Friday, December 19, 2025
Home Blog Page 5247

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

मुंबई । संपूर्ण राज्य कोरोनाने ग्रासले आहे. सामान्य नागरिकांपासून मंत्र्यांनाही कोरोनाची लागण होण्याची प्रकरण समोर आली आहेत. आता कोरोना संक्रमित झालेल्या मंत्र्यांच्या यादीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचाही समावेश झाला आहे. खुद्द उदय सामनात यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देत आपली कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याचे सांगितलं आहे.

”गेले १० दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.” असं उदय सामनात यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जनतेचे प्रेम व सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

चिंताजनक! मागील ३६ तासात राज्यातील १८९ पोलीस कोरोनाबाधित, तर ४ जणांचा मृत्यू

मुंबई । लॉकडाउनकाळापासून कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसही महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या ३६ तासांत राज्यातील तब्बल १८९ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२ हजार ८१८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी सध्या ३ हजार १८८ जणांवर उपचार सुरू आहेत तर १९ हजार ३८५ पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर २४५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

राज्यात काल रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा अधिक आहे. १९ हजार ९३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ११ हजार ९२१ रुग्ण वाढलेयत. सोमवारी १८० जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा १३ लाख ५१ हजार १५३ वर गेला आहे. तर आजवर राज्यात कोरोनानं ३५ हजार ७५१ जणांचा बळी गेला आहे. १० लाख ४९ हजार ९४७ जण आजवर राज्यात कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

योगाच्या साहायाने करा सर्दी या आजारावर मात

cold

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पावसाळा सुरु झाला कि त्याबरोबर अनेक आजार निर्माण होतात. यावर्षी तर त्यामध्ये कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. कोरोना पासून वाचण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. तसेच अजून कोणतेही औषध त्यावर प्राप्त झाले नाहीत. ऋतू बदलला की त्या बरोबर होणारे आजार ही अगदी नेहमीची गोष्ट आहे. अशावेळी बऱ्याच जणांना सर्दी, ताप यांच्याशी दोन हात करावे लागतात. आपल्या शरिरातील प्रतिकारशक्तीमुळे असे आजार आपोआपच बरे होतात. पण तरीही त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

आधुनिक काळातील औषधे खूपच परिणामकारक असतात. लोक स्वत:ला बरे करण्यासाठी योगा सारख्या उपायांकडेही वळत आहेत आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढवत आहेत. योग हे एक प्राचीन आणि विशेष असे तंत्र आहे.

तसेच योगाला आयुर्वेदामध्ये जास्त महत्व दिले जाते. ज्याच्यामुळे सशक्त शरिर आणि एकाग्र मन तयार होते. सर्दीशी जास्त चांगल्याप्रकारे सामना करताना तुम्हाला उपयोगी पडणारी काही आसने करावीत. घरगुती पद्धतीने जरी योग केला तरी अनेक आजारांवर परिणामकारक अनुभव मिळतो.

— नाडी शोधन प्राणायाम
— कपालभारती
— हस्त पादासन
–मत्स्यासन
–विपरीत करणी
–शवासन

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

कोरोनाग्रस्त वृद्धाची मिरजेतील रुग्णालयात चाकूने गळा कापून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

मिरज येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे घडला. ५८ वर्षीय हुसेन बाबुमिया मोमिन असे मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत संशय व्यक्त केला असून, घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, असा आग्रह नातेवाईकांनी धरला आहे.

मिरजेतील शासकीय कोव्हिड रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन बाबूमिया मोमिन यांना करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना दहा दिवसांपूर्वी उपचारासाठी शासकीय कोव्हिड रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोग्य कर्मचा-यांना मोमिन यांच्या बेडवर रक्त दिसले. जवळ जाऊन तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पहाटे तीनच्या सुमारास आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोमिन यांचा मुलगा मुस्तफा याला मोबाइलवरून घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांनाही कळवले. घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, हुसेन मोमिन यांच्या गळ्यावर जखम असल्याचे दिसले. त्याचबरोबर बाजूला चाकू पडला होता. मोमिन यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यानुसार रुग्णालय प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली. दरम्यान, मृत हुसेन मोमिन यांचा मुलगा मुस्तफा याने वडिलांच्या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त केला आहे.

