Thursday, December 18, 2025
Home Blog Page 5224

आता Processing Fees शिवाय कमी व्याजदरावर मिळणार Loan, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीच्या या हंगामात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. देशाच्या सर्वात मोठ्या बँकेने आज जाहीर केले आहे की YONO मार्फत कार, सोने, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. कार लोनसाठी (SBI Car Loan) अर्ज करणाऱ्या ग्राहकांना किमान 7.5% दराने कर्ज मिळेल. यासह निवडक मॉडेल्सवर त्यांना 100 टक्के ऑन-रोड फायनान्स देण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

होम लोनसाठी स्पेशल फेस्टिव ऑफर्स
SBI ने गृह खरेदीदारांसाठी होम लोनसाठी स्पेशल फेस्टिव ऑफर जाहीर केली आहे. अप्रुव्ड प्रोजेक्ट्समध्ये घरे खरेदी करणार्‍या ग्राहकांना एसबीआय होम लोनवर (SBI Home Loan) कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. तसेच ही बँक चांगला क्रेडिट स्कोअर (Credit Score) आणि लोन अमाउंट असलेल्या ग्राहकांना व्याज दरामध्ये 0.10 टक्के विशेष सवलत देत आहे. हे ग्राहकांनी SBI च्या योनो अॅपद्वारे अर्ज केल्यास त्यांना विशेष 0.5 टक्के सूट मिळेल.

गोल्ड लोन घेणार्‍या ग्राहकांना खास ऑफर
SBI ने गोल्ड लोन (SBI Gold Loan) घेणाऱ्या ग्राहकांसाठी देखील ऑफर जाहीर केल्या आहेत. अशा ग्राहकांना किमान 7.5 टक्के व्याज दरावर 36 महिन्यांसाठी गोल्ड लोनची परतफेड करण्याची सुविधा असेल. सध्याच्या संकटात ग्राहकांना परवडणारी कर्जाची उपलब्धता पाहता SBI 9.6 टक्के दराने पर्सनल लोन ऑफर (SBI Personal Loan Offer) देत आहे.

YONO APP वर प्री-अप्रुव्ड पेपरलेस लोनची सुविधा
डि​जिटल बँकिंगची वाढती उपयुक्तता आणि मागणी लक्षात घेता SBI ने YONO APP युझर्ससाठी ऑफर देखील जाहीर केली आहेत. योनो अॅप द्वारे या ग्राहकांना इन-प्रिंसिपल अप्रुवलच्या आधारे कार लोन आणि गोल्ड लोनसाठी अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.

प्री-अप्रुव्ड लोनसाठी पात्रता कशी तपासायची?
SBI ग्राहकांना केवळ 4 क्लिकमध्ये योनो अॅपद्वारे प्री-अप्रुव्ड पेपरलेस पर्सनल लोन मिळेल. यासाठी, ग्राहकांनी पहिले त्यांची पात्रता तपासली पाहिजे. प्री-अप्रुव्ड लोनसाठी पात्रता तपासण्यासाठी ग्राहकांना मेसेज बॉक्समध्ये PAPL <space> <last 4 digits of SBI a/c no.> टाइप करून 567676 वर एसएमएस पाठविणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

देशात वाढत आहेत Online Froud चे प्रकार, जर आपणही फोन बँकिंग वापरत असाल तर बाळगा सावधगिरी

हॅलो महाराष्ट्र । जर आपण स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, नेट बँकिंग (Net Banking), डिजिटल बँकिंग (Digital Banking) वापरत असाल तर जरा सावधगिरी बाळगा. कारण नुकत्याच आलेल्या एनसीआरबीच्या NCRB (National Crime Record Bureau) अहवालानुसार 2019 साली भारतात सायबर फसवणूकीत (Cyber Fraud) 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार 2019 साली सायबर गुन्ह्यांच्या 44,546 घटना घडल्या आहेत. तर 2018 मध्ये 28,248 नोंद झाली.

या राज्यात फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे समोर आलेली आहेत
कर्नाटकमध्ये सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली (12,020) त्यानंतर उत्तर प्रदेश (11,416), महाराष्ट्र (4,967), तेलंगणा (2,691) आणि आसाम (2,231) . बहुतेक फसवणूक कॉम्प्युटर द्वारे होत आहेत. या अहवालानुसार 5.1 टक्के प्रकरणे ही लैंगिक हिंसाचाराशी संबंधित आहेत.

आकडेवारीनुसार महानगरांमध्ये एकूण 18,372 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यामध्ये 81.9 टक्के वाढ झाली आहे. जास्तीत जास्त प्रकरणे (13,814) कॉम्प्युटरशी संबंधित गुन्हे (आयटी कायद्याच्या कलम 66) अंतर्गतही नोंदविले गेले आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आता यापुढे रेल्वेमध्ये मिळणार नाही खाण्यापिण्याच्या गोष्टी, रेल्वे मंत्रालय लवकरच घेणार Pantry बंद करायचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र । भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) अन्न, चहा, कॉफी आणि गरम सूप मिळविणे लवकरच थांबू शकते. एका वृत्तानुसार, रेल्वेच्या मोठ्या संघटनेने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून रेल्वेमधून पॅन्ट्री कार (Pantry Car) हटवून 3AC कोच डबे लावले जावेत जेणेकरून रेल्वेला आपली कमाई वाढविण्यात मदत होऊ शकेल. रेल्वे आता यावर काय निर्णय घेईल हे पहावे लागेल. परंतु रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

पँट्री कारमधून रेल्वेला कोणत्याही प्रकारचा महसूल मिळत नाही
ऑल इंडिया रेलवेमेंन्स फेडरेशन (All India Railwaymens Federation) ने रेल्वे मंत्रालयाला एक पत्र लिहिले आहे, त्यात अशी विनंती केली गेली आहे की, पँट्री कार ट्रेनमधून काढावी. मीडिया रिपोर्टनुसार AIRF ने असे म्हटले आहे की, बेस किचनमधूनही जेवण दिले जाऊ शकते. या पेंट्री कारमधून रेल्वे कोणत्याही प्रकारचा महसूल कमावत नाही.

पेंट्री कार हटविल्यामुळे रेल्वेला नुकसान होईल का?
पूर्वीच्या काही कारणांमुळे रेल्वे विमान कंपन्यांपेक्षा जोरात सुरु होत्या. परंतु कोरोना महामारीने लोकांची विचारसरणी मोठ्या प्रमाणात बदलली गेली आहे. ज्यामुळे आता लोक आरोग्याची कारणे लक्षात घेऊन विमान कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. EaseMyTrip.com चे Chief executive आणि co-founder निशांत पिट्टी म्हणाले की, प्रवासी रेल्वेचे हे पाऊल सकारात्मकपणे घेणार नाहीत. स्पाइसजेटसारख्या विमान कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे लोक आपला वेळ वाचवण्यासाठी रेल्वेऐवजी हवाई प्रवासाकडे वळू शकतात. अशा परिस्थितीत रेल्वेच्या पँट्री कार काढण्याच्या निर्णयामुळे त्यांचे आणखी नुकसान होऊ शकते.

बेस किचन ही एक चांगली कल्पना आहेः रेल्वे मंडळाचे माजी अध्यक्ष
रेल्वे मंडळाचे माजी अध्यक्ष आर.के. सिंग म्हणाले की, बेस किचन ही एक चांगली संकल्पना आहे. रेल्वेने जास्तीत जास्त बेस किचन्स बांधली पाहिजेत. पेंट्री कारपेक्षा बेस किचनमध्ये स्वच्छतेचे पालन करणे सोपे आहे. सध्याच्या या वातावरणात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पँट्री कार पूर्णपणे काढून टाकली पाहिजे असे मला तरी वाटत नाही. जर रेल्वे पँट्री कार काढण्याचा विचार करीत असेल तर त्यांनी जास्तीत जास्त बेस किचन्स तयार करावीत. सिंह पुढे म्हणाले की, रेल्वेने कोणताही पर्याय निवडताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

वैद्यकशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर; हार्वे अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स राईस ठरले यंदाचे मानकरी

नवी दिल्ली । वैद्यकशास्त्रातील यावर्षीचा म्हणजे वर्ष 2020 चा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला  आहे. हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.

हा पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटलं की, “या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे इतिहासात प्रथमच, हिपॅटायटीस सी विषाणूंमुळे होणारे आजार आता बरे होऊ शकतात. मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले तसेच लाखो लोकांचे जीवन वाचविणारी नवीन औषधेही तयार केली गेली.”

नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

दिल्ली कॅपिटल्सला धक्का ; बोटाच्या दुखापतीमुळे अमित मिश्राची आयपीएल मधून माघार

amit mishra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. दिल्लीच्या संघात युवा खेळाडूंचा आणि दिग्गजांचा योग्य समतोल दिसून येतोय. परंतू आता दिल्लीच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे उरलेला संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. शनिवारी शारजात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना अमित मिश्राच्या बोटाला दुखापत झाली होती.

ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना दिल्ली कॅपिटल्समधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “कोलकात्याविरुद्ध सामन्यात अमितच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर त्याचं स्कॅनिंग करण्यात आलं होतं. ज्याचा रिपोर्ट आला असून मिश्राला झालेली दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. तो यापुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. अस ते म्हणाले.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अमित मिश्रा फॉर्मात येत असतानाच त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागत आहे. त्याचा अनुभव संघातील इतर गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरायचा.” कोलकात्याविरुद्ध सामन्यातही अमित मिश्राने शुबमन गिलची विकेट घेतली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

कर्जमाफी हा कर्जदारांसाठी मोठा फायदा आहे, केंद्र सरकार बँकांऐवजी स्वतःच हा भार का उचलते आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले की, लोन मोरेटोरियम दरम्यान घेण्यात आलेल्या व्याजावरील व्याज माफ केले जाईल जेणेकरून कोविड -19 मुळे आधीच अडचणीत आलेल्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. त्याचबरोबर बँकांच्या ऐवजी हा भार केंद्र सरकार उचलेल. याद्वारे बँकांनाही 6 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त बोजापासून वाचविण्यात येणार आहे. दुसऱ्या शब्दांत, बँक यापुढे कर्ज घेणाऱ्यांकडून कर्जाच्या रकमेवर वसूल केलेली फी वसूल करणार नाहीत. ही सवलत केवळ दोन कोटी रुपयांच्या कर्जावर दिली जाईल, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

या कर्जात सवलती उपलब्ध असतील, बँकिंग प्रणालीवरही परिणाम होणार नाही
व्याजावरील व्याजातून सूट देण्यात एमएसएमई, शिक्षण, गृहनिर्माण, ग्राहक टिकाऊ, वाहन, बिझनेस लोनचा समावेश असेल. याशिवाय क्रेडिट कार्डच्या बॅलेन्सवरही व्याज आकारले जाणार नाही. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, जर कर्जमाफीचा भार बँकांकडे सोडला गेला तर त्यांना सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागेल. याचा देशातील बँकिंग प्रणालीवर वाईट परिणाम होईल. याचा बँकांच्या नेटवर्थवर देखील परिणाम होईल आणि त्यांची स्थिती अधिकच खराब होईल. अशा परिस्थितीत सरकार या सूटचा भार उचलत आहे.

व्याजावर व्याज देऊन तुम्हाला अतिरिक्त ईएमआय किंवा व्याज द्यावे लागेल.
व्याज माफ केल्यामुळे कर्जदारांना मोठा फायदा होईल याची खात्री आहे. समजा, अंदाजे 28 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी 8% व्याजदरावर घेतले गेले आहे. मोरेटोरियमची सुविधा घेण्यापूर्वी तुम्हाला दरमहा सुमारे 25,000 रुपये ईएमआय द्यावा लागतो. समजा तुम्ही मोरेटोरियम आधी 12 हप्त्या आधीच भरल्या आहेत आणि तुमच्याकडे 228 हप्ते बाकी आहेत. जर आपण यापूर्वी 3 महिन्यांसाठी मोरेटोरियमची निवड केली असेल तर ईएमआय मोरेटोरियम नंतर ते 25,478 रुपये असेल. कर्जाच्या कालावधीत तुम्हाला सुमारे 58 हजार रुपये अधिक परत करावे लागतील.

व्याज क्षमतेपेक्षा व्याज किंवा अधिक हप्ते नाहीत
आता ज्या लोकांनी केंद्र सरकारकडून व्याज दिल्यास सवलतीतून लोन मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतला आहे त्यांना कर्जाचे सामान्य व्याजच भरावे लागणार आहे. हे सोप्या भाषेत समजून घ्या, जर तुम्ही 3 महिन्यांचे मोरेटोरियम घेतली असेल तर पूर्वीप्रमाणे तुम्हाला दरमहा सुमारे 25,000 रुपये ईएमआय द्यावे लागेल. आपण निवडलेले 3 महिने, ते 3 ईएमआय पुढे जातील. हा नियम 6-महिन्यांच्या स्थगितीवर देखील असेल, म्हणजे आपल्याला अतिरिक्त व्याज किंवा अतिरिक्त ईएमआय देण्याची गरज नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

कार्तिक ऐवजी ‘या’ विश्वविजेत्या कर्णधाराकडे कोलकात्याचं नेतृत्व सोपवा ; भारतीय खेळाडूची मागणी

karthik and morgan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या २ वर्षांपासून यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्त्व करत आहे. पण अद्यापही तो यशस्वी नेतृत्व करू शकला नाही.दमदार खेळाडू संघात असूनही कोलकात्याला चांगली कामगिरी करता आली नाही. अशात आता दिनेशच्या नेतृत्त्वपदाविषयी मोठे विधान पुढे आले आहे. दिनेशच्या ऐवजी ऑयन मॉर्गनला कोलकाता संघाचा कर्णधार बनवण्यात यावे, असे विधान भारतीय क्रिकेटपटू एस श्रीसंतने केले आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत श्रीसंत म्हणाला की, “कोलकाता संघाचे नेतृत्त्व दिनेशने नाही तर विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा कर्णधार मॉर्गनने करायला पाहिजे. आशा आहे की, कोलकाता संघ माझ्या या मुद्द्याचा विचार करेल. त्यांना रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहलीसारख्या संघांपुढे आघाडी मिळवायची असेल, तर तशी क्षमता असणाऱ्या व्यक्तीवर संघाचे नेतृत्त्व सोपवावे लागणार आहे.”

इंग्लंडचा ऑयन मॉर्गन एक जबरदस्त कर्णधार असून 2019 विश्वचषक स्पर्धेत त्याने इंग्लंडच नेतृत्व करताना प्रथमच संघाला विश्वचषक करंडक जिंकवून दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात सोशल मीडिया आणि काही माध्यमांत ठरवून मोहिम चालवली गेली- परमबीर सिंह

मुंबई । सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी AIIMS रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालामध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला. त्यामुळं सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. आमची चौकशी ही प्रोफेशनल होती.

AIIMS नेदेखील आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटलं नसल्याचे परमबीर सिंह म्हणाले. अभिनेता सुशांत सिह राजपूतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा आणि सीबीआयकडे द्यावा ही मागणी मान्य करण्यात आली. पण AIIMSच्या अहवालानंतर त्याच्या शरीरात विषाचा अंश किंवा घातपात झाल्याचा निष्कर्ष निघाला नाही.

मुंबई पोलिसांविरोधात एक मोहीम चालवली गेली. मात्र, AIIMSच्या अहवालानंतर सत्य अखेर समोर आलं. सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी एक मोहीम चालवली गेली त्याबाबत चौकशी सुरू असून कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. काही मीडियानंही मुंबई पोलिसांवर विरोधात एक मोहीम चालवली. १६ जून सुशांतचा कुटुंबियांची विधानामध्ये देखील त्यांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं पण कुटुंबातील सदस्य चौकशीसाठी आले नाहीत असेही परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

शेतकरी विरोधानंतर केंद्राची कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्याने दिले संकेत

अकोला । मागील महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा अध्यादेश काढला होता. केंद्राच्या या निर्णयाला राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला भाजपमध्येही विरोध वाढताना दिसतोय. केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही विरोध दर्शवला आहे.

केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय लवकरच मागे घेणार असल्याचे संकेत धोत्रेंनी दिली आहेत. ते अकोल्यात केंद्राच्या कृषी विधेयकावर माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय लवकरच मागे घेणार असल्याचे संकेत धोत्रेंनी दिली आहेत. कांदा निर्यातबंदीला महाराष्ट्रातील सर्वांचाच विरोध असल्याचं संजय धोत्रेंना स्पष्ट केलं. सध्याचा विरोध पाहता किमान आधारभूत किंमतीवर स्वतंत्र कायदाच करावा लागेल, अशा परिस्थिती असल्याचं धोत्रे म्हणाले.

दरम्यान, राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच असल्याचं धोत्रे म्हणाले. परंतु, बच्चू कडूंची हमी कोण घेणार?,असा सवालही धोत्रेंनी केला. बच्चू कडूंनी कृषी कायद्यात केंद्राने दोन बदल केल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याचं काल वक्तव्य केलं होतं. या मुद्द्यावर बच्चू कडूंच्या सूचनांवर विचार करणार असल्याचं धोत्रे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.