Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5272

सप्टेंबरमध्ये आतापर्यंत डिझेल झाले प्रतिलिटर 2.28 रुपयांनी स्वस्त, आजच्या नवीन किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूडच्या किंमतीतील घसरणीमुळे झालेली रिकव्हरी आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या कमकुवतपणामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सुरू असलेली कपात रोखली गेली. देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी IOC-Indian Oil Corporation ने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. यापूर्वी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 8 पैशांनी घसरले आहेत. त्याचबरोबर डिझेल 15 पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. 3 सप्टेंबर पासून डिझेल स्वस्त मिळत आहे आणि आतापर्यंत ते 2.28 रुपयांनी घटले आहे.

आजच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये आज पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत जाणून घ्या
दिल्ली पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 71.28 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.74 आणि डिझेलची किंमत 77.74 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 82.59 रुपये तर डिझेल 74.80 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नई पेट्रोलची किंमत 84.14 रुपये आणि डिझेलची किंमत 76.72 रुपये आहे.
नोएडा पेट्रोल 81.58 रुपये आणि डिझेल 71.69 रुपये प्रति लिटर आहे.
लखनौ पेट्रोल 81.48 रुपये आणि डिझेल 71.61 रुपये प्रति लिटर आहे.
पटना पेट्रोल 73.73 रुपये तर डिझेल 76.80 रुपये प्रति लिटर आहे.
चंदीगड पेट्रोल 77.99 रुपये आणि डिझेल 70.97 रुपये प्रति लिटर आहे.

अशा प्रकारे जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि पहाटे 6 वाजता अपडेट केले जातात. आपल्याला SMS द्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील कळू शकतात (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईल ग्राहक RSP आणि शहराचा कोड लिहून 9292992249 नंबर वर माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

मराठा नेत्यांना आरक्षण नको असते तर आम्ही त्यावेळी अध्यादेश पारित केलाचं नसता- पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील काही बड्या नेत्यांना मराठा आरक्षण नको असल्याचे म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांचे मराठा आरक्षणाच्या विधानविषयी गांभीर्यांने घ्यायची गरज नाही, त्याचे ते विधान हास्यास्पद आहे. आमच्यातील मराठा नेत्यांना आरक्षण नको असते तर आमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी हा अध्यादेश पारित केला नसता असं चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यावर भाजप नेत्याकडून महाविकास आघाडी सरकारवर सतत टीका होतं आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडले असल्याची टीका भाजप करत आहे. याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता त्यांनी यावर हॅलो महाराष्ट्राला सविस्तर प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले कि, “कदाचित त्यांना विसर पडला असेल ५०-६० वर्षापासूनची मागणी असूनही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर १४ जुलै २०१४ साली मराठा आरक्षणाचा कायदा पास केला. मी मराठा आरक्षणाचा अध्यादेश मांडल्या बरोबर कोर्टात आवाहन दिले गेले. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे सरकार ३१ ऑक्टोबर २०१५ आलं. तोपर्यंत ही बाब न्यायप्रविष्ठ होती. ”

याशिवाय ”फडणवीस सरकारला खरोखरच आरक्षण द्यायचे असते तर त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितल असतं कि, सध्या भाजपाच नविन सरकार आलेलं आहे, मागच्या सरकारने हे विधायक आणलेले आहे. त्यावर आमच्या सरकारला काही विचारं करायचं आहे, आमच्या वकिलांना म्हणणं मांडायचं आहे त्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी मागणं गरजेच होत. अशी कोणतीही मागणी न करता फडणवीस सरकार नुसती गमंत बघत बसलं होतं. त्यांच्या वकिलांनी मराठा आरक्षणासाठीची बाजू काही व्यवस्थित मांडली नाही आणि १४ नोव्हेंबरला कोर्टाने माझ्या अध्यादेशाला स्थगिती दिली.” असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.

”आश्चर्याची गोष्ट खरी ही आहे, मी जो अध्यादेश मांडला होता, तोच अध्यादेश तसाच कोणताही पूर्णविराम, स्वल्पविराम न बदलता तेच विधेयक जानेवारीच्या २०१५ मध्ये पारित केले. त्यांना माहीत होते अध्यादेश जर निरस्त केले असेल तर तेच विधेयक विधिमंडळाने पारित केले तर ते देखील निरस्त होणार आहे. दोन वेगवेगळी न्यायालय एकाच विधयेकावर वेगवेगळे निर्णय देऊ शकत नाही. तसचं झालं आणि फडणवीसांनी आमचंच विधेयक विधिमंडळामध्ये मांडून पारित करून घेतले परंतु ते काही टिकलं नाही” असा दावा चव्हाण यांनी केला.

