Friday, December 19, 2025
Home Blog Page 5248

रामदास आठवलेंनी दिली शरद पवारांना भन्नाट ऑफर, म्हणाले..

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली आहे. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असंही विधान केलं होतं. मात्र, आता शरद पवारांनीच NDA मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शरद पवार यांना दिली आहे.

राजकीय वर्तुळातील आरोप- प्रत्यारोप आणि भूमिका पाहता आमची दोस्ती अशी आहे की त्यांना तिकडे आणि मला इकडे करमत नाही, तर पवारांनीच इथं यावं.तसं झाल्यास पवारांना पुढे मोठं पद मिळू शकतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र मिळू शकतो, असं वक्तव्य करत आठवलेंनी सर्वांचंच लक्ष वेधलं. जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांना राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं. शिवसेनेसोबत राहण्यात काहीच फायदा नाहीये असं आठवले यांनी म्हटलं.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलं. रामदास आठवले यांनी याप्रकरणावर बोलत असताना, शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याची विनंती केली आहे.

याशिवाय त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासाठीचा एक पर्यायही सुचवला. ज्यामध्ये त्यांनी एक वर्ष उद्धव ठाकरे आणि एक वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची दुरा सांभाळावी असं म्हणत शिवसेनेनं महायुतीत पुन्हा यावं असाच सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. आता आठवलेंनी दिलेल्या या प्रस्तावांवर सध्या महाविकासआघाडीत एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आता शेअर बाजारातही होणार Paytm चे वर्चस्व! सर्वांसाठी सुरु केली स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिस, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम (One97 Communications) ची वेल्थ मॅनेजमेंट कंपनी पेटीएम मनीने देशातील प्रत्येकासाठी स्टॉक ब्रोकिंग एक्सेस उघडला आहे. या आर्थिक वर्षात 10 लाखाहून अधिक नवीन गुंतवणूकदारांची भर घालण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. शेअर बाजारात वाढणारी लोकांची आवड पाहून त्यांची सिस्टम सुकर केली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. यासह डिलिव्हरी ऑर्डरवर कंपनी झिरो ब्रोकरेज आणि इंट्राडेसाठी केवळ 10 रुपये आकारत आहे. कंपनी डिजिटल केवायसीमार्फत लोकांचे पेपरलेस अकाउंट उघडत आहे.

कंपनी भारतातील सर्वात व्यापक ऑनलाइन वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म (online wealth management platform) बनण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून सर्वसामान्यांसाठी आर्थिक समावेश (financial inclusion) असू शकेल.

पेटीएमच्या मते, पेटीएम मनीला early access program अंतर्गत 2.2 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची नोंदणी मिळाली. यापैकी 65% युझर्स हे 18 ते 30 वर्षे या वयोगटातील आहेत. ठाणे, गुंटूर, बर्धमान, कृष्णा आणि आग्रा यासारख्या छोट्या शहरांतील लोकांना नोंदणीसाठी आकर्षित करणारे पेटीएम मनी मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि अहमदाबाद यासारख्या टियर 1 शहरांमध्ये पोहोचले आहे.

पेटीएम मनीने आपला व्यवसाय सुरू केल्याला दोन वर्षे उलटली आहेत. कंपनीच्या एकूण युझर्सपैकी 70% फ़र्स्ट टाइम इनवेस्टर्स आहेत. तर 60 टक्के छोट्या शहरांतील आहेत. सध्या पेटीएम मनी दररोज 20 कोटी रुपयांच्या डायरेक्ट म्युच्युअल फंडाची विक्री करते. हे राष्ट्रीय पेन्शन योजना आणि स्टॉकची ऑफर देखील देते. पेटीएम मनीचे सीईओ वरुण श्रीधर आहेत. ते म्हणाले की,”आमचे ध्येय आहे की, लाखो भारतीयांना आत्मनिर्भर भारत याखाली वेल्थ सर्विस मिळू शकेल. गेल्या दोन वर्षात आम्ही छोट्या शहरांमधून अनेक गुंतवणूकदारांची भर घालत आहोत. त्यांना इनोवेटिव्ह आणि पर्सनलाइज्ड सर्विस दिली गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! साखर निर्यातीसाठी सरकार देत आहे 6,268 कोटींचे अनुदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली असून साखर कारखान्यांना त्यांच्या साखरेच्या कोट्याची निर्यात (Mandatory Export) करण्यासाठीची अंतिम मुदत यावर्षी तीन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, साखर कारखाने आता डिसेंबर 2020 पर्यंत साखर निर्यात करू शकतील. अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, सप्टेंबरमध्ये संपलेल्या 2019-20 च्या विपणन वर्षासाठी जास्तीच्या साखरेची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यातून 60 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला सरकारने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर सरकार साखर निर्यातीसाठी 6,268 कोटी रुपयांचे अनुदानही देत आहे. यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना उसाची थकबाकी भरण्यास मदत होईल.

