Monday, December 29, 2025
Home Blog Page 5735

मग मोदींनी राबवलेली ‘स्किल इंडिया’ योजना फेल गेली का?; जयंत पाटील यांचा फडणवीसांना सवाल

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची पोलखोल करत वास्तविक माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील भूमिपुत्रांसंबंधी केलेल्या  वक्तव्याचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या आपल्या पत्रकार परिषदेत “भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांची काम करणं शक्य होणार नाही. भूमिपुत्रांना संधी मिळाली, तर आनंदच आहे, पण राज्य सरकार त्यांच्यामध्ये असं कौशल्य दोन महिन्यांत विकसित करू शकणार नाही,” असं म्हटलं होतं. फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरून जयंत पाटील यांनी त्यांना टोला होणला.

स्थलांतरित मजुरांच्या अनुपस्थितीमध्ये कारखानदारी सुरू व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील युवकांकडे स्कील आहे. स्किल इंडिया नावाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. तो फेल गेला की काय, असा प्रश्न निर्माण करणार विधान फडणवीस यांचं आहे. मागच्या पाच वर्षात स्किल इंडियानं काही स्किल दिली असतील, त्याचाही वापर झाला पाहिजे. पण, त्यावर फडणवीस यांचा विश्वास दिसत नाही,” असं म्हणत पाटील यांनी फडणवीस यांना चिमटा काढाला.

ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, सर्व मजूर राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. त्या लोकांकडे असलेलं स्किल महाराष्ट्रातील लोकांकडं नाही. तेव्हा फडणवीसांनी महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचं काम केलं. राज्याच्या तरुणांमध्ये, जनतेमध्ये स्किल आहे. ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात, असा विश्वास आहे. जे गेले आहेत, ते परत येतीलचं असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले..

मुंबई । देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्गावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, राज्यात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

येत्या २९ तारखेला आम्ही राज्यातील लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेऊ. बरीच स्थिती आटोक्यात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जिथे कोविड रुग्ण नाहीत किंवा अगदी कमी आहेत, तेथील व्यवहार सुरळीत करण्याबाबत विचार करू असे पाटील म्हणाले. पण जिथे रुग्ण जास्त आहेत तिथे शिथिलता दिली जाणार नसल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन ४ सुरु आहे. पण राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊन हा शब्दप्रयोग न करता काही गोष्टी कशा पुर्वपदावर आणता येतील याचा विचार करुया असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केले होते. दरम्यान राज्यातील लॉकडाऊन वाढणार की नाही हा प्रश्न विचारला जातो आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊनचा ५ वा टप्पा लागू होणार का? केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई । देशात कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, देशात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अशा वेळी केंद्रीय गृह मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही प्रसार माध्यम संस्थांकडून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. प्रसार माध्यमातून केले जाणारे लॉकडाऊन ५.० बद्दलचे सर्व दावे खोटे असल्याचं स्पष्टीकरणं गृह मंत्रालयानं दिलं आहे.

येत्या ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ते लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल घोषणा करू शकतील, असा प्रसार माध्यमांचा कयास आहे. गृह मंत्रालयानं हा दावा आधारहीन असल्याचं सांगितलं आहे. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. २५ मार्चपासून सुरू झालेलं हे लॉकडाऊन आतापर्यंत ४ टप्प्यांत वाढवण्यात आलं. १८ मेपासून सुरू झालेला लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, एका प्रसार माध्यम संस्थेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ३१ मे रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल घोषणा होऊ शकते, असं म्हटलं आहे. यावर गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्थिती स्पष्ट करतानाच मीडियाचे या दाव्यांना कोणताही अर्थ नसल्यांचं म्हटलं आहे. या दाव्यांना गृह मंत्रालयाशी जोडणंही योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कारण लॉकडाऊनची संपूर्ण रुपरेषा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) द्वारे तयार केली जाते असं स्पष्टीकरणही गृह मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मजुरांच्या ट्रेनचा खर्च राज्यानं दिला; फडणवीसांच्या दाव्याची महाविकास आघाडीने केली पोलखोल

मुंबई । राज्यात काही दिवसांपासून मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रमिक रेल्वेचा खर्च केंद्रानं उचलला असा दावा केला होता. फडणवीस यांनी या केलेल्या दाव्याची महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनिल परब यांनी केंद्राकडून राज्याला रेल्वे सोडण्याबाबतच्या फडणवीस यांनी केलेल्या दाव्यांवर उत्तरं दिली.

