Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5231

दहा महिन्याच्या चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाला वेगळे वळण; एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतून ओंकारचा खून

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी चिमुकल्याच्या अपहरणाची घटना फलटण तालुक्यातील काळज गावी घडली. मंगळवार दि .29 सप्टेंबर ला राहत्या घरातून चि .ओंकार भगत या चिमुकल्याच अपहरण करण्यात आलं होतं. या घटनेने फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्हा हादरवून सोडला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सदर प्रकार एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतून झाला आसल्याचे उघड झाले आहे. सातारा पोलिसांनी यासंबंधी एकाला अटक केलेली असून अधिक तपास सुरु आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली आहे.
                
हाती आलेल्या माहितीनुसार, १ आॅक्टोंबर रोजी सकाळी सदर चिमुकल्याच्या राहत्या घरा शेजारील विहिरी मध्ये त्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत सापडला होता. यानंतर गावकर्‍यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती. हे कृत्य करणारा आरोपी घरा जवळ राहणाराच कोणी तरी असणार असा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलिसांनी आपल्या तपासाची सुत्रे वळवली. सातारा पोलिसांनी २२ अधिकारी यांची १२ शोध पथके या शोध मोहिमे करता तयार केली होती. अखेर सदर घटनेला एकतर्फी प्रेमाची झलक असल्याचे समोर आले आहे. एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतूनच आरोपीने असे कृत्य केल्याचे समजत आहे.

मृत चिमुकल्याच्या आईने आरोपीसोबत फोनवर बोलण्यास नकार दिल्याने आपण हे कृत्य केल्याचा जबाब आरोपीने पोलिसांना दिला आहे. चिमुकल्याच्या आईने आरोपीस प्रतिसाद न दिल्याने तो राग मनात ठेवून त्याने ओमचे अपहरण करुन त्याचा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी एकास अटक केली असून अधिकचा तपास सुरु आहे असे सातपुते यांनी सांगितले आहे.

दरम्यान, फलटण तालुक्यातील चिमुकल्याच्या अपहरणाच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी तपासाची सर्व सुत्रे हाती घेतली होती. सबंध पोलिस यंत्रणा मागील दोन दिवस रात्रंदिवस तपासात लागली होती. त्यांच्या बरोबरच गावातील युवक व स्थानिक प्रशासनाकडुन ओंकार चा युध्दपातळीवर तपास सुरू होता. सातारा पोलिसांनी आता अखेर मुख्य आरोपीस शोधुन काढले असून वेगाने खून्याचा शोध लावून एकास अटक केल्याने नागरिकांतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

कोरोना चाचणी दरम्यानचा निष्काळजीपणा बेतला महिलेच्या जीवावर; नाकातून स्वॅब घेताना मेंदूजवळील भागाला धक्का

वॉशिंग्टन । अनेक देशांमध्ये करोनाची चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. करोना चाचणीसाठी नाकातून नमुने घेतले जातात. मात्र, या चाचणी दरम्यान केलेला निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. करोना संसर्गासाठी करण्यात येणाऱ्या स्वॅब चाचणीमुळे एका महिलेचे प्राण धोक्यात आले आहे. नाकातून स्वॅब जमा करताना ब्रेन लायनिंगला धक्का लागला आणि तिच्या नाकातून मेंदूचा फ्लूड बाहेर पडू लागला. ही धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे. डॉक्टरांनी ही बाब गुरुवारी एका वैद्यकीय नियतकालिकेला सांगितली. या महिलेवर वेळीच उपचार झाले नसते तर तिच्या मेंदूतही संसर्ग झाला असता.

‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या ४० वर्षीय महिलेला या आधीपासून आरोग्यविषयक त्रास होता. मात्र, तिला त्याबाबत माहिती नव्हती. करोना चाचणी करतानाही चूक झाल्यामुळे अपघात झाला. यामुळे स्वॅब चाचणी करताना आणखी सावधानता बाळगण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ही घटना घडली. JAMA Otolaryngology-Head & Neck Surgery मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन निबंधाचे वरिष्ठ लेखक जॅरेट वॉल्श यांनी सांगितले की, ज्यांचा सायनस मोठा आहे, किंवा कवटीशी संबंधित शस्त्रक्रिया झाली अशा व्यक्तींनी नाकाऐवजी ओरल टेस्टची मागणी करायला हवी.

