Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5799

अमिताभ, आयुष्मानचा ‘गुलाबो-सीताबो’ चित्रपट १२ जूनला होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सम्पूर्ण सिने सृष्टी बंद झाली आहे. देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शनदेखील थांबले आहे. अशावेळी लॉकडाऊन संपण्याची काही चिन्हेही दिसेनात त्यामुळेच काही चित्रपट निर्माते आता आपले चित्रपट हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करीत आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना अभिनित चित्रपट ‘गुलाबो-सीताबो’ हा १२ जून रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा शुजित सरकारचा ‘गुलाबो-सीताबो’ पहिलाच चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखविला जाईल. आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयीची माहितीही दिली आहे.

‘गुलाबो-सीताबो’चे पोस्टर शेअर करताना आयुष्मानने लिहिले की- “आम्ही अ‍ॅडव्हान्समध्येच आपल्या सर्वांना बुक करतोय. गुलाबो-सीताबोचा प्रीमियर हा १२ जून रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार आहे. तर मग फर्स्ट डे, फर्स्ट स्ट्रीम पहायला या.”

‘गुलाबो-सीताबो’या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या प्रदर्शनाविषयी माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले – “एका सन्माननीय व्यक्तीची आणि त्याच्या अनोख्या भाडेकरूची कहाणी.”

‘गुलाबो सीताबो’ हा चित्रपट याआधी १७ एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता, पण कोरोना या साथीमुळे घरीच बसावे लागलेल्या प्रेक्षकांना हा सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवण्याची जबाबदारी आता ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवर आली आहे.

मागे मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार म्हणाले होते की, ” ‘गुलाबो-सीताबो’ साठी त्यांच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. एक चित्रपट निर्माता म्हणून मला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला बघायचा आहे पण आता परिस्थिती अशी आली आहे की आवश्यक असल्यास मी हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास तयार आहे पण आम्ही ३ मे नंतरच यावर निर्णय घेऊ.”

गुलाबो-सीताबो मधील अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा लूक यापूर्वीच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. यापूर्वी हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता, त्यानंतर तारीख १७ एप्रिल करण्यात आली.

‘गुलाबो-सीताबो’ साठी आयुष्मान खुराना आणि शुजित सरकार हे दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. आयुष्मानने याआधी ‘विक्की डोनर’ आपल्या या डेब्यू चित्रपटात शूजित सरकारसोबत काम केले होते. तसेच अमिताभ बच्चन यांनी ‘पीकू’ चित्रपटात शुजित सरकारसोबत काम केले आहे. दीपिका पादुकोण आणि इरफान खान देखील ‘पीकू’ मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसून आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रेल्वेकडून प्रवासी तिकिटांचं बुकिंग ३० जूनपर्यंत रद्द

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार बंद आहेत. रेल्वे सेवाही बंद आहे. दरम्यान, अडकलेल्या मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मालवाहतूकही सुरु आहे. मात्र, रेल्वेने प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. दरम्यान, पुन्हा एकदा रेल्वेने आरक्षित तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून प्रवासी तिकिटांचं बुकिंग ३० जून पर्यंत रद्द करण्यात आलं आहे. या दरम्यान रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहतील. यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत आणखीन किती वाढ होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेच्या विशेष रेल्वे सेवांच्या अंतर्गत येताच नवीन बुकिंग सुरू होईल. रद्द झालेल्या सर्व तिकिटांना पूर्ण परतावा उपलब्ध असेल. जर आपण जूनमधील  नियोजित प्रवासासाठी तिकिट बुक केले असेल तर ते तिकीट रद्द होईल. परंतु जर आपण येत्या काही दिवसांत आपल्या मूळ राज्यात परत जाण्याचा विचार करीत असाल आणि  तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते शक्य नाही. कारण बुकिंग अद्याप सुरु करण्यात आलेले नाही.

