Thursday, December 18, 2025
Home Blog Page 5245

आता चेकद्वारे पेमेंट करण्याचा मार्ग बदलणार, 1 जानेवारीपासून लागू होणार RBI चा नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी एक नवीन सिस्टम आणत आहे. RBI ने त्याचे नाव ‘Positive Pay System’ असे ठेवले आहे. त्याअंतर्गत चेक पेमेंटद्वारे 50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम भरल्यावर काही महत्त्वाच्या माहितीची पुष्टी करावी लागेल. मात्र, या सुविधेचा लाभ घेणार आहे की नाही हे खातेधारकावर अवलंबून असेल. परंतु बँका चेकद्वारे 5 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम भरण्यासाठी ही सुविधा अनिवार्य करेल अशी शक्यता आहे.

Positive Pay System कसे काम करेल?
Positive Pay System अंतर्गत जो चेक देईल त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, पैसे देणारी व्यक्ती (Payee) व पेमेंटची रक्कम इत्यादीविषयी पुन्हा माहिती द्यावी लागेल. चेक देणारी व्यक्ती SMS, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकते.

यानंतर, चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची उलट तपासणी केली जाईल. त्यात काही दोष आढळल्यास त्यास ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ (CTS – Cheque Truncation System) च्या सहाय्याने ड्रॉ बँक (ज्या बँकेत चेक पेमेंट करायचे आहे) आणि प्रेझेटिंग बँक (ज्या बँकेतून चेक देण्यात आला आहे) त्यावर चिन्हांकित करून माहिती दिली जाईल. अशा परिस्थितीत आवश्यक ती पावले उचलली जातील असे RBI ने म्हटले आहे. त्याच प्रकारे, आणखीही बरेच काही आहेत.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) Positive Pay System साठी CTS मध्ये एक नवीन सुविधा विकसित करेल. यानंतर ती सर्व बँकांना उपलब्ध करुन दिली जाईल.

लोकांना जागरूक करण्यावर भर
रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, 1 जानेवारी 2021 पासून ही Positive Pay System लागू केली जाईल. यासह लोकांना या फिचर विषयी लोकांना माहिती देण्यासाठी पुरेशी जागरूकता वाढविण्याचा सल्ला बँकांना देण्यात आला आहे. बँका SMS अलर्टद्वारे, शाखा, एटीएम, वेबसाइट्स आणि इंटरनेट बँकिंगद्वारे हे करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

कोरोनानंतर आणखी एका विषाणूचा धोका; ICMRकडून सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली । कोरोना नावाच्या विषाणूने घातलेला धुडगूस आजही कायम आहे. चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोनाने साऱ्या जगाच्याच नाकीनऊ आणले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. आजही दिवसाला एक लाखाच्या आसपास रुग्ण देशात सापडत आहेत. या महामारीने झालेले आर्थिक नुकसान दुरगामी आहे. मात्र अशातच आता नव्या व्हायरसचा शोध लागला आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी कॅट क्यू व्हायरस (CQV) नावाचा एक विषाणू शोधून काढला आहे. या विषाणूमध्ये देशात रोगाचा प्रसार करण्याची क्षमता आहे. तसेच, हे विषाणू आर्थ्रोपॉड-जनित विषाणूंच्या श्रेणीमध्ये येतात. ते कुलेक्स नावाच्या डासांच्या व्यतिरिक्त डुकरांमध्ये देखील आढळतात. वृत्तानुसार, चीन आणि व्हिएतनाममधील लोक मोठ्या प्रमाणावर या सीक्यूव्ही विषाणूमुळे पीडित असल्याचे आढळले आहे. भारतात सुद्धा सीसीक्यूपासून होणारा रोग पसरण्याची शक्यता आहे.

भारतात दोन लोकांच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडीज आढळले आहेत. आयसीएमआरच्या वैद्यकीय जर्नल आयजेएमआरच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही नमुने कर्नाटकात २०१४ आणि २०१७ मध्ये घेण्यात आले होते. आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, जर हा विषाणूचा प्रसार झाला तर सार्वजनिक आरोग्यावर संकट उद्भवू शकते. दोन्ही व्यक्तींच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीसीक्यू आयजीजी अँटीबॉडीज सापडल्यावर डासांमधील सीक्यूव्हीच्या रेप्लिकेशन म्हणजेच संख्या वाढविण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यात आली. संशोधकांच्या मते, हे सूचित करते की, भारतात सीक्यूव्ही-जनित रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बचावात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांना सीरमच्या नमुन्यांची तपासणी आणि चाचणी करणे आवश्यक आहे.

