Thursday, December 18, 2025
Home Blog Page 5225

शेन वॉटसनची तुफानी खेळी आधीच फिक्स होती ?? पहा वॉटसनचे ते ट्विट

shane watson

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० च्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर अखेर चेन्नई सुपर किंग्सची गाडी विजयी मार्गावर परतली. चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाबचा १० विकेट्सने पराभव करत आपला दुसरा विजय नोंदवला. चेन्नईच्या या विजयात शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस शिल्पकार राहिले. या दोघांनीही नाबाद १८१ धावांची नाबाद शानदार भागीदारी रचली. यात वॉटसनने ८३ आणि डु प्लेसिसने ८७ धावांचे योगदान दिले.

वॉटसनसठी ही खेळी अधिक खास ठरली. कारण तो गेल्या चार सामन्यात सपशेल अपयशी ठरला होता. त्याचे अपयश चेन्नई संघालाही दबावात टाकत होते. पण पंजाब विरुद्ध वॉटसनने ११ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ चेंडूत नाबाद ८३ धावा करत स्वत:ला सिद्ध केले.

वॉटसनच्या या दमदार खेळीनंतर त्याचे एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट त्याने पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी केले होते. यामध्ये त्याने म्हटले होते की ‘चेन्नईसाठी परिपूर्ण खेळ लवकरच होईल!!!’ अखेर त्याने म्हटल्याप्रमाणे रविवारी त्याने परिपूर्ण अशा खेळाचे प्रदर्शन केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक; अजिय पवार आणि अनिल परब यांच्याशी आज चर्चा

मुंबई । MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालं आहे. आज उपमुख्यमंत्री अजिय पवार आणि अनिल परब मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी प्राथमिक चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याविषयावर निर्णय घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.

राज्यात एमपीएससीसाठी अडीच लाख विध्यार्थ्यांपैकी सुमारे 80 हजार विध्यार्थ्यांनी SEBC प्रवर्गातून अर्ज केला आहे. पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनी नेमकं कुठल्या प्रवर्गातून परीक्षेला बसावं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच EWS प्रवर्गातून परीक्षेला बसल्यास आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आज रात्रीपर्यंत याबाबत तोडगा निघाला नाही तर मातोश्रीबाहेर उद्या आंदोलन अटळ आहे अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतलेली आहे.

दरम्यान, अनेक मराठा तरुणांना नियुक्ती ऑर्डर मिळाली पण कामावर घेतलं जातं नाही. आरक्षण मिळेल, पण तुमच्या हातात जे आहे ते आधी करा, याला इशारा समजा किंवा विनंती, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला. नोकरीबाबत वकिलांनीही सरकारला जाब विचारावा. शिवाय 2014 ते 2020 पर्यंत नियुक्त्या का झाल्या नाहीत? त्या विरोधात याचिका दाखल करू, असा इशारा देत आरक्षणाच्या लढ्या संदर्भात कोल्हापूरने महाराष्ट्राला दिशा द्यावी, असं देखील संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Fixed Deposit द्वारे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी काय करावे लागेल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । फिक्स्ड डिपॉझिट हा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूकीचा सर्वात सोयीचा पर्याय मानला जातो. तथापि, सध्या जेव्हा आपण एफडीवरील व्याजदराबद्दल चर्चा करतो तेव्हा असे आढळते आहे की, बहुतेक गुंतवणूकदार कॉर्पोरेट किंवा कंपनी एफडीमध्ये अधिक रुची दाखवत आहेत. उच्च उत्पन्न मिळवणार्‍या गुंतवणूकदारांसाठी कंपनी एफडी एक लोकप्रिय गुंतवणूकिचा पर्याय आहे. जे जास्त परताव्यासाठी जोखीम घेण्यास सक्षम आहेत त्यांच्यासाठी हे योग्य मानले जाते. यामुळेच एफडीसाठी आवश्यक खर्च भागविण्यात मदत होते. सामान्यत: सेवानिवृत्त लोक या पर्यायाचा फायदा घेतात.