३० जून पर्यंत लॉकडाउन ४.० चालू असेल ,असे संकेत मिळत आहे. दरम्यान, अद्याप तरी याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, ३० जूनपर्यंतची तिकिटे रद्द करण्याच्या निर्णयामुळे रेल्वे सेवा रुळावर येण्याची चिन्हे नसल्याचे संकेत आहेत. सध्या फक्त विशेष गाड्या आणि श्रमिक स्पेशल चालतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कोरोना HIV सारखा कधीच नष्ट होणार नाही, WHOची चेतावनी

वृत्तसंस्था । संपूर्ण जग कोरोना व्हायरसने ग्रासलं आहे. जगभरात लॉकडाऊनमुळं लोक घरात कोंडून आहे, उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प. तर दुसरीकडे कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणाऱ्या औषधाचा अजूनही शोध लागलेला नाही. अशा बिकट परिस्थितीतून जात असताना जीवघेणा कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.

त्यासाठी त्यांनी HIV च्या विषाणूचे उदहारण दिले. ‘HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे तसेच करोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही’ असे रेयान म्हणाले. “HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. कोरोना व्हायरसचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही” असे रायन म्हणाले.

मागच्यावर्षी चीनच्या वुहान शहरातून या कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला होता. तेथून या विषाणूने जगभर आपले हातपाय पसरले. आतापर्यंत जगभरातील ४२ लाख नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उपासमारीचा, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसह जगातील प्रमुख देशांमध्ये कोरोनावर लस शोधण्याासठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण या आजाराला रोखणारे अजून एकही ठोस औषध सापडलेले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

औंरगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 743 वर; नवीन 55 रुग्णांची भर

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार शहरातील कोरोनाबधितांची संख्या 743 वर गेली आहे. शहरात आज पुन्हा 55 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबधितांची संख्या 743 वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

शहराचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे चिंता देखील वाढताना दिसत आहे. त्यात कालपर्यंतचा कोरोनाबधितांची संख्या पाहता 677 वर गेली होती. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार 55 कोरोनाबधितांची भर पडली.

यामध्ये भीमनगर भावसिंगपुरा १५, शिवपुरी पडेगाव १, उस्मानपुरा ७, सिल्कमिल कॉलनी १, कांचनवाडी १, नारळीबाग १, आरटीओ ऑफिस २, गरमपाणी १, बन्सीलाल नगर १, सातारा परिसर २, सातारा ग्रामपंचायत ५, खंडोबा मंदिर जवळ सातारा ग्रामपंचायत १, संजयनगर मुकुंदवाडी ३, हुसेन कॉलनी गारखेडा २, दत्त नगर पाच नंबर गल्ली १, न्याय नगर २, पुंडलीकनगर १, गुरूनगर १, न्यू नंदनवन कॉलनी १, गारखेडा १ , शहानुरवाडी १, पंचशील दरवाजा किलेअर्क १, बेगमपुरा १ व अन्य भागातील २  अशा ५५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

दरम्यान, काल बुधवारी दिवसभरात ३४ रुग्णांची भर पडली तर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. रविवार पासून आतापर्यंत शहरात तब्बल सात रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१० रूग बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४३  वर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक ! सायकल लपवल्याच्या कारणातून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा येथे सायकल लपवल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. दारूच्या नशेत या तरुणाचा बळी घेतल्याची चर्चा नागरिक करत होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की या दोघांनीही दारु पिली होती. त्यातूनच हा प्रकार झाला. आणि तरुणाने एकाच्या डोक्यात दगड घालून अमानुषपणे हत्या केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील वाढे गावातील सुरज निगडे वय 35 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपी दीपक विश्वनाथ दरपा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अतिशय निर्घृण प्रकारे खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केंद्र सरकार हव्या तेवढ्या नोटा छापू शकतं, प्लिज माझ्यावरील केस मागे घ्या – विजय मल्ल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा गंभीर परिणाम पडला असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. मोदींच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्यानंही पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच केंद्र सरकार हव्या तेवढ्या नोटा छापू शकतं, प्लिज माझ्यावरील केस मागे घ्या असंही मल्ल्याने म्हटलं आहे.

“करोनाशी लढा देण्यासाठी पॅकेज जाहीर केल्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन. सरकार इच्छा असेल तर आवश्यक तितक्या नोटा छापू शकते. पण, सार्वजनिक बँकांचं १०० टक्के कर्ज परत करण्याची ऑफर देणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या मदत करू इच्छिणाऱ्याकडे (Contributor) सतत दुर्लक्ष केलं पाहिजे का? माझी विनंती आहे की, कोणत्याही शर्थींशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा,” असं विजय मल्ल्या यानं ट्विट करून म्हटलं आहे.

दरम्यान, विजय मल्ल्या याने यापूर्वीही आपण कर्ज फेडण्यास तयार आहोत. मात्र माझ्यावरील केस मागे घ्या अशी मागणी केली होती. कर्नाटक उच्च न्यायालयात आपण सर्व संपत्तीविषयी माहिती सांगितली आहे. ती घेऊन किंगफिशर एअरवेजला वाचवा असं आवाहन देखील मल्ल्याने केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून पालक आणि शिक्षकांनी काय करायचं??

थर्ड अँगल | सीमंतिनी घोष 

‘बॉईज लॉकर रूम’ च्या घटनेनंतर मी प्रचंड मनस्ताप आणि भीतीमध्ये तुम्हाला हे सगळं लिहिते आहे. एका सहा वर्षाच्या मुलाची आई म्हणून मला भीती वाटत आहे. लैंगिकतेची पर्वा न करणाऱ्या मुलांची मला भीती वाटते आहे. जर आपण आताच काही कृती नाही केली तर काही वर्षानंतर माझा मुलगा, आपल्यापैकी कुणाचाही मुलगा/मुलींकडे घाणेरड्या पद्धतीने पाहणाऱ्या एखाद्या समूहाचा भाग होईल, याची मला भीती आहे. शिक्षक आणि पालकांनी दोन खोल अशा त्रासदायक सत्यासाठी जागे झाले पाहिजे. एक म्हणजे सायबर धमक्या ज्या मानसिक ताण, अस्वस्थता अति तणाव यासाठी कारणीभूत असतात. जे तणाव वास्तविक जीवनातील धकाधकीच्या घटनांसारखेच असतात. ‘बॉईज लॉकर रूम’ सारख्या घटनांमध्ये सायबर धमक्या महिलांच्या विरोधातील हिंसेसाठी दिल्या जातात. दुर्दैवाने भारतात हे खूप सामान्य आहे. महिलांना स्वतःला संपूर्णपणे झाकून घ्यायला सांगणे आणि त्यांना घरांमध्ये अदृश्य करण्यात भारताने उत्कृष्ट काम केले आहे. आपण नित्याने लाजेने हिंसेतही तग धरून राहतो आणि गुन्हेगार मोकळेपणाने फिरत असतात. महिलांचे ‘चांगल्या महिला’, ज्या त्यांच्यावरील विश्वासाच्या मर्यादा तोडत नाहीत आणि ‘वाईट महिला’ ज्या त्यांच्याविरूद्ध हिंसा करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीररित्या शिक्षा देतात असे विभाजन केले जाते. याचे देखील प्रतिबिंब सायबर क्षेत्रात दिसून येते. स्पष्ट बोलणाऱ्या महिला या नेहमी ऑनलाईन लैंगिक धमक्या देण्यासाठीचा निशाणा असतात. अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या ऑनलाईन लैंगिक अत्याचाराच्या वैयक्तिक अनुभवांची साक्ष देऊ शकतात. काही वेळा तर अनुक्रमे होय. अपराधींनी वारंवार अपराध करूनही पीडितांना मात्र नेहमी समुदायापासून दूर करून घेण्याचा पर्याय ठेवला जातो. अनेक महिलांवर अत्याचार केल्यानंतरही गुन्हेगार त्यासाठी क्वचितच जबाबदार ठरतात. त्याऐवजी जे महिलांच्या बलात्कार, त्यांच्यावरील विनोद आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या यांना निरुपद्रवी मजा मानणारा परोपकारी समाज त्यांना या गोष्टी करण्यास आणखी सक्षम बनवतो. 

‘बॉईज लॉकर रूम’ घटनेने एक महत्वाचा धडा अधोरेखित केला आहे. आपल्याला लवकरात लवकर शाळा आणि धोरणकर्त्यांना हलवून आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण मिळते आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे आणि त्यादृष्टीने कृती केली पाहिजे. 