वॉल्श हे लोवा विद्यापीठाच्या रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, या महिलेला इलेक्टिव हर्निया सर्जरी आधी नोजल चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर तिच्या नाकातून क्लिअर फ्लूड बाहेर येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर या महिलेला डोकेदुखी, उलटी होणे, अंधुक दिसणे, आदी विविध त्रास जाणवू लागला. या महिलेला उपचारासाठी वॉल्श यांच्याकडे पाठवण्यात आले. आपली स्वॅब चाचणी योग्य प्रकारे घेतली नसल्याचे महिलेने सांगितले. या महिलेवर मागील काही वर्षांपासून इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शनसाठी उपचार सुरू आहेत. याचा अर्थ असा की, मेंदूची सुरक्षा करणाऱ्या फ्लूडचा दबाव अधिक होता.

डॉक्टरांनी एक शंट लावून थोडा फ्लूड बाहेर काढला. त्यानंतर ही समस्या कमी झाली. मात्र, त्यामुळे encephalocele म्हणजे कवटी संबंधी त्रास झाला. यामध्ये मेंदूची लायनिंग नाकात पोहचते आणि त्यामुळे इजा होण्याचा धोका संभवतो. पहिल्यांदा स्कॅन करण्यात आले तेव्हा ही बाब लक्षात आली नव्हती. योग्य वेळीच उपचार झाले नसते तर मेंदूत बॅक्टेरिअल संसर्ग झाला असता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

भिलार ग्रामपंचायतीसमोरच स्थानिक धनदांडगा बेकायदा उत्खनन करतो; तलाठी मात्र उत्खननाची राखण करतो

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील अस्तित्वहीन महसुल प्रशासनामुळे स्थानिक धनदांडग्यांनी राजकीय अन सामाजिक संस्थांची बिरुदं वापरुन ‘नाम बडे दर्शन खोटे’ करत भिलार ग्रामपंचायतीसमोर सर्वे नंबर ५६ मध्ये बेकायदा उत्खननाचं भलं मोठ भगदाड पाडलं आहे. ग्रामपंचायतीच्या समोर हाकेच्या अंतरावरील तलाठी कार्यालयाशेजारी बेकायदा उत्खनन सुरु असताना तलाठी मात्र स्थानिकांच्या बेकायदा उत्खननाची राखण करत असल्याची अशी दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. भिलार सज्जाच्या तलाठ्याच्या नाकर्तेपणामुळे याठिकाणची परिस्थिती अवघड झाली आहे.

भिलारमधील स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम व बेकायदा उत्खननाला हातभार लावून भिलारचं नैसर्गिक वरदान लोप करण्याचा विडा उचलला आहे. सामाजिक कामाचा बुरखा घेवुन तहसिलदार व प्रांत यांना मॅनेज करत भिलारमध्ये दिवसाढवळ्या जमिनीचे लचके तोडण्याचा एकमेव उद्योग सुरु आहे. स्थानिकाने निसर्गाचे लचके तोडले तरी चालतील असा शिरस्ता भिलारमध्ये कायम झाला आहे. भिलारमधील बेकायदा उत्खनन सुरु असताना झाडाची मुळे आता दिसु लागली आहेत. बेकायदा उत्खननामुळे झाडांची कत्तल सुरु असल्याचा धक्कादायक प्रकारदेखील समोर आला आहे.

भिलार या गावातील सर्वे नंबर ५६ हा ग्रामपंचायतीसमोर व तलाठ्याच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर आहे. भिलारचे तलाठी हे तहसिलदार व प्रांतांच्या आदेशावरून बेकायदा उत्खननाची राखण करतात की काय ? अशी चर्चा भिलारमध्ये होवु लागली आहे. महसुल प्रशासन तसेच तहसिलदार सुषमा पाटील व प्रांत संगीता चैागुले याच्या कालखंडात महाबळेश्वर तालुक्याचं निसर्गसौंदर्य स्थानिक धनदांडगे आणि राजकीय पुढाऱ्यांनी धुळीस मिळवलं आहे. महसुल विभागानेच आपली लाज सोडल्यामुळे भिलारमध्ये बेकायदा उत्खनन सुरु आहे हे मात्र निश्चित..!!

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन क्रूरतेवर उतरलंय ; व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी साधला निशाणा

rahul gandhi and yogi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. तर विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच पीडितेच्या कुटुंबीयांवर प्रशासनाकडून इतरांना भेटण्यासाठी रोखलं जात असल्याचं वृत्त असून, याविषयी राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करून निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा उत्तर प्रदेश प्रशासनावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलणाऱ्या पीडितेच्या नातेवाईकाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “उत्तर प्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी क्ररतेवर उतरलं आहे. ना आम्हाला, ना माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांशी भेट दिलं. त्याचबरोबर त्यांनाही बाहेर येऊ दिलं जात नाहीये. वरून पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण आणि असभ्य वर्तन केलं जात आहे. कोणताही भारतीय अशा वागणुकीचं समर्थन करू शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LPG सिलिंडरच्या सबसिडीचे पैसे गेल्या 5 महिन्यांपासून येत नाहीत, सरकार हे पैसे का देत नाही ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तुम्हाला माहिती आहे काय की मागील 5 महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडर्स (Gas Subsidy) चे अनुदान एकतर थांबले आहे किंवा फक्त नाम मात्र येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार मे 2020 पासून घरगुती एलपीजी गॅसवरील अनुदान हे तुमच्या बँक खात्यात येत नाही. अशा परिस्थितीत मोदी सरकार घरगुती गॅसवरील अनुदान संपवत आहे. तुम्हाला मेपासून मिळणारी गॅसवरील सबसिडी सरकारने रद्द केली आहे. परंतु हे अनुदान संपविण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे. चला तर मग संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

अनुदानाची रक्कम खात्यात का येत नाही?
वस्तुतः घरगुती गॅसच्या किंमती इतक्या खाली आल्या आहेत की मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि आता यावर्षी सप्टेंबरमध्येही ग्राहकांना अनुदान मिळालेले नाही. तथापि, काही ग्राहकांच्या खात्यात गेल्या महिन्यात 27 रुपये नाममात्र अनुदान मिळाले आहे. यावर्षी मेपासून शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये सातत्याने कपात केल्याने अनुदानित आणि विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत एकसारखीच झाली आहे. सबसिडी म्हणून अनुदान आणि विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सरकार फरक देते. जेव्हा दोन्हीची किंमत जवळजवळ सारखीच असते तेव्हा अनुदान देखील शून्यावर येते. म्हणजेच अनुदानाशिवाय सिलिंडरची किंमत वाढल्यास अनुदानही पुन्हा सुरू केले जाईल.

सबसिडी संपल्याचा परिणाम काय झाला?
गेल्या एक वर्षापासून एलपीजी सिलिंडरवरील अनुदानात सतत कपात केली जात आहे. म्हणूनच अनुदानित सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाले आहे. यासह, त्यावर मिळणारे अनुदान शून्यावर आले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचा बाजारभाव 637 रुपये होता, जो आता खाली 594 रुपयांवर आली आहे. जर तुम्हाला यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असतील तर तुम्हाला ते बाजारभावाने खरेदी करावे लागतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोना पॉझिटिव्ह येण्याने जगभरातील शेअर बाजारात झाली मोठी घसरण

हॅलो महाराष्ट्र । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये कमालीची घसरण झाली आहे. आशियाई बाजारामध्ये जपानचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स निक्केईने 1 टक्क्यांहून अधिकने खाली आला आहे. त्याचवेळी चीनचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स शांघाय आणि ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स 200 इंडेक्स दोन टक्क्यांहून अधिकने खंडित झाला आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीमुळे भारतीय शेअर बाजार आज बंद आहे. आता व्यवसाय सोमवारपासून म्हणजे 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

युरोपियन बाजारामध्येही घसरण अपेक्षित आहे – वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, अध्यक्ष ट्रम्प यांच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेच्या शेअर बाजाराचा अग्रणी इंडेक्स डाऊ जोन्स फ्यूचर 500 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला. ट्रेझरी बाँडवरील उत्पन्नही खाली आले आहे.

तज्ञांचे मत आहे की, युरोपियन बाजाराची सुरूवातही लाल निशाणीवर असू शकते. ब्रिटनचा बेंचमार्क इंडेक्स एफटीएसई, फ्रान्सचा सीएसी आणि जर्मनीचा अग्रणी इंडेक्स डीएएक्स मोठ्या घसरणीसह उघडू शकेल.

