Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5232

हाथरस प्रकरणी योगी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ; शरद पवारांचा आरोप

Sharad Pawar Pm
Sharad Pawar Pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस येथील घटना दुर्दैवी असून पीडित तरुणीच्या मृतदेहाची उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर विल्हेवाट लावली. असा प्रकार देशात कधीच घडला नाही. उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्याचा देशभरातून संताप उमटलेला असून जनतेची रिअॅक्शन योग्यच आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता? असा सवाल त्यांनी केला.तसेच राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे,असा आरोप शरद पवारांनी केला.

उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. म्हणून हाथरस प्रकरणावर जनतेची रिअॅक्शन उमटत आहे, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता सुरु झाली Video KYC, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने (IRDAI) ने पॉलिसीधारकांसाठी विमा पॉलिसीच्या ऑनलाइन खरेदीसाठी Video KYC ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. IRDAI ने विमा कंपन्या आणि एजंटांना ऑनलाईन पॉलिसी देण्यास मान्यताही दिली आहे. आता ग्राहक KYC व्हिडिओद्वारे बँकेत न जाता किंवा विमा अधिकाऱ्याच्या संपर्कात न येता पॉलिसी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

विमा अधिकारी डिजिटल सिग्‍नेचरची पडताळणी करतील
ऑनलाईन पॉलिसीमध्ये, विमा अधिकाऱ्यास ग्राहकाच्या कागदपत्रांवरील सिग्‍नेचर मान्य करण्यासाठी डिजिटल मोडचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल. यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि भांडवली बाजार नियामक सेबी (SEBI) यांनीही KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यासाठी व्हिडीओ-आधारित उपकरणे वापरण्यासाठी बँक आणि म्युच्युअल फंड व्यवस्थापकांना (Mutual Funds) मान्यता दिली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या वितरणासाठी Video KYCला मान्यता दिली आहे.

Video KYC अशा प्रकारे केली जाईल

> विमा कर्मचारी किंवा अधिकृत प्रतिनिधी घरी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ग्राहकांची संपूर्ण माहिती घेतील.

> अधिकृत ऍपद्वारे पॉलिसीधारक विमा कंपनीच्या कर्मचार्‍यांशी जोडले जातील आणि IRDAI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार Video KYC ची प्रक्रिया सुरू करतील.

> दुसर्‍या पर्यायात पॉलिसीधारकाला अधिकृत वेब लिंक पाठविली जाईल, ज्याद्वारे विमा कर्मचारी ग्राहकांची माहिती गोळा करेल.

> यावेळी ग्राहकाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स पैकी एक सादर करावे लागेल. जर ग्राहक डिजीलॉकरची सुविधा वापरत असेल तर तो डिजिटल सिग्‍नेचर केलेली कॉपी सादर करू शकतो.

> Video KYC च्या प्रक्रियेमध्ये ग्राहक ही कागदपत्रे फोटोच्या रूपात शेअर करू शकतात किंवा ते ई-साइन सिस्टमद्वारे कागदपत्रे स्कॅन करुन शेअर करू शकतात.

> Video KYC दरम्यान ग्राहकांचे लोकेशन, तारीख आणि वेळ स्टॅम्पही नोंदविला जाईल. यामध्ये जिओटॅगिंग देखील अनिवार्य असेल.

> पॉलिसीधारक भारतात असेल तरच ही Video KYC ची प्रक्रिया वैध असेल.

Video KYC ग्राहकांना अशा प्रकारे मदत करेल

> कोरोना विषाणूच्या देशातील सद्यस्थितीनुसार ही प्रक्रिया ग्राहकांना सोयीची होईल.

> यासाठी पॉलिसी खरेदी प्रक्रियेसह कोणत्याही ग्राहकांना KYC व्हेरिफिकेशनसाठी विमा कार्यालयात जावे लागणार नाही.

> विमा कंपन्या या प्रक्रियेत आत्ताच काही बदल करतील. यानंतर, ग्राहक आणि कंपनीने शेअर केलेले लिंक विमाधारकाशी थेट कनेक्ट होऊ शकतील.

> KYC ची कागदपत्रे ऑनलाईन शेअर करण्याबरोबरच KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना समोरासमोर येण्याऐवजी Video मधूनच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.

