Friday, December 12, 2025
Home Blog Page 3777

मनपाच्या सीबीएसई शाळांत प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांचा प्रवेश

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.पहिल्या टप्प्यात उस्मानपुरा व गारखेडा या दोन शाळात ही सुविधा सुरू केली जात आहे. शहरातील गरीब व होतकरू मुलांना इंग्रजी माध्यमातून दररोज शिक्षणं देण्यासाठी या शाळांमध्ये अनुक्रमे 24 व 25 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत. लवकरच या शाळांमधील प्रवेश पूर्ण होतील अशी माहिती उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी सोमवारी दिली.

या दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. एलकेजी, युकेजी, फस्ट आणि सेकंड हे चार वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत.या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. पालिकेच्या शाळांमधील अनेक शिक्षण अत्यंत हुशार व विद्यार्थीप्रिय आहेत. या शिक्षकामधूनच निवड करून 25 ते 30 शिक्षकांकडे सीबीएससीच्या वर्गाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सीबीएससीचे वर्ग योग्य प्रकारे चालवण्यासाठी, शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी, सर्व स्तरातील मुलामुलींना प्रवेश मिळावा, प्रत्येक पालकांना ही शाळा आपली वाटावी, या हेतूने प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे परिश्रम घेत आहेत

खुशखबर ! आज सोने झाले स्वस्त, आजचे सोन्याचे दर काय आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमतींमधील नरमाईनंतर 27 जुलै रोजी भारतीय बाजारात सोन्याचे शेअर्स तेजीत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्टसाठी सोन्याचे दर 0.02 टक्क्यांनी घसरून 47,450 रुपयांवर गेले. सप्टेंबरमध्ये चांदीचा वायदा दर 0.22 टक्क्यांनी घसरून 66,970 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करीत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दोन दिवसांच्या बैठकीनंतर फेडचे अधिकारी याची पुष्टी करू शकतात की, अमेरिकेच्या मजबूत रिकव्हरीसाठी आणि त्यांच्यात अंतिम धोरण बदलण्याची योजना सुरू आहे.

सोने 47,100 रुपयांवर राहील
घरगुती बाजारावर, MCX वर सोने ऑगस्टमध्ये 47,300-47,100 रुपयांच्या पातळीवर राहू शकतात. MCX वर चांदी सप्टेंबरला 66,600 च्या पातळीजवळ पाठिंबा देईल, जिथे त्याला 67,300-68,000 रुपयांच्या आसपास प्रतिकार दिसू शकतो. पिवळ्या धातूच्या कमकुवत मागणीला उत्तेजन देण्यासाठी डीलर्स भारतात सोन्यावर भारी सूट देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या मौल्यवान धातूवर डिलर सूट देशात एक महिन्याच्या उच्चांकावर आहे.

वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर
गुड रिटर्न्स वेबसाइटवर नजर टाकल्यास, आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 ग्रॅमवर ​​4,787, 8 ग्रॅमवर ​​38,296, 10 ग्रॅमवर ​​47,870 आणि 100 ग्रॅमवर ​​4,78,700 वर आहे. जर आपण प्रति 10 ग्रॅम पाहिले तर 22 कॅरेट सोनं 46,870 वर विकलं जात आहे. जर आपण मोठ्या शहरांमधील सोन्याच्या किंमतींकडे पाहिले तर दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याचे भाव 46,950 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव 51,220 वर चालत आहेत. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे 46,870 आणि 24 कॅरेट सोन्याचे 47,870 वर धाव आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचे 47,250 रुपये, तर 24 कॅरेटचे सोने 49,950 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,200 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,310 रुपये आहे. या किंमती प्रति 10 ग्रॅम सोन्याचे आहेत.

३ किमी चा चिखलमय रस्ता ठरला आदिवासी युवकाच्या मृत्यूचे कारण ;परभणी जिल्हातील ग्रामीण रस्ते बनले मृत्युचे सापळे

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे 

या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे रस्ते लोकांच्या जीवाशी खेळत असून दोनच दिवसांपूर्वी गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील महिलेचा विजेचा शॉक लागल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच सोमवारी सायंकाळी पुन्हा चिखलमय रस्त्याने जाताना वेळेत उपचार न भेटल्यामुळे एका 32 वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात घडली आहे .त्यामुळे स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त केला जातोय .