सीक्यूव्ही विषाणूचे प्राथमिक होस्ट डुक्कर आहेत आणि याचा प्रसार करणाऱ्या डासांमुळे लक्षात येते की, भारतात ऑर्थोबुनिया विषाणू गंभीर आरोग्याच्या संकटाला कारणीभूत ठरू शकते, असे आयसीएमआरच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. आयसीएमआरने सांगितले की, मानवी सीरम नमुन्यांमध्ये अँटी सीव्हीसी आढळल्यानंतर भारतातील डासांमधील त्याचे वागणे समजण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रजातींचे परीक्षण केले गेले. या तपासणीत असे दिसून आले आहे की, भारतात आढळणारे डास विषाणूच्या प्रति संवेदनशील आहेत आणि सहज संक्रमित होऊ शकतात. हे डास इतर डुकरांना आणि मानवांमध्ये देखील संसर्ग पसरवू शकतात.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, सीक्यूव्हीसाठी मॉलिक्युलर आणि सेरोलॉजिकल तपासणी विकसित करण्याची आवश्यकता आहे. लोकांव्यतिरिक्त डुकरांची तपासणी आणि डासांमधील याचे रेप्लिकेशन देखील तपासणी आवश्यकता आहे. असे यासाठी केले पाहिजे की, जेणेकरून संकट गंभीर होण्यापूर्वी आवश्यक तयारी केली जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

कृषी कायद्यांना राज्य सरकारचा विरोध; अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरु

मुंबई । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना महाराष्ट्रात विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार कृषी कायद्यांविषयीचे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी विषयक कायदे संसदेत मंजूर होण्याआधी केंद्र सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यादेश जारी केले होते. हे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने १० ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने या अध्यादेशाचे नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात कायद्यात रुपांतर केले आहे. मात्र हे कायदे राज्यात लागू न करण्याची भूमिका महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतली आहे. तर शिवसेनेचाही या कायद्यांना विरोध आहे.

त्यामुळेच १० ऑगस्ट रोजी अध्यादेश लागू करण्याबाबत जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. येत्या एक दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जमिनीच्या मशागतीसाठी उपयुक्त रोटावेटरची देखभाल कसे करायचे जाणून घेऊया 

Rotavater

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली सर्वच क्षेत्रात बऱ्याचशा कामांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे बरीचशी कामे यंत्राच्या साह्याने केले जातात. काही यंत्र बैलचलीत काही स्वयंचलित आणि ट्रॅक्‍टरचलित यंत्रांचा यामध्ये समावेश आहे.  ट्रॅक्टर चलीत यंत्रांमध्ये रोटावेटर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जमिनीची नांगरट केल्यानंतर निघालेली ढेकूळ फोडण्यासाठी रोटावेटरचा वापर होतो हे सर्वांनाच ज्ञात आहे. रोटावेटरचा वापर केल्याने जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते.याचा उपयोग बऱ्याचदा केला जातो मात्र त्याची देखभाल केली जात नाही , आज रोटावेटरच्या देखभालीसंदर्भात जाणून घेऊया.

रोटावेटरच्या सर्व फिरणाऱ्या भागांना वंगण द्यावे व सर्वे ग्रीसिंग पॉईंट्स ग्रीस लावावे. गिअर बॉक्समधील वंगन ऑइलची पातळी तपासावी आणि ते कमी असल्यास त्यात योग्य ग्रेडचे ऑइल घालावे. ऑइल  संपले असल्यास ते बदलावे. रोटावेटरची पाती सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पाती वाकडी किंवा मोडली असल्यास गरजेनुसार ती बदलावीत किंवा दुरुस्त करावी. चेन पॉकेट व चेन केसमधील तेल तपासावे आणि साडेचारशे तास वापरल्यावर तेल बदलावे. चेनचा ताण योग्य स्थितीत ठेवावा. रोटावेटर वापरण्यापूर्वी त्याची सर्व नट बोल्ट घट्ट आवळावीत.

रोटावेटरचा वापर करण्यापूर्वी काही प्राथमिक तपासण्या करून घ्याव्यात. जसे की, पोलादी पाते व मुख्य चौकटीचे नट बोल्ट तपासून घट्ट करावेत. गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासून आवश्यक असल्यास तेल टाकावे. तेल टाकीच्या तळाशी असलेल्या लेव्हल काठीच्या साह्याने तपासून ऑइलची पातळी योग्य प्रमाणात तपासून तेलाची पातळी योग्य प्रमाणात ठेवावी ठेवावी.  नेहमी पुरेशी अतिरिक्त पाती व शिफारस केलेले नट बोल्ट ट्रॅक्टर सोबत दिलेल्या अवजारांच्या पेटीत आहेत याची खात्री करून घ्यावी. रोटावेटर ट्रॅक्टरला जोडताना सर्व लिंक्स व्यवस्थित जोडल्या गेल्या आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी.

तसेच प्रत्यक्ष शेतात काम सुरू असतानाही काही काळजी घ्यावी  लागते. रोटावेटर शेतात वापरताना अथवा वाहतुकीच्या वेळी तो १० ते १५ सेंटिमीटर पेक्षा सहसा जास्त उचलू नये.कारण पीटीओ शाफ्ट व कार्डेन शाफ्ट यामधील कोण ती संशोधनपेक्षा जास्त असता कामा नये. पात्यांचा फिरण्याचा वेग पीटीओच्या वेगावर आधारित असल्याने एक्सलेटर वाढवून तो आवश्यक तेवढा ठेवावा. माती कोरडी व काहीशी टणक असेल तर मात्र पहिल्या लो गियरमध्ये ट्रॅक्टर चालवावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं राम मंदिराचं श्रेय, मोदींबाबत केलं ‘हे’ धक्कादायक विधान

नवी दिल्ली ।  अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या योगदानावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असं कोणतही काम केलेलं नाही, असं सांगत स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना राम मंदिराचं श्रेय दिलं आहे. टीव्ही ९ भारतवर्ष वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

“पंतप्रधानांचं यामध्ये कोणतंही योगदान नाही. राम मंदिर प्रकरणात सर्व चर्चा आम्ही लोकांनी केली आहे. सरकारच्या वतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, जे मला माहिती आहे किंवा ज्यामुळे म्हणू शकतो की, निर्णय आला. मूळात ज्यांनी यात काम केलं आहे, त्यांचं मी नावं घेतलं आहे. यात पहिलं नावं राजीव गांधी यांचं आहे,” असं स्वामी म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील आमदाराच्या घरावर पोलिसांची धाड; अलिशान मोटारी, किमती वस्तू जप्त

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे । पुण्यातील एका आमदाराच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. एका सहकारी बॅंकेसंदर्भातील घोटाळ्याबाबत हे छापे असल्याचे सांगण्यात आले. यावर पोलिस लवकरच अधिकृत माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले.

याआधी एका सहकारी बॅंकेतील तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी सदर आमदारावर आमदारावर गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार आहेत. ही धाड संपत्ती जप्त करण्यासाठी झाली की प्रकरणाच्या तपासासाठी झाले, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

पोलिसांच्या या धाडीत संबंधित आमदाराच्या आलिशान गाड्या, किमती वस्तू यावर जप्ती आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. यात पुणे जिल्हा परिषदेचा माजी पदाधिकारी असलेल्या नेत्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. या बँकेचे रिझर्व्ह बँकेने 2018-19 चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

सुपर ओव्हर मध्ये ईशान किशनला का नाही पाठवलं?? रोहित म्हणतो…

ishan kishan and rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये काल मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये रोमांचक सामना झाला.अटीतटीच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात बंगलोरनं मुंबईला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ईशान किशन आणि कायरन पोलार्डच्या 119 धावांच्या झुंजार भागीदारीनंतरही मुंबईचा संघ विजयापासून अवघी एक धाव दूर राहिला. ईशाननं 99 तर पोलार्डनं नाबाद 60 धावा फटकावल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मुंबईला सात धावा करता आल्या. बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि डिव्हिलियर्सनं सात धावा पार करुन यंदाच्या हंगामातील दुसरा विजय साजरा केला.