”गेले ५ वर्षे सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी धातूर मातूर केलं, मोर्चाला समोरे गेले, आश्वासन दिले. पण कोर्टात त्यांना आरक्षणाचा कायदा टिकवता आलं नाही. जुलै २०१४ मराठा आरक्षणाचा अध्यादेश पारित केला आता अध्यादेश आणि विधिमंडळातील कायद्यात काहीच फरक नसतो. केवळ सहा महिन्यात अध्यादेश विधिमंडळात मान्य करायचा असतो. त्यामुळे आम्ही करूनं दाखवलं होतं” असंही चव्हाण यांनी म्हटलं.

”आम्ही तयार केलेल्या कायद्याच्या भाषेत गेल्या ५ वर्षात काहीच बदल झालेला नाही. परंतु वस्तुस्थिती खरी ही आहे, देवेंद्र फडणवीसांना हे विधेयक कोर्टात टिकवंता आलेलं नाही. आता महाविकास आघाडी समोर जबाबदारी आहे, कोर्टाला पटवून दिलं पाहिजे, आम्ही उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे जाण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे कोण आरक्षणाच्या विरोधात आहे, कुणाला लेबल नको ते सांगायची गरज नाही. आमच्यातील मराठा नेत्यांना आरक्षण नको असते तर आमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी हा अध्यादेश पारित केला नसता” असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजना लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृतीसाठी – मिनाज मुल्ला

सातारा । कोव्हीड १९ च्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी. तसेच कोव्हीड १९ चा संसर्ग पसरु नये व झाला तर कोणती काळजी घ्यावी याची माहिती लोकांना मिळावी हा एकमेव उद्देश माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा आहे. लोकांमधील कोव्हीड १९ च्या संशयित रुग्णाचा तात्काळ शोध घेण्याकरीता ५० कुटुंबामागे एक टीम नियुक्त करण्यात आली असून येणाऱ्या काळामध्ये कोरोनाचा बिमोड करुन प्रत्येकाच्या घरांपर्यंत पोहचत कोव्हीड १९ च्या संशयित रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती सातारा जावलीचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.

मार्चपासून उदभवलेल्या कोरोना परिस्थितीत चार महिन्यांत कोव्हीड १९ चे प्रमाण कमी होते. मात्र अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. शासनाकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून काम सुरु करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची आॅक्सिजन लेव्हल आणि शरीराचे तापमान पाहणार आहेत. त्याचबरोबर कोमाॅरबीड व वृद्ध लोकांचा सर्वेक्षण करत त्यांच्यावर देखील औषधोपचार केले जाणार आहेत. न्यूमोनिया आणि सर्दीवर देखील या योजनेतून उपचार करण्याची सोय आहे.

ही योजना दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर हा योजनेचा पहिला टप्पा असेल. तसेच दुसरा टप्पा १५ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबरपर्यंत राबवला जाणार आहे. दिवाळीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यशस्वी झालो तर खुल्या अंगाने आणि थोड्याशा मोकळ्या वातावरणात आपल्याला दिवाळी सणाचा आनंद घेता येईल. म्हणूनच सर्व नागरिकांनी नियमांचं पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

”जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जातायत”; गुप्तेश्वर पांडेंच्या स्वेच्छानिवृत्तीवर संजय राऊतांची टिप्पणी

मुंबई । सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर टीका करणारे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं असून ते अपेक्षितच असल्याचं म्हटलं. सध्या मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं सुनियोजित षडयंत्र रचलं जातंय, असा आरोप राऊत यांनी एबीपी माझा या वाहिनीशी साधलेल्या विशेष संवादावेळी केला.

“बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकासाठीच राजीनामा दिला आहे. हे सर्वांनाच अपेक्षित होतं. ही त्यांची राजीनामा देण्याची पहिली वेळ नाहीये. जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जातायत,” असं राऊत यावेळी म्हणाले. “कंगनाचं कार्यालय हे बेकायदेशीर होतं. तिचं बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून सध्या कांगावा सुरू आहे. कंगनाच्या ऑफिस तोडफोड प्रकरणात मला प्रतिवादी केलं जाणं हे हास्यास्पद आहे.” असंही राऊत म्हणाले. “आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली घडलो आहोत. माझ्या नावावर शेकडो केसेस आहे. आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. आम्हाला न्यायालयाची लढाई नवी नाही,” असं ते म्हणाले.

पांडे बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतणार
पांडे स्वेच्छानिवृत्ती घेतील अशी चर्चा बिहारमध्ये मागील बऱ्याच काळापासून सुरु होती. मात्र आता पांडे बक्सर विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ-एनडीए) पांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुशांत प्रकरणामध्ये अनेक वेळा थेट मुंबई पोलिसांच्या तपासावर पांडे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक मंजूर होताच गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक २०२० मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. अमित शहा यांनी ट्विट करून हे विधेयक जम्मू काश्मीरच्या नागरिकांसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. या विधेयकामुळे गोजरी, पहाडी आणि पंजाबी यांसारख्या स्थानिक भाषांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असंही अमित शहा यांनी म्हटलं.

‘जम्मू काश्मीरच्या जनतेसाठी आज एक महत्त्वपूर्ण दिवस आहे जेव्हा लोकसभेत जम्मू – काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक मंजूर करण्यात आलंय. या ऐतिहासिक विधेयकासोबतच जम्मू काश्मीरच्या जनतेचं बहुप्रतिक्षित स्वप्न साकार झालंय’ असं ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केलं.
काश्मिरी, डोगरी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या जम्मू – काश्मीरच्या अधिकृत भाषा असतील, असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

‘मी या विधेयकाच्या माध्यमातून जम्मू काश्मीरच्या संस्कृतीच्या संरक्षणाप्रती आपल्या वचनबद्धतेसाठी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. मी जम्मू काश्मीरच्या बंधु भगिनींना हे आश्वासन देऊ इच्छितो की मोदी सराकार जम्मू काश्मीरचा गौरव परत मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही’ असंही शहा यांनी म्हटलं.

लोकसभेत हे विधेयक गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सादर केलं. जम्मू काश्मीरमध्ये उर्दू बोलणारे केवळ ०.१६ टक्के लोक आहेत. परंतु गेल्या ७० वर्षांपासून हीच इथली अधिकृत भाषा बनली होती. आम्ही जी भाषा बोलतो, त्या भाषांनाही अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा अशी इथल्या लोकांची मागणी होती, असं त्यांनी विधेयक सादर करताना म्हटलं. जम्मू काश्मीरमध्ये ५३.२६ टक्के लोक काश्मिरी भाषा बोलतात. तर २६.६४ टक्के लोक डोगरी भाषेत संवाद साधतात. केंद्र शासित प्रदेशात २.३६ टक्के लोक हिंदी बोलतात, असंही रेड्डी यांनी संसदेत म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार; जाणून घ्या आजचे भाव

मुंबई । मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी सराफा बाजारात चांदीच्या किंमती 5700 रुपयांपर्यंत घसरले आहेत. अमेरिकी डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे ग्लोबल बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत सराफा बाजारात एक किलो चांदीच्या किंमतीत 5781 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरात 672 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली आहे.

HDFC सिक्यरिटीजनुसार, दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध असणाऱ्या सोन्याच्या दरात 672 रुयांची घसरण होऊन 51,328 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. परदेशी बाजारात सोन्याच्या दरात 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून एका महिन्याच्या निचांकी पातळीवर पोहचले आहेत.

चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा दर 5781 रुपयांनी घसरुन 61,606 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. सोमवारी चांदीचा भाव 67,387 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. कोरोना काळात शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याच्या गुंतवणूकीकडे मोठा कल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

दीपिकानंतर आता दिया मिर्झा NCBच्या रडारवर; लवकरच पाठवणार समन्स

मुंबई । सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर आता बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटी चौकशीच्या फेऱ्यात ओढले जात आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे बॉलिवूडची अनेक मंडळी NCBच्या (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) जाळ्यात अडकत आहेत. NCBची टीम या प्रकरणात जेवढ्या खोलात जात आहे त्यात अनेक सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत. दीपिका पादुकोणनंतर आता दिया मिर्झाचं नावंही आता समोर कथित ड्रग्स प्रकरणात आलं आहे. ड्रग्ज पॅडलर अनुज केशवानीने एनसीबीच्या चौकशीत दीया मिर्झाचं नाव घेतलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवानीने आपल्या जबाबात म्हटलं की दियाचा मॅनेजर तिच्यासाठी ड्रग्ज विकत घ्यायचा. यासंबंधीचे पुरावेही त्याने दिले. त्यामुळे आता एनसीबी लवकरच या प्रकरणात दिया मिर्झाला चौकशीसाठी समन्स पाठवू शकते असं म्हटलं जात आहे. दरम्यान, मंगळवारी दीपिका पादुकोणचं नावही ड्रग्ज चॅटमध्ये समोर आलं आहे. सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्यानंतर दीपिकाचं नाव समोर आल्याने साऱ्यांनाच धक्का बसला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि एका टॅलेन्ट मॅनेजमेन्ट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना समन्स बजावले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

बाबरी केस पासून अनेक खटले मी अंगावर घेतले, हा तर.. ; राऊतांचे कंगनाला चोख उत्तर

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेकडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिका-यांना बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

“एका अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने खटला दाखल केला असून मला प्रतिवादी बनवण्याची मागणी केली आहे. बाबरी केस ते मराठी अभिमानासाठी उभं राहण्यापर्यंत अनेक खटले मी अंगावर घेतले आहेत. ही गोष्ट मला माझं शहर आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. त्यांनतर कंगना आणि मुंबई महानगर पालिका यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचला होता. त्यानुसार २५ सप्टेंबरपर्यंत कंगनाच्या कार्यालयामधील तोडफोडीला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. संजय राऊत आणि वॉर्ड अधिकारी यांना प्रतिवादी करण्याची मागणी कंगनाच्या वकिलांकडून करण्यात आली.

