Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 3914

इंग्लंडच्या क्रिकेट संघातील 7 सदस्यांना कोरोनाची लागण

england cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान विरोधातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील तब्बल 7 सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये तीन खेळाडू व व्यवस्थापकीय टीममधील चार सदस्यांचा समावेश आहे.

इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांना लंडन सरकारच्या नियमानुसार विलगिकरणात जावे लागणार आहे. इतर सदस्यही विलगिकरणात असणार आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 8 जुलैपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. 8 जुलैला पहिला एकदिवसीय सामन्यानंतर 10 जुलैला दुसरा आणि 13 जुलैला तिसरा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर टी-20 मालिका 16 जुलैपासून सुरु होणार आहे. 16 जुलै,  18 जुलै आणि 20 जुलैला टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

एटीएम तोडून रक्कम चोरीचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : एटीएमचे लोक तोडून आतील रक्कम चोरी करण्याची घटएटीएम तोडून रक्कम चोरीचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यातना बजाज नगर येथे रविवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

बजाजनगर येथील मार महाराणा प्रताप चौकात ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मध्ये प्रवेश करून एटीएमचे लॉक तोडून त्यातील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी बाबासाहेब रुस्तुमराव झुंबड, वय 23, (रा. वाघरुळ दाभाडी, ता. बदनापूर, जि. जालना ) यास ताब्यात घेतले.

याप्रकरणी ॲक्सिस बँकेचे सल्लागार शेख गुफरान काशीद यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात बाबासाहेब झुंबड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरुद्ध ३० कोटींचा भूखंड हडपल्याचा आरोप; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची जमीन सिटी सर्वे नंबर 10/26 हि जमीन रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्त गोर्डे यांनी केला आहे. या विषयी त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले कि, रोहियो मंत्री भुमरे यांनी 30 कोटीच्या जमिनीचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी त्या जमिनीचा बेकायदेशीररित्या इतर अधिकार धारक कडून नोटरी आधारे त्यांचा मुलगा विलास भुमरे 99 वर्षाचा करार नामा करून घेतला. त्यांनतर मंत्री पदाचा गैर वापर करत ती जमीन घरकुल योजनेत आणून त्यांच्या नातेवाईकांचे नवे त्या घरकुल यादीत टाकले आणि हि सर्व करत असताना त्यांना फक्त ती जमीन हडप करायची होती. सध्या ही त्या जमिनीवर मंत्री भुमरे आणि माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांचाही या जमीन घोटाळ्यात हस्तक्षेप आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष दत्त गोर्डे यांनी केला.

दरम्यान, गोर्डे यांनी जिल्हाधिकारी यांना गेल्या महिनाभरापूर्वी या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यावर अद्यापही काही कारवाई झाली नाही असे गोर्डे म्हणले. त्यांनी काल पोलीस अधीक्षक लाच लुचपत विभाग औरंगाबाद, यांना कलम 13 नुसार मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही मेलद्वारे कळविले आहे. असे गोर्डे सांगतात.

ही तर आणीबाणी; मार्शलच्या कारवाई नंतर फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने भाजपचे 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

आज १२ वाजता प्रतिविधानसभेत मी बोलणार म्हणून मार्शलना पाठवून आम्हाला हटवण्यात आले. मात्र आमचा आवाक कुणीही बंद करू शकत नाही. सरकारला लोकशाहीची चाड नाही. मात्र आम्ही लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही विरोधात आवाज उठवत राहू. हे सरकारच सर्वच बाबतीती अपयशी ठरले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

सरकारने मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार अस म्हणत माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस यांनी म्हंटल.

वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

बनोटी : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या तरुणीचा १ वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तिने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव स्वर्णा अंबादास जाधव असे आहे. तिचे वर्षभरापूर्वी किन्ही येथील रहिवासी असणाऱ्या अंबादास जाधव या वकिलाशी लग्न झाले होते. सोमवारी सकाळी पती वकील अंबादास जाधव सोयगाव येथील न्यायालयात गेल्यानंतर काही वेळाने घरातील अन्य सदस्य देखील शेतात गेले. यानंतर घरी कोणी नसताना स्वर्णा यांनी घरातील छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेतला.

यानंतर दुपारच्या वेळी स्वर्णा यांचा पुतण्या गौरव घरी आला. तेव्हा स्वर्णा यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्याने आरडाओरड केली. तेव्हा गल्लीतील काहीजणांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यानी पंचनामा केला. मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर स्वर्णा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. स्वर्णा यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नसल्यामुळे आत्महत्येचे नेमके काय कारण आहे हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते पण त्यांच्या हातातच बॉम्ब फुटला; राऊतांची जोरदार टोलेबाजी

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी करत भाजपवर निशाणा साधला

संजय राऊत म्हणाले, काल सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. वेगळ्या प्रकारे कोंडी करणार होते. पण मराठीत एक म्हण आहे. केले तुका झाले माका, अशी कोकणात म्हण आहे. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. त्यांच्या हातात बॉम्ब होता. बरं का. पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला.

तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. विधानसभेच्या इतिहासात अशा प्रकारचं वर्तन झालं नव्हतं असं ते म्हणाले. कालच सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितलं की, आमदार-खासदारांचं सभागृहातील अशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये असेही राऊतांनी म्हंटल.

मराठवाड्यातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशनचे औरंगाबादेत उद्घाटन

Avenger Bike

औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढणाऱ्या इंधनाच्या किमतीमुळे भारतीय बाजारात इलेक्ट्रॉनिक वाहकांनी मागणी वाढवली आहे. मराठवाड्यातील पार्श्वभूमीवर पहिल्या इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशन औरंगाबादेतील चिखलठाणा येथील दक्षता पेट्रोल पंप येथे स्थापन झाले आहे.

रविवारी या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स आणि टाटा पॉवरचे अधिकारी तसेच एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर व स्टेट हेड अनिर्बन घोष यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर कामानिमित्त वाहनावर फिरणाऱ्या ग्राहकांना या टीव्ही चार्जिंग स्टेशनमुळे दिलासा मिळाला आहे.

पशु बटन स्टार्ट, चोरी विरोधी प्रणाली, रिमोट की, एलईडी डायलींग सिस्टम, सॉफ्ट सस्पेशन, डिक्स ब्रेक सारख्या फीचर्सने सुसज्ज अशा सुविधांमुळे इलेक्ट्रॉनिक वाहकांनी मागणी वाढली आहे.

शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षास पोलिसाकडून मारहाण प्रकरण; होणार गुन्हा दाखल

Aandolan

परभणी : हॅलो महाराष्ट्र – (गजानन घुंबरे) – शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षास केलेल्या मारहाणी प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेने दैठणा पोलीस स्टेशनला कुलूप ठोको आंदोलनाला यश आले असून दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष गजानन देशमुख यांनी दिली आहे.शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष माधवराव शिंदे यांना मागील महीण्यात विनाकारण शिवीगाळ करत पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी बळीराम मुंडे यांच्यावर कारवाई न केल्यामुळे ५ जुलै रोजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, शेतकरी संघटना कार्य अध्यक्ष ललित बहाळे, शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी यांच्या नेतृत्वात परभणी तालुक्यातील दैठणा पोलीस स्टेशनला कुलुप ठोको आंदोलन करण्यात आले . याठिकाणी पोलीस अधिकारी काकडे तसेच गंगाखेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मध्यस्थीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंद करून निलंबनाची कारवाई लवकरच करण्यात येईल असे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना दिले असता हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान आंदोलनस्थळी येणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी अटक करण्यात आली होती . त्यांना मुक्त करेपर्यंत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परभणी गंगाखेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले .अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका केल्यानंतर पोलीस बळीराम मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, धुळे, बुलढाणा, जालना, हिंगोली, अकोला, लातूर, नांदेड बीड,औरंगाबाद आदी जिल्हांसह परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

रशियामधील पॅसेंजर विमानाचा ATC शी संपर्क तुटला, विमानात आहेत 28 प्रवासी

मॉस्को । एक रशियन विमान बेपत्ता झाले आहे. त्यात 28 प्रवासी होते. मंगळवारी प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एकाधिक अहवालात असे सांगितले गेले की, हे विमान सुदूर पूर्व भागातील कामचटका कामचटका बेपत्ता झाले. TASS ने एका वेगळ्या सूत्राच्या हवाल्याने असे सांगितले की, AN -26 विमानाचा लँड करण्याचा प्रयत्न करीत असताना Air Traffic Control शी संपर्क तुटला.

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इंटरफेक्स आणि आरआयए नोव्होस्ती एजन्सींनी आपत्कालीन मंत्रालयाचा हवाला देत सांगितले की, विमानाचा संपर्क तुटला असताना कामचटका प्रायद्वीपातील पेट्रोपाव्लोव्हस्क-कामचस्की ते पलानाकडे उड्डाण करत होते. AFP ने सांगितले की, विमानात बसलेल्या 28 जणांमध्ये सहा चालक दल सदस्य असून 22 प्रवाशांमध्ये एक किंवा दोन लहान मुलं होती. एजन्सीने सांगितले की, या विमानाचा शोध सुरू करण्यात आला असून बचाव कर्मचारी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत.

एकेकाळी विमानाशी संबंधित अपघातांसाठी ओळखल्या जाणार्‍या रशियाने गेल्या काही वर्षांत आपल्या हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेमध्ये विक्रमी सुधारणा केल्या आहेत. तथापि, विमानांची कमकुवत देखभाल आणि सुरक्षिततेचे निम्न स्तर अद्याप कायम आहेत. याशिवाय, हवामानाच्या कठीण परिस्थितीसह देशाच्या विविध भागात उड्डाण करणे देखील खूप धोकादायक आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कायद्यात बदल करणे आवश्यकच : बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटच्या दिवसाला सुरवात झाली. कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी सभागृहात 3 विधेयके सादर केली. त्यांच्यानंतर शेतकरी विधेयकाबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही सभागृहातील चर्चेत सहभाग घेतला. “एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळाला नाही तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला दंड केला पाहिजे. याबाबत कायद्यात तरतूदही केली पाहिजे. सात दिवसात शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे. सात सात महिने शेतकरी आंदोलन करतात. ते दडपण्याचा काम केले जाते. हे थांबवून या कायद्यात बदल करून शेतकरी हित करण्याच्या दृष्टीने नवीन सुधारित कायदा मांडत आहोत, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मांडले.

पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसराही दिवस वादळी ठरला आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने तयार केलेल्या सुधारित शेतकरी विधेयक, कायद्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्राच्या कृषी कायद्याला राज्य सरकारकडून आव्हान देण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले कि, केंद्राने मध्यन्तरी शेतीसाठी काही कायदे केले. याविरोधात दिल्लीत व राज्यात शेतकऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. शेतकऱ्यांनी त्यांची फसवणूक केली तर व्यापारी पळून गेला कि त्याच्यावर कारवाई काय करायची त्याबाबत केंद्राच्या कायद्यात असे सूचित करण्यात आले कि, शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे व्यापाऱ्यांच्या तक्रारीसाठी जावे. मात्र, यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळाला नाही तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला दंड केला पाहिजे. याबाबत कायद्यात तरतूदही केली पाहिजे. सात दिवसात शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे.

१९६३ सालापासून शेतकऱ्याच्या जीवनात मार्केट कमिटीमार्फत बदल घडला आहे. त्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. त्या त्या ठिकाणी गाळे देऊन त्यांचे संरक्षण करत आहोत. शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात आली. शेतकरी वेधेयकाकबात देशात असंतोष आहे. कायदा करत असताना शेतकरी हिताचा करणे कर्जेचे आहे. सात सात महिने शेतकरी आंदोलन करतात. ते दडपण्याचा काम केले जाते. हे थांबवून या कायद्यात बदल करून शेतकरी हित करसाच्या दृष्टीने नवीन सुधारित कायदा मांडत आहोत, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मांडले.