Friday, December 26, 2025
Home Blog Page 5781

‘या’ प्रसिद्ध जर्मन कंपनीने चीनमधून गाशा गुंडाळला; भारतात प्रकल्प सुरू करणार

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक परदेशी कंपन्या चीनमधून आपलं बस्तान दुसऱ्या देशात सुरु करण्याच्या तयारीत आहेत. जपान, अमेरिका, आणि युरोपीय देशांतील अनेक कंपन्या आपले उद्योग प्रकल्प आता दुसरीकडे हलवत आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या उद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं ह्या कंपन्या भारतात आपले प्रकल्प सुरु करण्याच्या विचार करत आहेत. दरम्यान, जर्मनीची बूट तयार करणारी कंपनी वॉन वेल्सनं आपला चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच लवकरच ही कंपनी भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे.

वॉन वेल्सनं ही कंपनी उत्तम आणि दर्जेदार फुटवेअर्स तयार करणारी कंपनी म्हणून परिचित आहे. कंपनीनं नुकताच चीनमधील आपला व्यवहार गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त लवकरच भारतात आपलं उत्पादन सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. आग्र्यामध्ये ही कंपनी आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी कंपनीनं लॅस्टीक इंटस्ट्रीजसोबत करारही केला आहे. वॉन वेल्सनं दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या उत्पादनांची विक्री ८० देशांमध्ये होते. तर १० लाखांपेक्षा अधिक लोक त्यांच्या उत्पादनांचा वापर करतात असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आगे. तसंच या कंपनीची ५०० पेक्षा अधिक रिटेल स्टोअर्स असून ऑनलाइन पोर्टलवरदेखील या उत्पादनांची विक्री करण्यात येत असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी मूळ भारतीय असलेल्या लावा या कंपनीनं चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता जर्मनीची बूट तयार करणारी कंपनी वॉन वेल्सनं आपला चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच लवकरच ही कंपनी भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

बेस्ट बंदच्या हाकेला झुगारून कर्मचारी आले कर्तव्यावर; वाहतूक सुरळीत सुरु

मुंबई । बेस्ट कामगारांना आरोग्य विमा कवच देण्यासह इतर मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. कोरोना संकटाच्या काळात बेस्ट कामगारांनी कामगार संघटनेला साथ देण्याऐवजी बेस्ट प्रशासनाला साथ दिली. ८० ते ९० टक्के कामगारांनी कामावर हजेरी लावल्याने बेस्टची वाहतूक सुरळीत सुरू होती.

बेस्ट कामगारांना विमा कवच देण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट संयुक्त कामगार कृती कर्मचारी समितीने आज आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे करोना संकटाच्या काळात या आंदोलनाचा अत्यावश्यक सेवेतील कामगारांना मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे बेस्ट प्रशासनानेही पर्यायी व्यवस्था म्हणून एसटीकडून १ हजार बसेस चालवण्याची पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र, आज १८०० बसेस नेहमीप्रमाणेच रस्त्यावरून धावले.

कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आजपासून बेस्ट बंद ठेवण्याचं आवाहन केलं खरं, पण नेत्यांचा आदेश झुगारून बेस्ट कर्मचारी आपल्या कर्तव्याला जागले. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठीच नेत्यांनी पुकारलेले आंदोलन उधळून लावले आणि आपण खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहोत हे दाखवून दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा

थर्ड अँगल | प्रताप भानू मेहता

भारतीय कामगार कायद्यांना गंभीर बदलाची  आवश्यकता आहे. पण सुधारणेच्या सबबीखाली सरकारकडून करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या घोषणा म्हणजे संपूर्णपणे कामगारांवरील प्राणघातक  हल्ल्यांना मुक्तपणे सोडून देणे. त्यांचे कामाचे तास वाढविणे म्हणजे अक्षरशः त्यांचे शरीर, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा तोडणे होय. तक्रारींचे निवारण करण्याचे ढोंग करून, राज्य पूर्णतः सर्व प्रश्नांचे न्याय स्थिर करू पाहत आहे. कामगारांना कोणत्याच प्रकारची मागणी करण्याची शक्ती नाही हे राज्याला सुनिश्चित करायचे आहे. भारतीय कामगार कायद्यामध्ये भांडवल आणि कामगार या दोन्ही गोष्टींवर राज्यांचे वाद करण्याचे वेगळेपण होते. ते भारताच्या ९०% कामगार फोर्सच्या असंबंद्ध होते. खूप उत्कृष्ट आणि क्वचितरित्या कायद्यांनी काही प्रमाणात कामगारांचे संरक्षण केले आहे. कामगार शक्तीचे संरक्षण टाळण्यासाठी त्यांनी पुरेशी विकृती निर्माण केली होती. के आर श्याम सुंदर यांनी त्यांच्या कामातून हे कायदे स्पष्ट केले आहेत. ते एका म्हणीत सांगतात की, “कागदाचे वाघ सुद्धा नाहीत.”

औद्योगिक संबंध संहिता ही एक चांगली सुरुवात होती, पण राज्यांमधील कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचे अध्यादेश एक विडंबन आहे. 

भारतातील कामगार कायदे हे त्यांची मागणीची शक्ती वाढवते ही एक दंतकथा आहे. दिल्ली अर्थशास्त्र शाळा (Delhi School of Economics) च्या आदित्य भट्टाचार्य यांच्या अत्यंत तल्लख पेपरने दर्शविल्याप्रमाणे, १९८० पासून संप आणि बंद यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शंभर किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असणाऱ्या कारखान्यांच्या रोजगारात छोटया कंपन्यांपेक्षा अधिक बदल झाल्याचे दिसून येते. भारतीय कामगारांचे वेतन तसेच कायम होते. त्यामुळे भारतीय कामगारांच्या मागणीच्या शक्तीमुळे भारतीय औद्योगिकतेला अडथळा निर्माण होऊ शकतो ही कल्पनाच चुकीची आहे. कामगार कायदा कामगारांचे संरक्षण करत नव्हता. तो वाढीची विसंगत नव्हता. पण अजूनही कामगार कायदे कधीकधी व्यवसायांना अन्यायकारक नुकसान पोहोचवू शकतात या कल्पनेशी ही प्रस्तावना विसंगत आहे. हे कायदे खूपच गुंतागुंतीचे होते. काही कायद्यांमुळे कठोरपणा निर्माण झाला होता ज्याचा कामगारांच्या संरक्षणाशी काही संबंध नव्हता. त्यांनी मानवी भांडवलांमध्ये औद्योगिक गुंतागुंतीचा त्याग केला होता. त्यांनी भाड्याची राजकीय अर्थव्यवस्था निर्माण केली होती. व्यवसायांमुळे अनेकदा उद्योजकतेचे स्वरूप विकृत होऊ शकते. वास्तविक अभिनव उद्योजकांपेक्षा जे लोक राज्य व्यवस्थापित करू शकतात त्यांना प्रतिकूलपणे निवडले जाते. 

