Saturday, June 3, 2023

माझ्यासोबत डेटवर चला अन् मजुरांना मदत करा; लॉकडाउनमध्ये ‘या’अभिनेत्रीची चाहत्यांना खास ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना स्थिती खूप बिकट झाली आहे. सोबत देशातील आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. देशातील मजूर, कामगार आणि गरिबांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. विविध माध्यमातून काही लोक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक सेलिब्रिटीही यासाठी पुढे आले आहेत. बेफिक्रे सिनेमातून सर्वाना माहित झालेली अभिनेत्री वाणी कपूरही आता मजुरांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे. तिने त्यासाठी एक शक्कल लढविली आहे. तिने मजुरांना मदत करणाऱ्यांसोबत डेट ला जाण्याचा निर्णय व्हिडीओ मधून शेअर केला आहे.

आपल्या इंस्टाग्रामच्या अकॉउंटवरून हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. देशातील स्थिती आपल्या सर्वाना माहित आहे. या काळात मजुरांसाठी काहीतरी करूया. त्यांच्यासाठी मदत देऊया असे आवाहन तिने केले आहे. फ्रेंड काईन्ड सोबत तिने हा उपक्रम केला आहे. फ्रेंड काईन्ड या साईटवर जाऊन पैसे द्यायचे आणि तिचे नाव लिहायचे. अशा पद्धतीने मदत करणाऱ्यांपैकी ५ लोकांसोबत ती व्हर्च्युअल डेटवर जाणार असल्याचे तिने सांगितले आहे.

चला थोडी शुद्ध देसी दोस्ती करूया, असे म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. वाणीने https://www.fankind.org/index.php?/Vaani या वेबसाईटवर जाऊन पैसे द्या असे सांगितले आहे. अधिक माहितीसाठी या साईटवर मिळेल असेही ती म्हणाली आहे. अशाप्रकारे एमेलिया क्लार्क हिने हा प्रयोग केला होता. यातून तिने लाखो रुपये गोळा करून जागतिक आरोग्य संघटनेला दिले होते. तिच्या विधानांमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.