Monday, December 29, 2025
Home Blog Page 5736

‘हा’ पाकिस्तानी गोलंदाज बरळला की,’ब्रायन लारा माझ्या गोलंदाजीसमोर संघर्ष करत असे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चांगलीच चमकदार ठरली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत, त्यातीलच एक विक्रम म्हणजे कसोटीमधये एका डावात ४०० धावा करण्याचा आहे. मात्र आजवर कोणत्याही खेळाडूला लाराचा हा विक्रम मोडता आलेला नाही आहे. आपल्या काळात गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या लाराबाबत पाकिस्तानचा एका गोलंदाजाने असे म्हंटले आहे की,’ लारा त्याच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करत असे.’

होय, हा गोलंदाज दुसरा कोणीही नसून पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिज आहे. हाफिजने पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “डावखुरा फलंदाज असलेल्या ब्रायन लाराला माझा सामना करणे नेहमीच अवघड गेले आहे. मी नेहमी उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांसमोर नेहमीच चांगली गोलंदाजी केली आहे तसेच मी माझा आवडता फलंदाज असलेल्या लाराला बादही केलेले आहे.

हफीझ पुढे म्हणाला की, “लारानेही हे कबूल केले की माझ्याविरुद्ध फलंदाजी करताना त्याला त्रास होत होता. लारा हा एक फर्स्ट क्लास फलंदाज आहे आणि तो स्पिनर्सला सहसा चांगला खेळत असे. ” एकदिवसीय क्रिकेटमध्ये हफीझने दोन वेळा ब्रायन लाराला बादही केलेले आहे.

Mohammed Hafiz Back To The Pakistani Side For Series Against ...

तसेच हफीझ म्हणाला, “माझ्या कारकीर्दीत माझ्या गोलंदाजीने मला खूप आधार दिला. जर एखाद्या सामन्यात मला चांगली फलंदाजी करता आली नाही तर मी चांगली गोलंदाजी करून हि कसर भरून काढत असे. जोपर्यंत मी क्रिकेट खेळत आहे तोपर्यंत डावखुऱ्या खेळाडूंविरूद्धचे माझे हे यश मी कायम ठेवू इच्छित आहे. कारण मला हे गॉड गिफ़्टेड आहे. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राम गोपाल वर्माच्या कोरोनावरील जगातील पहिल्या सिनेमाचा ‘ट्रेलर व्हायरल’

मुंबई । कोरोनाच्या विळख्यातून जगाची सुटका कधी होईल याचं उत्तर सध्या कोणाकडेही नाही आहे. आपल्या देशात कोरोनाच्या रुग्णांची सध्या झपाट्यानं वाढत आहे. इतकंच नाही सोशल डिस्टन्सिंग अजूनही गांभिर्यानं घेतलं जात नाही आहे. याच विषयावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली असून याचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला आहे.

या चित्रपटाचं नावही ‘कोरोना व्हायरस’ असं ठेवण्यात आलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटव्दारे या चित्रपटाची घोषणा केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला. ‘करोना व्हायरस चित्रपटातील फॅमिली डिस्टन्सिंगचा एक फोटो…लॉकडाऊनवर आधारित, लॉकडाऊन दरम्यान शूट झालेला चित्रपट’,असं कॅप्शनही त्यांनं दिलं आहे.

कोरोनावर तयार झालेला हा जगातील पहिला सिनेमा असल्याचा दावा या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे. केवळ बाहेर नव्हे तर घरात देखील सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं असा संदेश या ट्रेलरमधून दिला गेला आहे. डिस्टन्सिंगचा घरातील नातेसंबंधावर झालेला परिणाम देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

वडील वीरू देवगण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजयने शेअर केली भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजय देवगणच्या वडिलांनी २७ मे २०१९ रोजी जगाचा निरोप घेतला. अजयने त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. वीरू देवगन बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि स्टंट कोरियोग्राफर होते. वडिलांसोबतच्या काही आठवणी सांगत अजय देवगणने लिहिले,’ डियर डॅड तुमच्या जाण्याला १ वर्ष पूर्ण झाले आहे. मी तुम्हांला नेहमीच आमच्याबरोबर बघू शकतो. शांततेत, काळजी घेणारे , संरक्षक; तुमची उपस्थिती आनंददायी आहे.’

 

अजय देवगन आपल्या वडिलांच्या अगदी जवळ होता आणि तो त्यांना आपला गुरुही मानत होता. आपल्या बॉलिवूड कारकिर्दीचे सगळे श्रेय तो वडिलांनाही देतो, कारण वीरू देवगण यांना वाटायचे की, अजयने सुपरस्टार बनावे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच त्यांनी अजयला चित्रपटांसाठी तयार करण्यास सुरवात केली.

