Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5719

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५१६ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. पुण्यावरून प्राप्त रिपोर्टनुसार आज पुन्हा ३१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. तसेच २१६ जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले असून दिवसभरात रायगाव आणि खावली कोरोना केअर सेंटर मधून ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे साकुर्डी येथील 27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोविड बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील 27 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 3, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 38, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 5 ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 77, ग्रामीण रुगणालय, खंडाहा येथील 60, ग्रामीण रुगणालय, कोरेगाव येथील 9 व रायगाव येथील 24 असे एकूण 216 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामीण रुगणालय, वाई येथे वाई तालुक्यातील आंबेदरे आसरे येथील 43 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर कोविड संशयित म्हणून नमूना तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात आला असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

रायगाव येथील 3 आणि 8 खावली येथील कोरोना केअर सेंटर मधून एकूण 11 जणांना डिस्चार्ज

आज रायगाव आणि खावली येथील कोरोना केअर सेंटरमधून 11 जणांचे 14 दिवसानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये ता. खटाव मधील मायणी येथील 1, डिस्कळ येथील 1,ता. कोरेगाव मधील न्हावी बुद्रुक येथील 1, वारणानगर येथील 3, शेंद्रे येथील 1, ता. खंडाळा मधील कवठे जवळे येथील 1, अजनुज येथील 2,ता. वाई मधील आसरे येथील 1 रुग्ण. आज दिवसभरात एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता जिल्ह्यात कोरोनातून 158 रुग्ण बरे झाले आहेत.

Satara

संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे विधान केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटवर त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतर देशांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या जास्त आहे. आणि विषाणूचे  संक्रमण रोखण्यासाठीच्या यंत्रणेची आपल्याकडे कमतरता होती. पण या संचारबंदीच्या  काळात ही यंत्रणा तयार झाली आहे. आता आर्थिक हालचाली सुरु करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. आता लोकांचीही मानसिकता झाली आहे त्यामुळे आता हळूहळू आर्थिक क्रिया चालू केल्या पाहिजेत असे ते म्हणाले. या बरोबरच संचारबंदीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे देश वाचला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

निवडणुकीच्या वेळी लग्न, अंत्यविधी अगदी दहाव्यालाही हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी कुठे गेले असा टोलाही त्यांनी मारला आहे. लोकांच्या डोक्यातून कोरोनाची भीती घालविली पाहिजे त्यांना दक्षतेसह बाहेर वावरण्याची  पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आमदार रोहित पवार, निलेश राणे, प्राजक्त तनपुरे यांच्या ट्विटरवर झालेल्या शाब्दिक वादावर विचारले असता त्यांनी “मी इतरांबद्दल सांगू शकत नाही. मात्र मी सभ्य आहे आणि स्वतःची गॅरंटी देऊ शकतो” असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

माझ्यासोबत डेटवर चला अन् मजुरांना मदत करा; लॉकडाउनमध्ये ‘या’अभिनेत्रीची चाहत्यांना खास ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना स्थिती खूप बिकट झाली आहे. सोबत देशातील आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. देशातील मजूर, कामगार आणि गरिबांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. विविध माध्यमातून काही लोक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक सेलिब्रिटीही यासाठी पुढे आले आहेत. बेफिक्रे सिनेमातून सर्वाना माहित झालेली अभिनेत्री वाणी कपूरही आता मजुरांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे. तिने त्यासाठी एक शक्कल लढविली आहे. तिने मजुरांना मदत करणाऱ्यांसोबत डेट ला जाण्याचा निर्णय व्हिडीओ मधून शेअर केला आहे.

आपल्या इंस्टाग्रामच्या अकॉउंटवरून हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. देशातील स्थिती आपल्या सर्वाना माहित आहे. या काळात मजुरांसाठी काहीतरी करूया. त्यांच्यासाठी मदत देऊया असे आवाहन तिने केले आहे. फ्रेंड काईन्ड सोबत तिने हा उपक्रम केला आहे. फ्रेंड काईन्ड या साईटवर जाऊन पैसे द्यायचे आणि तिचे नाव लिहायचे. अशा पद्धतीने मदत करणाऱ्यांपैकी ५ लोकांसोबत ती व्हर्च्युअल डेटवर जाणार असल्याचे तिने सांगितले आहे.

चला थोडी शुद्ध देसी दोस्ती करूया, असे म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. वाणीने https://www.fankind.org/index.php?/Vaani या वेबसाईटवर जाऊन पैसे द्या असे सांगितले आहे. अधिक माहितीसाठी या साईटवर मिळेल असेही ती म्हणाली आहे. अशाप्रकारे एमेलिया क्लार्क हिने हा प्रयोग केला होता. यातून तिने लाखो रुपये गोळा करून जागतिक आरोग्य संघटनेला दिले होते. तिच्या विधानांमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बिकिनी घातलेल्या तरुणीने पाण्यात उडी घेतली..अन् पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंटरनेट वर फिरणारा कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. रोज काहीतरी अजब समोर येत असतं किंवा असं काहीतरी कि त्याची चर्चा सर्वत्र सुरु होते. असाच एक व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवरून व्हायरल झाला आहे. ज्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहणारा किमान दोनदा हा व्हिडीओ पाहतोच कारण यात असाच एक ट्विस्ट आहे. बिकनी घातलेली एक तरुणी पाण्यात उडी मारतानाचा हा व्हिडीओ आहे.

या व्हिडिओमध्ये दोन बिकिनी घातलेल्या तरुणी पाण्यात उडी मारत आहेत. दोरखंडाच्या साहाय्याने या तरुणी पाण्यात उडी मारत आहेत. यातील एक तरुणी दोरखंडाच्या साहाय्याने पाण्यात उडी घेते. ती पाण्यात पडते पण मध्येच असे काहीसे होते. की पुन्हा एकदा व्हिडीओ आपोआपच पाहिला जातो. ती मध्येच हवेत अशी तरंगते की वाटते ती कशात अडकली की काय आणि पुन्हा हा व्हिडीओ पाहिला जातो.

 

सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. सर्वत्र हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ सगळीकडे शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ती तरुणी नेमकी कशात असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मुंबईतील स्पाय नेटवर्कची थेट भारतीय लष्करावर नजर ठेवण्यावर मजल; पोलिसांनी छापा टाकून केली एकाला अटक

मुंबई । चेंबूर भागात आज पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चेंबूर मध्ये बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची आणि जम्मू काश्मीरमधील काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. असे स्पाय नेटवर्क इथे चालविले जात असल्याची माहिती मिळाली आहे. Voice over Internet Protocol या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. जम्मू काश्मीरमधील माहिती तसेच सैन्य दलाच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सूर होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या छाप्यामध्ये पोलिसांना अनेक गोष्टी सापडल्या आहेत. ३ चालू असणारी चायनीज सिमकार्ड आणि इतर १९१ सिमकार्ड, लॅपटॉप, मॉडम, अँटीना, आणि कनेक्टर असा माल पोलिसांना सापडला आहे. Voice over Internet Protocol या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आवाज बदलून ही व्यक्ती भारतीय लष्कराची माहिती मिळवत होती. तसेच पाकिस्तान वरून आलेले कॉल तंत्रज्ञाच्या साहाय्याने स्थानिक नंबरवर डायव्हर्ट करून भारतीय लष्कराची गोपनीय माहिती मिळवण्याचा या व्यक्तीचा प्रयत्न सुरु आहे.

भारत आणि चीनमध्ये सीमेवर सुरु असणारा वाद तसेच काही दिवसांपूर्वी काश्मीर मध्येही सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्याचा उधळलेला कट या पार्श्वभूमीवर या व्यक्तीच्या अटकेमुळे काहीतरी मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. सीमेवरचा तणाव पाहता या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे. या व्यक्तीकडून आणखी काही ठिकाणी असे नेटवर्क आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पाकिस्तान भारतापेक्षा दुप्पट आनंदी देश? वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये भारताची मोठी घसरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी जागतिक आनंदी अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षण केलेल्या एकूण १५६ देशांमध्येभारताचा क्रमांक १४४ स्थानी घसरला आहे.  लेसोथो आणि मालवी या देशांच्या मध्ये भारताने ३.५७३ मिळविले आहेत.  दुसरीकडे पाकिस्तान ने ५.६९३ गुणांनी ६६ वे स्थान मिळविले आहे. तुलनेत भारताचे स्थान खूपच खाली घसरले आहे. फिनलँड ने सलग तिसऱ्यांदा ७.८०९ गुणांनी प्रथम स्थान मिळविले आहे तर डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडनी दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्यापाठोपाठ आइसलँड आणि नार्वेचा क्रमांक लागला आहे.

यावर्षीचे गुणांकन हे २०१८ आणि २०१९ चा डाटा वापरून केले आहे. हा इंडेक्स दरडोई जीडीपीचा विकास, निरोगी आयुर्मान, आयुष्यातील निवड स्वातंत्र्य, सामाजिक समर्थन, औदार्य, भ्रष्टाचाराबाबत जनजागृती या आधारावर हा आनंदी इंडेक्स मोजला जातो. भारताची २०१३ पासून सातत्याने या इंडेक्स मध्ये घसरण होते आहे. २०१३ साली भारत ११७ व्या क्रमांकावर  होता,२०१६ साली ११८, २०१७ साली १२२, २०१८ साली १३३, २०१९ साली १४० आणि २०२० साली १४४ अशा प्रमाणे भारत या इंडेक्स मध्ये घसरला आहे.

या अहवालातील एक लेखक जॉन हेलिवेल म्हणतात, “आंनदी देश तो असतो जिथे लोकांना एकमेकांशी जोडलेले जाणवतात, जिथे लोक एकमेकांवर विश्वास ठेवतात, आनंदी राहतात आणि हे सर्व त्यांना त्यांच्या सामाजिक संस्थांशी जोडलेले असते. आणखी एक लवचिकता असते. कारण ते सामायिक विश्वासाने अडचणींचे ओझे कमी करतात.” भारताची हि घसरण पाहता यावर विचार करण्याची गरज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री ! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य माध्यमिक मंडळ व बालभारती यांच्या मदतीने आगामी वर्षात आवश्यक असणाराच पाठ्यक्रम शिकविला जाणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाला कात्री लागणार आहे. राज्यात एकूण २ कोटी २५ लाख विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. त्यातील १ कोटी ९० लाख जवळपास २ कोटी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे नियोजन सरकार करत आहे.

दरम्यान दूरदर्शनच्या एकूण १६ मोफत चॅनेलपैकी कोणती दोन चॅनेल अभ्यासक्रमासाठी द्यायची, कोणत्या वेळात द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण शाळा १५ जूनपासून सुरु होतील असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विदर्भात २६ जूनपासून शाळा सुरु होईल राज्यात इतरत्र शाळा १५ जूनपासून सुरु होतील अशी माहिती देण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यासंदर्भात ऑनलाईन शिक्षणाचे कॅलेंडर तयार केले आहे. या अभ्यासक्रमात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा विषयांच्या तुलनेत गणित, विज्ञान आणि विज्ञान शाखा यांच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जाणार आहे.

भारत सरकारच्या दूरदर्शन या वाहिनीवरील १६ चॅनेल मोफत पाहायला मिळतात. पण ज्यांच्याकडे दूरदर्शनचे डिश नाही आहेत. त्यांना इतर डिशच्या माध्यमातून या मोफत चॅनेलचा लाभ घेता येणार आहे. १६ पैकी मोजक्याच चॅनेलवर १ली ते १२वीचा अभ्यासक्रम दाखविला जाणार आहे. दरम्यान या अभ्यासक्रमासाठी १ हजार तासांचे मटेरियल तयार करण्यात आले आहे. अत्यावश्यक विषयानाच प्राधान्य दिले जाणार आहे. जी अभ्यासक्रम शिकवण्याची गरज नाही अशा अभ्यासक्रमातील शंका विचारण्याची सोयही केली जाणार असल्याची माहिती आयटी सेलचे उपसंचालक विकास गरड यांच्याकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown 5.0 | या ३ टप्प्यांत सुरु होणार व्यवहार; कोणती गोष्ट कधी सुरु होणार? जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा थैमान जैसा थे आहे. ३१ मे रोजी देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील लॉकडाउन ३० जून पर्यंत वाढवण्यात आले आहे. सरकारकडून आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. तसेच राज्यांना लॉकडाउन संदर्भातील नियम ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. तसेच कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागातील लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने या भागांतील गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. पाहुयात कोणत्या गोष्टी सुरु होणार आहेत आणि कश्या टप्प्याने त्या सुरु होणार आहेत थोडक्यात

https://hellomaharashtra.in/financial-news/gold-prices-fell-as-locks-in-the-lockdown-came-find-out-todays-prices/

पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.

दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील. पालकांसह सर्व संबंधितांचे याबद्दल मत जाणून घेण्यात येईल. जुलै महिन्यात या संदर्भात निर्णय होईल.

तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन, व्यवस्थित आढावा घेऊन रेल्वे, हवाई प्रवास कधी सुरु करायचा त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाउन मध्ये शिथिलता येताच सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. लॉकडाऊनच्या या टप्प्यात स्थानिक सराफा बाजार बंद आहेत, तरीही सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्याच्या संकटाच्या काळात धोका टाळण्यासाठी गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणूकीवर अधिक अवलंबून आहेत. यामुळेच सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. १५ मे रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७,०६७ रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली होती. मात्र, या चौथ्या लॉकडाऊन दरम्यान सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/lockdown-5-0-mha-guidlines-to-states/

शुक्रवारी सोने ६६ रुपयांनी स्वस्त झाले
शुक्रवारी मुंबई बुलियन मार्केटमधील सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ६६ रुपयांची घसरण होऊन ४६,९२९ रुपये झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली वाढ तसेच हाँगकाँग वरून चीन आणि अमेरिकेमधील वाढता तणाव यामुळे शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत घसरणीचे वातावरण होते.

लॉकडाउन १.०: २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान सुरु झालेल्या पहिल्या लॉकडाऊनविषयी बोलताना यावेळी सोन्याच्या एकूण किंमतीत २,६१० रुपयांची वाढ झाली होती.

लॉकडाऊन २.०: १५ एप्रिल ते ३ मे रोजीच्या दुसर्‍या लॉकडाऊन दरम्यान सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम १२१ रुपयांची वाढ झाली.

लॉकडाउन ३.०: ४ मे ते १७ मे रोजीच्या तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम १,१४४ रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, यावेळी पहिल्यांदाच सोन्याची किंमत ४७,००० रुपयांच्या पुढे गेली होती.

लॉकडाऊन ४.०: चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन दरम्यान सोन्याच्या किंमती सातत्याने घसरल्या. मात्र , त्यादरम्यान, तीन दिवस असे होते की जेव्हा सोन्याची किंमत देखील प्रति १० ग्रॅम ४७,००० रुपयांच्या पुढे गेली. १८ मे रोजी सोन्याचे भाव ४७,८६१ रुपये होते, २० मे रोजी ते ४७,२६० रुपये होते आणि २२ मे रोजी ते ४७,१०० रुपये होते. तिसर्‍या लॉकडाऊनच्या तुलनेत सोन्याचे भाव ९३२ रुपयांनी स्वस्त झाले.

सोन्याचे भाव का वाढत आहेत
कोरोना विषाणूमुळे जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. हेच कारण आहे की सर्व केंद्रीय बँका सतत धोरणात्मक व्याज दरांमध्ये कपात करीत आहेत जेणेकरुन अर्थव्यवस्था परत रुळावर येऊ शकेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे सोने हे आहे. यावेळी शेअर बाजारामध्ये देखील सतत गोंधळाचे वातावरण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

BCCI ने केली रोहित शर्माच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

मुंबई । भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवत असते. २०१९ विश्वचषकात ५ शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

तर दुसरीकडे अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं बीसीसीआयने सुचवली आहे. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी शर्यतीत होतं. मात्र अखेरीस सिनीअर खेळाडूंसोबतच्या शर्यतीत त्याचं नाव मागे पडलं आहे. २०१८ सालीही शिखरचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं होतं. मात्र अंतिम यादीत त्याची निवड झालेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षात कोणत्या खेळाडूची मानाच्या पुरस्कारासाठी निवड होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”