साखर कारखान्यांमधून आतापर्यंत 56 लाख टन साखर सोडण्यात आली आहे
अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोध कुमार सिंह म्हणाले की, 60 लाख टनांपैकी 57 लाख टन साखरेचा करार झाला आहे. साखर कारखान्यांमधून आतापर्यंत सुमारे 56 लाख टन साखर सोडण्यात आली आहे. ते म्हणाले की, कोविड -१९ या साथीच्या दरम्यान काही कारखाने वाहतुकीतील अडचणींमुळे आपला साठा पाठवू शकले नाहीत. ते म्हणाले की, जागतिक महामारी दरम्यान अनेक कारखान्यांना लॉजिस्टिक समस्यांचा सामना करावा लागला. म्हणून आम्ही त्यांचा कोटा निर्यात करण्यासाठी डिसेंबर 2020 पर्यंतची वेळ देण्याचे आम्ही ठरविले आहे.

साखर कारखानदार शेतकऱ्यांना थकबाकी देण्यास मदत करतील
साखर कारखान्यांनी इराण, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशात साखर निर्यात केली आहे. अधिकृतपणे असे म्हटले जाते की, इंडोनेशियातील साखरेच्या निर्यातीसाठी क्‍वालिटीशी संबंधित काही समस्या होती जी आता संपवण्यात आली आहे. यामुळे भारताच्या साखर निर्यातीला चालना मिळाली आहे. केंद्र सरकार जादा देशांतर्गत साठा संपवण्यासाठी विपणन वर्ष 2019-20 मध्ये 6 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीसाठी 6,268 कोटी रुपयांचे अनुदान देत आहे. यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना उसाची थकबाकी देण्यास मदत होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करा! पायल घोषच्या भेटीनंतर रामदास आठवलेंची मागणी

मुंबई । अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. पायल घोषनं एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागनं माझ्यासोबत असभ्य वर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारावाई करा तेव्हाच या माणसाचं खरं रुप समोर येईल. या ट्विटमुळं माझ्या जीवाला धोका असून माझी मदत करा, असं म्हणत तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. रामदास आठवले यांनी नुकतीच पायलची भेट घेतली आहे, तसंच, दोघांनी आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

‘ऐरवी पोलिस लगेचच कारवाई करतात. अनुराग कश्यप मुंबईतच आहे तरीसुद्धा अद्याप त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाही. पायल घोषनं मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. पायलला सुरक्षा मिळेल, याविषयी मी स्वतःहून लक्ष घालणार आहे. पायलच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास यासाठी मुंबई पोलिस जबाबदार असतील. मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना याबाबत पत्र लिहणार आहे,’ असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

पायल घोष हिनं केलेले सर्व आरोप अनुरागनं फेटाळले आहे. त्यानं ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. आणखी आक्रमणं व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस, शांत बस. हे पण माहित आहे की, माहित नाही कुठल्या दिशेनं बाण येणार आहेत’, असं अनुरागनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

मला गोळी मारू नका, मी आत्मसमर्पण करतोय ; गळ्यात पाटी अडकवून गुंडाचे आत्मसमर्पण

criminal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |एन्काउंटरच्या भितीने उत्तर प्रदेशमधील एक गँगस्टर पोलिसांना शरण आला आहे. या गुंडाने गळ्यात पाटी घालून स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिलं. उत्तर प्रदेशमधील संबळमध्ये राहणारा नईम नावाचा हा गुंड पोलीस स्थानकामध्ये पोहचला आणि पोलिसांच्या पाया पडू लागला. तो रस्त्यावरुन चालत पोलीस स्थानकात आला तेव्हा त्याने गळ्यामध्ये पाटीही घातली होती.

हा सर्व प्रकार नरवासा पोलीस स्थानकामध्ये घडला आहे. या आरोपीवर पोलिसांनी 15 हजार रुपयांचं बक्षीसही ठेवलं होतं.

मी चुकीचे काम केले आहे. मला संभळ पोलिसांची भीती वाटते. मी माझी चूक स्वीकारतो. अशा परिस्थितीत मी आत्मसमर्पण करत आहे. माझ्यावर गोळीबार करू नका, असे या गुन्हेगाराने आपल्या गळ्यात अडकविलेल्या पाटीवर लिहिले होते. या गुन्हेगाराला पोलिसांनी आता ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने गुन्हेगारांविषयी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे गुंडांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

विशेषत: पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे गुंडांमध्ये एन्काऊंटर होण्याची भीती आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशातील गुन्हेगार एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही उत्तर प्रदेशात गुन्हेगारीच्या घटना कमी झाल्या नाहीत. परंतु कायदा व सुव्यवस्थेची भीती नक्कीच गुंडांच्या मनात निर्माण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना ‘या’वरून चोख उत्तर मिळालं

मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयनं केलेल्या निवेदनाचा हवाला देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. जवळपास महिनाभराच्या तपासानंतर सीबीआयनं आज या संदर्भात अधिकृत निवेदन दिलं आहे. ‘सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे,’ असं सीबीआयनं म्हटलं आहे.

सीबीआयच्या याच निवेदनाचा आधार घेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपसह मुंबई पोलिसांच्या टीकाकारांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘मुंबई पोलीस दल हे जगात नावाजलेले दल आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील पोलिसांनी देशाला वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावली होती. अशा पोलीस दलाचा अपमान करणाऱ्या व त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर आहे,’ असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त भाजपसह बॉलिवूडमधील काही नटनट्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं देण्याची मागणी केली होती. यापैकी काही मंडळींनी थेट मुंबई पोलिसांवर प्रकरण दाबण्यापासून नाही नाही ते आरोप केले होते. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मुंबई पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, असं राज्य सरकारचं म्हणणं होतं. मात्र, ते मान्य न करता काहींनी थेट कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

शॉर्ट्स घालण्यास मनाई केली तर स्कर्ट घालून शाळेत पोहोचले विद्यार्थी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरमी असूनही, संस्थांमध्ये शॉर्ट्स घालण्याच्या बंदीच्या विरोधात ब्रिटेन (Britain) मधील एका शाळेत मुलांचा एक ग्रुप स्कर्ट घालून शाळेत आला. शिक्षकांनी डेव्हॉन येथील आयएससीए अॅकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांना सांगितले की, जेव्हा ते छोटे कपडे घालून येतील तेव्हा त्यांना वर्गात वेगळे बसवले जाईल. त्यावर विद्यार्थी असे कपडे घालून आले.

एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, तिच्या 14 वर्षाच्या मुलाने प्रिन्सिपलकडे एक दिवस आधीच गरम होत असल्याबद्दल तक्रार केली होती, म्हणून ते म्हणाले की, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्कर्ट घालून येऊ शकता. त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही संभाव्य कारवाई टाळण्यासाठी तो इतर चार विद्यार्थ्यांसह स्कर्ट घालून शाळेत आला.

मुख्याध्यापकांनी कटाक्ष घेतला
विद्यार्थिनीच्या आईने डेव्हन लाइव्हला सांगितले, “माझ्या मुलाला शॉर्ट्स घालायची इच्छा होती, पण त्याला आठवडाभर एका वेगळ्या खोलीत राहावे लागेल, असे सांगितले गेले.” आई म्हणाली, “मुख्याध्यापकांनी त्याला सांगितले की तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही स्कर्ट घालू शकता, परंतु मला असे वाटते की ते मस्करी करत होत्या.” मात्र, मुलाने हे खरे म्हणून स्वीकारले आणि गुरुवारी पाच मुले स्कर्ट घालून आली. जेव्हा कि त्यांनीच असे सांगितले असल्याने शाळेला देखील यावर काहीही करता आले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

थरारक! कोरोनाबाधित रुग्णाने चाकूने स्वतःचा गळा कापून केली आत्महत्या

सांगली । मिरजमधील शासकीय कोरोना रुग्णालयामधील एक घटना धक्कादायक समोर आली आहे. येथे एका कोरोना बाधित रुग्णाने स्वतःचा गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हुसेन बाबुमिया मोमीन असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सदर कोरोनाबाधित व्यक्तीच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र ,नातेवाईकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती दिली आहे.

मयत हुसेन बाबूनिया मोमीन (वय56) या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना १० दिवसांपूर्वी मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या ८ दिवसांपासून हुसेन यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुसेन मोमीन यांनी रुग्णालयात धारदार चाकूने आपला गळा कापून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून मोमीन यांच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती देण्यात आली,त्यानंतर नातेवाईक यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालय प्रशासनावर उपचार दिले नसल्याचा आरोप केला आहे. तसेच ते आत्महत्या करू शकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केले आहे.

