Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5230

रामराज्य नव्हे हे तर जंगलराज ; सामनातून योगी सरकारवर जळजळीत टीका

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. असं म्हणत शिवसेनेनं योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्या राहुल गांधींना धक्काबुक्की करणे म्हणजे सामूहिक गँगरेपचच लक्षण आहे.राहुल गांधींच्या कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे. त्यामुळे ज्यांनी देशासाठी कोणतंही बलिदान दिले नाही त्या लोकांच्या आदेशानुसार राहूल गांधींवर हल्ला केला.अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

आता उत्तर प्रदेशचे सरकार म्हणते बलात्कार वगैरे सगळे झूठ आहे. पाठोपाठ बलरामपूरमध्येही सामूहिक बलात्काराचे प्रकरण झाले, पण ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळय़ांच्या कडा ओलावल्या. बलात्कार झालाच नाही तर विरोधकांनी बोंबलायचे कशाला? असे सरकारच बोंबलत असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर टीका केली आहे.

बलात्कार झालाच नाही, तर रात्रीच्या अंधारात त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी पेट्रोल ओतून का जाळला? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी यांना अडवलेच, पण त्यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले. देशातील एका प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यास असे वागवणे, अपमानित करणे हे लोकशाहीवर ‘गँगरेप’ होत असल्याचेच लक्षण असं अग्रलेखात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

MSME क्षेत्राला मोठा दिलासा! २ कोटींपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज रद्द करण्याची केंद्राची तयारी

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) कालावधीतील (मार्च ते ऑगस्ट) व्याज रकमेवरील चक्रवाढ व्याज रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. २ कोटींपर्यंतच्या कर्जाच्या व्याज रकमेवरील व्याज रद्द केलं जाऊ शकतं असं केंद्राने कोर्टात सांगितलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ज्यांनी शैक्षणिक, गृहनिर्माण, ग्राहक वस्तू, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी कर्ज घेतलं होतं, त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. यावेळी केंद्राने परवानगीसाठी संसदेत प्रस्ताव मांडू अशी माहिती दिली. “सध्याच्या कोरोना संकटात व्याजाचं ओझं कमी करणं हा एकमेव मार्ग सरकारकडे आहे,” अशी माहिती केंद्राने प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जदाराने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती की नव्हती का हे ग्राह्य न धरता सर्वांनाच चक्रवाढ व्याज माफ केलं जाणार आहे.गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने मोरॅटोरियम कालावधीतील व्याज रकमेवरील व्याज आकारण्याविरोधातील याचिकांवरील सुनावणी ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली होती. गेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील राजीव दत्ता यांनी केंद्र सरकार अद्याप कोणताही ठोस निर्णय घेऊ शकलं नसल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, ३ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत केंद्राने मोरॅटोरियम कालावधीतील व्याज रकमेवरील चक्रवाढ व्याज माफ न करण्याचा करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टात केंद्राची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली होती. बँकिंग क्षेत्र हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून ती अजून कमकुवत होईल असे निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. व्याज रकमेवरील व्याज माफ न करण्याचा निर्णय घेताना पेमेंटचा भार कमी करण्याचं ठरवलं असल्याचं तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं.

याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सुप्रीम कोर्टात करोना संकट लक्षात घेता कर्जदारांना दिलासा देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून, बळजबरीने व्याज माफ करण्याचा निर्णय आपल्याला योग्य वाटत नाही, कारण यामुळे बँकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते असं सांगितलं होतं. याचा फटका बँकेच्या ग्राहकांनाचा बसेल असंही सांगण्यात आलं होतं.

करोना संकटामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने २७ मार्चला कर्जदारांना आर्थिक ताणातून दिलासा म्हणून, मासिक हप्त्यांची परतफेड लांबणीवर टाकण्याची मुभा देणारा निर्णय घेतला. प्रारंभी तीन महिन्यांच्या मुदतीसाठी असलेला हा निर्णय आणखी तीन महिने म्हणजे ३१ ऑगस्ट २०२० कालावधीपर्यंत वाढविण्यात आला होता. बँकांकडून मासिक हप्त्यांमधील मुद्दल अधिक व्याज यापैकी मुद्दल रकमेची वसुली लांबणीवर टाकली गेली असली तरी, न फेडलेल्या हप्त्यांमधील व्याजाची रक्कम थकीत मानून त्यावर थकलेल्या कालावधीत व्याज आकारले जाईल, अशा रीतीने ही योजना कर्जदार ग्राहकांपुढे ठेवली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राहुल गांधींचा गनिमी कावा! मोटारसायकलवरून हाथरस गाठण्याची पोलिसांना धास्ती

