महाराष्ट्रातील सरकार आमचे नाही तर शिवसेनेचे; पृथ्वीराज चव्हाणांची आॅडिओ क्लिप व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मी मंत्रीमंडळात नाही आहे. सरकारपण आमचं नाहीये. हे सरकार शिवसेनेचं आहे असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारची एक आॅडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्हायरल आॅडिओ क्लिप मध्ये चव्हाण हे एका कार्यकर्त्याशी बोलत असल्याचे समजत आहे. काही कामानिमित्त कार्यकर्त्याने फोन केला असता मी मंत्रीमंडळात नाही. हे सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे सरकार आहे असं विधान चव्हाण यांनी केल्याच्या चर्चेमुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी सरकारकडे शिफारस करतो असं म्हणत चव्हाण यांनी कार्यकर्त्याची समजूत काढल्याचे आॅडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांकडे नेतृत्व गुण नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर आपण असे कोणतेही विधान केलेले नाही असं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले होते. आता या व्हायरल आॅडिओ क्लिपच्या सत्यतेबद्दलही अधिक माहिती मिळालेली नसून चव्हाण यांनी यावर अजून आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment