Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 3912

कराडात व्यापाऱ्यांचे आंदोलन फसले : पालिका व पोलिसांकडून 12 दुकाने सील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी आदेश काढले आहेत कि, इतर दुकाने कोणत्याही परिस्थितीत उघडली जाऊ नये. मात्र सोमवारी कराड शहरातील व्यापारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. कराड शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवार पासून नऊ ते चार या वेळेत व्यापारी आपली दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले होते. यावरून आज शहरातील मंडई परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु ठेवल्यामुळे सकाळी पोलीस, पालिका प्रशासनाने 12 व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा व नगरपालिकेचे कर्मचारी केल्याने व्यापाऱ्यांचे आंदोलन फसले. मात्र, यावेळी व्यापारी व प्रशासन याचा कर्मचाऱ्यांच्या किरकोळ वादावादी झाली.

कराड पालिकेच्यावतीने कराड शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यासंदर्भात शहरातून सूचना देण्यात आली होती. त्यामध्ये सध्या शहरात फक्त अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत सुरू आहेत या व्यतिरिक्त अन्य दुकाने उघडल्यास जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार येईल असे म्हंटले होते. मात्र, बुधवारी सकाळपासून व्यापाऱ्यांकडून आदेशाचे उल्लंघन केले जाऊ नये म्हणून येथील दत्त चौका परिसरासह शहरातील अनेक ठिकाणी पोलीस, पालिका प्रशासनाकडून बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी काही व्यापारी व पोलिसांमध्येही किरकोळ वादावादी झाल्याच्या प्रकार घडला. त्यानंतर पोलिसानी वादावादी घालणाऱ्या व्यापाऱ्यांना ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यातही नेले आहे. कराड शहरातील व्यापार्‍यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना ही आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर खा. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे व्यापार्‍यांना 9 ते 4 या वेळेत कोरोनाचे नियम पाळून दूकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दोन जिवलग मित्रांनी ‘या’ कारणामुळे केली आत्महत्या सुसाईट नोट वाचून व्हाल थक्क

Suside
Suside

औरंगाबाद | पिंप्री येथील दोन मित्रानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. ‘आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही’ असं म्हणत त्यांनी व्हाट्सअप स्टेटस सुसाईड नोट म्हणून ठेवत आत्महत्या केली. योगेश सुधाकर खिस्ते (23) आणि ज्ञानेश्वर गणेश शिरसाट (20) असे मृतांची नावे आहेत. त्यांनी स्टेटसला ठेवलेल्या सुसाईड नोटवरून शेख मोईन, शेख मुश्ताक आणि एक महिला यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री योगेश सुधाकर खिस्ते आणि त्याचा मित्र ज्ञानेश्वर गणेश शिरसाट यांनी आम्ही आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट व्हाट्सअँप स्टेट्सवर ठेवली होती. हे स्टेटस विजय आनंदा पवार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी दोघांना लगेच फोन लावला. परंतु कोणीच फोन उचला नाही. यानंतर आनंदा पवार यांनी भुसार मालाच्या गोडाऊनवर जाऊन पाहिले असता गोडाऊनमध्ये योगेश आणि ज्ञानेश्वर यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. विजय पवार यांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून दोन्ही युवकांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. सपोनि. प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांनी सहकार्यासोबत घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

‘आईबाबा आम्हाला माफ करा. तुम्ही आम्हाला फार कष्ट करून मोठे केले. पण आमच्यामुळे तुम्हाला कोणी वाईट बोलेल हे आम्हाला सहन होणार नाही. आमच्यावर शेख मोईन याने भोकरदन येथे खोटा गुन्हा दाखल केला आहे. मोईन हा त्याचा एक मित्र शेख मुश्ताक व एक महिलेला घेऊन लोकांच्या शेतात रात्री येत होता, आम्ही त्यांना पकडले. परंतु, त्याने आम्हालाच फसविण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आमच्या आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही. त्यामुळे आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या मृत्यूनंतर रडू नका. आमच्या बहिणीचे थाटात लग्न करा. आमच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना पोलिसांना फाशीची शिक्षा द्यायला लावा. आमच्या परिवाराला 30 लाख रुपये आर्थिक मदत द्या’, असे या व्हाट्सअप स्टेटस वरील सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी युवकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Gold Price : मागील 5 दिवसांत सोने 1500 रुपयांनी महागले, आजची किंमत काय आहे ते तपासा

नवी दिल्ली । सोन्याच्या किंमती वाढतच आहेत. आजकाल सोन्याची किंमत वाढतच चालली आहे. MCX वरील सोन्याचे वायदा 0.15 टक्क्यांनी वाढून 47,800 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय चांदी प्रति किलो 69505 रुपये पातळीवर आहे. याखेरीज मागील सेशनविषयी बोलताना येथे सोन्यात 0.9 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी चांदी 0.6 टक्क्यांनी घसरली होती. गेल्या 5 दिवसांत सोन्याचे भाव 1500 रुपयांनी महाग झाले आहेत.

जागतिक बाजारपेठेबद्दल बोलताना, येथे सोने गेल्या सत्रात तीन आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळपास होते, ज्यामुळे अमेरिकेच्या ट्रेझरीचे उत्पन्न घटले आहे. एका रात्रीत 1,815 डॉलर्सला स्पर्श केल्यानंतर स्पॉट सोन्याचे भाव 0.2 टक्क्यांनी वधारून ते 1,800.42 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकन डॉलरमधील थोडी कमजोरी देखील मौल्यवान धातूला मदत करते.

24 कॅरेट सोन्याची किंमत
24 कॅरेट सोन्याच्या किंमतींबद्दल बोलताना, आज राजधानी दिल्लीत प्रति 10 ग्रॅमची किंमत 50560 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये 49250 रुपये, मुंबईत 47760 रुपये, कोलकातामध्ये 49760 रुपये, हैदराबादमध्ये 48710 रुपये, लखनऊ आणि जयपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 50560 रुपये आहेत.

सोने विक्रमी पातळीपेक्षा 9 हजार रुपयांनी स्वस्त
सोन्याच्या किंमती गेल्या महिन्यात सुमारे 2,700 रुपयांनी खाली आल्या. या व्यतिरिक्त ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपये विक्रमी पातळी गाठली होती, परंतु त्यानंतर त्याची किंमत जवळपास 9,000 रुपयांनी खाली आली आहे. आजकाल सोन्याच्या किंमतींमध्ये बराच चढउतार सुरू आहे.

सोने का वाढले ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की,” डॉलरच्या कमकुवततेमुळे लोकांनी सोन्यात खरेदी केली. यामुळे सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला.” त्याचबरोबर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की डॉलरची घसरण आणि कोविड -19 च्या नवीन व्हेरिएन्टबद्दलच्या भीतीमुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

रुग्णासाठी रक्त आणणाऱ्या मजुराला मुकुंदवाडी पोलिसांची बेदम मारहाण

Crime

औरंगाबाद | मुकुंदवाडी पोलिसांनी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नातेवाईकांसाठी रक्त आणण्यासाठी निघालेल्या मजुराला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान मुकुंदवाडी भागातील राजनगर, झेंडा चौकात घडला. रमेश काळे ( 23, रा. मूर्तिजापूर ) असे जखमी मजुरांचे नाव आहे. रात्री मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी जाब घेतली होती

. काळे यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

हाती आलेल्या माहितीनुसार, रमेश काळे हे सुतारकीचे काम करतात. विश्वकर्मा समाज संघटनेची ते कार्यरत आहेत. सोमवारी काळे हे जवाहरनगर भागातील ब्लड बँकेकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. राजनगर झेंडा चौकात ते आले. सध्या दुपारी 4 नंतर संचार बंदीचे आदेश लागू असल्याचे तेथे काही पोलीस कर्मचारी नाकाबंदीसाठी उभे होते. त्याच वेळी तीन तरुणांच्या मागे काही पोलिस कर्मचारी धावत होते. तेवढ्यातच सीबी ड्रेसवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने काळे यांच्या दिशेने धाव घेत त्यांना कठीण बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यात ते गंभीर जखमी झाले.

दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने त्यांची विचारपूस केली त्यानंतर काळे घराकडे परत आले. त्याने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला मारहाणीनंतर झालेल्या जखमा पाहून कुटुंबीय भयभीत झाले. त्यानंतर सायंकाळी कुटुंबीय व अन्य नातेवाईक ठाण्यात गेले. मारहाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली ठाणे प्रमुखाने काळे यांच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काळे यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या आज पुन्हा किंमती वाढल्या, आपल्या शहराचे दर तपासा

नवी दिल्ली |. पेट्रोल डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या. पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ करण्यात आली आहे. राजधानीत पेट्रोलचे दर आज प्रतिलिटर 100 रुपये ओलांडून 100.21 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर 89.53 रुपये झाला आहे.

4 मेपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. सन 2021 मध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये आतापर्यंत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीसह, देशातील 10 पेक्षा जास्त राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू आणि लडाख या 11 राज्यांच्या यादीत आहेत. देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या गंगानगरमध्ये उपलब्ध आहे. आता दिल्लीचे नावही या लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहे.

.यावर्षी किंमतींमध्ये 15% वाढ झाली आहे
सन 2021 मध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये आतापर्यंत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये जेव्हा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान किंमतींमध्ये स्थिरता होती. तेव्हापासून तेथे सतत वाढते आहे. एका वर्षात पेट्रोलच्या दरात 19.43 रुपयांनी वाढ झाली आहे.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 100.21 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.53 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 106.27 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.08 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 101.1 रुपये तर डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 100.19 रुपये आणि डिझेल 92.44 रुपये प्रति लिटर आहे.

>> जयपुर मधील पेट्रोल 106.99 रुपये आणि डिझेल 98.64 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

बाधितांमध्ये वाढ : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 170 बाधित तर 26 जणांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात 1 हजार 170 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 451 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 493 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 99 हजार 488 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 85 हजार 820 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 494 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 26 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. मात्र, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच तोटा सहन करावा लागत आहे. अशात आता कुठे नियमांमध्ये शिथिलता होती. ती सुद्धा काढून घेतली जात असल्याने याबाबत व्यापाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यासह कराड तालुक्यातील व्यापारीही आक्रमक झाले असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. जिल्ह्यात मध्यन्तरीच्या काळात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील र्निबंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.

प्रेमाविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाला विवस्त्र करून बेदम मारहाण

Crime

औरंगाबाद | जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा येथे गावातल्या मुलीसोबत प्रेमाविवाह केल्यामुळे एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खुलताबाद तालुक्यात एनसी दाखल करण्यात आली आहे.

किशोर साहेबराव चव्हाण असे त्या तरुणाचे नाव आहे. सहा महिन्यापूर्वी किशोर साहेबराव चव्हाण यांनी गावातील एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तो गाव सोडून कन्नड येथे राहत होता. 2 जुलै रोजी आईला भेटण्यासाठी तो गावात आला होता. त्यावेळेस गावातील मुलीच्या नातेवाईकांनी त्याला पकडून विवस्त्र केले आणि बेदम मारहाण केली. त्यात तो प्रचंड जखमी झाला आहे. मारहाणी नंतर मरणासन्न अवस्थेत त्याला गावाच्या बाहेर टाकून देण्यात आले.

मुलाच्या नातेवाईकांना घडलेला प्रकार समजताच त्यांनी त्याला खुलताबादला उपचारासाठी दाखल केले.नग्न करून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. उपचारानंतर तो परत कन्नड येथे गेला. विवस्त्र करून मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी अद्याप खुलताबाद पोलिसांनी कोणत्याही आरोपीवर कारवाई केलेली नाही.

मराठवाड्यात गेल्या 24 तासात 295 नवीन रुग्णांची भर

corona test

औरंगाबाद | जिल्ह्यात 43 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील 11 रुग्ण आहेत. आणि एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर मराठवाड्यात 24 तासाच्या आत 295 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यातील 132 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 75 रुग्णांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही केवळ एकच रुग्ण आढळला आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण आढळले असून सध्या 67 रुग्णांवर उपचार सुरू असून, एका कोरोना बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे.

लातूर जिल्ह्यात उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या दोन हजार 405 वर आली असून कोरोनाचे नवे 14 रुग्ण आढळले आहे. परभणी जिल्ह्यात दहा नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात एकही मृत्यू झाला नसून 36 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यात 11नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 20 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून उस्मानाबाद जिल्ह्यात 75 नवीन रुग्णांची भर पडली असून दिवसभरात कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला तर एक रुग्ण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. या जिल्ह्यातही मृत्यूची नोंद नाही.

कुख्यात गुन्हेगाराच्या घरातून सहा तलवारीसह घातक हत्यारे जप्त; गरमपाणी भागात गुन्हेशाखेची कारवाई

Stock of swords confiscated
Sword thift

औरंंगाबाद | गरमपाणी भागात कुख्यात गुन्हेगाराच्या घरावर छापा मारून गुन्हेशाखा पोलिसांनी सहा तलवारी, एक गुप्ती, एक कुकरी असा शस्त्रसाठा जप्त केला. शेख इर्शाद उर्फ ईशु शेख सईद (२५,रा.गरमपाणी, मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर शेख जाकेर शेख समशोद्दीन (वय २४) असे फरार आरोपीचे नाव आहे.

गरमपाणी भागात कुख्यात गुन्हेगार शेख इर्शाद उर्फ ईशु याच्या घरात अवैधरित्या शस्त्रांचा साठा असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाने शेख इर्शाद उर्फ इशु याला सोमवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकासमोरून ताब्यात घेवून चौकशी केली असता तो सुरूवातील उडवा-उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने शस्त्रसाठा आपला मित्र शेख जाकेर याच्या घरात ठवेला असल्याची कबूली दिली. गुन्हेशाखा पोलिसांनी शेख जाकेर याच्या घरावर छापा मारला असता शेख जाकेर मिळून आला नाही. पोलिसांनी शेख जाकेर याच्या वडीलांच्या समक्ष घराची झडती घेतली असता स्वयंपाक घरातील पोटमाळ्यावर एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत सहा तलवारी, एक गुप्ती आणि एक कुकरी पोलिसांना मिळून आली. याप्रकरणी कुख्यात शेख इर्शाद उर्फ इशु व त्याचा साथीदार शेख जाकेर याच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन तलवारी मागविणारे आणखी चौघे गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशेद सालमीन दिप (वय २२), शेख आरबाज शेख शेरु (वय २१), मोहम्मद फरदीन मोईन बागवान (वय १९, तिघे रा. इंदिरानगर बायजीपुरा) आणि फैजान हारुण कुरेशी (वय २०, रा. चिकलठाणा) अशी अटकेतील ऑनलाईन तलवारी आणि गुप्ती मागविणाऱ्यांची नावे आहेत. या अगोदर कुरिअरने तलवारी मगवणाऱ्या आरोपीविरोधात सापळा रचत पुंडलिकनगर आणि जिन्सी पोलिसांनी संयुक्त कारवाई करित ईरफान ऊर्फ दानिश खान याला अटक करुन त्याच्या ताब्यातून ४१ तलवारी, सहा कुकरी, दोन गुप्त्या जप्त केल्या होत्या. पोलीस कोठडी दरम्यान इरफान खान उर्फ दानिश खान याने चौघा आरोपींसह अबुजर खान जफर खान (रा. जाली दर्गा) आणि सय्यद मुजाहेद ऊर्फ मुज्जू सय्यद हबीब (रा. किराडपुरा) यांना तलवारी व गुप्ती विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी वरील चौघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून चार तलवारी व एक गुप्ती जप्त केली.

Realme च्या या फोनवर मिळतोय तब्बल 17000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या बंपर ऑफर

Smartphone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अनेक ऑफर्स सुरु आहेत. या ऑफर्समध्ये अत्यंत महागडा फोनसुद्धा अतिशय स्वस्तात मिळतो. सध्या फ्लिपकार्टवर रियलमी डेज सेल सुरू आहे. ज्यामध्ये रियलमीच्या अनेक फोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये Realme X50 Pro 5G या फोनवर तब्बल 17 हजारांचा डिस्काउंट देण्यात येत आहे.

किंमत
Realme X50 Pro 5G स्मार्टफोनवर 17000 चा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. हा फोन SBIच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास त्यावर 10 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. Realme X50 Pro 5G फोन तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

१) 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.

२) 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे.

३) टॉप मॉडल 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. हे टॉप वेरिएंट Flipkart वर उपलब्ध आहे.

Realme X50 Pro 5G स्पेसिफिकेशन्स
– 6.44 इंची ड्यूल पंच-होल डिस्प्ले

– 90Hz रिफ्रेश रेट

– डिस्प्ले आणि बॅक पॅनलसाठी 3D AG मल्टीलेयर ग्लास प्रोटेक्शन

– क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर

– अँड्रॉईड 10 बेस्ड Realme UI 1.0

– हाय एफिशिएन्सी VC लिक्विड कूलिंग टेक्नोलॉजी

– 4,300mAh ड्यूल सेल बॅटरी

– 65W सुपरडार्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट

कॅमेरा
फोटोसाठी या फोनला रियलमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यात 64 मेगापिक्सल, 12 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि एक ब्लॅक अँड व्हाईट लेन्स देण्यात आली आहे.तर सेल्फीसाठी ड्यूल पंच होल वाईड अँगल कॅमेराचा वापर केला आहे. सेल्फीसाठी 32MP आणि 8MP अशा लेन्स देण्यात आल्या आहेत.