म्हणून, या कायद्यांकडे नव्याने बघितले पाहिजे हा नरेंद्र मोदी सरकारचा विचार योग्य होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये लोकसभेत औद्योगिक संबंध संहिता लागू करण्यात आली. स्थायी समितीने नुकताच आपला अहवाल दिला आहे. या अहवालाद्वारे पहिल्या तत्वावर गंभीरपणे विचार करण्यास परवानगी दिली आहे. संसदेने या विषयातील सर्व गोष्टींवर विचार करण्याची परवानगी दिली आहे. आणि हे जर योग्य रीतीने झाले तर २१ व्या शतकात योग्य कामगार संहिता तयार होण्यासाठी मदत होईल. हा पुढे जाण्याचा एक सुलभ मार्ग आहे. परंतु त्याऐवजी आपल्याकडे चार टोकाचे हल्ले आहेत ज्यामुळे मोदी सरकारचा स्वतःचा कायदा बिघडू शकेल. पहिला हल्ला घटनात्मकतेवरचा होय. मागील सरकारने या अध्यादेशाचा गैरवापर केला होता. अशाप्रकारे कायद्याच्या महत्वपूर्ण तरतुदी निलंबित करण्यासाठी अध्यादेशाचा अविवेकी वापर म्हणजेच जेव्हा संसद आधीच या विषयावर विचारविनिमय करत असेल, तेव्हा लोकशाहीचा अवमान होईल. केंद्रीय कायद्यांचे समर्थन न बाळगता राज्यांना परवानगी दिल्याने भविष्यात संघराज्यांसाठी समस्या निर्माण होईल. यातील अनेक तरतुदी रद्द केल्याने भारत आयएलओ अधिवेशन आणि त्यांचे कायदे यांचे उल्लंघन करेल. आणि बऱ्याच प्रस्तावांचा मनाप्रमाणे वापरही करता येत नाही. काही राज्ये नुकसान भरपाई न वाढवता कामाचे तास वाढवतील. आपल्याला असे म्हणावे लागेल की, आम्हाला कधीकधी १२ तासांच्या शिफ्टसाठी परवानगी देता येईल अशाप्रकारे कामाच्या तासांमध्ये लवचिकतेसाठी परवानगी द्या. लवचिकतेचे उद्दिष्ट काय आहे? जर ते कामगारांचे आरोग्य आणि टिपण्या कमी करत असतील तर, अशी लवचिकता अद्याप आठवड्यातील कामकाजाच्या मर्यादेत असू नये? किंवा आपण एकूण कामाचे तास रानटीपणे वाढवू पाहतो आहोत का? घटनात्मकतेवर, लोकशाही प्रवृतींवर, मनासारखा वापर करण्यावर, संमती रोखण्यासाठी अध्यक्षांचा चांगला आधार असतो. या अध्यदेशामुळे सर्वत्र साथीच्या आजारातील आणीबाणीचा वापर हवी तशी मनमानी करण्यासारखी शक्ती गोळा करण्यासाठी केला जाईल, जेव्हा अशा गोष्टींसाठी निषेध करणे देखील शक्य नसते. या भीतीची पुष्टी केली जात आहे. 

दुसरे म्हणजे जे काही थोडेफार कामगार उरले आहेत जे मागणी करतात, त्यांच्यावर आपण पद्धतशीरपणे हल्ला चढवित आहोत. आपण पुरेसा सामाजिक पाठींबा देण्यास नकार देऊन अनावश्यक कठोरता, अनादर आणि लाखो कामगारांवर दारिद्र्य आणत आहोत. आम्ही कृत्रिमरीत्या केवळ निर्वाहतेच्या काठावर राखीव कामगारांची जनसेवा निर्माण करतो आहोत. त्यामुळे त्यांना देऊ केलेल्या अटींवर काम केल्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय नसतो. जर सरकारला कदाचित ज्या कामगारांना कामावर परत येण्याची इच्छा नाही आहे कारण राज्य सरकार आणि त्यांचे मालक या दोघांनी त्यांना अत्याचारी वागणूक दिली आहे. अशा कामगारांसाठी मनापासून काही करावेसे वाटत असेल तर यामुळे  एमजीएनआरईजीए च्या पैशांमध्ये सुलभरीत्या वाढ होऊ शकेल. पण सरकार आणि मालक एमजीएनआरईजीएचा द्वेष का करतात हे याचे एक रहस्य आहे. त्याचा वास्तविक परिणाम असा आहे की ते मजुरीखाली एक मजला ठेवतात आणि थोड्या वेळाने त्यांची सौदेबाजीची स्थिती सुधारते. 

तिसरे म्हणजे भारतीय कामगारांवरील वैचारिक हल्ला होय. चीन सोडून जाणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यास भारताची असमर्थता मुखत्वे श्रमाशी संबंधित आहे. राज्य आणि भारतीय भांडवलांच्या क्षमतेच्या तुलनेत भारतीय भांडवलशाहीच्या वाटचालीत अडथळा आणण्याची आणि भारतीय अर्थव्यवस्थेला हानी पोहोचविण्याची  क्षमता भारतीय कामगारांकडे आहे. चौथे म्हणजे हुकूमशाहीची जोपासना होय. जिथे आपल्यासाठी अधिक गुलामी असेल. ज्या सहजतेने आपण १२ तास कामकाजाच्या दिवसाचे कौतुक करतो, आपल्या तक्रार निवारण यंत्रणेचे कौतुक करतो ते असे सूचित करते की, त्याचा अर्थशास्त्राशी काहीही संबंध असू शकत नाही. 