घसरण का झाली ? – तज्ञ म्हणतात की, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत काहीही घडले तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येतो. अशा परिस्थितीत अमेरिकेत येणाऱ्या दुसर्‍या मदत पॅकेजच्या आशेला धक्का बसला आहे. म्हणूनच जागतिक बाजारातील घसरण आणखी तीव्र झाली आहे.

गुरुवारी, बंद-बँक शेअर्सच्या शॉर्ट कव्हरिंगच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार तेजीत वाढला, बँक निफ्टी जवळपास 650 अंकांपर्यंत पोहोचला. याचा फायदा गुरुवारी दोन्ही निर्देशांकांवर दिसून आला. व्यापार संपल्यानंतर सेन्सेक्स 629 अंकांनी वाढून 38,697 वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 169 अंकांनी वधारत 11,417 वर बंद झाला. निफ्टी बँक 794 अंकांच्या वाढीसह 22,246 वर बंद झाला. मिडकॅप 142 अंकांनी चढून 17,125 वर बंद झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

SBI-HUL करार! आता किरकोळ विक्रेत्यांना मिळणार 50 हजार रुपयांपर्यंतच्या पेपरलेस ओव्हरड्राफ्टची सुविधा

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) यांच्यात डिजिटल पेमेंट सोल्यूशनवर (Digital Payment Solution) एक करार झाला आहे. त्याअंतर्गत, HUL च्या किरकोळ विक्रेत्यांना (Retailers) डिजिटल पेमेंट आणि फायनान्सिंग सॉल्यूशन उपलब्ध करून त्यांची आवश्यकता पूर्ण केली जाईल. हा करार छोट्या शहरांमध्येदेखील किरकोळ विक्रेत्यांना आणि HUL च्या ग्राहकांना डिजिटल सोल्यूशन प्रदान करेल. या कराराअंतर्गत आता बँक कंपनीच्या विक्रेत्यांना 50 हजार रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट पेपरलेस ओव्हरड्राफ्टची सुविधा आणि डिस्ट्रीब्यूटर्सना फायनान्सिंग सॉल्यूशन उपलब्ध करून देईल.

छोट्या शहरांमध्येही ग्राहक डिजिटल पेमेंट करण्यास सक्षम होतील
SBI छोट्या शहरांमधील SBI टच पॉइंट्सवर आपले पॉईंट ऑफ सेल (POS) मशीन इन्स्टॉल करतील. याव्यतिरिक्त, SBI आता HUL च्या किरकोळ विक्रेत्यांना UPI आधारित सॉल्यूशन देईल, जेणेकरून ते त्यांच्या डीलर्सला कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरक्षित कॅशलेस पेमेंट्स करू शकतील. यासाठी त्यांना HUL चे रिटेलर ऐप्लीकेशन शिखर वापरावे लागेल. HUL च्या कर्मचार्‍यांना बँक कॉर्पोरेट सॅलरी पॅकेजचा पर्यायसुद्धा देईल. SBI च्या मायक्रोसाईटच्या माध्यमातून ती सादर केली जाईल, जी कंपनीच्या इंटरानेटवर असेल.

SBI अंतिम ग्राहकांसाठी काम करते
देशातील सर्वात मोठी कर्जदाता SBI चे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, HUL शी झालेल्या या करारामुळे बँकेच्या शेअरहोल्डर्सना एक व्यापक आणि कस्टमाइज्ड शॉपिंगचा अनुभव मिळेल. SBI नेहमीच आपल्या शेवटच्या ग्राहकांसाठी (End User) काम करत असते. HUL एसबीआयला ग्राहक, विक्रेते, डीलर्स आणि कर्मचार्‍यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्याच्या भक्कम ब्रांच चेन आणि डिजिटल सोल्यूशन्सचा लाभ घेण्याची संधी प्रदान करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार

मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा दिला होता इशारा
एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आझाद मैदानात दोन महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आणि एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. जर आम्हाला पगार मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात याचिका दाखल करु आणि राज्य सरकारला न्यायालयात खेचू असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला होता. पगार न झाल्याने एसटी महामंडळाचे एक लाखापेक्षा जास्त कामगार ७ ऑक्टोबरपासून आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. त्याची दखल न घेतल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

धक्कादायक !! पोटच्या पोरीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; नराधम बापाला अटक

rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाप – लेकीचं नात हे मायेचं नात असत अस म्हणल जाते. परंतु आज याच नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणा-या नराधम बापाला रामनगर पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 2 वाजता डोंबिवली पुर्वेकडील पाथर्ली, शेलार नाका परिसरातील त्रिमुर्ती वसाहतीत घडली. क्षयरोगाची लागण झाल्याने  पिडीत मुलीची आई आपल्या तीन मुलींसमवेत वसाहतीत बाजुला घर असलेल्या तीच्या आईकडे राहते.

