फक्त औद्योगिक वसाहतीत किंवा उद्योगांच्या अधिसूचित क्षेत्रात हे उद्योग नाहीत यामूळे त्यांना उद्योजकांसाठी उद्योगांसाठी सबसिडी दिली जात नाही. औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांसाठी जागा उपलब्ध नाही. आणि उपलब्ध जागेची किंमत परवडणारी नाही म्हणून ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्लॉट घेऊन हे उद्योग सुरू झाले आहेत. या उद्योगांना सबसिडी देण्यासाठी शासनाने उद्योग धोरणात बदल करायला हवे असे मासीआचे अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले.

इन्कम टॅक्स ई-फाइलिंगच्या नवीन पोर्टलसाठी केंद्र सरकारने इन्फोसिसला दिले 164.5 कोटी रुपये

नवी दिल्ली । नवीन इन्कम टॅक्स ई-फाइलिंग पोर्टल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने आयटी दिग्गज कंपनी इन्फोसिसला 164.5 कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम जानेवारी-2019 ते जून 2021 दरम्यान देण्यात आली. सोमवारी संसदेत सरकारने ही माहिती दिली.

इन्फोसिसला हे टेंडर Integrated e-filing & Centralized Processing Centre (CPC 2.0) Project अंतर्गत एका ओपन टेंडरद्वारे मिळाले. सर्वात कमी बोली लावण्याच्या आधारे हे टेंडर इन्फोसिसला देण्यात आले.

CPC Project 4,241.97 कोटी रुपयांचा आहे
या प्रकल्पांतर्गत इन्फोसिसला 164.5 कोटी रुपये दिले गेले आहेत असे उत्तर एका प्रश्नाला देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की,” केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जानेवारी -19 रोजी 4,241.97 कोटी रुपयांच्या या CPC Project ला मंजुरी दिली. हे 8.5 वर्षांसाठी होते. यात जीएसटी, रेंट, पोस्टेज आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॉस्टचा समावेश होता.”

या CPC 2.0 अंतर्गत यावर्षी 7 जून रोजी सरकारने नवीन आयकर ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले. चौधरी म्हणाले की,” या नवीन पोर्टलमध्ये करदात्यांनी, टॅक्स प्रोफेशनल्सनी आणि इतर भागधारकांनी विविध समस्यांविषयी तक्रार केली आहे. काही तांत्रिक अडचणींना देखील सामोरे जावे लागत आहे. या सर्व तांत्रिक समस्या इन्फोसिस या कंपनीला सांगण्यात आल्या आहेत. प्राप्तिकर विभाग आणि कंपनी संपर्कातील या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

90 प्रकारच्या युनिक समस्या
प्राप्तिकर विभागाच्या या नवीन ई-फाइलिंग पोर्टलशी संबंधित आत्तापर्यंत 700 हून अधिक ई-मेल मिळाले असल्याचे केंद्र सरकारने कबूल केले आहे, ज्यामध्ये 2000 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाच्या या नवीन ई-फाइलिंग वेबसाइटमध्ये विविध प्रकारच्या 90 हून अधिक समस्या समोर आल्या आहेत. सरकारकडे पाठविलेल्या या तक्रारीमध्ये टॅक्स प्रोफेशनल, इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) आणि करदात्यांचा समावेश आहे.

अर्थमंत्र्यांनी बैठकही घेतली
इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी भारत सरकारने जूनमध्ये एक नवीन वेबसाइट (new income tax e-filing portal) लाँच केली. प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फाइलिंग पोर्टल सुरू झाल्यामुळे ई-फाइलिंग पोर्टलमध्ये करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ई-फाईलिंग पोर्टलच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार; शरद पवारांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी दरड कोसळून पूरस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूरग्रस्त असलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू पुरवणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं. येत्या दोन ते तीन दिवसात ही मदत पुरवली जाणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं

महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे. माळीणमधील दुर्घटनेनंतर सरकार आणि स्थानिक नेते यांनी पुनर्वसन केलं होतं. पुनर्वसन कसं करतात याचा अनुभव घेतला,” असं शरद पवारांनी सांगितलं. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल,” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

‘कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते’ – Moody’s

नवी दिल्ली । कोविड -19 साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. या नुकसानीपासून अर्थव्यवस्था परत मिळविण्यात निर्यात पुन्हा एकदा मोठी भूमिका बजावेल. मूडीज अ‍ॅनालिटिक्सने नुकत्याच दिलेल्या रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे.

‘एपीएसी इकॉनॉमिक आउटलुक: डेल्टा हर्डल्स’ असे शीर्षक असलेल्या रिपोर्टमध्ये मूडीज अ‍ॅनालिटिक्सने म्हटले आहे की,”सध्याच्या तिमाहीत Social distancing चा परिणाम होत आहे परंतु वर्षाच्या अखेरीस आर्थिक रिकव्हरी पुन्हा सुरू होईल.”

रिपोर्टनुसार, कोविड -19 मधील डेल्टा व्हेरिएन्ट आता एशिया-पॅसिफिक (APAC) क्षेत्राच्या अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम करणारे घटकांपैकी एक आहे, परंतु प्रदेशातील हालचालींवर निर्बंधाचा परिणाम दुसर्‍या तिमाहीतही समान होता. गेल्या वर्षी प्रमाणे आता आर्थिक मंदी तितकी तीव्र होणार नाही.

अर्थव्यवस्थेत निर्यातीचा कमी वाटा
भारतातील अर्थव्यवस्थेत निर्यातीचा वाटा तुलनेने कमी आहे. वस्तूंच्या जास्त किंमतींमुळे निर्यातीचे मूल्य वाढले आहे. हाच एक घटक आहे ज्याने कोविड -19 च्या पहिल्या विनाशकारी लाटेनंतर भारताला पुन्हा रुळावर आणण्यास मदत केली.