मुंबईच्या ईशान किशननं बंगलोरविरुद्ध 99 धावांची धडाकेबाज खेळी उभारली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. ईशाननं 58 चेंडूत 2 चौकार आणि तब्बल 9 षटकारांसह 99 धावा फटकावल्या. असे असे असूनही कर्णधार रोहित शर्माने त्याला सुपर ओव्हरमध्ये ईशानला फलंदाजीसाठी पाठवले नाही त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, सामना संपल्यानंतर रोहितने ईशानला फलंदाजीसाठी का पाठवले नाही याचा खुलासा केला.

सुपर ओव्हरमध्ये ईशान किशनला फलंदाजीसाठी न पाठवल्याबद्दल रोहित म्हणतो, आम्ही पहिला विचार केला होती की सुपर ओव्हरमध्ये किशनला फलंदाजीसाठी पाठवावे. पण खूप वेळ फलंदाजी केल्यामुळे त्याला फ्रेश वाटतं नव्हचं, म्हणूनच आम्ही हार्दिकला फलंदाजीसाठी पाठवले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

30 सप्टेंबरपर्यंत ‘ही’ 5 महत्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र । इनकम टॅक्स ते आधार कार्डपर्यंतची ‘ही’ सर्व महत्त्वपूर्ण कामे निकाली काढण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ही सर्व कामे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे.

(1) 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा टॅक्स संदर्भातील ‘हे’ काम- Income Tax Filling Deadline for AY 2019-20/CBDT: आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा दिलासा देताना शेवटची त्याची तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. त्याची अंतिम मुदत आता जवळ येत आहे. जर करदात्याने या अंतिम मुदतीद्वारे रिटर्न भरला नाही तर तो रिटर्न भरू शकणार नाही सामान्यत: देय तारखेपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाइल न केल्याबद्दल दंड आकारला जातो. समजा RTI दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै असेल आणि आपण 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न फाइल केला नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

(2) आधार कार्ड रेशन कार्डाशी लिंक करा – आपले आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केले नसेल तर घाई करा कारण आता 30 सप्टेंबरनंतर तुम्हाला PDS अंतर्गत स्वस्त धान्य मिळणार नाही. म्हणून, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत धान्य मिळविण्यासाठी, आपल्यास रेशन कार्डसह आपले आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. रेशन कार्डला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे, म्हणजेच या कामासाठी आपल्याकडे आजचाच दिवस आहे.

(3) फ्री एलपीजी कनेक्शन उपलब्ध होणार नाही – प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत (PMUY) फ्री गॅस कनेक्शन मिळण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2020 रोजी संपत आहे. आधीच कोरोना संसर्गामुळे केंद्र सरकारने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेची (PM Ujjwala Yojana) तारीख वाढविली होती. या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर वेळ न गमावता 30 सप्टेंबरपूर्वी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी pmujjwalayojana.com वर जाऊन फॉर्म डाउनलोड करुन तो जवळच्या गॅस डीलरकडे जमा करा.

(4) स्वस्त दरात घरे खरेदी करण्याची संधी – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक हजारो मालमत्तांचा लिलाव करणार आहे. ज्यांना स्वस्त दरात घर विकत घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे खास आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अशा लोकांना स्वस्त घरे, भूखंड किंवा दुकाने इत्यादी खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. यासाठी SBI तर्फे 30 सप्टेंबर रोजी एक मेगा ई-ऑक्शन (e-auction) आयोजित केला जाईल.