> Video KYC व्हेरिफिकेशनसाठी ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘त्यांना अशी शिक्षा करू कि…’ हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथ यांनी अखेर सोडलं मौन

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. हाथरास प्रकरणात पीडितेच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा आणि कारवाईत केलेली दिरंगाई यामुळं योगी सरकार टीकेचे धनी बनले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणामधील पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन न दिल्याने देशभरामध्ये आक्रोश व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेला घडून २० दिवस होऊनही मुख्यमंत्री योगी यांनी मौन बाळगलं असताना त्यांनी आता आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

योगींनी ट्विटरवरुन पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ते म्हणाले कि, ”उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे,” असं योगी यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

हाथरसमधील हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच विरोधकांनी योगी सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हाथरसमध्ये जाण्यास परवानगी दिली नाही. हाथरसमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. यामुळेच काँग्रेसविरुद्ध भाजपा असा थेट संघर्ष या प्रकरणावरुन झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसबरोबरच आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना यासारख्या भाजपाविरोधी पक्षांनी या प्रकरणावरुन योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

दिवसाला 200 रुपये गुंतवून मिळवा 14 लाख रुपये, ‘ही’ योजना काय आहे आणि किती वेळ लागेल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । जर आपणास असे वाटत असेल की 50 किंवा 100 रुपयांची बचत करुन कोणतीही मोठी बचत केली जाऊ शकत नाही. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बचत करण्यासाठी, मोठी अमाउंट असणे आवश्यक आहे असा विचार करणे चुकीचे आहे. कारण लहान बचत करूनही आपण एक मोठा फंड मिळवू शकतो. कमी गुंतवणूक करून जास्त इन्कम मिळवण्यासाठी योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत जी अगदी किफायतशीर आहे आणि याद्वारे तुम्ही सहजपणे मोठ्या प्रमाणावर पैसे जमा कराल. अशाच एका लहान बचत योजनेचा पर्याय म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (PPF). दररोज 200 रुपये वाचवून या योजनेद्वारे आपण केवळ 20 वर्षात 14 लाख रुपयांचे मालक कसे व्हाल हे जाणून घ्या.

PPF चे फायदे
PPF योजनेंतर्गत तुमच्या गुंतवणूकीवर सुरक्षिततेची हमी असते. या योजनेंतर्गत मिळालेल्या व्याजावर कोणताही इन्कम टॅक्स नसतो. यात नॉमिनीची सुविधा देखील असते. हे अकाउंट पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या काही निवडक शाखांमध्ये 15 वर्षांसाठी उघडले जाते, तसेच ते 5 वर्षांपर्यंत वाढविलेही जाऊ शकते.

हे खाते फक्त 500 रुपये देऊन उघडता येते
हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला 500 रुपयांची गरज आहे. मात्र एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यामध्ये एका वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या खात्यातील व्याज दर हे वेळोवेळी सरकार ठरवते. एप्रिल ते जून या तिमाहीत खात्यात 7.1 टक्के व्याज मिळाला आहे.

अशा प्रकारे जमा होईल 32 लाखांचा फंड
या योजनेंतर्गत, जर तुम्ही दररोज केवळ 200 रुपये दिवसाच्या गुंतवणूकीचा विचार केला तर ते एका महिन्यासाठी 6000 रुपये असेल. अशा प्रकारे आपली वार्षिक गुंतवणूक 72,000 रुपये होईल. जर आपण हे 15 वर्षांसाठी केले तर आपली एकूण गुंतवणूक 10,80,000 रुपये होईल.

PPF ला वर्षाकाठी 7.1 टक्के चक्रवाढ व्याज मिळते. जर तुम्हाला 20 वर्षांच्या समान दराने व्याज मिळाल्यास एकूण परतावा 14.40 लाख रुपये असेल. म्हणजेच तुमच्या एकूण गुंतवणूकीवर तुम्हाला 17.55 लाख रुपयांच्या व्याज स्वरुपात अतिरिक्त फायदा मिळेल.

चक्रवाढ सूत्र काय आहे?
A=P (1+r/n)nt
A: एकूण मूळ रक्कम
P : मूळ रक्कम
r: व्याज दर
n: वर्षात किती वेळा कंपाऊंडिंग होते
nt: एकूण वेळ

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राहुल गांधी पंजाब व हरयाणामध्ये काढणार ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांवरून आक्रमक

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातला शेतकऱ्यांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. पंजाब, हरयाणासह देशातील अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहेत. रस्त्यावर उतरून शेतकरी आपला रोष आणि विरोध व्यक्त करत आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतला असून, ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान पंजाब व हरयाणामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राहुल गांधी आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते या कायद्याबद्दल ट्विट करून टीका करत आहेत. “कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा,” असं म्हणत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत झालेल्या गदारोळाबद्दल ट्विट केलं होतं.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ही विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती. तिन्ही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर तिन्ही विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. यानंतर मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणासह देशभरात अनेक ठिकाणी संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

रेल्वे प्रवाश्यांसाठी चांगली बातमी! सणासुदीच्या हंगामात रेल्वे चालवणार आणखी 200 गाड्या

Railway

हॅलो महाराष्ट्र । सण-उत्सवांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय रेल्वे 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सणासुदीच्या काळात 200 स्पेशल गाड्या चालवण्याचा विचार करीत आहे, असे गुरुवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव यांनी सांगितले. यादव म्हणाले की, या उत्सवाच्या हंगामात रेल्वे 200 हून अधिक फेस्टिव्हल स्पेशल गाड्या चालवणार आहे. त्याचबरोबर, गरज भासल्यास किंवा जास्त मागणी असल्यास या स्पेशल गाड्यांची संख्या वाढविलीही जाऊ शकते.

12 सप्टेंबरपासून रेल्वेने 80 जादा गाड्या चालवल्या असून त्यांना क्लोन ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. यादव म्हणाले की, आम्ही विविध विभागांच्या महाव्यवस्थापकांशी बैठक घेतली असून त्यांनी स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या स्थितीचा आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे आणि सणासुदीच्या कालावधीत किती विशेष गाड्या चालवल्या ज्याव्यात यावर निर्णय घेण्यात येईल.

राज्य सरकारच्या गरजा आणि साथीच्या परिस्थितीचा विचार करता रेल्वेने प्रवासी सुविधांचा दररोज आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यादव म्हणाले की, जोपर्यंत प्रवासी गाड्यांचा प्रश्न आहे, आम्ही दररोज गाड्यांची गरज, रहदारी आणि कोविड १९ च्या परिस्थितीचा आढावा घेऊ. जेथे जेथे आवश्यकता असेल तेथे आम्ही ज्यादा गाड्या चालवू.

क्लोन केलेल्या गाड्यांबाबत यादव म्हणाले की, ऑक्युपेंसी जवळपास 60 टक्के आहे. या गाड्या जास्त मागणी असलेल्या मार्गावर चालविण्यात आलेल्या आहेत. रेल्वेचा प्रयत्न आहे कि, ज्याठिकाणी मोठी वेटिंग लिस्ट असेल त्याठिकाणी क्लोन ट्रेन चालवली जाईल. रेल्वेने असेही ठरवले आहे की जिथे जिथे क्लोन ट्रेन भरली जाईल तेथे त्या मार्गावर आणखी एक क्लोन ट्रेन चालविली जाईल जेणेकरून प्रवास्यांना वेटिंग लिस्टची वाट पाहावी लागणार नाही.

त्यांनी सांगितले की सणासुदीच्या काळात प्रत्येक व्यस्त मार्गावर एक ते दोन क्लोन गाड्या चालवल्या जातील. रेल्वेने सध्या केवळ 40 क्लोन गाड्या चालवल्या आहेत. याशिवाय सणासुदीच्या म्हणजेच दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस हि देखील ट्रॅकवर धावू शकते. IRCTC ने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

दुर्दैवी! जुळ्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

twin sister

सांगली । वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द मध्ये चार वर्षीय जुळ्या मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली. विद्या बर्गे आणि वेदिका बर्गे असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. आज सकाळच्या सुमारास या दोन मुली गावाजवळील बिरोबा मंदीरात खेळण्यासाठी गेल्या होत्या. दुपार झाली तरी मुली घराकडे आल्या नाहीत त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोधाशोध सुरु केला.

पूर्ण गाव शोधले असता त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. अखेर सायंकाळी सात वाजता त्या दोघींचे मृतदेह मंदिराजवळील एका तलावात गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्या मुलींच्या कुटुंबियांना देण्यात आली.घरच्यांनी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने दोनही मुलींचा मृतदेत पाण्या बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

दोनही मुलींचा मृतदेह कुरळप येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

जर आपणही फोन बँकिंग वापरत असाल तर सावधगिरी बाळगा! देशात वाढत आहेत सायबर फसवणूकीचे प्रकार

हॅलो महाराष्ट्र । जर आपण स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, नेट बँकिंग (Net Banking), डिजिटल बँकिंग (Digital Banking) वापरत असाल तर जरा सावधगिरी बाळगा. कारण नुकत्याच आलेल्या एनसीआरबीच्या NCRB (National Crime Record Bureau) अहवालानुसार 2019 साली भारतात सायबर फसवणूकीत (Cyber Fraud) 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार 2019 साली सायबर गुन्ह्यांच्या 44,546 घटना घडल्या आहेत. तर 2018 मध्ये 28,248 नोंद झाली.

या राज्यात फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे समोर आलेली आहेत
कर्नाटकमध्ये सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली (12,020) त्यानंतर उत्तर प्रदेश (11,416), महाराष्ट्र (4,967), तेलंगणा (2,691) आणि आसाम (2,231) . बहुतेक फसवणूक कॉम्प्युटर द्वारे होत आहेत. या अहवालानुसार 5.1 टक्के प्रकरणे ही लैंगिक हिंसाचाराशी संबंधित आहेत.

आकडेवारीनुसार महानगरांमध्ये एकूण 18,372 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यामध्ये 81.9 टक्के वाढ झाली आहे. जास्तीत जास्त प्रकरणे (13,814) कॉम्प्युटरशी संबंधित गुन्हे (आयटी कायद्याच्या कलम 66) अंतर्गतही नोंदविले गेले आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून FIR दाखल

नवी दिल्ली । हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी “मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा” असं म्हटलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने राहुल यांनी हे ट्विट केलं आहे. “मी जगातील कोणालाही घाबरणार नाही. मी कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही. मी असत्यावर सत्याने विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन. गांधी जयंतीच्या शुभेच्छा” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवर विरोधकांनीही योगी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार” आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणारं नाही. एका मुलीवर बलात्कार झाला. तिचा निर्घृण खून झाला. याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवायच नाही? ही कुठली लोकशाही आहे? हा प्रकार म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आता पैशांच्या व्यवहारावर लागू झाला टॅक्सचा नवीन नियम, कोणावर आणि कसा लागू होईल, याचा काय परिणाम होईल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । परदेशात पैसे पाठविण्यावरील कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने (Government of India) नवीन नियम बनविला आहे. हा नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून म्हणजेच आजपासून अंमलात आला आहे. अशा परिस्थितीत आपण परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलास पैसे पाठवत असल्यास किंवा एखाद्या नातेवाईकास आर्थिक मदतीसाठी पैसे पाठवत असल्यास आपल्याला 5% अतिरिक्त TCS-Tax Collected at Source भरावा लागेल.

TCS बद्दल जाणून घ्या(What is Tax Collected at Source) – फायनान्स अॅक्ट 2020 (Finance Act 2020) नुसार भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या लिबरलाइज्‍ड रेमिटन्स स्‍कीम (LRS) अंतर्गत परदेशात पैसे पाठविणाऱ्या व्यक्तीस TCS भरणे आवश्यक असतो. या LRS अंतर्गत आता आपण वर्षाकाठी 2.5 लाख डॉलर्स पाठवू शकता, ज्यावर कोणताही टॅक्स नसेल. ते टॅक्सच्या जाळ्यात आणण्यासाठी TCS द्यावे लागेल.

आयकर विभागाने कलम 206C (1G) अंतर्गत TCS ची व्याप्ती वाढवण्याचा आणि लिबरलाइज्‍ड रेमिटन्स स्‍कीम (LRS) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेमिटन्स म्हणजे देशाबाहेर पाठविलेले पैसे. हे पैसे एकतर खर्चाच्या (प्रवास, शैक्षणिक खर्च इत्यादी) किंवा गुंतवणूकीच्या स्वरूपात असू शकतात. 1 ऑक्टोबर 2020 पासून एखाद्या आर्थिक वर्षात एखाद्या ग्राहकाने 7 लाख किंवा त्याहून अधिकची रक्कम पाठविली तर त्यावर TCS लागू होईल. या नव्या नियमाचा पाया फायनान्स अॅक्ट 2020 च्या माध्यमातून घातला गेला आहे. आता आपल्याला RBI ची LRS योजना समजून घ्यावी लागेल. कारण ही योजना परदेशात पैसे पाठविण्यास सूट देते. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …

नियमांनुसार परदेशात किती पैसे पाठविले जाऊ शकतात? -LRS ही RBI ची योजना आहे. ही योजना एका आर्थिक वर्षात परदेशात मालमत्ता खरेदी, गुंतवणूक, अनिवासी भारतीयांना कर्जाचा विस्तार इत्यादीसाठी 2.50 लाखा डॉलरपर्यंत (सुमारे 1.50 कोटी रुपये) करंट अकाउंट ट्रांजेक्शंस करण्यास परवानगी देते. त्याशिवाय प्रायवेट/इंप्लॉयमेंट विझिट्स, बिझनेस ट्रिप्स, गिफ्टस, डोनेशन, मेडिकल ट्रीटमेंट तसेच जवळच्या नातेवाईकांची काळजी इत्यादींसाठी चालू आर्थिक वर्षात 2.50 लाख डॉलरपर्यंतच्या करंट अकाउंट ट्रांजेक्शंसना परवानगी देते. आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स वेबसाइटवर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वस्तूंच्या खरेदीसाठी वायर ट्रान्सफरचा देखील या योजनेत समावेश आहे. सरकारने असे पाऊल का उचलले?

सरकारला TCS चे नियम का बनवावा लागला? – सरकारने हा नियम आणण्याबद्दल केसीसी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद कोहली यांनी सांगितले की, परदेशात अनेक प्रकारच्या पेमेंट्सवर टीडीएस वजा केला जातो. त्याचबरोबर गिफ्ट, उपचार, प्रॉपर्टीत गुंतवणूक, नातेवाईकांना मदत, हॉस्पिटलना भरण्यासाठी पाठविलेले पैसे हे टीडीएस अंतर्गत येत नव्हते. या सर्वांना आरबीआयच्या एलआरएस अंतर्गत टीडीएसमधून सूट देण्यात आली आहे. वास्तविक, कोणताही भारतीय आरबीआयच्या एलआरएस अंतर्गत वर्षाकाठी अडीच लाख डॉलर्स पाठवू शकतो. हे पैसे टॅक्सच्या रडारमध्ये आणण्यासाठी TCS घेण्याचा नियम बनविण्यात आला आहे. यात अनेक प्रकारचे सूटही देण्यात आली आहे. त्याशिवाय प्रत्येकाला 5 टक्के TCS द्यावे लागतील. त्यामधून कोणत्या गोष्टी वगळल्या आहेत ते जाणून घेउयात.

नवीन कर TCS मधून कोणाला सूट मिळणार – सरकारने यामध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे, ज्या अंतर्गत परदेशात पाठविलेल्या सर्व पैशांवर हा टॅक्स लागू होणार नाही. तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी 7,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे पाठवल्यास त्यावर TCS आकारला जाणार नाही. जर शैक्षणिक कर्ज 7,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर 0.5% TCS आकारले जाईल. कोणत्याही टूर पॅकेजसाठी परदेशात पाठविलेल्या रकमेवर TCS लागू होणार नाही. कोणत्याही कामासाठी परदेशात पाठविलेल्या 7,00,000 किंवा त्यापेक्षा कमी रकमेवर TCS लागू होणार नाही, म्हणजे ही रक्कम यापेक्षा जास्त असल्यास TCS लागू होईल. तथापि, टूर पॅकेजेसच्या बाबतीच्या जास्त रकमेस देखील सूट देण्यात आली आहे.

परदेशात शिक्षण घेत असलेल्या मुलाला पैसे पाठविण्याबद्दल TCS आकारले जाईल का? शरद कोहली म्हणतात की, परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलांना पैसे पाठविण्यावरही 5% TCS आकर्षित होतील. शैक्षणिक कर्ज TCS ला 0.50 टक्के दराने आकर्षित करेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.