यासंबंधी सविस्तर माहिती अशी कि ,पाथरी तालुक्यातील वाघाळा गावापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आदिवासीबहुल पारधी समाजातील कुटूंबांची शेती असल्याने या ठिकाणी वस्ती निर्माण झालेली आहे .परंतु मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही .शासनाकडून या ठिकाणी राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वस्तीशाळा बांधून देण्यात आली असून इतर भौतिक सोयी सुविधा मात्र स्थानिक नागरिकांच्या नशिबी अजूनही आल्या नाहीत . प्रत्येक पावसाळा या लोकांच्या जीवाशी खेळत असून उपचाराअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने यापूर्वीही परिसरात राहणाऱ्या दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर सोमवार २६ रोजी दुपारी पुन्हा एका युवकाचा चिखलमय रस्ता तुडवत दवाखान्यात उपचारासाठी
नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .

राजेभाऊ रामा पवार (वय ३२) असं मयत युवकाचे नाव असून सदरील युवकाला सोमवारी दुपारी अचानक रक्ताची उलटी झाल्यानंतर त्याला तात्काळ आरोग्य उपचाराची गरज होती .वस्तीवरील लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत खांद्यावर व नंतर बैलगाडीतीतून चिखलमय रस्ता तुडवीत वस्तीहून अडीच ते तीन किमी असणाऱ्या वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची वाट धरली खरं परंतु उपचार करण्यासाठी नेत असताना त्यांना यावेळी मोठी कसरत करावी लागली . परंतु प्रयत्नाची पराकाष्टा करूनही आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी येण्यास उशीर झाल्याचे सांगत राजू पवार यास मृत घोषीत केले .

यावेळी पावसामुळे चिखलमय झालेला रस्त्याने त्याचा बळी घेतला असे स्थानिक नागरीकांचे म्हणने आहे . पारधीवस्ती वर समाजाची दहा पंधरा कुटूंबाची १०० पेक्षा जास्त लोक राहतात . याठिकाणी जाण्या येण्यासाठी मागील अनेक वर्षांपासुन पाठपुरावा करूनही त्यांना पक्का रस्ता मिळालेला नाही . प्रशासन व स्थानिक नेतेमंडळी यांनी नुसते आश्वासन देण्या पलीकडे काही केले नाही . असे उद्विग्न झालेल्या वस्तीवासीयांचे म्हणणे आहे . सोमवारी दुपारी सदरील युवकाची तब्येत खालावल्यावर स्थानिक नागरिकांनी वाघाळा येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार मिळावेत म्हणून जीवतोडून प्रयत्न केले . आणखी किती जीव गेल्यानंतर रस्ता करून देण्यात येईल असा प्रश्न आता वस्तीवर राहणारे पारधी बांधव करू लागले आहेत .

क्रांतीचौकातील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा जानेवारीत बसवणार

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिसेंबर २०२१ किंवा जानेवारी २०२२ पर्यंत बनविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

क्रांती चौक येथील जुना पुतळा दोन वर्षांपूर्वी महापालिकेने काढला होता, त्यानंतर महापालिकेने चबुतरा बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु बांधकामसाठी निधी वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटीदराकडून काही काळ काम बंद करण्यात आले होते. दरम्यान, चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती एकवीस फूट उंच व बावीस फूट लांब आणि सहा टन वजनाचा पुतळा पुण्यात तयार होत आहे.

चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांच्या सहकार्याने बनवलेल्या या पुतळ्याची पाहणी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सह लोकप्रतिनिधी महापालिका अधिकाऱ्यांनी केली होती. पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रांती चौकातील पुतळा बसवण्यात येणार, असून स्मार्ट सिटी अभियानातून क्रांती चौकात सुशोभीकरण केले जाणार असल्याचे आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

Petrol-Diesel Price : महागड्या पेट्रोल-डिझेलपासून दिलासा, आजची किंमत तपासा

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग दहाव्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये किंमती समान आहेत. राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आणि डिझेलची किंमत 89.87 रुपये आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा 74 डॉलरच्या पुढे गेले आहेत. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किंमती 45 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल 42 दिवसांत सुमारे 11.52 रुपयांनी महाग झाले आहे. मे ते जुलै या कालावधीत अधून मधून इंधन दरामध्ये वाढ झाली आहे.

