Monday, February 6, 2023

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख राजेंद्रकुमार गेन्नामनी म्हणाले की,’ भारतात गेल्या २ दिवसात यावर्षीच्या सर्वांत जास्त ४७.६ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. ते म्हणाले की,’२८ मेपासून हीटवेव्ह कमी होण्यास सुरवात होतील, कारण त्यानंतर देशातील उत्तर भागात जोरदार वारे वाहू लागतील. २९ मे पासून, पाऊसही सुरू होईल आणि त्यामुळे तापमान हे ४० डिग्री सेल्सियस पर्यंत खाली घसरेल. नैऋत्य मॉन्सून हा १ जून ते ५ जून या काळात केरळ किनारपट्टीवर धडकेल आणि १५ जून ते २० जून दरम्यान तो मुंबईत पोहोचेल.

- Advertisement -

 

दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या सर्व भागात तापमान हे सुमारे ४५–४६ डिग्री आहे. भारत, राजस्थान, चूरू आणि पिलानी येथे देशात सर्वाधिक ४७.६ अंश तापमान नोंदले गेले आहे. हवामान खात्याने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की,’ येत्या पाच दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ तसेच तेलंगणा या काही भागात जोरदार गरम वारे वाहतील. त्यामुळे तापमानात आणखीनच वाढ होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.