‘आत्महत्या करण्यासारखी वडिलांची मानसिक स्थिती नव्हती. रुग्णालय प्रशासनाने करोना वार्डातील सीसीटीव्ही फुटेज द्यावे. पोलिसांनी योग्य चौकशी करावी, त्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत,’ अशी भूमिका मोमिन यांचा मुलगा मुस्तफा मोमिन याने घेतली आहे. करोनाबाधित रुग्णाने शासकीय रुग्णालयात आत्महत्या केल्याचे वृत्त पसरताच सांगलीत खळबळ उडाली आहे. या घटनेची महात्मा गांधी पोलीस चौकीत नोंद झाली असून या बाबतचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.

महाबळेश्वर नगरपालिकेला पर्यटनस्थळाचा “ब “ दर्जा; पर्यटन सांस्कृतिक विभागाचा महत्वपुर्ण निर्णय

महाबळेश्वर प्रतिनीधी |  महाराष्ट्राच नंदनवन म्हणुन नावलैाकीक असलेल्या जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वर नगरपालीकेला पर्यटनस्थळाचा “ब” गटाचा दर्जा देण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय पर्यटन व सास्कृतीक विभागाने आज दिला आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिक क्षेत्र हे भैागोलीक दृष्ट्या पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे. ते समुद्र सपाटीपासुन १४३७ मी उंचीवर आहे. अतिपर्जन्यमान असलेने इथे सुर्यदर्शनपण होत नाही. स्वातंत्र्यपुर्व काळापासून सन १९३५ पासुन पर्यटकांना बोटींगचा अनुभव दिला जातो. या शहरात मोरारजी भाई कॅसल बंगल्यात महात्मा गांधीचं वास्तव्य होते. अशा महत्वपुर्ण बाबीचा समावेश महाबळेश्वर नगरपालीकेच्या क्षेत्रामध्ये आहे. सातारा जिल्हाधिकारी यांनी तशी शिफारस केली होती.

दरवर्षीप्रमाणे  आपल्या महाळेश्वर दैार्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  स्थानिक शिवसेना पदाधिकारी व जिल्हाअधिकारी सातारा यानी केलेल्या शिफारशीवरुन नगरपालीका महाबळेश्वरला पर्यटन स्थळाला एक विषेश बाबा म्हणुन  “ब”गटाचा दर्जा दिला आहे. शासननिर्णयामघ्ये म्हटले आहे की महाबळेश्वर नगरपालीकेच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी १७ ते १८ लाख देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. भविष्यात वाढत्या पर्यटकांच्या देशी व विदेशी याच्या संख्या विचारात घेता. तसेच ऐतहासिक व भैागोलिक बाबी विचारात घेता. महाबळेश्वर नगरपालीकेका क्षेत्रात एक विशेष बाब म्हणुन”  ब” गटाचा दर्जा दिला जात असल्याचा शासन निर्णय आज पर्यटन व सास्कृतीक विभागाकडुन पारीत करण्यात आला.

महाबळेश्वर शहर पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असुन निसर्गाला पडलेल विलोभणीय स्वप्न आहे. याच जतन करत सदैव शहराच्या विकासाला चालना मिळण्याकरीता शिवसेनने महत्वपर्ण जवाबदारी पार पाडली आहे. महाविकास आघाडीच सरकार अन् शिवसेनेचे मुख्यमंत्री व नगरविकास खात्याचे मत्री एकनाथ शिंदे याच्या पाठपुराव्यामुळे  महाबळेश्वरला मिळालेली ही अतुलनीय भेट आहे अशी प्रतिक्रिया माजी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश कुभारदरे यांनी दिली . शिवसैनिक म्हणुन आमच्या सगळ्यांच्याच मागणीला मुख्यमंत्री महोदयांनी महाळेश्वर नगरपालीका क्षेत्राला “ब”गटाचा दर्जा दिल्याने शहराच्या विकासाला चालना देणारी आहे .

तेवातियाचे एकाच ओव्हर मध्ये 5 सिक्स !! युवराज म्हणतो….

Yuvi and Tewatia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील पंजाब विरुद्ध राजस्थान सामना खूपच रोमांचक झाला. पंजाबने ठेवलेलं 224 धावांच आव्हान राजस्थानने शेवटच्या षटकात पार केला. शेवटच्या तीन ओव्हर मध्ये राजस्थान ला तब्बल 51 धावांची आवश्यकता होती. तेव्हाच राहुल तेवातीया नावाचं वादळ आलं, आणि पंजाबचा सुफडासाफ झाला.

मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर तेवतियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेलं राजस्थान एकदम आघाडीवर आलं. आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी तेवतियाने बरोबरी केली.

तेवातियाने एकाच षटकात पाच षटकार लगावल्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंगने एक मजेशीर ट्विट केलं. “मिस्टर राहुल तेवातिया…. असं करू नका… ओव्हरमधल्या त्या एका चेंडूवर षटकार न मारल्याबद्दल धन्यवाद! सामना अत्यंत अप्रतिम झाला. राजस्थान… तुमचं मनापासून अभिनंदन. मयंक अग्रवाल आणि संजू सॅमसन… तुमच्या खेळी अप्रतिम होत्या”, असे ट्विट त्याने केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

कोरोना संकटातही दिवाळी होणार ‘धुमधडाक्यात’ साजरी; फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्याची प्रशासनाची तयारी

अहमदनगर । कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. दिवाळी मात्र ‘धुमधडाक्यात’ साजरी करण्यास करता येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दिवाळीच्या काळात फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले असून अर्जाची पद्धत नेहमीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे.

नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी आवाहन करून फटाके विक्रीचे तात्पुरते परवाने घेऊ इच्छीणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत ठिकठिकाणच्या तहसिलदार कार्यालयात नेहमीच्या पद्धतीने आणि नेहमीची कागदपत्रे जोडून अर्ज करायचे आहेत. अर्ज तहसिलदार कार्यालयातच करायचे असून तेथूनच परवाने मिळणार आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. तोपर्यंत करोनाचे संकट कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यापूर्वीच सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही नोव्हेंबरपर्यंत करोना संपेल, अशी विधाने केलेली आहेत. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी दिलासादायक परिस्थिती दिसून येत आहे. नव्या बाधितांचे आकडे काहीसे कमी होत आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी अद्यापही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नवरात्राचे उत्सवही रद्द करण्याची वेळ आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले ‘हे’ नवीन पाऊल, काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे.

प्रदूषणामुळे पर्यावरणाचे नुकसानही कमी होईल
मंत्रालयाने याबाबत असे म्हटले आहे की,’ स्वच्छ उर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याअंतर्गत नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.’ यासंदर्भात माहिती देताना मंत्रालयाने म्हटले आहे की,’ या पावलामुळे देशातील हायड्रोजन इंधन सेल आधारित वाहनांना चालना मिळण्यास मदत होईल आणि पर्यावरणास अनुकूल अशी उर्जा वापरणार्‍या वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान देखील कमी होईल. अशा वाहनांचे उत्पादक आणि पुरवठा करणारे यांच्याकडे वाहन चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय मानके उपलब्ध केली गेली आहेत.’

व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याची सरकार करत आहे तयारी
यासह जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याचीही तयारी केंद्र सरकार करीत आहे. या संदर्भात रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने एक प्रस्ताव सादर केला असून त्यावर मंत्रिमंडळाकडून विचार केला जात आहे. 2018 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये 10 वर्षापेक्षा जुन्या डिझेल आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी घातली. तेव्हापासून या पॉलिसीचा विचार केला जात होता. जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्याबाबत अद्याप भारतात कोणतेही स्पष्ट अशी वाहनांची पॉलिसी नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

रामदास आठवलेंनी दिली शरद पवारांना भन्नाट ऑफर, म्हणाले..