पर्यावरणीय संरक्षण, कामगार सुरक्षा, धोकादायक औद्योगिक क्रिया, मूलभूत अधिकार यासारख्या मूलभूत आवश्यकतांचे नियमन होण्याची गरज आहे. हे करण्यासाठी आपल्याला राज्याच्या क्षमतेमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. आपल्याला “सुधारणा” या शब्दावर पुन्हा  हक्क सांगण्याची गरज आहे. जेव्हा एखादा विशिष्ट उपाय साध्य होतो तेव्हाच “सुधारणा” शब्द वापरला पाहिजे. पर्यावरणीय कायद्यांचा नाश करणे म्हणजे “सुधारणा”  नाही. स्वच्छ हवा आणि आणि पाणी मिळविण्यासाठी कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे म्हणजे “सुधारणा” होय.  कामगारांचे संरक्षणाचा नाश करणे म्हणजे “सुधारणा” नाही. कामगारांच्या हिताचे रक्षण करतील अशा संरचनेची रचना करणे, त्यांच्या मागण्यांचा आदर करणे आणि  त्याच वेळेला भांडवल वाटपातील बचाव विकृती सुधारणे म्हणजे “सुधारणा” होय. आपले मुख्यमंत्री जे करत आहेत ती सुधारणा नाही. ते औदासिन्य आणि हुकूमशाही आहे ज्याला सुधारणेचा मुखवटा लावला आहे. 

औद्योगिक संबंध संहिता ही मोदी सरकारकडून एक चांगली सुरुवात होती. अध्यादेश विडंबन आहेत. जो आपल्या नागरिकांच्या मानवी भांडवलावर गुंतवणूक करत नाही असा कोणताही देश कोणताही विकास करू शकत नाही. त्यामुळे देशाच्या संपत्तीत श्रम साठा वाढत नाही. आणि कामगार अधिकार आणि भांडवल यांच्यात संतुलनही राहत नाही. नवीन आणि उत्तम सामाजिक करार लिहायचा आहे की नाही हे मोदी सरकार ठरवू शकते. किंवा पुन्हा १९व्या शतकातील रानटीपणा मुक्त केला जाईल? 

लेखक द इंडियन एक्सप्रेसचे सहयोगी संपादक आहेत. त्यांच्या या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार; आज पुन्हा ५९ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज शहरात पुन्हा नवीन ५९ कोरोनाग्रस्त सापडले असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार पार गेली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 ‍सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कंटेनमेंट झोन मध्ये नागरिकांना बाहेर पडण्यास पूर्ण मज्जाव करण्यात आला असून जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणी घेत आहे.

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये’ म्हणून तरुणाचं धनंजय मुंडेंना रोखठोक पत्र

Dhananjay Mundhe
Dhananjay Mundhe

जळगाव । राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमध्ये लागू करण्यात आलेली क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका तरूणाने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी रोखठोक पत्र लिहिले आहे. सदर पात्रात या तरुणाने परदेशात शिक्षणासाठी जाण्याकरता कराव्या लागणाऱ्या पूर्ततानबाबत सविस्तर लिहिले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दि. 5 मे, 2020 रोजी शासन निर्णयाद्वारे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या विशेष अध्ययन करण्यास्तव राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत. याला अनुसरून या तरुनानाने यामुळे अनुसूचित जातीतील विदयार्थ्यांना कसे यामुळे या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे याबाबत सांगितले आहे. सविस्तर पात्र खालीलप्रमाणे आहे.

प्रति,
मा.ना. धनंजय मुंडे,
सामाजिक न्याय मंत्री,
महाराष्ट्र

विषय : अनुसूचित जाती विद्यार्थी यांचे परदेशी शिष्यवृत्तीसाठी लागू करण्यात आलेली क्रिमिलियर अट रद्द करणेबाबत.

