Monday, December 29, 2025
Home Blog Page 5721

जेव्हा द्रविडने पाकिस्तानी खेळाडूला विचारले,’मी आऊट होतो का ? उत्तर मिळाले,”नाही”, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना असतो तेव्हा रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. यावेळी, कोणत्याही संघाला सामना गमवायचा नसतो. आज दोन्हीही संघ एकमेकांबरोबर द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत पण एक काळ असा होता की, भारत देखील पाकिस्तानला जायचा. १९९६ साली झालेल्या एका सामन्याबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने एक वक्तव्य केले आहे. राहुल द्रविड त्या सामन्यात बाद नसतानाही त्याला पॅव्हेलियनमध्ये कसे परत जावे लागले याबद्दल सांगितले. लतीफने मॅचनंतर स्वत: द्रविडला तो आऊट नसल्याचे सांगितले.

लतीफने द्रविडला सांगितले की तो आऊट नाही
शारजाह येथे झालेल्या एका एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य दिले होते. राहुल द्रविड त्यावेळी क्रीजवर फलंदाजीला आला होता, हा त्यांचा तिसराच वनडे सामना होता. त्याने तीनच धावा केल्या होत्या तेव्हा मुश्ताक अहमदकडून एक जोरदार अपील करण्यात आले आणि पंचानी द्रविडला बाद घोषित केले. या सामन्याबद्दल बोलताना लतीफ म्हणाला, ‘ हा सामना शारजाह येथे भारताविरुद्ध खेळला जात होता. द्रविड विकेटच्या मागे झेलबाद झाला, मुश्ताक अहमदने बॉल टाकून जोरदार अपील केले, आम्हीसुद्धा त्याच्याबरोबर अपील केले आणि अंपायरने त्याला आऊट दिले. हा सामना संपल्यानंतर द्रविडने मला विचारले की,’ मी आऊट होतो का ? मी त्याला म्हणालो, ‘ भाई नाही, मुश्ताक नंतर खूप पिडतो. ‘ आमिर सोहेलच्या नेतृत्वात खेळलेला हा सामना पाकिस्तानने ३८ धावांनी जिंकला होता.

लतीफने द्रविडची जोरदार प्रशंसा केली
रशीद लतीफने द्रविडचे कौतुक केले आणि सांगितले की,’ असा खेळाडू फक्त क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला होता. तो म्हणाला की,’ द्रविड अंडर १९ आणि इंडिया अ चा प्रशिक्षक असताना भारताला अनेक चांगले खेळाडू दिले आणि त्यांना चांगले मार्गदर्शनही केले. यापूर्वी पाकिस्तानचा माजी फलंदाज युनिस खाननेही द्रविडचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की,’ द्रविडने त्याला मार्गदर्शन केले होते ज्यामुळे त्याचा खेळ सुधारला.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आकड्यांची लपवाछपवी महाराष्ट्र नव्हे गुजरात करतं; रोहित पवारांची भाजपवर टीका

पुणे । कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत. अशा संकट काळात विरोधकांकडून केवळ राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाबाबतचे आकडे लपवत नाही. मात्र, भाजपची सत्ता असलेले गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी करत राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. महाराष्ट्रात कोरोना विषाणूबाबतची चाचणी संख्या वाढली म्हणून रुग्ण संख्या वाढतेय, असा दावा त्यांनी यावेळी केला.

पुण्यात एमपीएससी स्टुडंट्स राईट्स आणि सृजन फाऊंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना फूड पॅकेट दिले जात आहेत. त्या उपक्रमाला रोहित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ठाकरे सरकारचे कौतुक आणि केंद्रातील सरकावर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून होणाऱ्या टीकेकडे लक्ष द्यायची गरज नाही. मजुरांना पहिल्याच टप्प्यात रेल्वेने त्यांच्या राज्यात सोडवायला पाहिजे होते, म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.

राज्यात ग्रीन तसेच ऑरेंज झोनमध्ये दुकाने सुरु होत आहेत. हॉटेल पार्सल सेवा सुरु आहे. केश कर्तनालाय दुकाने काही भागात सुरु होणे हा लॉकडाऊनचा एक्झीट प्लान असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. आरोग्य व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था यापुढची संकटे ही आगामी काळात मोठी आव्हाने असतील. लस किंवा औषध कधी येईल माहिती नाही. मात्र, रोजगाराची समस्या मोठी असेल, अशी भीती रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

याचसोबत काही विकसित देशांमध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर केसेसचं प्रमाण वाढलं. त्याप्रमाणे आपल्याकडेही लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर केसेस वाढल्या आहेत. लॉक डाऊन उठवल्यानंतर तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याला सामोरं जाण्याचीही तयारी आपल्याला ठेवावी लागेल असं मत रोहित पवार यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे. केंद्रातील मोदी सरकारने आर्थिक पॅकेजची मोठी घोषणा केली. ही केवळ घोषणा आहे. कारण घोषणा केलेले पॅकेज हे २० लाख कोटी रुपयांचे नसून प्रत्यक्षात १ लाख ६० हजार कोटी रुपयांचे आहे. राज्याचेही स्वतंत्र पॅकेज येईल, असं सांगत आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारवर टीका करत ठाकरे सरकारचे कौतुक केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जगातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली केवळ एकमेव भारतीय

वृत्तसंस्था । फोर्ब्स मासिकाने  आज जगातील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने अव्वल स्थान काबीज केलं आहे. भारताच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या १०० जणांच्या यादीत फक्त एकाच भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे. हा एकमात्र खेळाडू आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली.

या यादीमध्ये जगभरातील नामांकित खेळाडूंचा समावेश आहे. पण भारताकडून कोहली वगळता एकही खेळाडू या १०० जणांच्या यादीमध्ये स्थान पटकावू शकलेला नाही. कोहलीने गेल्या वर्षभरात २६ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १९७ कोटी रुपयांची कमाई केल्याचे पुढे आले आहे. गेल्या १२ महिन्यांमधील त्याची ही कमाई आहे. कोहलीने या १०० श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये ६६ व्या स्थानावर आहे.

विराटाचे कमाईचे स्रोत
१)जाहिराती आणि अन्य करार
भारतामध्ये सध्याच्या घडीला सर्वात जास्त जाहिराती या कोहलीकडे असल्याचे पाहायला मिळते. सध्या कोहलीकडे आठपेक्षा जास्त कंपनीच्या जाहिराती आहे. त्याचबरोबर कोहलीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे ट्विटर, इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट लगेच व्हायरल होत असते. या कंपन्यांबरोबरही कोहलीचे करार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी या सर्व माध्यमातून कोहलीने २ कोटी ४० लाख डॉलर एवढी रक्कम कमावल्याचे पाहायला मिळाले आहे. क्रिकेटपेक्षा जाहीरातींमध्ये कोहलीची सर्वाधिक कमाई होत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

२)बीसीसीयशी करार
कोहली हा बीसीसीआयशी करारबद्ध आहे. बीसीसीआय फॉर्मात असलेल्या खेळाडूंबरोबर वार्षिक करार करत असते. या करारामध्ये कोहली हा A+ या सर्वोत्तम ग्रेडमध्ये आहे. त्यामुळे कोहलीला बीसीसीआयकडून १० लाख अमेरिकन डॉलर एवढी रक्कम गेल्या वर्षभरात मिळाली आहे.

३)क्रिकेटशी निगडीत अन्य उत्पन्न
वर्षभरात विविध स्पर्धा होतात. या स्पर्धेत खेळण्यासाठी काही रक्कम खेळाडूंना दिली जाते. त्याचबरोबर मालिका जिंकल्यावरही रोख रक्कम मिळते. त्याचबरोबर सामनावीर आणि मालिकावीर असे पुरस्कारांमधूनही खेळाडूंना रोख रक्कम मिळत असते. गेल्या वर्षी कोहलीने या सर्व माध्यमांतून १० लाख अमेरिकन डॉलर कमावले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मान्सून केरळमध्ये दाखल, आता पाऊस पडणार – Skymet Weather

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मान्सून आणि हवामानाविषयी माहिती देणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितले आहे की,’ दक्षिण पश्चिम मान्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच ३० मे रोजी केरळला पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्यातच सांगितले होते की, यावेळी मान्सून १ जूनला केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान खात्याने गुरुवारी आपला हा अंदाज बदलला. आयएमडीने सांगितले की,’ सध्याच्या परिस्थिती पावसाळ्याच्या आगमनासाठी अनुकूल बनली आहे. मात्र, यापूर्वी ५ जून रोजी मान्सून केरळला पोहोचणार असल्याचे सांगितले जात होते.

स्कायमेटने दावा केला आहे की, मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. मागीच्या वर्षी, आठ दिवसांच्या विलंबानंतर ८ जूनला मान्सून केरळ किनारपट्टीवर धडक दिली होती. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मॉन्सूनपासून पाऊस पडतो. हवामान खात्याने एप्रिलमध्ये सांगितले होते की, यावेळी मान्सून सरासरी राहणार आहे.

 

विभागाच्या मते, ९६ ते १००% पाऊस हा सामान्य मान्सून मानला जातो. साधारणपणे १ जून रोजी केरळ किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर ५ जून रोजी गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम आणि ईशान्य या राज्यात मान्सून पुढे सरकू शकतो.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १० जून रोजी मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये प्रवेश करू शकेल. याशिवाय १५ जूनला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात मान्सून २० जूनला तडाखा देऊ शकेल.

मात्र, २५ जूनपर्यंत उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात आणि हिमाचलमध्ये मान्सून पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून अखेरिस उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल. मान्सूनचा अंतिम प्रवेश राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथे होईल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ३० जूनपर्यंत मान्सून या राज्यांमध्ये दाखल होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पायलटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ; एअर इंडियाचं विमान अर्ध्या वाटेतून माघारी बोलावलं

नवी दिल्ली । वैमानिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे एअर इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या वंदे भारत मिशनअंतर्गत मॉस्कोला निघालेलं विमान परत बोलवावं लागलं आहे. आता सर्व क्रू कॉरेंटाईन राहणार असून दुसरं विमान मॉस्कोला पाठवलं जाईल. उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलेलं हे विमान परत बोलावण्यात आलं. दिल्ली विमानतळावर या विमानाचं आता निर्जंतुकीकरण केलं जात आहे. आता हे विमान मॉस्कोला कधी निघणार याविषयीची माहिती अजून देण्यात आलेली नाही.

शनिवारी सकाळी मॉस्कोसाठी निघालेलं एअर इंडियाचं ए-३२० निओ हे विमान उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं होतं. जाण्यापूर्वी क्रू मेंबर्सची कोरोना चाचणी करण्यात आली होती, ज्यापैकी वैमानिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान, विमान उड्डाण होण्यापूर्वी क्रू मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आहे असं चुकून वाचण्यात गेल्याची माहिती आहे. पण नंतर ही चूक लक्षात आली आणि विमान परत बोलवावं लागलं. एअर इंडियाचं हे विमान दिल्ली विमानतळावर १२.३० वाजता दाखल झालं.

दिलासादायक बाब म्हणजे मॉस्कोला निघालेल्या या विमानामध्ये एकाही प्रवाशाचा समावेश नव्हता. विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन तासातच हा प्रकार समोर आला. एका दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा एकदा क्रू मेंबर्सच्या चाचणी अहवालांवर नजर मारली असता ही चूक लक्षात आली. यानंतर एअर इंडियाने चालढकल करण्याऐवजी मोठा निर्णय घेत विमान परत बोलावलं. हे विमान उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं होतं. आता या विमानातील क्रू मेंबर्सला नियमानुसार १४ दिवस कॉरेंटाईन रहावं लागणार आहे. आता याऐवजी दुसरं विमान एअर इंडियाकडून मॉस्कोला पाठवलं जाणार असल्याची माहिती आहे. मॉस्कोमध्ये अडकलेल्या भारतीयांना या विमानातून परत आणलं जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मी मॅच्युर लिडर; उद्धव ठाकरेंना मला अपयशी ठरवायचे नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई । राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख उंचावतच असताना विरोधी पक्षीयांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रमक झाले असून मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते सडकून टीका करत आहेत. फडणवीस हे मुद्दामून सत्तेच्या हव्यासापोटी ठाकरे यांना अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यावर आता मी एक मॅच्युर लीडर आहे. मला उद्धव ठाकरे यांना अपयशी ठरवायचे नाही अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे हे माझ्या मोठ्या बंधूंसारखे आहेत. मला कोणालाही अपयशी ठरवायचे नाही. उद्धवजी माझे मित्र आहेत. मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत कामही केले आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदा निवडून आले. ते पहिल्यांदाच मुख्यमंत्रीही बनले. अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे यांच्याबद्दल चांगले शब्द काढले आहेङत. ठाकरे यांचा प्रत्यक्ष सत्तेतील अनुभव नवीन असल्याने काही गोष्टी समजून घ्यायला वेळ लागतो. तो वेळ आम्ही त्यांना दिला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र उद्धवजी असे करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीतही समन्वय नाहीये. ब्युरेक्रेट्समध्येही समन्वय नाहीये. आणि हा घडवण्याचे काम मुख्यमंत्री या नात्याने उद्धवजींचे आहे. आणि ते जर यात कमी पडत असतील तर ते दाखवून देणे हे माझे कर्तव्य आहे. असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मला कुठेही आत्ताच्या क्षणी उद्धवजींवर टीका करायची आहे. पॉईंट स्कोर करायचा आहे असं नाही. असे करून मला काही मिळणारही नाहीये. मी एक मॅच्युर लीडर आहे. मी अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे. कुठल्यावेळी काय बोलले पाहिजे आणि कुठल्या वेळी काय अपेक्षा केली पाहिजे हे मला चांगलं समजत. माझी दूरदृष्टी अजूनही चांगली आहे. मला जवळचा चष्मा लागला आहे. त्यामुळे मी जवळच्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो. असं फडणवीस यांनी सांगितले. कोरोना विरुद्ध लढण्याऐवजी या सरकारने पत्रकार आणि विरोधी पक्षांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर ट्रॉलर्सच्या गॅंग उभ्या केल्या. मात्र असं केलं तरी सत्य हे जनते पर्यंत पोहोचतेच. आणि त्यामुळेच सध्या जनतेत प्रचंड असंतोष आहे. सरकारने बनवाबनवी करायची सोडून प्रत्यक्ष काम करावं. आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबाच नव्हे तर सरकार म्हणेल ते आम्ही करायला तयार आहोत. अशी फडणवीस म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

संवेदनशून्य! श्रमिक ट्रेनध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्यूला भाजपा नेता म्हणाला, ‘किरकोळ घटना’

कोलकाता ।  सोमवारपासून देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार श्रमिक विशेष ट्रेन निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेत असल्यानं, तसेच ट्रेन निश्चित ठिकाणी जाताना भरकटल्यामुळं या ट्रेनने प्रवास करणाऱ्या आतापर्यंत एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. याचसंदर्भात बोलताना भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दिलीप घोष म्हणले कि, ”काही दुर्देवी घटना नक्की घडल्या आहेत, मात्र त्यासाठी रेल्वे प्रशासनाला दोषी ठरवता येणार नाही. श्रमिकांच्या प्रवासासाठी रेल्वे त्याच्याकडून सर्वोत्तम सेवा देत आहे. काही जणांचे मृत्यू झाले आहेत पण ते वेगवेगळ्या घटनांमध्ये झाले आहेत,” असं मत व्यक्त केलं. गुरुवारी घोष यांनी व्यक्त केलेल्या या मतावरुन विरोधकांनी आता हे वक्तव्य संवेदनशून्य असल्याची टीका केली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“प्रवाशांना मदतीची गरज असताना रेल्वेने कशाप्रकारे उत्तम प्रकारे काम केलं आहे याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. काही छोट्या घटना घडल्या आहेत मात्र त्यामुळे रेल्वेसेवा बंद करता येणार नाही,” असं खासदार असलेल्या घोष यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. घोष यांच्या या वक्तव्यावरुन पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि माकपने (एम) (सीपीआय एम) आक्षेप नोंदवला आहे. भाजपा नेत्यांनी मजुरांना होत असणाऱ्या अडचणींबद्दल संवदेनशील असण्याची गरज आहे असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.

“कोरोना संकट आणि लॉकडाउनचे केंद्र सरकारने नीट नियोजन न केल्याने स्थलांतरितांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक लोकांचा मृत्यू होत आहे असं असतानाच भाजपा नेते अशापद्धतीचे उद्धट वक्तव्य करत आहेत जसं काही काही घडलचं नाही. आमच्याकडे बोट दाखवण्याआधी दिलीप घोष यांनी जरा संभाळून आणि नीट बोलावं,” असा टोला तृणमूलच्या खासदार सौगाता रॉय यांनी घोष यांना लगावला आहे.

माकपचे सदस्य मोहम्मद सलीम यांनीही रॉय यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. “घोष यांच्यासारखे नेते भाजपाच्या आभासी जगात राहत आहेत. ज्यांना भाजपाच्या काळात सर्व काही चांगले होत असल्याचं वाटत आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नामुळे मोदी सरकार लोकांचे प्राण वाचवण्यात अपयशी ठरत असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारमुळे गोंधळ निर्णाण झालेला असताना अशाप्रकारे दिशाभूल करताना भाजपा नेत्यांना लाज वाटली पाहिजे,” असं सलीम यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापूरचे उपमहापौर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी पोलिसांनी काल सोलापुरातून अटक केली आहे. फ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोलापूरमधील विजापूरनाका पोलीस ठाण्याच्या मदतीने काळे यांना घरातून अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील कोंडवा येथील सिंधू सुभाष चव्हाण यांच्या मुलाने 15 लाख रुपये देऊन फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, मुलगा सचिन आणि पती सुभाष यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या प्लटवर गेल्यानंतर तो दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे समोर आले. बॉम्बे मर्कंटाईल एमजी रोड शाखेतील बँक मॅनेजरला हाताशी धरून नीता सुरेश लोटे राजेश दिलीप काळे यांनीच लिलावात तो फ्लॅट घेतल्याचे समोर आले. तर दुसरीकडे पिंपळे येथील एक फ्लॅट चौघांना विकून वेगवेगळ्या नावे त्या फ्लॅटवर राजेश काळे आणि निता लोटे यांनी चिंचवड स्टेशन परिसरातील देना बँकेतून कर्ज घेतले.

दरम्यान, बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक मॅनेजर कुमुद बाबुराव वाळके यांनी निगडी पोलीस ठाण्यात राजेश काळे आणि निता लोटे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार त्या दोघांवर त्या ठिकाणीही गुन्हे दाखल झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सलमान खानने मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ गिफ्ट; मुख्यमंत्री ठाकरेंनीही केले कौतुक

मुंबई । अभिनेता सलमान खान हा त्याच्या अभिनयासोबत नेहमीच अनेकांना मदत केल्याबद्दल चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये बऱ्याचजणांना उभे करण्यासाठी सलमानने मदत केल्याचे म्हंटले जाते. काही अभिनेत्रींना त्याने ब्रेक दिल्याच्याही चर्चा असतात. यासोबत बिईंग ह्युमन या त्याच्या संस्थेद्वारे तो समाजातील गरजूनाही मदत करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या घरातून काही गरजूना आपल्या घरातून धान्य आणि जीवनावश्यक किट पाठवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. संचारबंदी सुरु झाल्यापासून तो वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. आता त्याने कोरोना युद्धात अग्रभागी काम करणाऱ्या मुंबई पोलिसांना १ लाख सॅनिटायझरच्या बाटल्या दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल ट्विटर वर त्याचे आभार मानले आहेत.

बॉलिवूड स्टार सलमान खान याने काही दिवसांपूर्वी चित्रपटक्षेत्रातील २५ हजार कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे व धान्याचे किट वाटले होते. याची दखल  माध्यमांनी घेतली होती. आता त्याने मुंबई पोलिसांना १ लाख सॅनिटायझर च्या बाटल्या दिल्या आहेत. समिना शेख यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून ही  माहिती देत त्याचे कौतुक केले होते. ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले होते. मुख्यमंत्र्यांनी ही पोस्ट शेअर करत सलमान खानचे कौतुक केले आहे तसेच आभार मानले आहेत.

 

सलमान खान हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. चित्रपट सृष्टीत त्यांच्या कुटुंबाचे योगदान मोठे आहे. त्यांचे वडील सलीम खान, भाऊ अरबाज खान व सोहेल खान हेही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आहेत. त्याच्या दानशूर स्वभावामुळे सलमान खान अनेकांचा प्रिय आहे. बिईंग ह्युमन च्या द्वारे सर्वप्रकारच्या गरजूना तो गेली अनेक वर्षे मदत करतो आहे. तसेच हिंदी बिग बॉस या गाजलेल्या शोचा तो सूत्रसंचालक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

काश्मिरात २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

मुंबई । जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. ही दुसरी मोठी कारवाई आहे. दहतवाद्यांची घुसखोरी सुरु आहे. गेल्या आठवड्यातही चकमक झाली होती. तेव्हापासून जम्मू-काश्मीर येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाम परिसरात अजूनहीसर्च ऑपरेशन सुरु आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील या जिल्ह्यातील वानपुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर हा परिसर घेरला गेला होता आणि शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. याला भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात दहशतवादानं पुन्हा एकदा तोंड वर काढलेलं दिसतंय. याविरुद्ध सुरक्षादलाकडून आपली कारवाई तेज केलीय. उल्लेखनीय म्हणजे, कुलगाममध्ये गेल्या पाच दिवसांत हे दुसरं ऑपरेशन आहे. यापूर्वी मंजगाम भागात सुरक्षा दलानं एन्काऊंटरमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दरम्यान, एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील वानपुरा भागात दहशतवादी असल्याचं गुप्त सूचना मिळाल्यानंतर या परिसराला वेढा घालून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. याच दरम्यान सुरक्षादलावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला त्यानंतर उत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत दोन जणांना ठार करण्यात आलं. सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”