दरम्यान, मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा देत,सदर घटनेच्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती डॉ.सुधीर ननंदकर यांनी दिली आहे. तर हुसेन मोमीन यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. या आत्महत्येची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यांमध्ये झाली असून अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

निकोलस पूरनच्या जबरदस्त फिल्डिंगचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

Nicolas Pooran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शारज्याच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने षटकार आणि चौकांराची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी २२४ धावांचे आव्हान राजस्थानने ४ गडी राखत पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार मारत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. एक क्षणी पंजाब सामन्यात बाजी मारेल असं वाटतं असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला.

पण यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते पंजाबचा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या क्षेत्ररक्षणामुळे. आठव्या षटकात तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने दणदणीत शॉट मारला. हा षटकारच होता. मात्र, सीमारेषेवर क्षेत्रक्षण करणाऱ्या निकोलसने हवेत उडी मारत कॅच घेतला, त्याचवेळी पुरनचा तोल गेला, प्रसंगावधान दाखवत त्याने चेंडू सीमारेषेच्या आता फेकला. पूरनने केलेलं क्षेत्ररक्षण पाहून पंजाबचा फिल्डिंग कोच जॉंटी ऱ्हॉड्सने उभे राहत त्याचे कौतुक केलं. तसेच त्याच्या या क्षेत्र रक्षणामुळे समाज माध्यमात धुमाकूळ घातला आहे.

सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रितेश देशमुख यांनी सुद्धा पूरनचे कौतुक केले

निकोलस पूरनची ही फिल्डींग पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही चांगलाच भारावला. आतापर्यंत मी पाहिलेली ही सर्वोत्तम फिल्डींग असल्याचं सचिनने म्हटलं आहे.

तसेच पूरनच्या फिल्डिंगने ग्रेव्हिटी नावाची गोष्टच विसरायला लावली असं सेहवागने म्हटलंय. तर रितेश देशमुखने अशी फिल्डिंग आपण इतिहासात पहिल्यांदाच पाहिल्याचं म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Vodafone Idea यूजर्सचा मोठा फायदा! आता 3G नेटवर्क यूजर्स होणार 4G वर अपग्रेड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्होडाफोन आयडिया लिमिटेड (Vi) आपल्या विद्यमान 3G ग्राहकांना अधिक चांगला डेटा स्पिड आणि सेवा देण्यासाठी 4G नेटवर्कवर आणेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपले 3G नेटवर्क आता 4G वर अपग्रेड केले जाईल. बिर्ला समूहाच्या कंपनीने सांगितले की, व्होडाफोन आयडिया यासाठी Vi GIGAnet Technology वापरत आहे. कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींदर टाककर म्हणाले की,”आम्ही देशातील एक अब्ज लोकसंख्येमध्ये 4G नेटवर्क पसरविला आहे. Reliance JIO आणि Bharti Airtel ने हे काम यापूर्वीच केले आहे.

2G युझर्सना बेसिक व्हॉइस सेवा मिळणे सुरूच राहील
आयडिया व्होडाफोनने सांगितले की, आता कंपनी आपल्या Vi GIGAnet नेटवर्कवर 3G युझर्सना वेगवान 4G डेटा स्पीड देऊ शकेल. कंपनीच्या 3G-आधारित सेवा वापरणार्‍या एंटरप्राइझ ग्राहकांना 4G आणि 4G बेस्ड IoT ऐप्लिकेशंस आणि सेवांमध्ये अपग्रेड केले जाईल. कंपनी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करेल. तसेच , कंपनीच्या 2G युझर्सना पुरविल्या जाणार्‍या सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे बेसिक व्हॉइस सेवा मिळणे सुरूच राहील.

Vi च्या ग्राहकांच्या संख्येत सतत घट
एकत्र आल्यानंतर, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरने, Vi या ब्रँड नावाने इंटीग्रेटेड 4G नेटवर्क GIGAnet लॉन्च केले. अलीकडे, व्होडाफोन-आयडियाद्वारे असे म्हटले गेले आहे की, कंपनीकडे एकूण 16 की-सर्कल्स आहेत. येथे ऑपरेटर अधिक ग्राहक मिळविण्यावर आणि बाजारातील वाटा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो आहे. उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, जेणेकरून ग्राहकांच्या संख्येत होणारी घट थांबवता येईल. ट्रायच्या अहवालानुसार जून 2020 मध्ये Vi चे सुमारे 48.2 लाख युझर्स कमी झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.