संदर्भ : दि. ५ मे, २०२० रोजीचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग यांचा शासन निर्णय.

महोदय,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दि. 5 मे, 2020 रोजी शासन निर्णयाद्वारे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या विशेष अध्ययन करण्यास्तव राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत.

अमेरिकन विद्यापीठात एखाद्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरिता संबंधित विद्यार्थ्यास GRE/GMAT/TOEFL परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. काही विद्यापीठे विद्यार्थ्यांचे प्रोफाईल, स्टेटमेंट ऑफ पर्पज, मोठ्या कंपनीचे किंवा विशेषज्ञाचे रेकॉमेंडेशन लेटर इत्यादी विचारात घेऊन प्रवेश द्यायचे किंवा कसे हे ठरवीत असतात. अमेरिकेतील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी USMLE परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. या प्रत्येक परीक्षेसाठीचे परीक्षा शुल्क साधारणपणे १५० ते १००० डॉलर्स ( भारतीय रुपयात १० हजार ते ८० हजार रुपये ) असे असते.

इंग्लंडमधील विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी TOEFL, IELTS, PLAB इ. परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. अनेक वेळा संबंधित विद्यापीठाच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षा असतात त्या उत्तीर्ण करणे आवश्यक असते. या प्रत्येक परीक्षेसाठीचे परीक्षा शुल्क साधारणपणे २०० ते १००० पौंड ( भारतीय रुपयात १५ हजार ते १ लाख रुपये ) असे असते.

आवश्यक त्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यापीठात प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्याला संबंधित विद्यापीठात काही रक्कम डिपॅाझीट करावी लागते. पहिल्या १ ते १०० क्रमांकाच्या QS मानांकन असलेल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे शुल्क, संबंधित कोर्स व कोर्सचा कालावधी पाहून वर्षाला किमान ३० लाख ते १ कोटी रुपये पर्यंत असू शकते. हे शुल्क भरण्यासाठी विद्यार्थी अथवा त्यांचे पालक आर्थिक दृष्टीने सक्षम आहेत याचा लेखी पुरावा विद्यापीठास सादर करावा लागतो.

यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकाच्या बँक खात्यात सतत तीन महिने किमान रुपये ५ लाख रक्कम बॅलन्स आहेत याचे स्टेटमेंट सादर करावे लागते. एवढी पूर्तता झाल्यानंतर संबंधित विद्यापीठ त्या विद्यार्थ्यास काही रक्कम आगाऊ जमा करण्यास सांगते. ही रक्कम विद्यापीठाचा दर्जा व अभ्यासक्रम लक्षात घेऊन किमान २ लाख ते कमाल १० लाख पर्यंत असू शकते. एवढे सोपस्कार पार पडल्यानंतर विद्यार्थ्याचा प्रवेश सुनिश्चित होतो व त्यास प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र मिळते.

हे पत्र मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थी महाराष्ट्र सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो. जर त्यास सरकारची शिष्यवृत्ती मंजूर झालीच तर पुढे संबंधित देशात जाण्यासाठी विसा प्राप्त करावा लागतो. विसा मिळण्यासाठी व परदेशात वास्तव्य करण्याची त्याची आर्थिक ऐपत ( बँक खात्यात काही लाख रुपये जमा असल्याचा दाखला) आहे हे लेखी दाखवावे लागते. ज्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपये असेल त्यांनी प्रवेश घेण्यासाठी वरील सर्व आर्थिक भार सहन केला तर उत्पन्न ६ लाख पेक्षा जास्त दिसेल. आणि उत्पन्न जास्त आहे म्हणून तो या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाही. अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना पहिल्या १ ते १०० क्रमांकाच्या QS मानांकन असलेल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यापासून वंचित राहावे लागेल.

तरी सदर निवेदनाद्वारे आम्ही आपणास आग्रहपूर्वक विनंती करतो की, दि. 5 मे, 2020 रोजी शासन निर्णयाद्वारे राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमध्ये लागू करण्यात आलेली क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी.

कळावे,
राहुल सावळे
चाळीसगाव, जि. जळगाव

साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे कोरोनामुळे निधन

पुणे प्रतिनिधी । काल दिनांक १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे देहावसान झाले. मृत्यूसमयी ते एक्याऐशी वर्षांचे होते.

20200518_110659.gif

१९५५ मधे, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोचवला.

मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.

रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जावली पुन्हा हादरलं..!! कोरोनाच्या दहशतीने आई-वडिलांनी १६ वर्षीय मुलाचा मृतदेह ३ दिवस घरातच ठेवला..त्यानंतर..?

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोना संकटाच्या काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. लॉकडाऊन काळात मुंबईहून आपल्या गावातील घरी पहिल्यांदाच रहायला आलेल्या जावली तालुक्यातील म्हाते खुर्द या गावात एक भयानक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांच्या आणि कोरोनाच्या भीतीने एका कुटुंबाने आपल्या १६ वर्षीय मुलाचा झालेला मृत्यू गावकऱ्यांपासून ३ दिवस लपवून ठेवला. अर्णव दळवी या आपल्या मुलाच्या मृतदेहासहित त्याचे आई आणि वडील घरामध्ये २ दिवस तसेच राहिले. शेवटी मृतदेहामध्ये जंतू झाल्याने तो कुजला आणि त्याची दुर्गंधी बाजूच्या परिसरात पसरली. यानंतरच गावकऱ्यांनाही या घटनेचा छडा लागला.

Satara

तब्बल ७२ तास या मृतदेहाला तसंच ठेवण्यात आल्याने त्या मृतदेहाचं जैविक विघटन सुरु झालं आणि दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला. अर्णव जयवंत दळवी, वय १६ असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचं नाव असून जिल्हा शासकीय रुग्णालयात या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. नियमानुसार कोरोना रुग्णाची तपासणी मृत्यूपश्चात २४ तासानंतर करता येत नसल्याने या मुलाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.

मुंबईहून आलेलं हे कुटुंबीय गावातील कुणाशीच बोलत नव्हतं, आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही जास्त माहिती देत नव्हतं असं आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आणि गावच्या सरपंच विमल दळवी यांनी सांगितलं. अर्णव हा मागील सात ते आठ महिन्यांपासून आजारी असल्याचं प्राथमिक माहितीनुसार समजलं आहे. म्हाते खुर्द हे गाव नुकतंच कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडलं आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबियांनी या गंभीर परिस्थितीची कल्पना गावकऱ्यांना का दिली नाही हाच सवाल आता उपस्थित होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

उंब्रज येथे ‘त्या’ तरुणीच्या संपर्कात आलेल्या दोन जणांना कोरोनाची लागण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील उंब्रज येथील चोरे रोड परिसरातील एका काँलनीतील युवती नुकतीच कोरोना मुक्त झाली. पंरतु युवतीच्या निकट सहवासातील दोघांचे रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे अहवाल रविवारी रात्री प्राप्त होत असुन पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Satara

दरम्यान कोरोना बाधित असणारे हे दोन्ही निकटवर्तीय सध्या कराड येथे इन्स्टिट्यूट क्वारनटाईनमध्ये आहेत. आज १४ दिवसानंतर दुपारी त्यांचे स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने कराड तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा 96 वरती गेला आहे तर सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 135 वर पोचली आहे.

