Friday, December 19, 2025
Home Blog Page 5246

‘राजकीय चर्चा करणं हा काय गुन्हा आहे का?’ फडणवीसांसोबतच्या भेटीवर राऊतांचा प्रतिप्रश्न

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांना आणखी हवा देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. “जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार,” असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी भेटीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना चर्चेवर खुलासा केला आहे.

संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता, राज्यपालांना भेटावं लागेल असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

फडणवीस-राऊत भेटीवर काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
“जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेत भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार. तर ते दोन ते अडीच तास एकत्र बसले असतील तर चहा बिस्किटावर चर्चा करणार नाहीत. पण ही कोणतीही निर्णयात्मक बैठक नव्हती” असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस-राऊत भेटीमागे आपला कयास लावला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती- चंद्रकांत पाटील

मुंबई । महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मध्यावधी निवडणूक ही खरंतर कुणालाच नको असते. कारण एक निवडणूक लढणं पक्षाला काय आणि उमेदवाराला काय अवघडच असतं. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

“पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

छोट्या मुलांना सुद्धा होऊ शकतो मधुमेह

diabetes

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपण वयस्कर लोकांना आणि ३५ वयापेक्षा जास्त लोकांना मधुमेह हा आजार झाल्याचे पहिले आणि ऐकले असेल. पण लहान मुलांना हा आजार झाल्याचे कधी ऐकले नसेल . या आजारामध्ये साखरेचे प्रमाण अचानक वाढतो त्यामुळे हा लहान वयातील मुलासाठी जास्त धोकादायक आजार आहे. हा आजार हा दोन प्रकारांमध्ये मोडतो. मधुमेह टाइप १ आणि टाइप २ असे आजार आहेत.

टाइप १ या प्रकारामध्ये मधुमेह याचे इंसोलुशन तयार होत नाही. अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे हा जो आजार आहे तो कमीत कमी एक वर्षाच्या मुलापासून सर्वाना होऊ शकतो. त्यासाठी नेहमी रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे कि नाही हे तपासणे शरीरासाठी चांगले राहणार आहे. त्याची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया .

ज्या लहान मुलांना मधुमेह होतो.
— वजन हे अचानक कमी होण्यास सुरुवात होते.
— तसेच वारंवार भूक लागते.
— सतत थकवा जाणवतो.
–लघवीचे प्रमाण हे जास्त असते
— मन विचलित होते.
— शरीराची दुर्गंधी येते.

मुलांना टाइप १ ची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

1 ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसीचे नियम, आता पहिल्यांदाच आपल्याला मिळेल ‘हा’ अधिकार

हॅलो महाराष्ट्र । 1 ऑक्टोबरनंतर पॉलिसीधारकास नवीन अधिकार मिळतील. होय, आपण आपल्या विमा पॉलिसीचा प्रीमियम सलग 8 वर्षे भरला असेल, त्यानंतर कंपनी कोणत्याही कर्णाच्या आधारे हा क्लेम रिजेक्ट करू शकणार नाही. आता एकाहून अधिक रोगांवर उपचार करण्याचे क्लेम हेल्थ कव्हरमध्ये उपलब्ध असतील. मात्र, त्याचा परिणाम म्हणून प्रीमियम दरांमध्ये वाढ देखील होऊ शकते.

आपल्याला पहिल्यांदाच हा अधिकार मिळेल – एकापेक्षा जास्त कंपनीची पॉलिसी असल्यास, ग्राहकाला क्लेम निवडण्याचा अधिकार असेल. आता एका पॉलिसीच्या मर्यादेनंतर, उर्वरित क्लेम हा दुसर्‍या कंपनीकडून मिळवणे शक्य होईल. डिडक्शन झालेल्या क्लेमही दुसर्‍या कंपनीकडून घेण्याचा अधिकार देखील असेल. 30 दिवसांमध्ये क्लेम स्वीकारणे किंवा नाकारणे आवश्यक आहे. कंपनीच्या प्रोडक्टला माइग्रेशन नंतर एक जुना वेटिंग पीरियड जोडला जाईल. टेलिमेडिसिनची किंमत देखील या क्लेमचा भाग असेल.

उपचार करण्यापूर्वी आणि नंतर टेलिमेडिसिनचा वापर पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जाईल. ओपीडी कव्हरेज असलेल्या पॉलिसीमध्ये टेलिमेडिसीनची संपूर्ण किंमत उपलब्ध असेल. डॉक्टरांना टेलिमेडिसिन वापरण्याचा सल्ला देण्यात येईल. कंपन्याना मान्यता घेण्याची गरज नसेल, वर्षाची मर्यादा हा नियम लागू होईल.