सीमंतिनी घोष

जोपर्यंत एखाद्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्यांना या आभासी अत्याचारामुळे झालेले अथक नुकसान समजणे कठीण आहे. ज्या स्त्रियांनी धार्मिक/ राष्ट्रीय कायद्यांचा त्रास झाल्याचे उघडपणे सांगितले आहे, त्यांना लिंचिंग, बलात्कार आणि मृत्यूसारख्या अनेक धमक्यांना सतत सामोरे जावे लागते. ज्या विवेकी महिला आपले मत व्यक्त करण्याचे धाडस करतात, अशा महिलांसोबत विकृती आणि हिंसाचार केला पाहिजे यासाठी ट्रोलर्स नेहमी नाविन्यपूर्ण मार्गांचा विचार करत असतात. मोठ्या संख्येने सोशल मीडियावरील भारतीयांनी ते स्वीकारले आहे आणि त्या ढोंगात राहायलाही शिकले आहेत. मोठ्या प्रमाणात माध्यमांनी या गोष्टींवर प्रकाश पाडूनही गुन्हेगारांविरुद्ध प्रत्यक्ष कारवाई खूप कमी प्रमाणात केली जाते. अडचणीतून मुक्त होण्याची आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची जबाबदारी महिलांवरच असते. असे इंटरनेट ट्रोल्स सारखे प्रकार हे शहरातील उत्तम शाळेत शिकणाऱ्या सुशिक्षित मुलांकडून अपेक्षित नसल्याच्या कारणामुळे समाजात आक्रोश आहे. हा तार्किक समज आहे. जो कदाचित काहीच विचारला जाणार नाही. किशोरवयीन मुलांच्या इच्छेच्या प्रदर्शनासारख्या वागणुकीपासून दूर राहण्यासाठी काही प्रयत्न देखील केले जातात. १९६० च्या दशकापासून समाज जीवशास्त्र फॅशनेबल झाले असल्याने, मोठया प्रमाणात जीवशास्त्रीय निर्धारांद्वारे हिंसक वागणूक स्पष्ट करणारे संशोधन करण्यात आले आहे. वृषणात तयार होणारे, लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक, योद्धा जनुक (gene), टेस्टोस्टेरॉन, सुपरमेल (ज्यात एक गुणसूत्र आणि  autosomes चे तीन संच असतात) या सर्वांकडे माध्यमांचे लक्ष होते आणि नंतर अधिक काळजीपूर्वक, नियंत्रित संशोधनाद्वारे अंशतः किंवा पूर्णतः हे सर्व स्वीकृत करण्यात आले. पण लोकप्रिय जाणिवेनुसार टेस्टोस्टेरॉन हे पुरुषी आक्रमकतेचे कारण मानले जाते. विशेषतः जर त्यामुळे लैंगिकतेला उत्तेजन दिले गेले असेल तर तेच कारण मानले जाते. काही दंतकथा शोधून त्यांना वास्तविक पुराव्यांसहित तोलल्यानंतरचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे. 

१) पहिले चांगल्या घरातील सुशिक्षित मुले महिलांना त्रास देत नाहीत. 
स्पष्टीकरण –
आतापर्यंत त्या समूहाशी जोडली गेलेली सर्व मुले ही दिल्ली एनसीआर, नोएडा येथील चार किंवा पाच खास लोकांच्या शाळेतील तसेच अगदी हेतुपूर्वक सुशिक्षित आणि सामाजिकदृष्ट्या उत्तम घरातील होती. याउलट पुराव्यांमधील एक मोठा भाग भारतीय सामाजिक संरचनेत शक्तीची पात्रता आणि दंडात्मक कारवाई प्रदान करणाऱ्या काही विशेष अधिकारांना सूचित करतो. लैंगिक अत्याचाराला ज्या निर्लज्जपणाने हाताळले जाते त्या सगळ्याचा हा परिणाम आहे.  

