पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये – शंभुराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मी मंत्री मंडळात नाही…सरकारपण आमचं नाही…हे सरकार शिवसेनेचे आहे अशा आशयाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एक क्लिप व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये असं मत देसाई यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील सरकार हे महाआघाडीचे आहे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे काँग्रेसचा नाही. या तीन पक्षाच्या सरकारचे नेतृत्व शिवसेना करत आहेत. तीन पक्ष मिळून आम्ही एकत्र काम करतोय त्यामुळे बाबांच्या बोलण्याचा विपर्यास काढू नये असं देसाई यांनी म्हटले आहे.

बाबांना असे म्हणायचे असेल की मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. सरकारमधला एक घटक पक्ष काँग्रेस आहे. पृथ्वीराज बाबा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या सुचनांचा, धोरणाचा, भावनाचा निश्‍चितपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आम्ही आदर करत आहोत. त्यांच्या राज्याच्या तसेच जनतेच्या हिताच्या सुचना, मार्गदर्शन निश्‍चितपणाने आम्ही विचारात घेऊन काम करत असतो. त्यामुळे कोणीही त्यांच्या बोलण्याचा विर्यास करू नये, असेही मंत्री देसाई म्हणाले आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment