CBIचौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर..; संजय राऊतांची भाजपावर अप्रत्यक्षरित्या टीका

मुंबई । सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याचं केल्याचा अहवाल एम्स रुग्णालयाने दिला आहे. सदर अहवाल सीबीआयकडे सोपवण्यात आलेला आहे. या अहवालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असेलल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा रिपोर्ट आहे. त्यांचे कोणताही राजकीय संबंध नाही किंवा शिवसेनशी देखील संबंध नाही.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालामध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला. त्यामुळं सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like