परब म्हणाले, “फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यातून श्रमिकांसाठी ६०० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यासाठी केंद्र सरकारनं खर्च उचलला. एका रेल्वेसाठी केंद्रानं ५० लाखांचा खर्च उचलला,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. आता एका रेल्वेला ५० लाख खर्च कसा येतो? हे फडणवीस यांनी सांगावं. प्रत्यक्षात या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारनं दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाही. श्रमिकांना घरी सोडण्यासाठी संपूर्ण खर्च राज्य सरकारनं केला. महाराष्ट्रातून ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या मजुरांचा सगळा ट्रेन प्रवासाचा ६८ कोटी रुपये खर्च राज्याने केला. केंद्राकडून एकही पैसा मिळालेला नाही” असं परब यांनी सांगितलं.

महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं १७८ रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. ३० मे पर्यंत या गाड्या सोडायच्या होत्या. पण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एका दिवसात १४८ रेल्वेगाड्या दिल्या. त्यानंतर काल एकाच दिवसात ४८ रेल्वेगाड्या सोडल्या. परवापर्यंत (२५ मे पर्यंत) सगळं बरं होतं. पण, त्यानंतर मागील दोन दिवसांपासून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप परब यांनी केंद्रावर केला.

पूर्वी गाडी सोडण्याच्या एक दिवस अगोदर माहिती राज्य सरकारला दिली जायची. आता सरकारला ते कळवलं जात नाही. काल ११:३० वाजताची रेल्वे १०:३० वाजता सोडली. त्यामुळे मजुरांना ताटकळत बसावं लागलं. गुजरात महाराष्ट्रापेक्षा छोट आहे. पण, १५०० ट्रेन दिल्या, महाराष्ट्राला ६०० ट्रेन दिल्या गेल्या. त्यात रेल्वेच्या वेळा बदलून गोंधळ आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं अनिल परब म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

२००६ कराची कसोटी जेव्हा अख्तरच्या वेगवान गोलंदाजीला भारतीय फलंदाज घाबरले होते- मोहम्मद आसिफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २००६ मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे खेळलेला तिसरा कसोटी सामना पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफला आठवला. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अष्टपैलू इरफान पठाणने हॅटट्रिक घेतली होती. इतकेच नाही तर या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही धडाकेबाज दुहेरी शतक झळकावले होते. आपल्या संघाने भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना कसा जिंकला याबद्दल आसिफने एक मनोरंजक खुलासा आहे.

या मालिकेतील पहिले दोन सामने मुलतान आणि फैसलाबाद येथे खेळविण्यात आले होते तर तिसरा कसोटी सामना २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार होता. पाकिस्तानी शो बर्गर्जमध्ये आसिफ म्हणाला, “जर तुम्हाला आठवत असेल तर २००६ साली भारताची टीम पाकिस्तानात आली होती. त्यांनी खूप जोरदार फलंदाजी केली होती. राहुल द्रविड खूपच धावा करत होता, वीरेंद्र सेहवागनेही मुलतानमध्ये आम्हाला खूप धुवून काढले होते. फैसलाबाद कसोटीत तर दोन्ही संघांनी ६०० धावा केल्या. आम्हाला भारताच्या फलंदाजीच्या खोलीबद्दल चिंता होती. महेंद्रसिंग धोनी त्यावेळी सात किंवा आठ क्रमांकावर फलंदाजी करायचा. “

तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. आसिफ म्हणाला, “सामना सुरू होताच इरफान पठाणने पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली होती. त्यामुळे आमचे मनोबल ढासळले होते. कामरान अकमलच्या खालच्या क्रमांकावर खेळात शतक झळकावले होते. आम्ही जवळपास २४० धावा केल्या.” पाकिस्तानने दुसर्‍या डावात सात बाद ५९९ धावा केल्या आणि भारताला २६५ धावांवर बाद करून आम्ही तो सामना ३४१ धावांनी जिंकला.

Mohammad Asif opens up on his tainted international career

या माजी वेगवान गोलंदाजानेही सांगितले की,’ या सामन्यादरम्यान त्याचा सहकारी शोएब अख्तरच्या वेगवान चेंडूंनी तर एकदा सचिन तेंडुलकरला इतके घाबरवले की त्याचे वेगवान बाऊन्सर्स पाहून सचिनने आपले डोळेच बंद केले.’

तो म्हणाला, “जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा मी स्क्वेअर लेगवर उभा होतो आणि शोएब अख्तर सातत्याने वेगाने गोलंदाजी करत होता. दरम्यान, सचिनने त्याच्या दोन बाउन्सरवर आपले डोळेच बंद केले होते. भारतीय संघ तेव्हा बॅकफूटवर होता आणि म्हणून आम्ही पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केंद्राने हक्काचेही पैसे दिले नाही, अन फडणवीस हवेतील आकडे दाखवतात- अनिल परब

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राला केंद्राकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहिती देऊन अभासी चित्रं निर्माण केलं आहे. मात्र, वास्तव चित्रं वेगळच आहे. केंद्राकडेच राज्याचे ४२ हजार कोटींचा निधी थकीत असून करोना संकटाच्या काळातही हा निधी राज्याला मिळालेला नाही. राज्याला केंद्राकडून हक्काचेही पैसे दिले जात नाहीत, मात्र फडणवीस हवेतील आकडे दाखवून अभासी चित्रं निर्माण करत आहेत, अशी टीका राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी केली.

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची पोलखोल केली. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फडणवीस यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतील दाव्यांचा चांगलाच समाचार घेतला.

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारला २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत केली असा दावा काल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला केला होता. त्याला आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. अनिल परब यांनी राज्याला केंद्राकडून नेमके काय मिळाले? फडणवीसांनी कशी दिशाभूल केली? त्याची सविस्तर माहिती दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत १७२६ कोटी रुपये दिले. पण ही योजना आधीपासूनच लागू आहे. ६ हजारमधील दोन-दोन हजार रक्कम टप्याटप्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होती. त्यात महाराष्ट्रासाठी वेगळं काही नाही. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना केंद्राने ११६ कोटी रुपये दिले. पण २० टक्के रक्कम केंद्र सरकार देते. त्याचबरोबर १२१० कोटी महाराष्ट्र सरकारने दिले. पण देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कररित्या विसरले. महाराष्ट्रातून ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या मजुरांचा सगळा ट्रेन प्रवासाचा ६८ कोटी रुपये खर्च राज्याने केला. केंद्राकडून एकही पैसा मिळालेला नाही असा खुलासा अनिल परब यांनी यावेळी केला

महाराष्ट्र सरकारला २०१९-२० सालचे हक्काचे १८२७९ कोटी रुपये आणि आता एप्रिल-मे चे २३६९ कोटी मिळालेले नाहीत. ते दिले तरी पुरेसं आहेत. आम्ही या मागणीसाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करतोय. ४२ हजार कोटींची अपेक्षा होती पण नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनमुळे २४ हजार कोटींची तूट आहे. महाराष्ट्राला जीडीपीच्या ५ टक्के कर्ज घेता येईल. हे आम्हाला यांच्याकडून शिकावे लागेल? असा खोचक सवाल परब यांनी फडणवीस यांना केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

ऑस्ट्रेलियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू म्हणाली,’सचिनला गोलंदाजी केल्याचा तो क्षण नेहमीच लक्षात ठेवेन’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटच्या मैदानावर खेळण्याचे स्वप्न पाहत असतात, मात्र अगदी काही खेळाडूंचेच हे स्वप्न पूर्ण झाले आहे. या खेळाडूंपैकीच एक ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची अष्टपैलू अ‍ॅनाबेल सदरलँड ही देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलाच्या आगीत बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी बुशफायर क्रिकेट बॅश खेळला गेला. तेव्हा ऐलिस पेरीसह अ‍ॅनाबेल सदरलँडने सचिनला गोलंदाजी केली. सदरलँड याविषयी म्हणते की,’ तिच्या आयुष्यातील हा क्षण तिला आयुष्यभर लक्षात राहील.’

Bowling to Sachin Tendulkar will be a memory for the rest of my ...

यावर्षी ९ फेब्रुवारी रोजी सचिनने ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी बुशफायर क्रिकेट बॅश चॅरिटी सामन्यात सहभाग घेतला. हा सामना १० षटकांचा खेळवण्यात आला. ज्यामध्ये पेरी आणि सदरलँड यांनी सचिनला गोलंदाजी केली.

क्रिकेट डॉट कॉमने सोशल मीडियावर नुंतच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात सदरलँडने म्हटले आहे की, “मी मिड-ऑफवर फिल्डिंग करत होते आणि मला वाटते की पेरीने तीन ते चार चेंडू सचिनला गोलंदाजी करून चेंडू मला दिला. मी सचिन तेंडुलकरला बॉलिंग केलेला हा क्षण मला नेहमीच आठवणीत राहील. सचिनला गोलंदाजी करताना मी खूपच घाबरले होते आणि मी त्याला फुल टॉस आणि एक चेंडू खाली टाकला. “

ती म्हणाली, “परंतु सचिन खूप दयाळू आहे आणि त्याने तो अगदी निवांतपणे खेळला. आमच्या सर्वांसाठी हा एक रोमांचक क्षण होता.”