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र उत्तरप्रदेश पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर रोखले होते. यावेळी राहुल गांधींना उत्तरप्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की सुद्धा केली होती. त्यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र आज पुन्हा राहुल गांधी मोटारसायकलवरुन हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मागील दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान राहुल गांधी आज दुपारी पुन्हा हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदार देखील सहभागी होणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही – राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, मी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना मला पोलिसांनी अडवलं. त्यानंतर मी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

“योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे”
“योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्या बंद झाल्या पाहिजेत. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. तेव्हा आम्ही उन्नावच्या लेकीसाठी अशी लढाई लढत होतो” असं प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटणारच ; राहुल गांधींचा निर्धार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली असून उत्तरप्रदेश सरकारचा निषेद केला जात आहे. तसेच या दुर्घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राहुल गांधीनी पुन्हा एकदा हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याचा निर्धार केला आहे.

“जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “पीडित मुलीबरोबर आणि कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केलेला व्यवहार मला तर मान्य नाहीच शिवाय कोणत्याही भारतीयांना हा व्यवहार पटला नसेल,” असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

सलाम! मुंबई पोलिसांना, प्रसंगावधान दाखवत वाचविले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण

मुंबई । मुंबई पोलिसांनी प्रसंगावधान राखून एका तरुणीचे प्राण वाचविले. आत्महत्या करण्यासाठी टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढलेल्या या २० वर्षीय तरुणीचे पोलिसांनी मोठ्या हुशारीने तिचा जीव वाचवला. अंधेरीमधील कोलडोंगरी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. तरुणीला आत्महत्येपासून प्ररावृत्त करणाऱ्या पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमधील कोलडोंगरी मध्ये राहणारी २० वर्षी तरुणी महाविद्यालयात शिकते. घरगुती कारणावरून तिचे कुटुंबियांशी भांडण झाले आणि या रागातून सरिता आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर जाऊन बसली. दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर अंधेरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, भिंगर्दीवे, थिटे आणि सोनिया साळवी हे घटनास्थळी तात्काळ पोहोचले. प्रवीण जाधव यांनी त्या तरुणीला बोलण्यात गुंतवून ठेवत तिच्या जवळ पोहोचले आणि संधी मिळताच तिला कठड्यावरून आत खेचले. पोलिसांनी दाखविलेला संयम आणि प्रसंगावधान यामुळे त्या तरुणीचे प्राण वाचले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

अटल बोगद्याचे मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण ; लष्करासाठी ठरणार वरदान

atal tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात येणार आहे आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्वाचा भाग ठरणार आहे

बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (१०,०४० फूट) बनवण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांचे नाव या बोगद्याला दिले गेले आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचं अंतर ४६ किमीने कमी होणार आहे

दरम्यान, रोहंताग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वत: वाजपेयी यांनी ३ जून २००० साली केली होती. तो आता वाहतुकीसाठी तयार झाला. महत्त्वाचे म्हणजे भारत-चीनदरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे.

या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर अंतरावर टेलिफोनची सुविधा असेल. ६० मीटरवर हायड्रेंट, ५०० मीटरवर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रत्येक १ किमीवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. प्रत्येक त्याचबरोबर २५० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

धक्कादायक! मध्यप्रदेशात दलित महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांच्या जाचामुळे पीडितेची आत्महत्या

नरसिंहपूर । उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूरमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनानंतर आता मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये पीडित महिलेने बलात्काराच्या ४ दिवसांनंतर फाशी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने महिलेने हे पाऊल उचलले आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे देखील उत्तर प्रदेशातील हाथरससारखीच संतापजनक घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे.

नरसिंहपूर जिल्ह्यात एका दलित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित महिला ४ दिवस तक्रार दाखल करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. उलट पोलिसांनी पीडितेलाच शिवीगाळ करत पैसे मागितले. त्यानंतर निराश झालेल्या पीडितेने शुक्रवारी फाशी घेत आत्महत्या केली. हे प्रकरण सगळीकडे पसरू लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याच आदेश दिले. या व्यतिरिक्त एफआयआर दाखल करून न घेणाऱ्या पोलिस ठाण्याच्या प्रभाऱ्याविरोधात तक्रार नोंदवून त्याला अटक करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ही संतापजनक घटना २८ डिसेंबरला घडली. नरसिंहपूरमधील रिछाई या गावात राहणारी दलित महिला शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या तीन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबाबत तक्रार नोंद करण्यासाठी गोटिटोरिया चौकी आण चीचल पोलिस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी आपली तक्रार दाखल करून घेतली नाही, अशी पीडित महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या वागणुकीला कंटाळून शेवटी पीडित महिलेने आत्महत्या केली.

पोलिसांनी प्रथम पीडित महिलेला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पीडित महिला वैद्यकीय रिपोर्ट घेऊन पोलिस ठाण्यात गेली असता तिच्या कुटुंबीयांना ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर पीडितेला शिवीगाळ करण्यात आली आणि पैसे दिले तर कुटुंबीयांना सोडून देऊ असे पोलिसांनी सांगितल्याचा पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांनी आमच्याच विरोधात कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची तक्रार पीडितेचे पती आणि सासऱ्यांची तक्रार आहे. महिलेच्या आत्महत्येनंतर सामूहिक बलात्काराची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, एक आरोपी फरार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

तांब्याच्या पेल्यात पाणी पिण्याचे काय आहेत फायदे

copper glass

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । तांब्याच्या वस्तू आता सहसा कोणाच्या घरात पाहायला मिळत नाहीत. पूर्वीच्या काळात सर्व घरात तांबे याच्या वस्तू पाहायला मिळायच्या . पण आता सहसा या वस्तू कोणी ठेवत नाही. कारण या भांड्यांबरोबर ऑक्सिजन ची प्रक्रिया होते. आणि तांब्याची भांडी काळी पडतात. त्यामुळे सतत ते घासावे लागतात. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने त्याची जागा काचेची,स्टील ची भांडी यांनी घेतली . सर्वत्र त्या भांड्याच्या वापरास सुरुवात झाली. परंतु पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास आरोग्यास त्यास फायदा होतो. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. तांब्यामुळे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते. तसेच आपला मेंदू तल्लक होऊन योग्य प्रकारे काम करतो. तांब्यामध्ये ऍन्टिऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे तांबे हे उत्तम ऍन्टिएजिंग आहे. त्यामुळे पचन क्रिया सुद्धा सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे हाडे व स्नायू मजबूत होतात आणि रक्तदाब समप्रमाणात होण्यास मदत होते. आपल्या शरीराला काही प्रमाणात लोहाची गरज असते. ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पूर्ण करणे गरजेचे असते. आपल्या शरीराची गरज भागवण्यासाठी वेगवगेळ्या पदार्थांबरोबर इतर काही उपाय शोधले जातात. ऍन्टिइनप्लमेट्री असल्यामुळे संधीवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते. अशा प्रकारे तांब्याचा वापर करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. तांब्यामुळे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते. तसेच आपला मेंदू तल्लक होऊन योग्य प्रकारे काम करतो. तांब्यामध्ये ऍन्टिऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे तांबे हे उत्तम ऍन्टिएजिंग आहे. त्यामुळे पचन क्रिया सुद्धा सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे हाडे व स्नायू मजबूत होतात आणि रक्तदाब समप्रमाणात होण्यास मदत होते. आपल्या शरीराला काही प्रमाणात लोहाची गरज असते. ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पूर्ण करणे गरजेचे असते. आपल्या शरीराची गरज भागवण्यासाठी वेगवगेळ्या पदार्थांबरोबर इतर काही उपाय शोधले जातात. ऍन्टिइनप्लमेट्री असल्यामुळे संधीवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते. अशा प्रकारे तांब्याचा वापर करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

देशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली; उमा भारतींचा घरचा आहेर

नवी दिल्ली । हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.  नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. देशात रामराज्य आणण्याचा वचन दिलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे.

योगी आदित्यनाथ हे एक पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये असंही आवाहन उमा भारती यांनी केलं आहे.

“मी करोना वॉर्डमध्ये अत्यंत अस्वस्थ आहे. मी करोना पॉझिटिव्ह नसते तर आज त्या गावातील त्या पीडितेच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरी बसलेले असते.” असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी आहे त्यामुळे तुम्ही माझा सल्ला ऐकावा असंही आवाहन उमा भारती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावणार- खा. छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । मराठा आरक्षणासोबतच धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं आश्वासन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिलं आहे. कोल्हापूरात धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद पार पडली, या परिषदेनंतर धनगर समाजाच्य नेत्यांनी संभाजीराजेंची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी आपली भूमिका सांगितली.

खासदार संभाजीराजे म्हणाले की, धनगर समाजाने गोलमेज परिषद कोल्हापूरात घेतली याचा आनंद, छत्रपती घराणे आणि धनगर समाजाचं जिव्हाळ्याचं नातं आहे. चौंडीच्या कार्यक्रमातही मी धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आजदेखील धनगर समाजाचे नेते राम शिंदे भेटण्यासाठी आले, त्यांच्याकडून प्रश्न समजून घेतला आहे. केंद्र सरकारकडे धनगर समाजाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहे. त्याचसोबत बहुजनांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, धनगर आणि मराठा समाज एकत्र आहोत असंही त्यांनी सांगितले.

याशिवाय कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद झाली, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचा वारसा छत्रपती संभाजीराजे चालवतायेत, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे. मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे पुढाकार घेत आहेत, त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणावरही संभाजीराजेंनी लक्ष घालावं, मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन संभाजीराजेंनी धनगर समाजाला दिल्याचं राम शिंदे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.