कंगनानं पालिकेविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेत संजय राऊत आणि पालिकेचो वार्ड अधिकारी यांना प्रतिवादी बनवण्याची मागणी केली. उद्या, बुधवारपर्यंत राऊत आणि पालिका अधिकारी भाग्यवान लोटे यांना बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संजय राऊतांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना ‘उखाड डाला’ अशा आशयाची प्रतिक्रिया दिल्याचे पुरावे कंगनाकडून न्यायालयापुढे सादर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाला दिलेला दिलासा तूर्तास कायम आहे. यासंदर्भात शुक्रवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

ब्रिटनमध्ये तालिबानी समजून एका भारतीय शीख चालकाला पगडी काढून केली मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । तालिबानी (Talibani) असल्याच्या संशयावरून भारतात जन्मलेल्या एका शीख टॅक्सी चालकास ब्रिटनमधील चार जणांनी मारहाण केली. रविवारी रात्री 41 वर्षीय विनीतसिंग आग्नेय इंग्लंडच्या रीडिंग शहरातील ग्रॉसव्हेंसर कॅसिनो येथून चार जणांना घेऊन टॅक्सीमध्ये बसले. थोड्या वेळाने त्या चौघांनी विचारले की,”तुम्ही तालिबानी आहात काय?” यानंतर विनीतसिंग यांना प्रवाशांचा तोंडी आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. या घटनेच्या तक्रारीनंतर यूके पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पगडी उतरवण्याचाही प्रयत्न केला
विनीतसिंग म्हणाले की,” चारही जण गोरे होते. ते गाडी चालवित असताना एका प्रवाश्याने त्यांना डोक्यावर जोराने मारले तर दुसऱ्या एका प्रवाशाने त्यांना लाथा मारून त्याला सीटच्या मागे ढकलले. तिसर्‍या प्रवाशाने त्यांची पगडी उतरवण्याचा प्रयत्न केला. विनीत म्हणाले की,” हा एक अतिशय वाईट अनुभव आहे आणि मी एक धार्मिक व्यक्ती आहे आणि माझी पगडी माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.” ते म्हणाले की,”पगडीचे धार्मिक महत्त्व मी या चार प्रवाश्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला व त्यांनी स्पर्श करू नये म्हणून त्यांनी आवाहनही केले.” या घटनेने दु: खी झालेल्या विनीतला खात्री आहे की, हा हल्ला केवळ वर्णद्वेषाने प्रेरित झालेला नाही तर चार प्रवाश्यांमध्ये द्वेषही आहे.

विनीत मुळात संगीत शिक्षक आहे
टिलहर्स्ट येथे राहणारे विनीत सिंग, पत्नी आणि मुलांसमवेत बर्कशायरच्या स्लोफमधील एका शाळेत संगीत शिक्षक म्हणून काम करत होता. कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्यांची संगीत शिक्षकाची नोकरी गेली. यामुळेच त्यांना घर चालविण्यासाठी टॅक्सी चालवावी लागली.

विनीतसिंग म्हणाले की,” या भीतीदायक अनुभवानंतर ते नाईट शिफ्टमध्ये टॅक्सी चालवणार नाही. ते अजूनही खूप घाबरलेले आहेत.” ते म्हणाले की,” हे चार प्रवासी टॅक्सीमध्ये बसताना चांगले वागले होते, परंतु हळूहळू ते वर्णद्वेषात अडकले आणि त्यांचे वर्तन हिंसक बनले.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

.. तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता- देवेंद्र फडणवीस

नागपूर । कृषी विधयेक राज्यसभेच्या पटलावर चर्चेसाठी आली असताना सभागृहाच्या उपसभापतींची भूमिका सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसंच सदस्यांनी केलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देत एक दिवसाचे अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी खासदाराच्या निलंबनाला विरोध केल्यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी संयत प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शरद पवारांनी पत्रकार परिषदेत विधेयकाला कुठेही विरोध केलेला नाही. त्यांनी काल जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईच्या निमित्ताने विरोधी पक्षाला समर्थन दिलं. पण मला असं वाटतं की राज्यसभेतील सदस्य असंशोभनीय वागले नसते तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता. त्यांचं वागणं अशोभनीयच होतं. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही”.

अन्नत्यागाची घोषणा करताना शरद पवार म्हणाले..
निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. “राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी उपोषण सुरु केलं असून आपल्या मनातील भावना सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं,” असं शरद पवार यांनी म्हटलं होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.