कराड तालुक्यातील रुग्ण संख्या 96 झाली आहे यापैकी, कृष्णा हॉस्पिटल कराड येथून 30, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 4 तर सह्याद्री हॉस्पिटल कराड येथून 21 रुग्ण असे एकूण 55 रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या 135 झाली असून या पैकी कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 66 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबईहून शिराळ्याला आलेले पती पत्नी सापडले कोरोना पॉझिटिव्ह; सांगलीत सध्या १८ रुग्ण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शिराळा तालुक्यातील निगडीमध्ये मुंबईहून आलेले पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज तपासणीत स्पष्ट झाले. मुंबईतून आलेला त्या कुटुंबाला गावांमध्ये घेतले नसल्याने जांभुळवाडीत संस्था क्वॉरंटाईन केले होते. तेथे त्रास होऊ लागल्याने त्यांना मिरजेतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर दोघेही पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 18 झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

मुंबईमधून आपापल्या गावाकडे जाण्याची सरकारने परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात लोक जिल्ह्यात येत आहेत. निगडीमध्ये मुंबईहून 14 मे रोजी एका कुटुंबातील पाच जण आले होते. निगडीमध्ये यापूर्वी मुंबईतून आलेल्या तरुणी आणि तिच्या आईला कोरोना झाला होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. सध्या त्या दोघी कोरोना मुक्त झाल्या असल्या तरी दक्षतेचा उपाय म्हणून बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश दिला जात नाही. मात्र मुंबईतून पती-पत्नी, मुलगा, मुलगी आणि मेहुणी असे पाच जण निगडीमध्ये आले होते. मुंबईतून आलेला त्या कुटुंबाला गावांमध्ये घेतले नसल्याने जांभुळवाडीत संस्था क्वॉरंटाईन केले होते. तेथे त्रास होऊ लागल्याने त्यांना मिरजेतील कोविड-19 रुग्णालयात शनिवारी हलविण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर पती-पत्नी दोघांचाही अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, त्यांच्यासोबत आलेल्या मुलगा, मुलगी आणि मेहुणी यांनाही मिरजेत संस्था क्वॉरंटाईन केले असून त्यांचेही कोरोनाच्या तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 52 रुग्ण आढळले आहेत, त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 32 जण कोरोनामुक्त रुग्ण झाले होते. रविवारी सांगलीतील महसूल कॉलनीमधील त्या तरुणानेही कोरोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात 18 कोरोनाचे रुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात लॉकडाऊनसोबत चिंताही वाढली; दिवसभरात सापडले तब्बल २ हजार ३४७ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या ३३ हजार पार

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढे होते ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतके वाढले आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.

राज्यात ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या ११९८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ९,औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १,लातूर मध्ये १, तसेच अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २०,१५० (७३४)
ठाणे: २२८ (४)
ठाणे मनपा: १५५० (१८)
नवी मुंबई मनपा: १३६८ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ५२० (६)
उल्हासनगर मनपा: १०१
भिवंडी निजामपूर मनपा: ४८ (२)
मीरा भाईंदर मनपा: ३०० (४)
पालघर: ६१ (२)
वसई विरार मनपा: ३५९ (११)
रायगड: २३९ (५)
पनवेल मनपा: २०६ (११)
ठाणे मंडळ एकूण: २५,१३० (८११)

नाशिक: १०५
नाशिक मनपा: ७१ (१)
मालेगाव मनपा: ६७५ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १९
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ७० (५)
जळगाव: २०५ (२६)
जळगाव मनपा: ६१ (४)
नंदूरबार: २३ (२)
नाशिक मंडळ एकूण: १२९५ (७८)

पुणे: १९९ (५)
पुणे मनपा: ३४६४ (१८८)
पिंपरी चिंचवड मनपा: १५८ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३६४ (२४)
सातारा: १३१ (२)
पुणे मंडळ एकूण: ४३२५ (२२४)

कोल्हापूर: ३० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ४२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: ९५ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १९१ (५)

औरंगाबाद:९७
औरंगाबाद मनपा: ८४२ (३१)
जालना: २८
हिंगोली: ९६
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: १०६९ (३२)

लातूर: ४२ (२)
लातूर मनपा: २
उस्मानाबाद: ७
बीड: ३
नांदेड: ५७
नांदेड मनपा: ६२ (४)
लातूर मंडळ एकूण: १२३ (६)

अकोला: २८ (१)
अकोला मनपा: २४१ (१३)
अमरावती: ६ (२)
अमरावती मनपा: १०४ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: ३० (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ५११ (२९)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३५५ (२)
वर्धा: २ (१)
भंडारा: ३
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३६८ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: ३३ हजार ५३ (११९८)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.