२) दुसरे, मुले ही  मुले असतात. किंवा याचा दोष टेस्टोस्टेरॉनला दिला जातो.
स्पष्टीकरण –
होय, टेस्टोस्टेरॉनचा संबंध पुरुषी आक्रमकतेशी जोडला जातो. पुरुषी आक्रमकता हे चिंपांझी सारख्या सर्वश्रेष्ठ समुदायाचे सर्वात खास लक्षण आहे. जे आपले अगदी नजीकचे पूर्वज आहेत. ज्यांच्यातील पुरुषांचे सामाजिक संवाद हे स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचारामुळे आणि अल्फा वर्चस्वामुळे चर्चेत असतात. तथपि अनुवांशिकतेच्या संदर्भात बोलायचे तर आपण आणखी एका समुहासारखे आहोत, ज्यांना bonobos म्हणतात तर ते स्त्रीवादी आणि समतावादी आहेत. म्हणजे, मानवी नरांमध्ये असणारी कठोर हिंसा ही कल्पना सदोष आहे. वागणूक ही पर्यावरणीय आणि जीवशास्त्रीय संवादाद्वारे निश्चित केली जाते. जेव्हा आपण सामाजिक वागणुकीवर येतो तेव्हा १२,००० वर्षांपासूनच्या सांस्कृतिक आणि संज्ञात्मक उत्क्रांतीचा हिशोब घ्यावा लागतो. स्क्रीनशॉटमध्ये असणाऱ्या पुराव्यांमध्ये दिसणारी केवळ पौगंडावस्था निष्ठुरता स्प्ष्ट करत नाही. उच्च वर्गीय बलात्कार प्रकरणे किंवा भारतीय महिलांच्या विरोधातील हिंसक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी या पौगंडावस्थेतील मुलांना माध्यम कव्हरेज पासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. जेव्हा संवाद लैंगिकता आणि संमतीच्या भोवती असतो तेव्हा ही मुले लैंगिक हिंसेबद्दल खूप सहजरित्या बोलत असतात तसेच अत्यंत उग्र विशेषतः महिलांचा द्वेष करणारे विचार व्यक्त करत असतात. हे सुद्धा खूप चिंताजनक आहे. 

३) तिसरे, थोडीशी निरुपद्रवी मजा करण्यात काय समस्या आहे? 
स्पष्टीकरण –
चुकीचा प्रश्न. इथे आणखी काही चांगले प्रश्न आहेत. मजेसाठी पाशवी हिंसा कशी काय केली जाते, आणि ती निरुपद्रवी कशी असू शकते? कुणीतरी ज्या महिलांची छायाचित्रे वापरली गेली, त्यांना झालेल्या आघातापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला? महिलांच्या शरीरावरचे हे अधिकार कुठून आले? जे काय आहे जे इतक्या निखालसपणे आणि रानटी वृत्तीने संमतीकडे दुर्लक्ष करण्यास शिकवते?  एखादी व्यक्ती आपल्याच मैत्रिणीसोबत पाशवी हिंसा करण्याची कल्पना कशी काय करू शकते आणि त्यातून आनंद कसा मिळवू शकते? आपण महिलांविरोधातील हिंसा इथपर्यंत सामान्य केली आहे का की ‘बॉईज लॉकर रूम’ सारख्या समुहापासून अपेक्षित असणाऱ्या स्वीकार्य चर्चेत महिलांवर सामूहिक बलात्काराचे करण्याचे नियोजन करतो? अशा पद्धतीने आपण बंधुत्व वाढविणार आहोत? आचारपद्धती सुधारणार आहोत? पालक म्हणून, आपण या विषारी पुरुषत्वाला आपण कसे रोखणार आहोत, ज्यामुळे आपल्या मुलींचे कधीच भरून न येणारे नुकसान होते आहे? आपण यात समाविष्ट असणाऱ्या मुलांना सहजपणे विकृत म्हणून चिन्हांकित करु शकत नाही, त्यांना शिक्षेसाठी पात्र म्हणून पुढे जाऊ शकत नाही. भारतातील प्रत्येक मोठ्या बलात्काराच्या प्रकरणानंतर बलात्काऱ्यांना फासावर लटकवण्याची ओरड समाजातून केली जाते. आणि त्यांना फासावर लटकवले ही आहे. बलात्कार करणारे नराधम, पोलीस एन्काऊंटरमध्ये मारलेही गेले आहेत. तरीही आतापर्यंतची आकडेवारी सातत्याने सांगते की, मृत्यूची शिक्षा देऊनही कुठेही, कधीही आपण महिलांविरुद्धच्या हिंसा कमी करू शकलो नाही आहोत. भारताने बलात्कार/ सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडाची परवानगी दिली असल्याने त्यांना खालच्या कोर्टात असेच सोडून दिले जाते. तथापि, इतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन समस्या संपत नाही. याचे ही अलीकडची घटना म्हणजे आणखी एक प्रात्यक्षिक आहे. कारण बलात्कार आपल्या आत राहतो. आपला समाज बलात्काराच्या संस्कृतीला सक्षम करतो, परवानगी देतो आणि त्याची निष्क्रिय शांतता बलात्काराला बळकट करते. ही पुढची आणि पूर्णतः बलात्काराची संस्कृती आहे. 

