Friday, December 26, 2025
Home Blog Page 5785

राज्यात दिवसभरात सापडले १ हजार ६०६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ३० हजार ७०६ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी २२ मृत्यू हे गेल्या २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४१, पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये ३, मीरा भाईंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर सोलापूर शहरामध्ये १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४७ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत तर २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १८,५५५ (६९६)
ठाणे: २०५ (३)
ठाणे मनपा: १४१६ (१८)
नवी मुंबई मनपा: १२८२ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ५०२ (६)
उल्हासनगर मनपा: १००
भिवंडी निजामपूर मनपा: ४६ (२)
मीरा भाईंदर मनपा: २८३ (४)
पालघर: ५० (२)
वसई विरार मनपा: ३४० (११)
रायगड: २१८ (२)
पनवेल मनपा: १९६ (१०)
ठाणे मंडळ एकूण: २३,२०९ (७६८)

नाशिक: १०२
नाशिक मनपा: ६६ (१)
मालेगाव मनपा: ६६७ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ६७ (५)
जळगाव: १९३ (२६)
जळगाव मनपा: ५७ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १२५६ (७८)

पुणे: १८९ (५)
पुणे मनपा: ३३०२ (१७९)
पिंपरी चिंचवड मनपा: १५६ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३६२ (२१)
सातारा: १३१ (२)
पुणे मंडळ एकूण: ४१४९ (२१२)

कोल्हापूर: २१ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३८
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ९१ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १७३ (५)

औरंगाबाद:९७
औरंगाबाद मनपा: ७७६ (२५)
जालना: २१
हिंगोली: ६६
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ९६६ (२६)

लातूर: ३३ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ७
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५४ (४)
लातूर मंडळ एकूण: १०१ (५)

अकोला: १९ (१)
अकोला मनपा: २१७ (१३)
अमरावती: ६ (२)
अमरावती मनपा: ९६ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४६६ (२८)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३५० (२)
वर्धा: २ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३६१ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: ३० हजार ७०६ (११३५)

पत्नी, मुलगा आणि मुलावर झाडली गोळी; CRPF च्या जवानांची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये धक्कादायक घटना घडली. जेथे एका सीआरपीएफच्या जवानाने आपली पत्नी आणि दोन मुलांवर गोळी झाडली. त्यानंतर या सीआरपीएफ जवानाने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. ही घटना थरवईच्या परिल्ला ग्रुप सेंटरची आहे. या घटनेची माहिती मिळताच छावणीत एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारीही तातडीने तिकडे आले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. विनोद असे या सीआरपीएफ जवानाचे नाव होते. त्याने आपली पत्नी विमला, मुलगा संदीप आणि मुलगी सिमरन यांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

त्याच वेळी, प्रयागराजमध्येच आणखी एका सामूहिक हत्याकांडाच्या घटनेची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये पीडित कुटुंबाला आपल्या घरातील मुलाच्या एका महिलेबरोबरील अवैध संबंधाचा विरोध करणे चांगलेच महागात पडले. चिडलेल्या या मुलाने नंतर आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. आतापर्यंतच्या तपासात हे उघड झाले आहे की पीडित कुटूंबातील मुलगा हाच या खुनाचा सूत्रधार आहे.

इतकेच नाही तर त्या मुलाने आपल्या मित्राला ८ लाख रुपयांची सुपारी देऊन घरातील आई, वडील, बहीण आणि पत्नीची हत्या केली. या घटनेत पोलिसांनी आतिश आणि अनुज श्रीवास्तव यांना अटक केली. यातील आतिशने त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आहे तर अन्य दोन आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. धुमगंज पोलीस स्टेशन परिसरातील प्रीतम नगर भागात या घटनेनंतर दहशतीचे वातावरण झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सदाभाऊंचे घरासमोर आंदोलन

सांगली प्रतिनिधी । रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २२ जिल्हयांमध्ये शासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लघंन न करता अंगण हेच आंदोलन हे ऐतिहासिक डिजिटल आंदोलन पार पडले. डिजिटल आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अन्यथा भविष्यात सरकारची झोप उडवणारे अनोखे आंदोलन केले जाईल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्र्वभुमीवर कोणताही अर्थतज्ञ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचा आकडा सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत करोडो लोकांच्या मजुरांच्या हाताला काम देणारा व हजारो व्यवसायिकांना हजारो कंपन्यांना व्यवसाय देणारा, हजारो कोटी कर देणारा शेती हा उद्योग अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उभारी देण्याची गरज असताना शेतकरी कर्जमाफीचे घोंगडे भिजत ठेवलेले आहे. कृषी पंप वीज बिलातून शेतकऱ्यांना पूर्ण मुक्त करणे गरजेचे आहे. आज कोरोनाचे संकट पुढे असले तरी अन्नधान्याचा पुरवठा व निर्मिती करण्याची फार मोठी जबाबदारी शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजुर व इतर छोटे मोठे व्यावसायिक यांच्यामध्ये शासनाच्या धोरणावर प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा कोणताही शेतीमाल मार्केटींग व्यवस्था कोलमडुन पडल्यामुळे शेतामध्ये पिकवीलेला माल योग्य भावात योग्य ठिकाणी विकु शकत नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. म्हणूनच राज्य शासनाचे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा मागण्या संघटनेने सरकारकडे केले आहेत. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सर्व नियम पाळून स्वतःच्या अंगणात घरात अगदी गाईच्या गोठ्यामध्ये सुद्धा हे प्रतिकात्मक आंदोलन पार पडले.

आमदार गोपीचंदांचे पडळकरवाडीत गुढी उभारून स्वागत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याने आनंदाचे प्रतिक म्हणून आटपाडी तालुक्यातील पडळकर कार्यकर्त्यानी घरासमोर गुढी उभाकरून सध्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष न करता पडळकरवाडी येथे घराणसोम गुढी उभारत आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत केले.

भाजपमधून गोपीचंद पडळकर विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. सोशल मिडीयावरून कार्यकर्त्यानी गुढी उभारलेले फोटो टाकून प्रतिक्रिया विजयाच्या वक्त केल्या. सध्या कोरोना विषाणुमूळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे संचारबंदी व जमावबंदी चे उल्लघंन न करता तालुक्यात कार्यकर्त्यानी विजयी गुढी उभा करून आनंदोत्सव साजरा केला.

यामध्ये तालुक्यातील सर्व गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यानी, भिंगेवाडीतील मुस्लिम बांधवानी, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यु.टी.जाधव, यांनी घरा पुढे गुढी उभाकरून स्वागत केले. पडळकरवाडी येथे गोपीचंद पडळकर यांचे निवास्थान असून त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर व त्यांच्या मातेाश्री यांनी सुध्दा घरापुढे गुढी उभा करून आमदाकरीचे स्वागत केले.

जर तुम्हीच पंतप्रधान असता तर काय केले असते? राहुल गांधी म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, त्यांनी केंद्र सरकारच्या प्रयत्न आणि लॉकडाऊनमुळे देशातील उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले की,” जेव्हा मूल रडते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही, ट्रीट देते. रस्त्यावर आलेल्या स्थलांतरित मजुरांना सध्या कर्जाची नसून पैशांची गरज आहे. म्हणून सरकारने सावकारांसारखे वागू नये.”

यावेळी एका व्यक्तीने राहुल गांधींना विचारले की,’जर तुम्ही पंतप्रधान असता तर तुम्ही काय केले असते ?’ या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी हसत हसत म्हणाले की,’मी पंतप्रधान नाही. म्हणून मी काल्पनिक परिस्थितीबद्दल बोलू शकत नाही. परंतु एक विरोधी पक्षनेता म्हणून मी म्हणेन की कोणतीही व्यक्ती आपले घर सोडून इतर राज्यांत कामाच्या शोधात जाते. त्यामुळे सरकारने रोजगाराच्या मुद्द्यावर काहीतरी राष्ट्रीय योजना आखली पाहिजे.’

राहुल म्हणाले की,’माझ्या म्हणण्यानुसार सरकारने शॉट, मिड आणि लाँग अशा तीन शब्दांत काम केले पाहिजे. अल्पावधीत मागणी वाढवा. या अंतर्गत आपण भारतातील लघु व मध्यम व्यवसायातील व्यापाऱ्यांना वाचवा. त्यांना रोजगार द्या. कृपया त्यांना आर्थिक मदत करा. आरोग्यानुसार, ज्यांना सर्वाधिक धोका आहे अशांची काळजी घ्या.”

ते पुढे म्हणाले,’लघु आणि मध्यम व्यवसायाला मिड टर्मसाठी मदत करा. भारताला ४० टक्के रोजगार हा या लोकांकडून मिळतो, म्हणून त्यांना आर्थिक मदतही दिली जावी. फक्त बिहारसारख्या राज्यांत रोजगार वाढवण्यावर भर द्या.’

मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) बाबत राहुल गांधींनी सुचवले, ‘दहा वर्षांपूर्वीचा भारत आणि आजचा भारत पूर्ण वेगळा आहे. आज बरेच कामगार हे शहरात राहत आहेत. म्हणूनच माझे असे मत आहे की त्यांच्या सुरक्षेसाठी मनरेगा आणि न्याय (किमान उत्पन्न योजना) योजना शहरात असाव्यात. जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात काही पैसे पाठवता येतील. जर सरकारला हवे असेल तर ते न्याय योजना काही काळ अंमलात आणून पाहू शकतील.

यापूर्वी राहुल गांधी यांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे म्हटले होते आणि त्यांच्या मदत कर्जाचे पाकिट होऊ नये. हे पैसे थेट शेतकरी आणि स्थलांतरित कामगारांच्या खिशात गेले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले होते. सरकारच्या निर्णयाबद्दल राहुल गांधी म्हणाले, ‘वाढती वित्तीय तूट यामुळे एजन्सींच्या दृष्टीने भारताचे रेटिंग कमी होईल, असे सांगितले जात आहे. मात्र याक्षणी मी रेटिंगबद्दल नाही, तर भारताबद्दल विचार करतोय. जर सर्व लोक ठीक असतील तर ते पुन्हा एकत्रित काम करतील आणि त्यामुळे रेटिंग आपोआपच दुरुस्त होईल.

या वेळी सर्वात मोठी गरज म्हणजे मागणी-पुरवठा सुरू करण्याची गरज असल्याचे या कॉंग्रेस नेत्याने सांगितले. ते म्हणाले की,’वाहन चालविण्यासाठी तुम्हाला तेलाची गरज असते. जोपर्यंत आपण कार्बोरेटरला तेल घालत नाही तोपर्यंत कार चालू होत नाही. मला भीती वाटते की जेव्हा इंजिन सुरू होईल तेव्हा तेल नसल्यामुळे गाडी चालू होणार नाही. हा लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उठवाव लागेल. कारण आपल्या समस्यांवर तो एकमेव उपाय नाहीये. आपल्याला वृद्ध आणि मुलांची काळजी घेत लॉकडाऊन हळूहळू मागे घेण्याविषयी विचार करावा लागेल. जेणेकरून कोणालाही धोका होणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जळगाव जिल्ह्यात सात रुग्णांची भर, रूग्णांची एकूण संख्या 257

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज सात कोरोना बाधित रूग्ण आढळलेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेे. त्यापैकी 91 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील पिंप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी येथील प्रत्येकी एक, भुसावळचे दोन, भडगावचा एक व मूळच्या खामगाव, जि. बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 257 झाली आहे, यापैकी 48 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर 33 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णसंखेमुळे आता शहर व जिल्ह्यातील नागरीकांनी आता विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कराड नगरपालिकेची पुढील सभा लोकशाही मार्गाने न झाल्यास अविश्वास ठराव आणणार – राजेंद्रसिंह यादव

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यापुढील काळात नगरपालिकेच्या होणाऱ्या सभा संसदीय पद्धतीने होणार असतील तरच आम्ही सभागृहात येऊ. अन्यथा, कायदेशीरमार्गाचा अवलंब करु, असे सांगत पुढील सभा लोकशाहि मार्गाने न झाल्यास नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावा आणू, असा इशारा जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेतून दिला. कऱ्हाड नगर पालिकेत जनशक्ती आघाडीच्यावतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर, विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, हणमंत पवार, गजेंद्र कांबळे, किरण पाटील, शारदा जाधव, स्मिता हुलवान, आशा मुळे, सुप्रिया खराडे आदींची उपस्थिती होती.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, सभागृहाची परंपरा जपत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, तो आम्हाला मिळत नसल्याचे दिसत आहे. गत दोन महिन्यात उद्धभवलेल्या कोरोना सदृश्य परिस्थितीत काम करण्याऐवजी केवळ कोणाला तरी टार्गेट करून आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केला असल्याचा काल झालेल्या कोरोनाविषयाच्या विशेष सभेत दिसून आला. कालच्या सभेतील घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हालाही लाज वाटू लागली आहे. काल सभागृहात घडलेल्या नगराध्यक्षांच्या वर्तनाचा आम्ही आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करीत आहोत. आता गावच्या विकासासाठी कोणाला आवातणे देण्याची गरज नसून प्रत्येकाने आपआपल्या परिने गावच्या विकासासाठी प्रयत्न करावे.

सौरभ पाटील म्हणाले, दोन महिन्याच्या कालावधीत शहरात उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीत नगराध्यक्षांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. एखादी तरी बैठक अथवा नगरसेवकांशी चर्चा करणे आवश्यक होते. कालच्या सभेत मांडल्या गेलेल्या उपसुचनेवर चर्चा करून त्यास बहुमत मिळते की नाही, हे पाहणे गरजेचे होते. मात्र, नगराध्यक्षांनी तसे केले नाही. आम्ही मांडलेली सुचनाच ग्राह्य धरली जाईल, असे त्या म्हणाल्या. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सुचना, म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.

विजय वाटेगावकर म्हणाले, ह्ययापुढील काळात लोकशाही पद्धतीनेच सभा होतील. कोणाचाही आवाज दाबला जाणार नाही. आम्ही पुढील काळात एखादी स्थायी समितीची सभा तसेच सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी नगराध्यक्षांकडे करणार आहोत. तसेच या सभेत संसदीय पद्धतीने कामकाज केले जावे, अशी मागणी करणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ट्रम्प यांच्या स्वागतावर १२० करोड खर्च केल्यानंतर देशाला मिळाले २० करोडचे व्हेंटिलेटर; ‘या’ महिला खासदाराचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर गिफ्ट देण्याच्या प्रकरणावर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांवर थेट हल्ला चढवत महुआ मोइत्रा यांनी ट्वीट केले की,”मोदीजी, ट्रम्प यांच्यासाठी पार्टिचे आयोजन करण्यात सरकारचा वेळ आणि पैश्याचा दुरुपयोग करण्याऐवजी आपण वेळीच कोरोनाचा धोका लक्षात घेतला असता तर कदाचित आपल्याला त्यांच्या या गिफ्टची गरज भासली नसती.”

त्याच बरोबर, महुआ असेही म्हणाल्या की, ट्रम्प यांनी भेट म्हणून दिलेल्या २०० व्हेंटिलेटरची किंमत ही २० कोटी रुपये असून भारताने त्यांच्या नमस्ते इंडिया कार्यक्रमासाठी १२० कोटी रुपये खर्च केले होते. महुआने मोदींना टोमणे मारत विचारले की,”सर ! तुमच्या आत्मनिर्भर मोहिमेची ही सुरुवात आहे का ?”

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स भेट म्हणून देणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मला अभिमान आहे की,”भारत या आपल्या मित्रांला अमेरिका व्हेंटिलेटर भेट म्हणून देईल. आम्ही या साथीच्या कठीण काळात भारतासमवेत उभे आहोत. तसेच कोरोनाची लस तयार करण्यात आम्ही एकमेकांना मदतही करत आहोत. ट्रम्प असेही म्हणाले की, “एकत्र मिळून आम्ही कोरोनासारख्या शत्रूचा पराभव करू.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की,’अध्यक्ष ट्रम्प, या साथीचा सामना करण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, जगाला निरोगी बनवण्यासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याची आता वेळ आली आहे. यासह नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आणि सांगितले की,”आपल्या या निर्णयामुळे भारत-यूएसएची मैत्री आणखीनच मजबूत होईल.”

यापूर्वी भारतानेही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध अमेरिकेत पाठविले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ‘चेतावणी’नंतर भारत सरकारने मलेरियासाठी वापरण्यात येणारे हे औषध अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कोरोना विषाणूची लस या वर्षाच्या अखेरीस किंवा त्यानंतर लवकरच बाजारात उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली आहे. रोज गार्डन येथील एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले की,“ २०२० च्या अखेरपर्यंत ही लस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक विकास कार्यक्रम पुन्हा सुरू होतील अशी अशा आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बिचुकलेंनी पंतप्रधान मोदींना पत्रातून दिला ‘हा’ सल्ला; वाचून शाळकरी मुलंही म्हणतील तुम्हीच आमचे नेते

सातारा । साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असो वा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरत  दारुण पराभूत पत्करणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जवळपास गेले ५० दिवस देश लॉकडाऊनमध्ये आहे. या कठीण परिस्थितीत बिचुकलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एक मोलाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यामुळं बिचुकलेंच पंतप्रधानांना पाठवलेलं हे पत्र सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

कवी मनाचे नेते, सातारा लोकसभा तसेच वरळी विधानसभा अपक्ष नेता असा स्वत:चा उल्लेख करत बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे. मोदींना पाठवलेल्या या पत्रामध्ये बिचुकलेंनी यंदाचे संपूर्ण वर्ष शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेश मोदींनी द्यावेत असं म्हटलं आहे. शाळा सुरु केल्यास त्या माध्यमातून कोरोनाचा धोका वाढू शकतो अशी भिती बिचुकलेंनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आता खुद्द बिचुकलेंनी पत्र लिहलं म्हटल्यावर पंतप्रधान मोदी काय निर्णय घेतात याकडे समस्त सोशल मीडियावरील सक्रिय नेटकरी जनतेचं लक्ष लागून आहे.

बिचुकलेंचे पंतप्रधान मोदींना लिहलेलं हेच ते पत्र

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”