Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 3913

भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. पण, आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर दिले आहे. तसेच भाजपाची अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेने मन खाली घालणारी होती अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज संपले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसलले होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भाजप शिवसेना पुन्हा युती होणार अशी चर्चा रंगली आहे. असा सवाल पत्रकारांनी विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी दोघांच्या म्हणजेच अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या मध्ये आहे. मला बाहेर निघायचे असेल तर या दोघांना टाळण शक्य आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार टिकेल का या प्रश्नाला आपल्या ठाकरी स्टाईलने उत्तर दिले आहे.

विरोधकांना जोरदार टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाही. मुद्दा काय होता. केंद्राकडे इम्पिरेकल डेटा मागण्याचा होता. यामध्ये नवीन आम्ही काय केले. जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तिन्ही पक्षाचे आम्ही नेते होतो त्यावेळी आम्ही इम्पिरेकल डेटाची मागणी सुद्धा केली होती. राज्यपालांना भेटून त्यांना देखील विनंती केली होती ही माहिती केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तोच ठराव आम्ही विधिमंडळात केला तर यात चुकीचे काय आहे आणि एवढ्या मिरच्या जोंबण्याचं कारण काय? ओबीसी समाजाच्या बाबतीत जर आपल्या मनात द्वेश असेल तर तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रकट करु शकत होता.

देवेंद्र फडणवीसांना टोला
अधिवेशनात सोमवारी झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले कि, कालच विधिमंडळात झालेला गोंधळ हा राज्याला काळीमा फासणारा आहे. उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान लावल्यानंतर कोणी अस वागू शकत का ? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सौभाग्याच लेण धोक्यात ! दुचाकीस्वारांनी सिडकोत वृद्धेचे अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले; चोरटे सीसीटीव्हीत कैद

औरंगाबाद : उस्मानपुऱ्यात वृद्धेचे तीन तोळ्याचे गंठण हिसकावल्याची घटना ताजी असतानाच सिडकोत एका वृद्धेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरांनी अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले. ही घटना सिडको एन-८ भागातील नवभारत सोसायटीत दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

विमल दत्तात्रय वाणी (७०, रा. नवभारत कॉलनी, सिडको, एन-८) या दुपारी सव्वा एकच्या सुमारास घराबाहेर वाळत घातलेले कपडे पलटवण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी तिथे दोन दुचाकीस्वार आले. त्यांनी दुचाकी घराच्या बाजूला रस्त्यावर उभी केली. त्यातील एकजण विमलबाई यांच्याकडे आला. त्याने त्यांच्या हातात एक चिठ्ठी देत यावरील पत्ता सांगा असे म्हणाला. त्यामुळे विमलबाई यांनी त्यांचा नातू सुयश याला आवाज दिला. तेवढ्यात त्या चोराने विमलबाई यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले. दोन्ही चोरटे दुचाकीने तेथून पसार झाले.

यावेळी विमलबाई यांनी आरओरड करत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत दुचाकीस्वार चोर तेथून पसार झाले होते. यांनतर घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी पथकासह घटनासथळाकडे धाव घेतली. गुन्हे शाखेचे पथक देखील तिथे पोहोचले. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात अली. त्यात घटनास्थळाजवळच एका सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहे. पोलिसांची पथके चोरांचा शोध घेत आहेत.

अगोदर केली रेकी मग मारला डल्ला…

विमलबाई यांच्या घराच्या गल्लीतून दुचाकीस्वार चोरांनी अगोदर एक चक्कर मारून रेकी केली. रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून पुन्हा दोन मिनिटात विमलबाई यांच्या घराकडे परत आले. त्यानंतर पत्ता विचारण्याच्या वाहण्याने गंठण हिसकावून धूम ठोकली. चोरटे बाजूच्या एका सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

हर्सूल लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी प्रतीक्षा; नागरिक झाले संतप्त

औरंगाबाद : सध्या लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळात आहे. मात्र लसींच्या अभावामुळे सतत लसीकरण थांबत आहे. आज मंगळवारी सकाळपासूनच हर्सूल येथील मनपाच्या लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची होत्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र १२ वाजले तरीही लसीकरण सुरु न झाल्याने या ठिकाणी नागरिक संतापात होऊन हमरीतुमरीवर उतरले. या ठिकाणी नागरिकांची बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दिडशे लसी प्रत्येक केंद्रांवर वितरीत केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी समजुतीने घ्यावे आणि मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.

सोमवारी जिल्ह्याला २६ हजारांचा साठा प्राप्त झाला. यातून केवळ १० हजार लसी मनपास देण्यात आल्या आहेत. मात्र हा साठा एकाच दिवसात संपेल. त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पाच गिरवावे लागणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात आली आहे. औरंगाबादकरांकडून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र वारंवार लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे.

गेल्या आठवड्याभरात केवळ दोन ते तीनच दिवस लसीकरण सुरु होते. आत्तापर्यंत १५ हजार, १२ हजार या प्रमाणात लसींचा पुरवठा झाला. मात्र लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दोनच दिवसात हा साठा संपत आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी किमान ७० टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी यापूर्वीच म्हटले आहे. मात्र जोपर्यंत जास्तीचा साठा मनपास प्राप्त होत नाही तोपर्यंत ७० टक्के लसीकरण होणे अशक्यप्रायच आहे.

टीव्ही सेंटर मैदानावर उभारले जाणार स्टेडियम

औरंगाबाद : टीव्ही सेंटर मैदानावर उभारणार स्टेडियम व्यापारी संकुलच्या आतील बाजूस स्टेडियम तयार करून मुलांसाठी खेळायचे मैदान तयार केली जाणार आहे. त्याकरिता पीएमसीची नियुक्ती करून डीपीआर तयार केला जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिली. टीव्ही सेंटर येथील मैदानाच्या दोन्ही बाजूंनी व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. आता व्यापारी संकुलाच्या आतील बाजूस स्टेडियम तयार केले जाणार आहे.

मनपा प्रशासन तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय या याबद्दल माहिती देताना म्हणाले की, ‘गरवारे स्टेडियम आणि टीव्ही सेंटर येथे मुलांना खेळण्यासाठी मैदाने तयार करण्याचा विचार असून गरवारे स्टेडियमच्या मोकळ्या मैदानावर फुटबॉल, हॉकी, हॉलीबॉल बास्केटबॉल मैदानी तयार करायचे आहेत. स्विमिंग पूलचे काम थांबलेली असून त्याला देखील सुरुवात केली जाणार आहे तसेच हॉल मध्ये टेबल टेनिस कोर्ट केले जाईल’.

दुसऱ्या टप्प्यातील विकास म्हणून टीव्ही सेंटरचा विकास केला जाणार आहे. याठिकाणी स्टेडियम तयार करून मैदाने विकसित केले जातील त्याकरिता पीएमसीची नियुक्ती करण्यात येईल. पीएमसी कडून डीपीआर बनवून त्यास मान्यता दिली जाईल त्याकरिता राज्याचा युवक व क्रिडा कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली जाईल. क्रीडा विभागाकडून मदत करण्याचे आश्वासन बाकी कोरिया यांनी दिले असल्याचे प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.

स्व. प्रेमिलाकाकी व आनंदराव चव्हाण यांचा स्मृतिदिन कार्यक्रम यावर्षी रद्द

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे आई – वडील तसेच कराड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री स्व. आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व. प्रेमिलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन दरवर्षी 8 जुलै रोजी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्मृतिदिन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

माजी केंद्रीय मंत्री स्व. आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व. प्रेमिलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन 8 जुलै रोजी व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे दरवर्षी या कार्यक्रम घेतले जातात. त्यांच्या विचारांना उजाळा मिळावा या उद्देशाने दरवर्षी राज्य व देशपातळीवरील व्याख्यात्यांचे व्याख्यान कराड येथे आयोजित केले जातात. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जातो.

यावर्षी सुद्धा अशाच स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रशासनाने लागू केलेल्या नियमांच्या अनुषंगाने सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमजीएम, सलीमअली सरोवर परिसर या दोन ठिकाणी उभारणार सायकल ट्रॅक

औरंगाबाद : महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सायकल चालविण्यासाठी स्वतंत्रपणे 20 किमीचा सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन पाठोपाठ आता एमजीएम ते सेंटरल नाका आणि टीव्ही सेंटर ते सलीमअली सरोवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सायकल ट्रॅक बनविला जाणार असल्याचे मनपा प्रशासन तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान सहा कि.मी.चा सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. ‘सायकल ट्रॅकची काळाची गरज आहे आणि नागरिकांचा तो अधिकार आहे त्यादृष्टीने काम केले जात आहे’. असे आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले.

सायकल ट्रॅक बनविण्यासाठी 192 कोटींच्या रस्त्यामध्ये नियोजन करण्यात आले आहे त्याबरोबरच एमजीएम ते सेंट्रल नाका टीव्ही सेंटर ते सलीम अली सरोवर रस्ताच्या दोन्ही बाजूने सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. हा सायकल ट्रॅक चार कि.मी.चा असेल. एमजीएम ते सेंट्रल नाका सिमेट रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून डिव्हायडर तयार करण्यात आले आहेत.

बायको नांदायला येत नाही म्हणून सासूच्या डोक्यात जाते घालून केले ठार स्वतःही केली आत्महत्या

crime

नांदेड | पत्नी सासरी नांदायला येत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने सासुच्या डोक्यात जाते घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री भावसारनगर येथे घडली. भीतीपोटी जावयानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पती-पत्नीचे भांडणावरून सासूला जीव गमवावा लागला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मालिनी विजयकुमार बाहेकर या आपल्या शिक्षक मुलासोबत भावसारनगर येथे राहत होत्या त्यांची मुलगी मोहिनी तिचा श्रीकांत शंकरराव पाटेवाड याच्याशी सहा वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. मोहिनी खासगी बँकेत नोकरीला होती. आणि श्रीकांत एका होस्टेलवर गार्ड म्हणून काम करत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली व तो बेरोजगार झाला. त्यामुळे दोघांचे वादा वाद सुरू झाले. आणि मोहिनी माहेरी निघून गेली.

तिच्यापाठोपाठ श्रीकांत ही तिथे गेला आणि सासरी चल असा आग्रह करू लागला परंतु मोहिनीने यायला नकार दिल्यास त्याचा राग अनावर झाला. आणि नशेच्या भरात त्याने हे कृत्य केले. रविवारी रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान मालिनी या घरात एकट्या होत्या त्या दरम्यान श्रीकांतने त्यांच्या डोक्यात जात्याचा दगड घातला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मालिनीला रक्तामध्ये पाहून श्रीकांत खूप घाबरला आणि त्याने दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली.

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या; नितेश राणेंची जहरी टीका

nitesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी या घटनेनंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केली.

भास्कर जाधव यांना जे जे ओळखतात त्याना माहीत आहे ते सोंगाड्या आहेत. ते नरकासुरासारखे आहेत. ते एकच सोंग कधीही ठेवत नाही. काल त्यांना कोणीही शिवी घातली नाही. कोणीही काहीही केलं नाही. पण तमाशातील सोंगड्या कसा असतो, नरकासुर कसा असतो. तसे हे भास्कर जाधव आहेत. अशी टीका नितेश राणे यांनी केली.

भास्कर जाधव यांच्यासारख्या सोंगाड्या माणसाने त्या तालिका अध्यक्षच्या खुर्चीचा अपमान केला आहे, असं देखील यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच ‘मला आश्चर्य वाटतं की, ते काल रडले का नाहीत? किंवा त्यांनी कपडे फाडून घेतले नाहीत’, असं म्हणत नितेश राणे यांनी भास्कर जाधवांवर सडकून टीका केली.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

औरंगाबाद : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कार्यालयात कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नियमबाह्य त्रास देण्यात येत आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात वारंवार तक्रार करूनही प्रशासनाच्या वतीने कुठलीच कारवाई होत नाही. म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद व प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवाडी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

गेल्या अनेक दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद व प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवाडी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विविध कामातून त्रास देण्यात येत असल्याचे संघटनेच्या एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली परंतु उलट या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाहेरील गुंड आणि भावाकडून कर्मचाऱ्यांना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या देण्यात येत असल्याचे या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

शेतकरी दुश्मन आहेत की ते पाकिस्तानातून आले आहेत?; भुजबळांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi and bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक ठाकरे सरकार कडून विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या सडकून टीका केली. शेतकरी हे गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

कायदे करताना विरोध होतो, त्यावेळी लोकांना काय हवंय ते लक्षात घेतो; कायदे मागे घेतो. पण इथे बोलायला लागले की ईडीची विडी शिलगावतात. कारण कायदेच तसे आहेत. काहीही आरोप करायचे. आरोप सिद्ध करणारा कुठे तर तुरुंगात, कसे आरोप सिद्ध करायचे? ही लोकशाही आहे. किती वेळ लागेल शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना घरी पाठवायला, असेही भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले, या देशात खायला अन्न नव्हतं. ते मी पाहिलेलं आहे. अमेरिकेतून येणारा लाल गहू पाहिला, खाल्ला. स्व. वसंतराव नाईकांनी घोषणा केली. त्यांनी कृषी क्रांती आणली. ती यूपीए सरकारपर्यंत सुरू राहिली. हमीभाव दुप्पट-तिप्पट वाढवून दिले. शेतकऱ्यांनी इतकं पिकवलं की, सव्वाशे कोटी देशवासीयांची भूक भागवून २५ देशांच्या अन्नाची गरज या देशाने भागवली,” असं भुजबळ म्हणाले.