 


View this post on Instagram

 

My Father, My Guru. He gave me invaluable life lessons ???? #HappyTeachersDay

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on Sep 5, 2019 at 2:01am PDT

 

वीरू देवगणने आतापर्यन्त ८० हून अधिक चित्रपटांमध्ये स्टंट कोरियोग्राफ/ डायरेक्ट केलेले आहेत. दिलवाले, शहेनशाह, हिंदुस्तान की कसम अशा अनेक चित्रपटात त्याने स्टंट कोरियोग्राफ केले आहे. १९९२ साली आलेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अ‍ॅ क्शन डायरेक्टर या पुरस्काराने गौरविण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मुंबई पोलीस दलातील आणखी एका कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू

मुंबई । मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाची दहशत पसरली असून आज आणखी एका पोलिसाला कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. दादर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले हेड कॉन्स्टेबल शरद मोहिते (५५) यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान, राज्यात कोरोनाने मृत पावलेल्या पोलिसांची संख्या आता २१ वर पोहोचली असून आतापर्यंत १९६४ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे.

राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत कॉन्स्टेबल शरद मोहिते यांच्या मृत्यूंनंतर मुंबईत आतापर्यंत कोरोनाने १३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात हाच आकडा २१ वर पोहचला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यातील तब्बल १९६४ पोलीस आतापर्यंत कोरोनाबाधित झाले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ८४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर १०९५ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्य पोलीस दलाकडून देण्यात आली. करोना बाधितांमध्ये राज्यातील २२३ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर १७४१ कर्मचारी आहेत. अद्याप १५५ अधिकारी आणि ९४० पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ६७ पोलीस अधिकारी हे या आजारातून बरे झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जगातील सर्वात ऊंच माऊंट एव्हरेस्टची उंची मोजायला निघालाय चीन; तिबेट मधून केली चढाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वांत उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची पुन्हा मोजण्यासाठी चीनची एक सर्वेक्षण टीम बुधवारी तिबेटमार्गे एव्हरेस्टवर पोहोचली. चीनच्या मोजमापानुसार माउंट एव्हरेस्टची उंची ८८४४.४३ मीटर असून ती नेपाळने केलेल्या मोजणीपेक्षा चार मीटरने कमी आहे. १ मेपासून या जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजण्यासाठी चीनने नवीन सर्वेक्षण सुरू केले. नेपाळने केलेल्या एव्हरेस्टच्या उंचीच्या मोजमापावर चीन समाधानी नाही.

सिन्हुआच्या अहवालात असे म्हटले आहे की,’ चीनला जगातील या सर्वोच्च शिखराची उंची मोजण्यासाठी मोहीम राबविण्यास उद्युक्त केले आणि वैज्ञानिकांना असा विश्वास आहे की, ते निसर्गाच्या प्रति मानवाचे आकलन वाढवतील तसेच वैज्ञानिकतेच्या वाढीस चालना देण्यास मदत करतील.

अहवालात असेही म्हटले आहे की, चीनी सर्वेक्षणकर्त्यांनी माउंट एव्हरेस्टवर मोजमाप आणि वैज्ञानिक संशोधनाची सहा चक्रे पूर्ण केली. १९७५ आणि २००५ मध्ये अनुक्रमे ८,८४३.१३ मीटर आणि ८,८४४.४३ मीटर उंचीची नोंद केली.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेपाळने मार्चमध्ये माउंट एव्हरेस्टसहित हिमालयातील सर्व शिखरे गिर्यारोहणासाठी बंद केली आहेत. चीनी कंपनी हुआवेई ही चायना मोबाईलबरोबर माउंट एव्हरेस्टवर दोन ५ जी स्टेशन्स तयार करण्यासाठी काम करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

दहावीच्या निकालाबाबत SSC बोर्डानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे । दहावीच्या निकालाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC) एक मोठा निर्णय घेतला आहे. एसएससी बोर्डाकडून मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाचा पेपर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता. आता या विषयाचे गुण कसे दिले जाणार ते बोर्डाने जाहीर केले आहे.

बोर्डाने या संदर्भात एक परिपत्रक जरी केलं आहे. त्यानुसार, सामाजिक शास्त्रे पेपर- २ या विषयाचे गुणदान हे सरासरीने होणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेत त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन त्याचे गुणांत रुपांतर करून त्यानुसार गुण दिले जातील.

भूगोल विषयाची परीक्षा २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नियोजित होती; मात्र ती करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या.

या दोन्ही विषयांचे गुणदान कसे होणार याविषयी बोर्डाने माहिती जाहीर केली आहे. याचसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान विद्यार्थ्यांनी अन्य विषयांच्या लेखी, तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन / तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.

maharashtra times

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊनचा नियम मोडू नये, म्हणून ‘या’ देशाचे पंतप्रधान आपल्या मरणासन्न आईला भेटू शकले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी जगभरातील सर्व नेत्यांसाठी एक उदाहरण ठेवले आहे. ज्याची सध्या सगळीकडे खूप चर्चा होते आहे. पीएम मार्क यांची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती आणि त्या जगणे शक्य नसल्याचे त्यांच्या डॉक्टरांनीही सांगितले होते. मात्र, कोरोनाव्हायरसमुळे देशात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे मार्क यांना शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांच्या आईला भेटता आले नाही. लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानंतर मार्क आपल्या आईला भेटायला गेले, मात्र त्याच रात्री त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

नेदरलँड्स पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मार्क आपल्या आजारी असलेल्या आईला ज्यादिवशी भेटायला गेले त्या रात्रीच त्यांचे निधन झाले. प्रवक्त्याने सांगितले की, त्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या, मात्र पंतप्रधानांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्यामुळे ते त्यांना भेटायला जाऊ शकले नाही. मार्कने गेल्या सोमवारी जाहीर केले होते की,’ त्यांच्या ९६ वर्षीय आईचे १३ मे रोजी निधन झाले आहे. मार्क यांनी स्पष्टीकरण दिले होते की ,’त्यांच्या आईचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गाने नव्हे तर दीर्घ आजाराने झाला.’

गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आपल्या आईच्या अखेरच्या दिवसांत आईबरोबर राहता न आल्याबद्दल मार्कला खूप वाईट वाटत आहे. मात्र, त्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की,’ पंतप्रधान असलो तरीही कायदे प्रत्येकाला तेवढेच लागू आहेत.’ पीएम मार्कची यांची आई केअर होममध्ये राहत होती आणि लॉकडाऊनच्या नियमांनुसार केअर होमला भेट देण्यास पूर्णपणे बंदी घातली गेली होती.

पंतप्रधानांच्या कार्यालयानेही याची पुष्टी केली आहे की, डॉक्टरांकडून मार्क यांना त्यांच्या आईच्या बिघडलेल्या अवस्थेबद्दल माहिती देण्यात आली होती. मात्र कायद्याचे उल्लंघन करणे त्यांना योग्य वाटले नाही. मार्कने आपल्या आईच्या मृत्यूची घोषणा केली आणि म्हटले की,’ मी तिच्याबरोबर शेवटचे क्षण घालवू शकलो नाही याहून अधिक दु: खदायक काहीच नाही.’ नेदरलँड्समध्ये आतापर्यंत ४५,००० पेक्षा जास्त संसर्गाची नोंद झाली आहे, तर त्यातून ५,८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाऊनमध्ये प्रियकर पंजाबी ड्रेस घालून निघाला प्रेयसीला भेटायला, पण..

वलसाड, गुजरात । लॉकडाउनमुळे प्रियकर-प्रेयसींना विरह सहन करावा लागत आहे. त्यांचा संवाद फक्त मोबाइलपुरता उरला आहे. बरेच जण घरी असल्यानं घरच्यांसमोर फोनवर सुखानं बोलताही येत नाही. लॉकडाऊन हा अनेकांसाठी न संपणारा वनवास ठरतं आहे. दरम्यान, काही प्रियकर-प्रेयसींच्या मनात लॉकडाऊनचे नियम मोडत आपल्या जिवलगाला भेटण्याची उत्कट इच्छा तयार होत आहे. रस्त्यावरील पोलीस आणि कोरोना यामुळं काहींनी वेदना सहन करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही प्रेमवीरांनी जोखीम पत्करत घराबाहेर पडण्याचा पराक्रम केला आहे. असाच एक प्रकार गुजरातमध्ये समोर आला आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी आतूर असलेल्या एका युवकाने चक्क महिलेचा वेश धारण करुन मध्यरात्री घराबाहेर पडण्याचा पराक्रम केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

महिलेचे कपडे घातले म्हणून पोलीस आपल्याला पकडणार नाहीत असे या युवकाला वाटले होते. पण इथेच तो चुकला. गुजरातच्या वलसाडमधील पारडी शहरात ही घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास पारीयारोडवर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना मोपेडवर एक महिला दिसली. तिेने पंजाबी ड्रेस घातला होता व चेहऱ्याभोवती ओढणी गुंडाळलेली होती.

महिला समजून सुरुवातीला पोलिसांनी दुचाकीला थांबवले नाही. पण दुचाकीवर असलेली तथाकथित महिला पुन्हा तिथे आली तेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी मोपेड थांबवली. पोलिसांनी इतक्या रात्री बाहेर पडण्याचे कारण विचारले?. त्यावेळी बाईकवर बसलेला युवक आपले बिंग फुटेल या भितीने काही बोलत नव्हता. तो चिन्हाने पोलिसांशी संवाद साधत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.

अखेर पोलिसांनी त्या महिलेला चेहऱ्यावरुन ओढणी हटवायला सांगितली. तेव्हा सर्व सत्य समोर आले. पोलिसांनी तसेच मुलीच्या पालकांनी पकडू नये, यासाठी मुलीचा वेश धारण केल्याचे युवकाने चौकशीमध्ये सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली होती. मंगळवारी संध्याकाळी जामिनावर त्या युवकाची सुटका झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

SBI चा ग्राहकांना झटका; FD वरील व्याज ०.४० % ने कमी केले, असा आहे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याजदरात 0.40 टक्क्यांनी घट केली आहे. एसबीआयच्या एफडीवरील कमी करण्यात आलेले नवीन दर 27 मेपासून लागू झाले आहेत.

एसबीआयने आपल्या वेबसाइटवर यासंबंधीची माहिती दिली असून एका महिन्यात बँकेकडून ग्राहकांना मिळालेला हा दुसरा धक्का आहे. एसबीआयने मेच्या सुरूवातीस एफडीवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ग्राहकांना मिळणारा रिटर्नही कमी केला होता.

याशिवाय एसबीआयने बल्क डिपॉझिटसवरील व्याज दरातही कपात केलेली आहे. 2 कोटी किंवा त्याहून अधिकबल्क डिपॉझिटसवरील व्याजदरात बँकेने 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. बँकेकडून आता ठेवीदारांना बल्क डिपॉझिटसवर जास्तीत जास्त 3 टक्के व्याज मिळेल. आजपासून या दरांमधले हे बदल लागू करण्यात आले आहेत.

आता नव्या दरांनंतर एसबीआयच्या एफडीवरील वेगवेगळे टर्म व्याजदर जाणून घ्या.

7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.9 टक्के व्याज

46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 3.9 टक्के व्याज

180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दर

211 दिवस ते 1 वर्षाच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दर

1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.1 टक्के व्याज दर

2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी एफडीवर व्याजदर 5.1 टक्के

3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी एफडीवर व्याजदर 5.3%

5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.4% व्याज दर

बँकांच्या एफडीवरील व्याज दर कमी होण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. गेल्या आठवड्यातच आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात कपात केली होती, त्यानंतर असे म्हटले जात आहे की लवकरच बँका आपल्या ग्राहकांसाठी कर्जाचे दरही कमी करतील. मात्र, एफडी दरातही कपात करण्याची भीतीही व्यक्त केली गेली.

तथापि, एसबीआयचे एफडी दर ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे आहेत आणि आपण त्याबद्दल येथे माहिती मिळवू शकता.

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे एफडी व्याज दर जाणून घ्या

1 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दर

46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दर

180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.9 टक्के व्याज

211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.9 टक्के व्याज दर

1 वर्ष ते 2 वर्षापेक्षा कमी एफडीवर 5.6 टक्के व्याज दर

2 वर्ष आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.6 टक्के व्याज दर

3 वर्ष ते 5 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.8 टक्के व्याज दर

5 वर्ष व 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.2 टक्के व्याज दर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता दीड लाख पार तर मृत्यूदरात घट

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा दीड लाख पार पोहोचला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, देशाचा रिकव्हरी रेट 41.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आरोग्य मंत्रालयाच्या या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात एक लाख 51 हजार 767 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, 4387 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 64 हजार 425 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

मृत्यूदरात घट
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात देशात काही प्रमाणात घट आली आहे. जवळपास ३.३ टक्क्यांवरुन आता मृत्यूदर २.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावरील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदराशी तुलना केल्यास भारताच्या दरात बरीच तफावत आहे. ही बाब अतिशय दिलासादायक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात घटणाऱ्या या मृत्यूदराचा आकडा आणखी कमी होऊन कोरोनावर मात करण्यात देश यशस्वी ठरेल याबाबत सारेच आशावादी आहेत.

महाराष्ट्रात काल 2 हजार 091 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर 1168 रुग्ण बरे झाले. तर दिवसभरात सर्वाधिक 97 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला आहे. त्यातील 16 हजार 954 रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 36 हजार 004 रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा 1792 वर पोहोचले आहेत.

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 30.96 टक्के एवढा आहे. तर एकट्या मुंबई शहरात 32 हजार 974 कोरोनाबाधित असून त्यातील 1065 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 936 रुग्ण असून त्यातील 542 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रिकव्हरी रेट 56.28 टक्के एवढा आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 56 टक्क्यांवर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”