बँक / कॉर्पोरेट एफडी लॅडरिंग टेक्निक
बँक एफडी लॅडरिंग हे एक प्रकारचे टेक्निक आहे ज्यात एकाहून अधिक एफडी वेगवेगळ्या कालावधीसाठी बनविल्या जातात. लिक्वि​डिटी मॅनेज करण्याचा हा एक चांगला मार्ग मानला जातो. यासाठी तुम्हाला अल्प गुंतवणूकीसाठी एकरकमी रक्कम निश्चित करावी लागेल. यानंतर, ते वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतविले जातात.

लॅडरिंगचा लाभ आपल्याला कसा मिळेल?
समजा, तुम्हाला एकूण 7 लाख रुपये बँक किंवा कॉर्पोरेट एफडीमध्ये जमा करायचे आहेत. अशा परिस्थितीत, फक्त 7 लाख रुपयांच्या एफडीऐवजी आपण त्यास लहान एफडीमध्ये विभागून वेगवेगळ्या मॅच्युरिटीजसाठी गुंतवणूक करावी. जर आपण त्यास 1-1 लाख रुपयांच्या सात एफडीमध्ये विभागले आणि प्रत्येक एफडीत अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, आणि 7 वर्षांत गुंतवणूक केली तर दर वर्षी तुमची एफडी मॅच्युर होईल. अशा प्रकारे आपल्याकडे पुरेशी लिक्वि​डिटी उपलब्ध असेल. एफडी मॅच्युरिटीनंतर आपल्याला पैशांची आवश्यकता नसल्यास आपण पुन्हा एकदा गुंतवणूक करू शकता.

दुसऱ्यांदा गुंतवणूक करताना 5 वर्षांसाठी एफडीची गुंतवणूक करा. अशा प्रकारे आपण एफडीची साखळी तयार करण्यास सक्षम असाल, जेणेकरून आपल्याकडे योग्य वेळी पुरेसे पैसे जमा असतील आणि अशा प्रकारे आपण आपल्या लिक्वि​डिटीची आवश्यकताही पूर्ण करू शकाल. आपण आपल्या सोयीसाठी आणि भविष्यातील संभाव्य गरजेच्या आधारे हे लॅडरिंग डिझाइन करू शकता. एफडी लॅडरिंगमध्ये व्याज सरासरी आहे.

कॉर्पोरेट एफडी मध्ये सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅन
AAA रेटड कॉर्पोरेट एफडीवर बँकांना एफडीपेक्षा जवळपास 1 ते 2 टक्के अधिक व्याज मिळते. यापैकी काही एफडीवर सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅन देखील उपलब्ध आहेत. यात तुम्ही दरमहा थोडी थोडी रक्कम जमा करू शकता. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीनंतर रक्कम काढण्याचा किंवा ती वेगवेगळ्या भागात काढण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.

उदाहरणार्थ, बजाज फायनान्स एफडीवर एसडीपीची सुविधा उपलब्ध आहे, जिथे आपण 6 ते 48 डिपॉझिट्स ठेवू शकता. आपण निवडलेला कालावधी सर्व डिपॉझिट्स ना लागू होतो. या सर्व डिपॉझिट्स वर मॅच्युरिटीची तारीख बदलते. हे डिपॉझिट्स आपण निवडलेल्या मुदतीच्या आधारावर मॅच्युर होतात. अशा प्रकारे आपल्याला नियमित उत्पन्न देखील मिळू शकते.