Australian Women's All-Rounder Annabel Sutherland Relishes Memory ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आम्ही भारत चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार – डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था । गेले काही दिवस सुरु असणार भारत चीन वाद जगभरात चांगलाच चर्चेत आला आहे. चीन युद्धाच्या तयारीत असल्याची शंका वर्तविली जात आहे. चीनने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु केल्या आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता या प्रकरणावर बोलले आहेत. त्यांनी चीन आणि भारत यांच्या सीमावादावर आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत. आमची तशी ईच्छा आहे. आणि ते करण्यास आम्ही सक्षम आहोत असेही त्यांनी सांगितले आहे. तशी माहिती आम्ही दोन्ही देशांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भारत आणि चीनचा सीमावाद चिघळला आहे. दोन्ही देशातील सैन्य आता मोठ्या प्रमाणात सीमेवर तैनात आहे. चीनने नागरी गुन्सा विमानतळावर वेगाने धावपट्टी बांधत असल्याच्या बातम्या आहेत. भारताच्या सॅटेलाईट ने घेतलेल्या फोटोमध्ये ते स्पष्ट दिसून येते आहे. भारताने लडाख सीमेवर रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यापासून हा वाद चिघळला आहे. गेल्या अनेक वर्षात चीनने सीमेवर रस्तेबांधणी तसेच इतर निर्माण कार्य केले आहे. पण भारताने कामास सुरुवात केल्यावर त्यांनी विरोध केला. तरीही रस्तेबांधणीचे काम सुरूच ठेवल्यामुळे चीनने सीमेवर स्वतःचे सैन्य वाढविले आहे.

चीनसोबत भारतानेही आपले सैन्य वाढविले आहे. आतापर्यंत भारताच्या आणि चीनच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांमध्ये बैठकाही झाल्या आहेत. त्यांच्या मध्ये चर्चा झाल्या आहेत. तरीही चीनने हळूहळू सीमेवर सैन्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. चीनकडून येणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषयात लक्ष दिल्यामुळे आता दोन्ही देशांकडून काय भूमिका घेण्यात येईल. याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

उत्तराखंड येथील जंगले आगीच्या विळख्यात; अनेक दिवसांपासून आग सुरूच

वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण हे एक संकट देशासमोर असतानाच आता उत्तराखंड मध्ये एक नवीनच संकट येऊन ठेपले आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासून काही ठराविक अंतराने उत्तराखंडच्या विविध भागातील जंगलांमध्ये आग लागते आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते आहे. त्यामुळे हळूहळू जंगले जळत आहेत. या जळणाऱ्या जंगलांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या आगीमुळे जंगलातले प्राणिजीवन ही विस्कळीत झाले असून जीव मुठीत घेऊन ते इतरत्र जात आहेत.

आतापर्यंत या परिसरातील साधारण ४६ जंगले जळाली आहेत आणि त्यामध्ये एकूण ५१.३४ हेक्टर परिसर जळून खाक झाला आहे. राज्यातील केवळ कुमाऊ भागातील २१ जंगलांना आग लागली आहे. त्यानंतर गढवाल परिसरात १६ जंगले जळाली आहेत. याशिवाय ९ भागामध्ये रिजर्व जंगलामध्ये आग लागली आहे. अल्मोडा, बागेश्वर, नैनीताल, पौढी, चमोली, पिथोरगड, आणि डेहराडून अशा सर्वच जंगलांमध्ये आग लागली आहे. आतापर्यंत या आगीमुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती जखमी झाला आहे.

जंगलांमध्ये लागणाऱ्या या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलातील जैवविविधता नष्ट होण्याचीही भीती निर्माण झाली आहे. वनाधिकारी आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. मात्र गेले काही दिवस आग थांबण्याचे नावच घेत नाही आहे. या आगीचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उत्तराखंडच्या जंगलातील ही अवस्था खूप वाईट असल्याचे दिसून येत आहे. लवकरच आग आटोक्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Video: बिग बी-आयुषमानच्या ‘गुलाबो सिताबो’ सिनेमाचं पहिलं भन्नाट गाणं रिलीज

मुंबई । बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गुलाबो सिताबो’च्या भन्नाट ट्रेलरनंतर आता सिनेमाचं पाहिलं गाणं रिलीज झालं आहे. या भन्नाट गाण्याच्या रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. ‘जूतम फेंक’ असे या गाण्याचे बोल असून यात बिग बी आणि आयुषमान यांच्यातील भांडणाचे मजेशीर खटके दाखविण्यात आले आहेत.

शुजीत सरकार दिग्दर्शित याचित्रपटातलं ‘जूतम फेंक’ हे गाणं पीयूष मिश्रा यांनी गायलं आहे. तर पुनीत शर्मा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या चित्रपटात बिग बी ‘मिर्झा’ ही भूमिका साकारत असून ते घरमालक आहेत. तर ‘बांके’ म्हणजे आयुषमान खुराना त्यांचा भाडेकरु दाखविला आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

या ट्रेलरमधून बिग बी आणि आयुषमान खुराना यांची जोडी मजेशीर अंदाजात पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्यातच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटगृहात नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला आहे. १२ जूनला हा चित्रपट तुम्ही घर बसल्या पाहू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”