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली आहे. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असंही विधान केलं होतं. मात्र, आता शरद पवारांनीच NDA मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शरद पवार यांना दिली आहे.

राजकीय वर्तुळातील आरोप- प्रत्यारोप आणि भूमिका पाहता आमची दोस्ती अशी आहे की त्यांना तिकडे आणि मला इकडे करमत नाही, तर पवारांनीच इथं यावं.तसं झाल्यास पवारांना पुढे मोठं पद मिळू शकतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र मिळू शकतो, असं वक्तव्य करत आठवलेंनी सर्वांचंच लक्ष वेधलं. जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांना राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं. शिवसेनेसोबत राहण्यात काहीच फायदा नाहीये असं आठवले यांनी म्हटलं.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलं. रामदास आठवले यांनी याप्रकरणावर बोलत असताना, शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याची विनंती केली आहे.

याशिवाय त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासाठीचा एक पर्यायही सुचवला. ज्यामध्ये त्यांनी एक वर्ष उद्धव ठाकरे आणि एक वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची दुरा सांभाळावी असं म्हणत शिवसेनेनं महायुतीत पुन्हा यावं असाच सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. आता आठवलेंनी दिलेल्या या प्रस्तावांवर सध्या महाविकासआघाडीत एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आता शेअर बाजारातही होणार Paytm चे वर्चस्व! सर्वांसाठी सुरु केली स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिस, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम (One97 Communications) ची वेल्थ मॅनेजमेंट कंपनी पेटीएम मनीने देशातील प्रत्येकासाठी स्टॉक ब्रोकिंग एक्सेस उघडला आहे. या आर्थिक वर्षात 10 लाखाहून अधिक नवीन गुंतवणूकदारांची भर घालण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. शेअर बाजारात वाढणारी लोकांची आवड पाहून त्यांची सिस्टम सुकर केली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. यासह डिलिव्हरी ऑर्डरवर कंपनी झिरो ब्रोकरेज आणि इंट्राडेसाठी केवळ 10 रुपये आकारत आहे. कंपनी डिजिटल केवायसीमार्फत लोकांचे पेपरलेस अकाउंट उघडत आहे.

कंपनी भारतातील सर्वात व्यापक ऑनलाइन वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म (online wealth management platform) बनण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून सर्वसामान्यांसाठी आर्थिक समावेश (financial inclusion) असू शकेल.

पेटीएमच्या मते, पेटीएम मनीला early access program अंतर्गत 2.2 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची नोंदणी मिळाली. यापैकी 65% युझर्स हे 18 ते 30 वर्षे या वयोगटातील आहेत. ठाणे, गुंटूर, बर्धमान, कृष्णा आणि आग्रा यासारख्या छोट्या शहरांतील लोकांना नोंदणीसाठी आकर्षित करणारे पेटीएम मनी मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि अहमदाबाद यासारख्या टियर 1 शहरांमध्ये पोहोचले आहे.

पेटीएम मनीने आपला व्यवसाय सुरू केल्याला दोन वर्षे उलटली आहेत. कंपनीच्या एकूण युझर्सपैकी 70% फ़र्स्ट टाइम इनवेस्टर्स आहेत. तर 60 टक्के छोट्या शहरांतील आहेत. सध्या पेटीएम मनी दररोज 20 कोटी रुपयांच्या डायरेक्ट म्युच्युअल फंडाची विक्री करते. हे राष्ट्रीय पेन्शन योजना आणि स्टॉकची ऑफर देखील देते. पेटीएम मनीचे सीईओ वरुण श्रीधर आहेत. ते म्हणाले की,”आमचे ध्येय आहे की, लाखो भारतीयांना आत्मनिर्भर भारत याखाली वेल्थ सर्विस मिळू शकेल. गेल्या दोन वर्षात आम्ही छोट्या शहरांमधून अनेक गुंतवणूकदारांची भर घालत आहोत. त्यांना इनोवेटिव्ह आणि पर्सनलाइज्ड सर्विस दिली गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.