Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5055

ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत म्हणजे भारताविरुद्ध मत ; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपाने दक्षिणेतील राज्यांकडे आपलं लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे. तेलंगणात सध्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचार सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (AIMIM leader Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत म्हणजे भारताविरुद्ध मत आहे अशी टीका त्यांनी केली.

“ओवेसी बंधू कधीच जुन्या हैदराबादचा विकास करणार नाही. ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारं प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणार मत असेल. असदुद्दीने ओवेसी हे विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी करतात याच गोष्टी मोहम्मद अली जिन्नाही करायचे,” अशा शब्दांमध्ये सुर्या यांनी ओवेसी बंधुंवर निशाणा साधला.

 

“असदुद्दीन ओवैसी हे मोहम्मद अली जिना यांचे अवतार आहेत” असं म्हणत तेजस्वी सूर्या यांनी ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. ओवैसींना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं असा घणाघात देखील केला आहे. “ही फक्त एक महानगरपालिका निवडणूक नाही, जर तुम्ही ओवैसी यांना मतं दिली तर ते महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेशांत मजबूत होतात” असं म्हटलं आहे. हैदराबादमध्ये प्रचार करताना तेजस्वी सूर्या यांनी असं म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसामचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगई (Tarun Gogoi) यांचे गुवाहाटी येथे आज उपचारांदरम्यान निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. त्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तरुण गोगोई यांनी आसाममध्ये सलग तीन टर्म मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते. काँग्रेसमध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य पातळीवर महत्वाच्या पदांवर काम केले होते.

गोगई यांच्या निधनाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी माहिती दिली. आज सकाळी गोगई यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपला नियोजित कार्यक्रम रद्द दिब्रुगढ येथून ते गुवाहाटी येथे निघाले होते. तरुण गोगोई हे 25 ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर GMCH रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे वयाच्या 84 व्यावर्षी निधन झाले. आसामध्ये ते 2001 ते 2016 पर्यंत सत्तेत होते. सलग तीन टर्म सत्तेत असणाऱ्या गोगोई यांची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांपेक्षा जास्त होती. तरुण गोगोई यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तरुण गोगोई यांना श्रद्धांजली

तरुण गोगोई हे लोकप्रिय नेते आणि कुशल प्रशासक होते. केंद्र आणि आसामच्या राज्य सरकारमध्ये त्यांना कामकाजाचा अनुभव होता. गोगोई यांच्या कुटुंबीयांसोबत दुख:द प्रसंगी असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी तरुण गोगोई यांना आंदरांजली वाहिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले ; शिवसेनेचा भाजपला टोला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा करावा अशी मागणी करत विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लव्ह जिहाद कायद्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने भाजपचे पुढारी शिवसेनेवर हिंदुत्वविरोधी अशी टीका करत आहेत. यावर आता शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्राद्वारे उत्तर दिले आहे. शिवसेनेने भाजपला लव्ह जिहादबाबत बिहारमध्ये कायदा करण्याचा सल्ला दिला आहे. त्या कायद्यातील मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. त्यानंतर आम्ही पाहू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे! असे सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

काय म्हंटल आहे सामना अग्रलेखामध्ये-

अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, आधी लव्ह जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली व देशाने स्वीकारली असे होणार नाही. बिहारात भाजपचे राज्य आहे व नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधी कायदा भाजप करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या! काय हो, महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनो, हे बरोबर आहे ना? ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!

हिंदू मुलींना मुसलमान तरुण फूस लावून पळवून नेतात. त्यांचे धर्मांतरण करून निकाह लावतात. हा हिंदुत्वावर आघात आहे. त्यास ‘लव्ह जिहाद’ असे नाव देण्यात आले. पाकिस्तान, चीनची घुसखोरी, रोज होणारे जवानांचे बलिदान, कोरोनाचे दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे उसळलेले संकट, त्यातून निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट हे प्रश्न तसे गंभीर नसून ‘लव्ह जिहाद’ हेच देशासमोरचे सगळ्यात भयंकर संकट आहे व महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्यांप्रमाणे ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजप पुढाऱ्यांनी केली आहे.

भाजपने ‘लव्ह जिहाद’ची जी व्याख्या ठरवली आहे त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी व किती घडली आहेत, ते समोर आणावे, पण उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल, असे सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

लव्ह जिहादचे प्रकार कुठे सुरू असतील तर ते पाकिस्तान आणि बांगलादेशात. पाकिस्तानातील हिंदू समाजातील महिला, मुली अत्यंत असुरक्षित जिणे जगत आहेत. त्यांना पळवून नेले जाते. त्यांचेही जबरदस्तीने धर्मांतरण करून निकाह लावले जातात. विरोध करणाऱ्या मुलींना ठार केले जाते. त्याच दहशतीखाली अनेक हिंदू कुटुंबे पाकिस्तानातून पळून हिंदुस्थानात आश्रयास आली आहेत. बांगलादेशातही वेगळे काही सुरू नाही. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात शस्त्र उचलण्याची गरज तेथे आहे. अर्थात त्या परक्या प्रदेशात जाऊन भाजप किंवा संघ परिवारास आंदोलन वगैरे करता येणार नाही. पण केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी पाकिस्तान, बांगलादेश सरकारला दम नक्कीच भरता येईल. एखादा सर्जिकल स्ट्राइकही करता येईल.

लव्ह जिहाद हा विषय शिवरायांच्या महाराष्ट्रात रुजू शकत नाही. दुसरे असे की, येथे शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. पण आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धार्मिक उन्माद व त्यावर तरारलेले राजकारण नाही.एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे! असे सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

शांत झोप लागण्यासाठी करा जायफळचा वापर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जायफळ हे फळ हे अनेक पोषक तत्वांनी बनलेले फळ आहे. आपल्या संस्कृतीत अनेक प्रकारचे फळे आणि मसाल्याचे पदार्थ हे सहज रित्या उपलब्ध होत असतात. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. अनके पदार्थांचा गोडवा आणि त्याच्यातील स्वादिष्ट पणा हा फक्त आणि फक्त भारतीय मसाल्यांमध्ये आहे. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. लहान बाळांना जर झोप येत नसेल तर पूर्वीच्या काळी जायफळ याचा वापर हा झोपेसाठी सुद्धा केला जात होता.

जायफळाचे फायदे —

— जायफळात आढळणारे घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच तुम्ही शांत व दीर्घकाळ झोपता.

—- जायफळाची चिमूटभर पावडर चमचाभर मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किमान 15 मिनिटे आधी घ्यावे. मधात हे ‘5’ पदार्थ मिसळा आणि तुमचे वजन घटवा

— जायफळाचा काढा तयार करा.

जायफळाची पूड करून कपभर पाण्यात मिसळून उकळा. उकळ आल्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या. रात्रीच्या जेवणानंतर हा चहा तुम्हांला आरामदायी झोप येण्यासाठी हा चहा नक्कीच मदत करेल.

— जायफळयुक्त दूध :

रात्री झोपण्यापूर्वी तुम्हांला दूध पिण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर जायफळ मिसळा. दुधामुळे सेरोटोनीन आणि मेलाटोनीनचे प्रमाण वाढते. या दोन्हींमुळे तुम्हांला आरामदायी झोप मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुधात जायफळ पूड घालून पिणे फायद्याचे आहे.

— जायफळ आणि आवळ्याचा रस :

ग्लासभर आवळ्याच्या रसामध्ये चिमूटभर जायफळ पूड मिसळल्यास पचन सुधारते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आरामदायी झोप येण्यास मदत होते.

— जेवणात जायफळ :

रात्री झोपण्यापूर्वी चहा,कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यात आवर्जून जायफळ पूड मिसळा. तसेच रात्रीच्या जेवणात सूप, कढी किंवा दह्याचा समावेश करत असल्यास त्यात जायफळाची पूड जरूर मिसळा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

PVR चे मालक अजय बिजली यांचा ‘प्रिया व्हिलेज रोड शो’ पासून ते आतापर्यंतचा संपूर्ण प्रवासाविषयी सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्ली । हाय-फाय लोक देशभरातील पीव्हीआर मल्टिप्लेक्स सिनेमामध्ये चित्रपट पाहण्यासाठी जातात, परंतु पीव्हीआरच्या इतिहासाची माहिती असणारे खूपच कमी लोकं आहेत. कदाचित त्यांना माहित नसेल की, पीव्हीआर चे पूर्ण आणि जुने नाव काय आहे. हे केव्हा सुरू झाले आणि त्यामागील प्रमुख कारण काय आहे हे देखील त्यांना माहिती नाही. पीव्हीआर मालकाचा स्वतःचा एक मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता, परंतु असे काय कारण होते की त्यांना ट्रान्सपोर्ट व्यवसायातून सिनेमाच्या व्यवसायात यावे लागले. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात.

पीव्हीआरच्या मालकाला काहीतरी वेगळे करायचे होते
पीव्हीआरचे संस्थापक आणि मालक अजय बिजली यांनी वयाच्या 22 व्या वर्षापासून वडिलांना ट्रान्सपोर्ट व्यवसायात (अमृतसर ट्रान्सपोर्ट कंपनी -1988) मदत करण्यास सुरवात केली, परंतु अजय बिजली वडिलांच्या व्यवसायापेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते. अजयच्या वडिलांचा प्रिया नावाचे थिएटर देखील होते. सुरवातीला अजय यांनी ट्रान्सपोर्ट ऐवजी सिनेमा व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. प्रिया सिनेमाची सुरूवात 1978 मध्ये झाली होती, पण विरोधकांमुळे सिनेमाचा व्यवसाय फारसा होऊ शकला नाही.

हॉलिवूड चित्रपटांचा ट्रेंड
‘प्रिया व्हिलेज रोड शो’ चे खरे नाव ‘प्रिया लव्ह विकास सिनेमा’ होते ज्याला आता पीव्हीआर म्हणून ओळखले जाते. 1992 मध्ये अजय यांच्या वडिलांच्या निधनानंतर दोन्ही व्यवसायाचा बोझा त्याच्या डोक्यावर आला. आपल्या समजूतदारपणाने ट्रान्सपोर्ट ऐवजी सिनेमाचा व्यवसाय करणे योग्य असल्याचे अजयला वाटले. अजयने सिनेमाच्या मार्केट मध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी हॉलिवूड चित्रपट दाखवायला सुरवात केली. सिनेमाला डॉल्बीच्या जबरदस्त आवाजाने सुसज्ज केले. त्याच वेळी, एका हॉलिवूड चित्रपटाच्या एका डिस्ट्रीब्यूटरने अजय यांना भारतात आपले नेटवर्क विस्तृत करण्यास सांगितले.

दिल्लीचा पॉश एरिया निवडला
एका मुलाखतीत अजय बिजली म्हणाले की, “मी फारसा अभ्यास केलेला नाही, परंतु कॉमन सेन्सने मला पुढे ढकलले आणि मी माझ्या सिनेमात दिल्लीच्या आरके पुरम, वसंत विहार आणि सोम विहारसारख्या पॉश भागात हॉलीवूड चित्रपट दाखविणे सुरू केले. अजयला वेस्टर्न स्टाईलचा मल्टिप्लेक्स देशात आणायचा होता पण तज्ञांच्या अभावामुळे ते हे करू शकले नाहीत. त्याच वेळी, हॉलिवूड चित्रपटांच्या डिस्ट्रीब्यूटरने अजयला ऑस्ट्रेलियामध्ये पीव्हीआर वाढविण्यास सांगितले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे चित्रपट डिस्ट्रीब्यूटरने देखील भारतात आपले जाळे विस्तृत करण्यास उत्सुक होते.

4 स्क्रीन असलेलं मल्टिप्लेक्स सुरु केले
यावेळी अजयने ‘व्हिलेज रोड शो’ चे मॅनेजिंग डायरेक्टर जॉन क्रॉफर्ड यांची भेट घेतली. या भागीदारीनंतर प्रिया लव्ह विकास सिनेमाचे नाव इथून ‘प्रिया विलास रोडशो’ असे ठेवले गेले. त्याच वेळी पीव्हीआरने दिल्लीच्या साकेत येथील अनुपमा सिनेमा येथे लीजवर चार-स्क्रीन मल्टिप्लेक्स उघडला, ज्याला ‘प्रिया व्हिलेज रोड शो अनुपमा -4’ असे नाव देण्यात आले. अजयने सांगितले की, आम्ही जेव्हा 4 स्क्रीन मल्टिप्लेक्स लाँच केला तेव्हा सिनेमा गृहाबाहेर प्रेक्षकांची लांबलचक लाईन होती. आम्ही त्यावेळी एक दिवसात 24 चित्रपट दाखवत होतो.

जेव्हीबरोबर पीव्हीआरची तुटलेली भागीदारी
त्यानंतर अजयने दिल्लीत पीव्हीआरचा विस्तार सुरूच ठेवला आणि पीव्हीआर विकासपुरी आणि पीव्हीआर नरैना शाखा उघडल्या. त्याच वेळी 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता, त्यानंतर पीव्हीआर आणि जेव्ही वेगवेगळे झाले. परंतु जेव्हीने पीव्हीआरबरोबर 50-स्क्रीनच्या प्रोजेक्टमध्ये 100 कोटी रुपयांचा करार केला पण नंतर अजयने या प्रोजेक्टवर त्याचा मित्र भारती मित्तलचा मालक सुनील मित्तल याच्याशी चर्चा केली.

पैशांची कमतरता भागवण्यासाठी अजयने आपली वैयक्तिक मालमत्ताही विकली. जरी ही वेळ अजयसाठी खूप कठीण होती परंतु येथून पीव्हीआरला त्यांच्या नावाने भारतात एक नवीन ओळख मिळाली. आज भारतातील 71 शहरांमध्ये पीव्हीआरच्या 845 स्क्रीनवर चित्रपट दाखविले जातात. हा भारतातील सर्वात मोठा मल्टिप्लेक्स थिएटर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘ही’ अभिनेत्रीला ठरली ‘क्रश ऑफ द इयर’; गुगलवर भारतीयांनी सगळ्यात जास्त केलं सर्च

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे.

आता रश्मिका आणि तिच्या चाहत्यांना गुगलनं मोठा सुखद धक्का दिला आहे.

Rashmika Mandanna To Turn Producer And Is Looking For A Director?

चक्क सर्च इंजिन गुगलनं तिला ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020 फिमेल’ घोषित केलं आहे.

South siren Rashmika Mandanna rejected Shahid's Jersey remake for this  reason - OrissaPOST

आता गुगलवर नॅशनल क्रश सर्च केल्यानंतर रश्मिकाचं नाव समोर येतं. सोबतच रश्मिका आता ट्विटरवरसुद्धा ट्रेन्डमध्ये आहे.

Here's what really happened before Rashmika Mandanna was accused of making  anti-Kannada comments

24 वर्षीय रश्मिका दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. रश्मिकानं कन्नड, तमिळ आणि तेलगु चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.

तिला खरी ओळख ‘गीता गोविंदम’ या चित्रपटातून मिळाली.

Geetha Govindam Wallpapers posted by Ryan Anderson

रश्मिकानं 2016 मध्ये ‘किरीक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील अभिनयासाठी तिचं फार कौतुक झालं होतं.

Rashmika Mandanna Feels That A-list Heroes Might Not Work With Her Again  Due To Link-up Rumours - Filmibeat

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

सोन्या-चांदीचे नवे दर आज रिलीज झाले, प्रति 10 ग्रॅम सोन्याची आजची किंमत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कॅनडासह जगातील बर्‍याच भागांत वाढती आर्थिक चिंता आणि लॉकडाऊनमुळे सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तथापि, ही भरभराट फारशी नव्हती. दुसरीकडे चांदीच्या किंमती आज घसरल्या आहेत. जागतिक बाजारपेठांमध्ये कमी व्यवसायाची नोंद आहे.

आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दराबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, आर्थिक अनिश्चितता पुन्हा एकदा वाढताना दिसून येते. त्याचबरोबर कॅनडासह जगाच्या बर्‍याच भागात कोरोना विषाणूमुळे लॉकडाउनचा नवा टप्पा सुरू झाला आहे.

सोन्याचे नवीन दर
राजधानी दिल्लीत आज प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव 57 रुपयांनी वाढून 49,767 रुपयांवर गेले. याआधी शुक्रवारी एका दिवसाच्या व्यापारानंतर तो 49,710 वर बंद झाला. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,874 डॉलर झाली.

चांदीचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 185 रुपयांनी कमी होऊन 61,351 रुपये प्रति किलो झाली. याआधी, चांदीचा दर मागील व्यापार सत्रात 61,536 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात, प्रति औंस किंमत 24.22 डॉलर होती.

सोन्याच्या किंमती आणखी खाली येतील अशी अपेक्षा आहे
एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख आसिफ इक्बाल यांनी न्यूज 18 हिंदीला सांगितले की, कोरोना लसीसंबंधित चांगल्या बातमीनंतर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने घट झाली आहे. ते म्हणतात की, सोन्याच्या किंमती घसरण्याचा ट्रेंड अजून दिसू शकेल. नवीन वर्षानंतर ही लस बाजारात आणली गेली तर MCX वरील सोन्याच्या किंमती 45000 रुपयांवर येऊ शकतात. अल्पावधीत सोन्याचे घसरते असे मत आहे. ते म्हणतात की, कोरोनाची लस बाजारात आली तर सोन्याची किंमत 48000 रुपयांच्या खाली जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

३ महिन्यात ठाकरे सरकार पडेल अन भाजप सरकार येईल, कसं येईल तेही सांगेल; दानवेंचा ‘वेट अँड वॉच’ इशारा

परभणी । ”येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो,” अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त ते परभणीत बोलत होते.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ ३ वेळेस भाजपकडे होता, पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला. नाहीतर हा मतदारसंघ आपल्या हातून जात नव्हता. याचा बदला या निवडणुकीत घेऊन भाजपचा उमेदवार पुन्हा निवडून आणायचा आहे. गेल्या काही वर्षात आमदाराने एकही प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. आपल्याला एकाचे पाच आणि पाचाचे पन्नास करायचे. कुटुंब नियोजन करायचं का? पक्षाचं नाही करायचं. पक्ष वाढला पाहिजे. विधानसभा लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिली निवडणूक आहे, आपल्याला यश मिळालं पाहिजे. असं सांगत कार्यकर्त्यांना बूथनिहाय पुन्हा कामं जोमाने करण्याचं आवाहन रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

कोरोना लसीबद्दल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ‘हे’ चार प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना विषाणूचा कहर झाला असून कोरोना वरील लस कधी येणार यांकडे जनतेचे लक्ष लागले आहे. त्यातच आता काँग्रेस करते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत देशाला उत्तर दिली पाहिजेत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटद्वारे नरेंद्र मोदी यांना चार प्रश्न विचारले आहेत.  कोरोनावरील लस बनवणाऱ्या कोणत्या कंपनीची निवड केली गेलीय, पहिल्यांदा लस कोणाला मिळणार, कधी मिळणार, मोफत लस मिळणार, असे प्रश्न राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना विचारले आहेत.

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना भारत सरकरानं कोरोना लस बनवणाऱ्या सर्व कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीची निवड केली आहे आणि का केली आहे? हा प्रश्न विचारला आहे.

कोरोना लस पहिल्यांदा कोणाला उपलब्ध होणार आणि कोरोना लस मिळाल्यानंतर त्याच्या वितरणाबाबत काय धोरण ठरवण्यात आले आहे? हा प्रश्नही राहुल गांधीनी विचारला आहे.

कोरोना काळात तयार केलेल्या पीएम केअरचा निधी सर्व भारतीयांना मोफत कोरोना लस देण्यासाठी वापर केला जाणार का? हा प्रश्न देखील राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. सर्व भारतीयांना कोरोना लस कधीपर्यंत दिली जाणार आहे? हा प्रश्नदेखील राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.

दरम्यान,  पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. तशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’