जोखीम देखील घ्या
तथापि, आपण कॉर्पोरेट एफडीमधील जोखमीबद्दल देखील विचार केला पाहिजे. जरी AAA रेटड कंपनी एफडी उपलब्ध आहे, तरीही आपल्या भांडवलाच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही हमी नसते. बँकांमध्ये बनविलेल्या एफडीवर भांडवल संरक्षण निश्चितच उपलब्ध आहे. कॉर्पोरेट एफडीवर इनकम टॅक्स देय हा इनकम टॅक्स स्लॅबच्या आधारे लागू होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी; काँग्रेसने केलं समर्थन

मुंबई । काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवतवणुक केली. यावर महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या असून, महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे चित्र वाघ यांच्या भूमिकेला काँग्रेसने समर्थन केले आहे. गेल्या वर्षी भाजपमध्ये सामील होऊन सुद्धा त्या या आपले ‘संस्कार’ विसरल्या नसल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “महिला नेत्यांच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिंमत कशी होते? जर महिला समोर येऊन एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर कुठलेही पोलीस असेना त्यांनी आपल्या मर्यादांचं भान ठेवलं पाहिजे. भारतीय संस्कृतीत विश्वास ठेवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.”

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या भूमिकेचे महाराष्ट्र युवा काँग्रेसचे प्रमुख सत्यजित तांबे यांनी स्वागत केलं आहे. चित्र वाघ यांच्या ट्विटवर तांबे म्हणाले कि, ”चित्राताई, आपण एक महिला नेत्या म्हणून पक्षीय जोडे बाजूला ठेवून घेतलेली भूमिका स्वागतार्ह्य आहे. मात्र आपलं बोलणं निर्लज्ज योगीनाथ ऐकतील का ? हा प्रश्न मात्र आहेच. पण एक मात्र खरं, पक्ष बदला असला तरीही तुम्ही तुमचे संस्कार व विचार विसरला नाहीत ह्याचा अभिमान आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

CBIचौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर..; संजय राऊतांची भाजपावर अप्रत्यक्षरित्या टीका

मुंबई । सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याचं केल्याचा अहवाल एम्स रुग्णालयाने दिला आहे. सदर अहवाल सीबीआयकडे सोपवण्यात आलेला आहे. या अहवालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असेलल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा रिपोर्ट आहे. त्यांचे कोणताही राजकीय संबंध नाही किंवा शिवसेनशी देखील संबंध नाही.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालामध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला. त्यामुळं सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आज सोने झाले 6,000 रुपयांनी स्वस्त, दिवाळीपर्यंत किंमत किती असेल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत आहे. सोमवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX – Multi-Commodity Exchange) वर सोन्याचे वायदा 0.9 टक्क्यांनी घसरून 50,130 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तथापि, चांदीचा वायदा 0.88 टक्क्यांनी घसरून 60,605 रुपये प्रति किलो झाला. शुक्रवारी सोन्याचा दर 0.4 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता. या दिवशी चांदीच्या दरात 1.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. यावेळी चांदीचा दरही प्रति किलो 80,000 रुपयांवर पोहोचला.

जागतिक बाजारपेठेची स्थिती काय आहे?

जागतिक बाजारपेठेबद्दल बोलताना, गुंतवणूकदार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत. सोमवारी जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत 1,900 प्रति औंस स्तरावर स्थिर राहिली. पूर्वी सोन्याच्या दरावर डॉलरवर तीव्र परिणाम झाला होता. मात्र, सोमवारी झालेल्या कमकुवत डॉलरमुळे गुंतवणूकदारांना सोने खरेदी करण्यास मदत झाली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बाजारात मोठी घसरण झाली. पण, आता ते स्थिर होत आहे. आर्थिक क्रियाकार्यक्रम सुरू झाल्याने आता बाजारातही रिकव्हरी दिसून येत आहे. चलन आणि कमोडिटी बाजार (Commodity Market) मध्ये चांगला व्यवसाय होतो आहे. यामुळेच 30 सप्टेंबरपासून घरगुती सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 5,684 रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत प्रति किलो सुमारे 16,034 रुपयांनी घसरली आहे.

दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत किती असेल?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीतील घसरण म्हणजे पूर्वीच्या पातळीवर येईल असे नाही. शेअर बाजाराच्या हालचालीनुसार जर आपणास  सोन्याची किंमत दिसत असेल तर आपण चूक कराल. सध्या सोन्याचा भाव 50,000 आणि चांदीचा भाव 60,000 रुपये आहे. येत्या काळात त्यामध्ये चढ-उतार होऊ शकतात. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ किंवा घसरण होण्याची शक्यता नाही. दीपावलीवरही सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50 ते 52 हजार रुपयांच्या पातळीवर राहू शकते.

रुपयाच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीत झाली घट

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यांतील डॉलरच्या तुलनेत झालेली रुपयाची वाढ. सध्या रुपया 73 ते 74 च्या श्रेणीत आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या काळात ते 78 च्या पातळीवर पोहोचले होते. रुपयाच्या जोरदार परताव्यामुळे सोन्याचा भावही खाली आला आहे. जर डॉलर आणखी वाढला तर पिवळ्या धातूच्या किंमती दीर्घ कालावधीत अधिक वेगाने वाढतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

बिहार विधानसभा दंगल: लालूपुत्र तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

पाटणा । राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्ये प्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजदचे नेते तेजप्रताप यादव व अनिल कुमार साधू यांच्यासह ६ जणांविरोधात एफआयआरची नोंद केली आहे. राजदसाठी बिहारमध्ये विधनासभा निवडणुकीच्या हा एक मोठा झटका बसला आहे.

मलिक यांच्या कुटुंबाकडून नोंदवल्या गेलेल्या तक्रारावरून तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, अनिल कुमार साधु यांच्यासह ६ जणांविरोधात षडयंत्र रचून हत्या केल्याचा आरोप करून, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक विशाल शर्मा यांनी एफआयआर नोंदवण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांची रविवारी सकाळी हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या घालून हत्या केली. यानंतर मलिक यांच्या पत्नीने या प्रकरणी सायंकाळी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार नोंदवली. मलिक यांच्या कुटुंबीयाचा आरोप आहे की ही लोकं मलिक शक्ती मलिक यांना जीवे मारण्याची सातत्याने धमकी देत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका! निलेश राणेंचा शिवसेनेला टोला

मुंबई । सुशांत सिंग राजपूत केसमध्ये AIIMS अहवालात सुशांतने आत्महत्यांचं केल्याचं म्हटलं आहे. AIIMS डॉक्टरांच्या टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे. AIIMS च्या या अहवालानंतर सुशांत प्रकरणावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर शिवसेना निशाणा साधत आहे. दरम्यान, शिवनेनेला सुशांत प्रकरणावर सतत लक्ष करणाऱ्या निलेश राणे यांनी अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका असा टोला शिवसेनेला मारला आहे.

ट्विटर निलेश राणे म्हणाले कि, ”SSR केसच्या AIIMS अहवाला नंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.” दरम्यान निलेश राणे यांच्या टीकेनंतर शिवसेना काय उत्तर देते लक्ष यावर लागून आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येनंच झाल्याचा अहवाल AIIMSनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच महाराष्ट्राची बदनामी केली, ते आता माफी मागणार का? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘आधी तुम्ही आमचे रक्त प्यायलात, आता आम्ही तुम्हाला रक्ताचे दान देतोय, आतातरी धनगर आरक्षण द्या!’- गोपीचंद पडळकर

पंढरपूर । मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असताना धनगर समाजाचे फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदानाची मोहीम हाती घेतली आहे. ‘आजवर तुम्ही आमचे रक्त पित आलात आता आम्हीच आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी धनगर समाजाला आरक्षण द्या’, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनानंतर राज्यभरात रक्तदानाची मोहीम धनगर तरुणांनी हाती घेतली असून आत्तापर्यंत 5 हजार रक्ताच्या पिशव्या झाल्याचे पडळकर यांनी सांगितले. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एका कार्यक्रमात आले असताना त्यांनी समाजातील तरुणांना आवाहन केले. सध्या कोरोनाच्या काळात या रक्ताची गरज गोरगरीब रुग्णांना असून त्यांच्यासाठी या रक्ताचा उपयोग होईल असे त्यांनी सांगितले.

धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या अगोदर कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर “ढोल बजाव, सरकार जगाव” हे आंदोलन करण्यात आले होते. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे, त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.