(5) 30 सप्टेंबरनंतर टीव्ही खरेदी करणे महाग होईल – 1 ऑक्टोबरपासून टीव्ही खरेदी करणे देखील महाग होईल. मीडिया रिपोर्टनुसार, टीव्हीच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या ओपन सेल्सच्या आयातीवरील 5 टक्के सीमाशुल्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी सरकारने एक वर्षाची सूट दिली होती, जी 30 सप्टेंबर रोजी संपेल. त्यामुळे टीव्हीची किंमत 600 रुपयांवरून 1,500 रुपयांवर जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आता स्टेशनवर पाहुण्यांना घ्यायला किंवा सोडायला येणाऱ्यांकडून Railway घेणार ‘हे’ शुल्क

Railway

हॅलो महाराष्ट्र । रेल्वे (Indian Railway) आता लवकरच प्रवाशांकडून यूज़र चार्ज (User Charges) वसूल करण्याची तयारी करत आहे. हे शुल्क 10 रुपयांपासून ते 35 रुपयांपर्यंत असू शकते. रेल्वेने यासाठीच आपला प्रस्ताव तयार केला असून तो मंत्रिमंडळाने मंजूर करताच अंमलात आणला जाईल. सध्या देशभरातील सुमारे एक हजार स्थानकांवरून गाड्या पकडण्यासाठी हे शुल्क आकारले जाईल. याशिवाय या स्थानकांवर पाहुण्यांना घ्यायला येणाऱ्या किंवा त्यांना सोडायला येणाऱ्या पाहुण्यांकडूनही यूजर चार्ज आकारला जाईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बऱ्याच काळापासून याची तयारी करत होती आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे शुल्क लागू होईल असे मानले जात आहे. या प्रस्तावानुसार …

यूजर चार्जच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांकडून 10 ते 35 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. एसी वर्गाच्या प्रवाशांकडून अधिक यूज़र चार्ज आकारला जाईल:
एसी -1 साठी हे शुल्क 30 ते 35 रुपये असेल.
एसी 2 साठी 25 रुपये असेल.
एसी -3 साठी 20 रुपये असेल.

स्लीपर क्लाससाठी 10 रुपये असू शकतात.
सद्यस्थितीत रेल्वे जनरल क्लास प्रवासी व उपनगरीय प्रवाशांकडून हे शुल्क आकारणार नाही. पण जे लोक प्लॅटफॉर्मवर पाहुण्यांना घ्यायला किंवा सोडायला येतील त्यांना प्लॅटफॉर्मच्या तिकिटाव्यतिरिक्त सुमारे पाच रुपये वेगळा यूजर चार्ज द्यावा लागेल.

एवढेच नव्हे तर उपनगरीय प्रवाश्यांचा मासिक पासही महाग करण्याचा विचार रेल्वे करीत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार उपनगरीय गाड्यांचे भाडे बऱ्याच काळापासून वाढविण्यात आलेले नाही, त्यामुळे आता त्यांचे मंथली सीज़न टिकट (MST) 5 रुपयांनी महाग होऊ शकते.

वास्तविक, रेल्वे स्थानकांच्या रिडेवलपमेंटची योजना तयार केली गेली आहे. सुरुवातीला 50 रेल्वे स्थानक, हॉटेल, मॉल्स, आॉफिस स्पेस, फूड प्लाझा, रेस्टॉरंट्स इ. मधील प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ केली जाईल.

यापैकी अनेक स्थानकांच्या रिडेवलपमेंटच्या योजनेतही अनेक खासगी कंपन्यांनी रस दाखविला आहे. रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष व्ही.के. यादव यांच्या म्हणण्यानुसार, ज्या स्थानकांवर पीपीपी तत्त्वावर रिडेवलपमेंट केले जाईल, तेथे यूजर चार्ज खासगी भागीदारांना वसुली करण्यास परवानगी देण्यात येईल. भारतीय रेल्वेमध्ये जवळपास 7500 रेल्वे स्थानके असून सध्या सुमारे 1 हजार रेल्वे स्थानकांवर यूजर चार्ज आकारला जाणार आहे.

मात्र, सामान्यत: विमानतळासारख्या ठिकाणांचे रिडेवलपमेंट केल्यानंतर, यूजर चार्ज वसूल केला जातो किंवा रस्ता सुधारल्यानंतर टोल चार्ज आकारले जाते. परंतु रिडेवलपमेंटपूर्वीच यूजर चार्ज आकारले जाण्याची ही कदाचित पहिली वेळ असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Loan EMI Moratorium: सर्वसामान्यांना मिळेल दिलासा, सरकार लवकरच घेणार EMI वर सूट देण्याबाबत निर्णय

हॅलो महाराष्ट्र । लोन मोरेटोरियम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने अधिक वेळ मागितला आहे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी 5 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे. केंद्राने सोमवारी कोर्टाकडे आणखी 3 दिवसांची मुदत मागितली आहे. कोर्टासमोर हा तपशील ठेवण्यासाठी सरकारला आणखी काही कालावधी हवा आहे. या प्रकरणात केंद्र सरकार 1 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करू शकते. आरबीआयने मार्च महिन्यात 3 महिन्यांसाठी लोन मोरेटोरियम सुरू केली, नंतर पुढील 3 महिन्यांसाठी ते 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आले. परंतु मागील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबरपर्यंत आणि आता 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली.

पॅनेलची स्थापना – सरकारच्या प्रतिज्ञापत्रात व्याजवरील व्याज हटविणे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार मोरेटोरियमचा कालावधी वाढविणे या संदर्भात केंद्र आपले मत मांडू शकते. महर्षि समितीच्या शिफारशींवरही सरकार निर्णय घेऊ शकते. केंद्राने म्हटले होते की, रिझर्व्ह बँकेच्या सध्याच्या नियमांमुळे मोरेटोरियमचा कालावधी हा दोन वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो. कोविड -१९ या साथीमुळे स्थगित हप्त्यांमध्ये बँकांकडून स्थगित हप्त्यावर घेतलेल्या व्याजप्रश्नावर लक्ष देण्यासाठी केंद्राने माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राजीव महर्षि यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमली आहे.

10 सप्टेंबर रोजी सरकार आणि आरबीआयच्या वतीने बाजू मांडताना तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितले की, ते व्याज कमी करू शकत नाहीत, परंतु पेमेन्टचा दबाव कमी करेल. मेहता म्हणाले होते की, बँकिंग क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा आधार आहे आणि अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्याचा निर्णय घेता येत नाही. मात्र, या वेळी त्यांनी असा विश्वासही व्यक्त केला की, समस्या सोडवणारे सर्व लोक बरोबर आहेत. प्रत्येक क्षेत्राच्या परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे, परंतु बँकिंग क्षेत्रानेही काळजी घेणे आवश्यक आहे. तुषार मेहता म्हणाले की मोरेटोरियमचा हेतू हा नव्हता की व्याज माफ केले जाऊ शकेल.

डीफॉल्ट खाते NPA घोषित करण्यावर बंदी- मोरेटोरियमची मुदत आता संपली आहे. अशा परिस्थितीत लोकांना बँकांकडून EMI भरण्यासाठी मेसेजेस, फोन कॉल आणि ई-मेल येऊ लागले आहेत. यामुळे लोक त्यांचे बँक लोन अकाउंट (Loan Account) ला नॉन परफॉर्मिंग एसेट (NPA) म्हणून घोषित करण्यास घाबरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जोपर्यंत सरकार एक ठोस अशी योजना देत नाही, तोपर्यंत 31 ऑगस्टपर्यंत अंतरिम आदेश लोन डिफॉल्टर्सना NPA म्हणून घोषित करू नये.

काय अडचण आहे – खरं म्हणजे लॉकडाऊनमुळे रिझर्व्ह बँकेने त्या ग्राहकांना लोन मोरेटोरियमची सुविधा दिली होती, ज्यांचे उत्पन्न कमी झाल्यामुळे EMI वेळेवर परत करू शकत नव्हते. ही सुविधा मार्च ते ऑगस्ट पर्यंत राहिली. हा तात्काळ दिलासा मिळाला कारण EMI टाळण्यासाठी हा एकच पर्याय होता. परंतु ग्राहकांना धक्का बसला की जितक्या दिवसांसाठी त्यांनी मोरेटोरियम केलेले आहे त्या काळात बँका EMI द्वारे तयार केलेल्या व्याजावर व्याज घेतील.

या प्रकरणात न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने असे सांगितले गेले आहे की, जर लॉकडाऊन लक्षात घेता सरकारने ही सुविधा दिली असेल तर ग्राहकांना व्याजावरील व्याज का द्यावे लागेल. ज्या ग्राहकांनी EMI पुढे ढकलला, आता त्यांचा EMI वाढत आहे. त्यांच्याकडून चक्रवाढ व्याज घेतले जात आहे. मग या सुविधेचा उपयोग काय आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.