या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, “दुसरी लाट आता शेवटच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने अर्थव्यवस्थेला दीर्घावधीत नुकसान होऊ शकते. छोट्या व्यावसायिकांवर साथीच्या आजाराचा वाईट परिणाम झाला आहे. त्याच वेळी निर्यात पुन्हा एकदा रिकव्हरीसाठी आधार ठरेल.”

भारत लसीकरणाला वेग देण्यासाठी झुंज देत आहे
आर्थिक माहिती आणि विश्लेषणाशी संबंधित मूडीज अ‍ॅनालिटिक्सने लसीकरणाच्या संदर्भात असे लिहिले आहे की,” लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी भारत संघर्ष करीत असल्याचे दिसते.” त्यात म्हटले आहे की,” जागतिक आर्थिक रिकव्हरी ठोस वेगाने सुरू आहे, परंतु आशियातील काही देशांमध्ये अल्पावधीत त्याचे प्रतिबिंबित होताना दिसत नाही. विशेषतः दक्षिणपूर्व आशियामध्ये. त्याचे कारण म्हणजे कोविड -19 च्या डेल्टा व्हर्जनचा संपूर्ण प्रदेशात प्रसार आणि त्यास प्रतिबंध करण्यासाठी सामाजिक अंतर प्रतिबंध आहे.

मूडीज अ‍ॅनालिटिक्सच्या मते, यावर्षी जागतिक GDP (सकल देशांतर्गत उत्पादन) वाढीचा दर 5 ते 5.5 टक्के राहील. हा अपेक्षित विकास दराच्या 3 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींबद्दल पेट्रोलियम मंत्री काय म्हणाले आणि त्याबाबत सरकारची काय योजना आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत केंद्र सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या विशेष निर्णयामुळे सर्वसामान्यांना वाढणाऱ्या तेलाच्या किंमतीपासून दिलासा मिळू शकेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी सरकारने म्हटले आहे की, देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर समान ठेवण्याच्या विचाराधीन कोणतीही योजना नाही आणि आतापर्यंत जीएसटी परिषदेत ऑइल आणि गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करण्याची कोणतीही शिफारस केलेली नाही.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की,”जागतिक बाजारपेठेतील दरांच्या आधारे पेट्रोल, डिझेलचे दर निश्चित केले जातात.” ते म्हणाले की,” भारत आपल्या एकूण इंधन गरजेपैकी सुमारे 85 टक्के इतर देशांकडून आयात करतो आणि जागतिक बाजारपेठेतील किंमती तेलाची आयात, उत्पादक आणि निर्यात करणार्‍या देशांकडून ठरवली जातात.”

एकसमान ठेवण्याची कोणतीही योजना नाही
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेतील उदय प्रताप सिंह आणि रोडमल नगर यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एकसारख्या ठेवण्यासाठी सरकार कोणतीही योजना तयार करत आहे का, असा सवाल या सदस्यांनी केला होता.

यावर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, “सरकारकडे अशी कोणतीही योजना विचाराधीन नाही.” तसेच ते म्हणाले की,” पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती, VAT (मूल्यवर्धित कर) यासारख्या घटकांमुळे स्थानिक बाजारात वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये भिन्न आहेत.”

दुसर्‍या पूरक प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की,”2010 पासून पेट्रोलियम पदार्थांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार निश्चित केले जातात.” ते म्हणाले की,”32 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणून घेतले जातात आणि याचा उपयोग पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना मदत, लोकांना मोफत लसीकरण, किमान आधारभूत किंमत आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी इत्यादी कामांसाठी केला जातो.”

जावयाने सासऱ्याचा प्लॉट परस्पर विकला; जावया विरूद्ध तक्रार दाखल

crime

औरंगाबाद |  छत्तीस महिन्याचा करारनामा करून गॅरेजसाठी किरायाने दिलेल्या प्लॉट जावयाने स्वतःच्या नावावर करून परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात जावया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश प्रेमकुमार अग्रवाल असे जावयाचे नाव आहे. विजय हिरालाल अग्रवाल वय 61, (रा. विष्णू नगर जवाहर कॉलनी) असे सासर्‍याचे नाव आहे. विजय हे मिठाईचे व्यापारी आहेत. त्यांना रुचिता ही एकुलती एक मुलगी आहे ती सध्या त्यांच्यासोबतच राहते.

2012 मध्ये बगरशेरगंज दाऊदपुर येथे 1 हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला होता. 6 नोव्हेंबर 2020 रोजी व्यंकट पिराजीराव यांना गॅरेजसाठी 36 महिन्याचा भाड्याने दिला होता. प्लॉटचा करारनामा करताना जावई निलेश अग्रवाल हा साक्षीदार होता. 20 जुलै रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास अग्रवाल यांना भाडेकरूने फोन करून सांगितले की ते चार पाच जणांनी गॅरेजवर येऊन धमकावले तसेच हा प्लॉट त्यांचा असल्याचे सांगितले. विजय हिरामण पडवळ आणि संजय अर्जुनदास डायरानी यांनी आम्ही हा प्लॉट जावई निलेश कडून खरेदी केल्याचे सांगितले.

सुशील भिसे नावाच्या व्यक्ती सोबत तीन ते चार महिला होत्या. त्यांनी हा प्लॉट लगेचच रिकामा करा असे भाडेकरूला धमकावले होते. त्यावरून निलेशने या प्लॉटची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच प्लॉटची मूळ कागदपत्रे देखील घरातून गायब असल्याचे अग्रवाल यांच्या लक्षात आले. त्यांनी जवाहर नगर पोलिस ठाण्यात रविवारी जावया विरुद्ध तक्रार केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक घोरपडे हे करत आहेत.