एप्रिलनंतर पेट्रोलच्या किंमतीत 39 पट आणि डिझेलच्या किंमतीत 36 पट वाढ झाली

यावर्षी एप्रिलपासून पेट्रोलचे दर 39 वेळा वाढले आहेत. त्याच वेळी, डिझेलचे दर 36 पट वाढले आहेत. यामुळे देशातील सर्व राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने लोकसभेत ही माहिती दिली आहे. यादरम्यान पेट्रोलचे दर एकदा आणि डिझेल दोन वेळा कमी करण्यात आले.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर आहे.

>> बेंगलुरु मधील पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर आहे.

>> लखनऊ – पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लिटर आहे.
>> पाटणा – पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.51 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळ – पेट्रोल 110.20 रुपये तर डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> जयपूर – पेट्रोल 108.71 रुपये तर डिझेल 99.02 रुपये प्रति लिटर आहे.
>> गुरुग्राम – पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

बहिणीला घटस्पोट दिला म्हणून मेव्हण्याने पाडले दाजीचे दात

Crime

औरंगाबाद | तारांगण मिटमिटा येथील कुणाल कैलास गजहंस यांच्या साल्याने बहिणीला घटस्पोट दिला म्हणून फाइटरने दोन दात पाडल्याची घटना कर्णपुरा मैदानाजवळील बस स्टॉप येथे घडली आहे. शनिवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मेव्हण्याने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील विटखेडा येथील सचिन ज्ञानेश्वर दिवेकर हा त्याच्या तीन साथीदारांना सोबत घेऊन आला होता. त्याने कर्णपुरा मैदानाजवळ कुनाल याला बहिणीला घटस्पोट दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच हातातील फायटरने तोंडावर ठोसे लगावले यात कुणाल गजहंस यांचे दोन दात पडले आहे. या मारहाणीनंतर पुन्हा भेटल्यास आणखीन मारहान करेल अशी धमकीही दिली.

मारहाण केल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले. कुणाल यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. त्यांनी उपचार घेतल्यानंतर छावणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन मेव्हण्याचा व इतर तीन जणांच्या विरोधात तक्रार केली आहे. छावणी पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस मुंडे हे करीत आहेत.

उद्धव ठाकरेंमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना भरभरून शुभेच्छा दिल्या.

अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.. तो दिवस लवकरच उगवेल..
आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रालाही उद्धव ठाकरेंसारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. उद्धव ठाकरे एक दिवस देशाला नेतृत्व देतील अशा शुभेच्छा मी त्यांना देतो असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे असे राऊत म्हणाले.

कोट्यवधींचा ऑक्सीजन प्लांट धूळखात पडला बंद

oxigen plant
oxigen plant

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. यातच आता कोणाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये उद्भवलेल्या त्रुटी लक्षात घेता काही ठिकाणी ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करण्यासाठी साहित्य जमा केले जात आहे. त्याचबरोबर ऑक्सीजन प्लांटसाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. परंतु याला अपवाद म्हणून सिविल हॉस्पिटल परिसरामध्ये ऑक्सीजन प्लांट रखडला आहे. या ऑक्सीजन प्लांटचे कोट्यावधींची यंत्रसामग्री धूळखात पडून आहे.

सिविल हॉस्पिटल परिसरांमध्ये ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आला होता. त्यासाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याची लाईन देखील टाकण्यात आली होती. परंतु पैसो सर्टिफिकेट नसल्यामुळे हा कोट्यावधीचा प्लांट बंदच आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सीएसआर मधून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू झाला की 24 तासात 225 जंबो सिलेंडर भरतील एवढ्या ऑक्सिजनची निर्मिती या ठिकाणी होईल. परंतु त्यासाठी स्वतंत्र फिडर व लाईन टाकावी लागणार आहे. यासाठी एमएसईबीकडे बारा लाख दहा हजार रुपये भरले तरीही मागणी पूर्ण झाली नाही आणि हा प्लांट अजूनही सुरू करण्यात आलेला नाही. या प्रकल्पासाठी 2 कोटी 52 लाख रुपये खर्च आलेला आहे.

या सिविल हॉस्पिटलमध्ये 300 बेडसाठी जम्बो सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा उपलब्ध असून सिलेंडर बदलण्याची प्रक्रिया सतत करावी लागत होती. म्हणूनच सिविल हॉस्पिटल परिसरांमध्ये 13 केएल क्षमतेचा ऑक्सीजन टॅंक उभारण्यात आला होता. परंतु तीन महिने होऊनही या ऑक्सीजन टँकचा वापर सुरू झालेला नाही.

आज दहा केंद्रावर लसीकरण सुरु

corona vaccine

औरंगाबाद : महापालिकेला प्राप्त झालेल्या कोविल्ड शिल्ड 11 हजार लसीपैकी बहुतांश डोस सोमवारीच संपले. त्यामुळे आता मंगळवारी फक्त दहा केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

केंद्रांवर 18 वर्षातील 200 नागरिकांना टोपण देऊन नोंदणीद्वारे कोविडशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस देण्यात येईल. तर पाच केंद्रांवर कोविल्डशिल्ड लसीचा पहिला डोस 200 नागरिकांना देण्यात येईल. तर पाच केंद्रावर कोविल्डशिल्ड लसीचा पाहिला डोस 200 नागरिकांना देण्यात येईल. त्यासाठी कोविड पोर्टलवर ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन येणे बंधनकारक राहील. प्रोझोन मॉल येथे वाहनामध्ये येणाऱ्यानाच लस दिली जाईल. लसीकरणबाबत शंका असल्यास 8956306007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

कोविल्डशिल्ड दुसरा डोस हा भीमनगर, बायजीपुरा, जवाहर कॉलनी, चिखलठाणा, सिडको एन 8, सिडको एन 11, बन्सीलालनगर, न्यू इंग्लिश स्कुल अय्यापा मंदिराजवळ, पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य केंद्र, पुंडलिकनगर आरोग्य केंद्र. कोविल्डशिल्डचा पहिला डोस हा सदातनगर, कैसर कॉलनी, चेतनानगर हर्सूल, शहा बाजार आरोग्य केंद्र, गणेश कॉलनी आरोग्य केंद्र, कोव्हॅक्सिन ही 150 नागरिकांना पहिला डोस, 50 नागरिकांना दुसरा डोस क्रांती चौक आरोग्य केंद्र, राजनगर आणि एमआयटी हॉस्पिटल, एन 4.

नागरिकांनी शिस्त नाही पाळली तर ऑनलाईन नोंदणी केली जाईल – डॉ. नीता पाडळकर

corona vaccine

औरंगाबाद : जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासत आहे, केंद्रावर लसी उपलब्ध आहे पण लसीकरण केंद्रावर टोकन वाटपावरून हाणामारी झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. या कारणामुळे महापालिका प्रशासन सावध झाले असून, नागरिकांनी शिस्त पाळली नाही तर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी बंधनकारक करण्यात येईल. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सोमवारी असे सांगितले की, आता नऊ ते दहा या वेळेतच टोकनचे वाटप करण्यात येईल.

लसींचा मोठ्या प्रमाणात झालेल्या लसींच्या तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रावर रांगेत उभ्या नागरिकांमध्ये वाद होत आहे. टोकन वाटपाच्या वेळी घरातील एखादी व्यक्ती रांगेत उभी असते ती जागेच आपल्या कुटुंबियांना रांगेत उभे करते या कारणाने मागील उभे असलेले नागरिक वाद घालतात.

या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, प्रत्येक लसीकरण केंद्रावर नऊ ते दहा दरम्यान टोकन वाटप करण्यात येणार आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार टोकन देण्यात येईल. या आधी केंद्रावर काही जणांकडून आलेल्या यादीनुसार टोकन दिले जात होते, अशी पद्धत बंद करण्यात येईल अशा सूचना केंद्र प्रमुखांना दिल्या आहेत.