अनेक रोगांना कव्हर करण्याची व्याप्ती वाढेल – सर्व कंपन्यांमध्ये कव्हरच्या बाहेरील कायमस्वरुपी रोग एकसारखेच असतात. कव्हरच्या बाहेरील कायमस्वरुपी आजारांची संख्या 17 इतकी कमी केली जाईल. आत पॉलिसीमध्ये एक्सक्लूजन 10 असेल आणि ते 17 केल्यास प्रीमियम कमी केला जाईल. आता मानसिक, अनुवांशिक रोग, न्यूरो-संबंधित सारखे गंभीर आजार, न्यूरो डिसऑर्डर, ओरल केमोथेरपी, रोबोटिक सर्जरी, स्टेम सेल थेरपीचे कव्हरदेखील उपलब्ध असतील.

आधीच रोगाच्या अटींविषयीचे नियम बदलले – पॉलिसी जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत लक्षणे पूर्व अस्तित्वातील आजार मानली जातील. प्रीमियमनंतर 8 वर्षांसाठी क्लेम रिजेक्ट केला जाणार नाही. 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीसाठी कोणताही पुनर्विचार लागू होणार नाही. 8 वर्षांपासून नूतनीकरण चुकीच्या माहितीचे निमित्त ठरणार नाही.

क्लेम मध्ये फार्मसी, इम्प्लांट आणि डायग्नोस्टिकशी संबंधित संपूर्ण खर्च मिळेल. एसोसिएट मेडिकल खर्चात वाढ झाल्यामुळे क्लेमची रक्कम कमी केली जाते. एसोसिएट मेडिकल खर्चावर क्लेम मर्यादेच्या पलीकडे रूमच्या पॅकेजमध्ये वजा केला जातो. क्लेममधील ICU च्या प्रमाणातही कोणतीही कपात केली जाणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

सोलापूरातील डान्सबारवर पोलिसांचा छापा, तीन नृत्यांगना अश्लील हावभाव करताना आढळल्या

dancebar

सोलापुर प्रतिनिधी | एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी काल रात्री उशिरा छापा टाकला, यामध्ये तीन नृत्यांगना अश्लील हावभाव करत असताना आढळून आल्या,याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह आकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकुण दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने ही पोलिसांनी जप्त केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली की हॉटेल नयन मध्ये 3 मुली आणून अवैधरित्या डान्सचा कार्यक्रम चालू केला आहे. याबाबत खात्री केली असता आमचे सहकारी नितीन पेटकर, दादासाहेब मोरे, पीएसआय सचिन माने, कॉन्स्टेबल शिंदे, सुभाष मुंढे,अमोल यादव, वाघे ,समाधान कदम,खैरे, मुल्ला यांच्यासोबत महिला पथक हॉटेलवर पाठवण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यानी दिली. त्यावेळी हॉटेल वर 3 महिला डान्स करताना आणि 9 पुरुष त्यांच्यावर पैसे उधळताना आढळले. त्यांची नावे शहानवाज शेख, जैद रमजान सय्यद, मतींन मोहम्मद रफिक शेख, राजू जाधव , अनिल सदाशिव यादव, यल्लप्पा जाधव, रफिक नवाब शेख असून हे त्या 3 महिलांवर पैसे उधळताना सापडले. हे हॉटेल भारत पांडुरंग जाधव यांच्या मालकीचं आहे. त्याच्यावर सोलापूर पोलीस स्टेशनमध्ये एकूण 18 गुन्हे आहेत. तो वेगवेगळे धंदे करत असून हॉटेल चा व्यवसाय कमी आणि अवैध धंदेच जास्त करत आहे.

दरम्यान, गेल्याच महिन्यात याच हॉटेल वर जुगाराची धाड पडली होती तर आता अवैध डान्स प्रकरणी कारवाई करण्यात आली असून आयपीसी 294, महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण कायदा अंतर्गत कलम 3 आणि कलम 8 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तसेच या 3 महिला आणि 9 पुरुषांचे 17000 किंमतिचे 9 मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी एकुण दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने ही पोलिसांनी जप्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आज डिझेल पुन्हा झाले स्वस्त, आपल्या शहरातील दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा डिझेलचे दर बदलले आहेत. आज डिझेलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची कपात करण्यात आली आहे. मात्र पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या सात दिवसांपासून पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेलची किंमत 70.63 रुपये प्रतिलिटर झाली. गेल्या दोन दिवसांत डिझेलचे दर प्रति लिटर 28 ते 30 पैसे खाली आले आहेत. मागणी कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही क्रूड तेलाची किंमत खाली येत आहे, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील इंधनावर पडतो आहे.

सप्टेंबरमध्ये पेट्रोल 1.02 रुपयांनी झाले स्वस्त
ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यात आज पेट्रोलच्या दरात निरंतर वाढ झाली. राजधानी दिल्लीतच पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 16 हप्त्यांमध्ये एकूण 1 रुपये 65 पैशांची वाढ झाली. तथापि, काही काळ ते देखील कमी झाले आहे. 21 सप्टेंबरपर्यंत तो प्रतिलिटर अंदाजे 1.02 रुपयांनी कमी झाला आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या
दिल्ली पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.63 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.74 रुपये आणि डिझेलची किंमत 77.04 रुपये आहे.
कोलकाता पेट्रोल 82.59 रुपये तर डिझेल 74.15 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नई पेट्रोल 84.14 रुपये तर डिझेलची किंमत 76.10 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 81.58 रुपये तर डिझेल 71.14 रुपये प्रति लिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 81.48 रुपये आणि डिझेल 71.05 रुपये प्रति लिटर आहे.
पटना पेट्रोल 73.73 रुपये तर डिझेल 76.24 रुपये प्रति लिटर आहे.
चंदीगड पेट्रोल 77.99 रुपये आणि डिझेल 70.33 रुपये प्रति लिटर आहे.

अशा प्रकारे आपल्या शहरातील आजचे दर तपासा
पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर कसे माहित होतील. इंडियन ऑईल ग्राहक RSP वर सिटी कोड लिहून 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात तर बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि त्यास 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत कळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

धक्कादायक! रेल्वे रेस्ट हाऊसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोन अधिकाऱ्यांना अटक

भोपाळ । रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ रेल्वे स्थानकातील रेस्ट हाऊसमध्ये रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेल्वे अधिकाऱ्याला अटक केली आहे. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी रेल्वेचे कर्मचारी असल्याचे उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. तसेच रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

रेल्वेचे पोलीस अधीक्षक हितेश चौधरी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील महोबा येथील २२ वर्षीय तरुणी आणि भोपाळ रेल्वे मंडळाचे सुरक्षा सल्लागार पदावर कार्यरत ४५ वर्षीय राजेश तिवारी यांची सोशल मीडियावर ओळख झाली. तिवारीने तिला नोकरीचे प्रलोभन देऊन भोपाळला बोलावले. तरुणी शनिवारी सकाळी भोपाळ रेल्वे स्थानकात पोहोचली. त्यावेळी त्याने तिला स्थानकातील व्हीआयपी रेस्ट हाऊसमध्ये थांबवले.

तिवारी दुपारच्या सुमारास आपल्या एका सहकारी कर्मचाऱ्यासोबत तरुणीला भेटण्यासाठी आला. तिला काहीतरी प्यायला दिले. त्यात गुंगीचे औषध होते. ते प्यायल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर सदर तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली राजेश तिवारी याला अटक केली आहे. तर अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. तो सुद्धा रेल्वे कर्मचारी आहे.
या घटनेचा अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राज्यातील सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या; असे आहे सुधारित वेळापत्रक

मुंबई । राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात येत होती. आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आता या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता, तारखांमध्ये पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे.

सुधारित सीईटी वेळापत्रक : एलएलबी (पाच वर्षे) – ११ ऑक्टोबर, एलएलबी (तीन वर्षे) – २ आणि ३ नोव्हेंबर, बीए/ बीएस्सी, बीएड इंटिग्रेटेड – १८ ऑक्टोबर, बीएड/एमएड सीईटी – २७ ऑक्टोबर, एमपीएड सीईटी – २९ ऑक्टोबर, बीपीएड – ४ नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट ५ ते ८ नोव्हेंबर, एमएड – ५ नोव्हेंबर, एम-आर्च सीईटी – २७ ऑक्टोबर, एम- एचएमसीटी – २७ ऑक्टोबर, एमसीए – १० ऑक्टोबर — २८ ऑक्टोबर, बी-एचएमसीटी – १० ऑक्टोबर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

मुंबई । संपूर्ण राज्य कोरोनाने ग्रासले आहे. सामान्य नागरिकांपासून मंत्र्यांनाही कोरोनाची लागण होण्याची प्रकरण समोर आली आहेत. आता कोरोना संक्रमित झालेल्या मंत्र्यांच्या यादीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचाही समावेश झाला आहे. खुद्द उदय सामनात यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देत आपली कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याचे सांगितलं आहे.

”गेले १० दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.” असं उदय सामनात यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जनतेचे प्रेम व सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

चिंताजनक! मागील ३६ तासात राज्यातील १८९ पोलीस कोरोनाबाधित, तर ४ जणांचा मृत्यू

मुंबई । लॉकडाउनकाळापासून कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसही महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या ३६ तासांत राज्यातील तब्बल १८९ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२ हजार ८१८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी सध्या ३ हजार १८८ जणांवर उपचार सुरू आहेत तर १९ हजार ३८५ पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर २४५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

राज्यात काल रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा अधिक आहे. १९ हजार ९३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ११ हजार ९२१ रुग्ण वाढलेयत. सोमवारी १८० जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा १३ लाख ५१ हजार १५३ वर गेला आहे. तर आजवर राज्यात कोरोनानं ३५ हजार ७५१ जणांचा बळी गेला आहे. १० लाख ४९ हजार ९४७ जण आजवर राज्यात कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.