बाप हा त्याच्या घरात दुपारी झोपला असताना पिडीत मुलगी त्याठिकाणी खेळायला आली होती. त्यावेळी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. तीने लागलीच रामनगर पोलीस ठाणे गाठत नव-याविरोधात तक्रार केली. आईने दिलेल्या तक्रारीवरून पिडीत मुलीच्या बापावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश आहेर यांनी दिली. आरोपीला दुपारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

सर्वसामान्यांना सरकारकडून मिळाला दिलासा, ‘या’मुळे सप्टेंबरमध्ये झाले बेरोजगारीचे प्रमाण कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तसेच सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये ऑगस्ट 2020 च्या तुलनेत देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. CMIE च्या मते, सप्टेंबर 2020 मध्ये एकूणच नोकरी गमावण्याचे प्रमाण 6.67 टक्के होते, तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये 8.35 टक्के होते.

सप्टेंबर 2020 मध्ये शहरी बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले
CMIE च्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये शहरी बेरोजगारीचे प्रमाणही कमी झाले आहे. या कालावधीत नागरी बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये 9.83 टक्क्यांवरून 8.45 टक्क्यांवर आला आहे. मात्र, CMIE याबाबत म्हणते की, यातून आनंदी होण्याची आवश्यकता नाही. खरं तर, CMIE म्हणते की सप्टेंबरच्या साप्ताहिक कामगार बाजारपेठेतील इतर डेटा ऑगस्टच्या तुलनेत आणखी बिघडण्याची चिन्हे दर्शवित आहेत. ऑगस्टमध्ये कामगार बाजाराच्या लॉकडाउननंतर रुळावर परत येण्याची प्रक्रिया रखडली.

20 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 6.35% होता.
CMIE ने बेरोजगारीच्या दरावर सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांचा डेटा जाहीर केला आहे. त्यानुसार 20 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 6.35 टक्के होता. त्याच काळात या काळात शहरी बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन 8.83 टक्के झाले. सप्टेंबरच्या मासिक आकडेवारीनुसार राष्ट्रीय बेरोजगारीचा दर वाढून 6.67 टक्के झाला आहे. त्याच वेळी, शहरी बेरोजगारीचा दर सुधारण्यासह 8.45 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

16 ऑगस्ट नंतर कामगार सहभाग दर कमी
केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 20 सप्टेंबरला 30 दिवसांच्या कालावधीसाठी सरासरी कामगार-शक्ती सहभाग दर (LPR) 40.30 टक्के होता, तो ऑगस्टच्या 40.96 टक्क्यांपेक्षा वाईट होता. CMIE चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास म्हणाले की, 16 ऑगस्टनंतर ते कमी होऊ लागले. जून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत सरासरी LPR 40.9 टक्के होता. यानंतर सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सरासरी 40.45 टक्क्यांवर गेला. घटत्या लेबर-फोर्स पार्टिसिपेशन रेट (LPR) असे नमूद करते की, सध्याच्या कार्यरत लोकसंख्येचा एक छोटासा भाग रोजगार किंवा बेरोजगार आहे आणि तो रोजगाराच्या शोधात आहे.

एप्रिल आणि मेमध्ये रोजगाराचा सर्वात वाईट काळ आला
CMIE च्या मते, अलिकडच्या आठवड्यांत बेरोजगारीच्या दरात झालेली घट हे श्रमदारी सहभागाचे प्रमाण आणि रोजगाराचे घटते प्रमाण या पार्श्वभूमीवर अर्थहीन आणि दिशाभूल करणारे आहे. एप्रिल आणि मेमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात घातल्या गेलेल्या लॉकडाऊनदरम्यान रोजगाराचा सर्वात वाईट टप्पा आला. एप्रिल 2020 मध्ये बेरोजगारीचा दर 23.52 टक्के आणि मेमध्ये 21.7 टक्के होता. CMIE च्या आकडेवारीनुसार, याच काळात नागरी बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 25 टक्के आणि मेमध्ये 23.14 टक्के होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.