दोन दृष्टिकोन तात्काळ गरजेचे आहेत. लिंगभाव आणि लैंगिक शिक्षणाला प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग बनविले पाहिजे. शाळांनी तात्काळ पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत नियमित सायबर धमक्या, लिंगभाव संवेदनशीलता आणि लैंगिक अत्याचारासंदर्भातील कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. मी विशेषतः पालकांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मुलांमधील हक्काची भावना जी प्रत्येक भारतीय पुरुषामध्ये असते ती नष्ट करून टाका. आपल्या मुलींना अंगभर कपडे घाला किंवा घरात राहा हे सांगण्यापेक्षा आपल्या मुलांना बलात्कार करू नका म्हणून सांगा. आपण मुलांना संमतीचा अर्थ शिकविला पाहिजे. जर पालक स्वतः उदाहरण झाले नाहीत तर वरील सर्व चुकू शकते. मोठ्या प्रमाणात भारतीय तरुण हे लिंगभाव समानता बघत वाढलेले नाहीत त्याऐवजी त्यांनी उलटेच बघितले आहे. मुले आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी बघत असतात त्यातूनच ते शिकत असतात. जर मुलांमध्ये लिंगभावाबद्दल आदर वाढवायचा असेल तर लैंगिक रूढी तोडणे फार महत्वाचे आहे. रूढीवाद प्रामुख्याने कुटुंबामध्ये हैरारकी निर्माण करतो, जिथे एका लिंगाची स्थिती दुसऱ्याची स्थिती ठरविते. 

एक विद्यापीठ शिक्षक, नागरिक आणि पालक म्हणून माझी एक प्रामाणिक आशा आहे की आपण या सामूहिक अपयशामध्ये बरोबरीची भागीदारी घेऊ. आपण आता धोरणकर्ते आणि शाळामधून मुलांना लवकर लैंगिक शिक्षण मिळते आहे का याची खात्री केली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या भरभराटीच्या बलात्कार संस्कृतीची जबाबदारी घेणार नाही, तोपर्यंत भारतीय महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता खूप लांबची गोष्ट आहे. 

लेखिका अशोका विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत. मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9561190500

राज्यात दिवसभरात १ हजार ४९५ नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या २५ हजार ९२२ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. आज १४९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५५४७ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ नमुन्यांपैकी २ लाख ०३ हजार ४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २५ हजार ९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ९७५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २१ महिला आहेत.

आज झालेल्या ५४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १५,७४७ (५९६)
ठाणे: १५७ (३)
ठाणे मनपा: ११२२ (११)
नवी मुंबई मनपा: १०१८ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४१२ (३)
उल्हासनगर मनपा: ७२
भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४५ (२)
पालघर: ४० (२)
वसई विरार मनपा: २८६ (११)
रायगड: १५८ (२)
पनवेल मनपा: १५० (८)
ठाणे मंडळ एकूण: १९,४४६ (६४४)

नाशिक: ८८
नाशिक मनपा: ४६
मालेगाव मनपा: ६१७ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: १०
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ६२ (३)
जळगाव: १६२ (१७)
जळगाव मनपा: ४४ (९)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १११४ (७१)

पुणे: १८० (५)
पुणे मनपा: २८३० (१६१)
पिंपरी चिंचवड मनपा: १५१ (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: ३११ (२१)
सातारा: १२५ (२)
पुणे मंडळ एकूण: ३६०६ (१९३)

कोल्हापूर: १६ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३५
सांगली मिरज कुपवाड मनपा: ६ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ६० (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १३० (५)

औरंगाबाद:९४
औरंगाबाद मनपा: ५८६ (१७)
जालना: १६
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७५९ (१८)

लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९४ (५)

अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १७४ (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८४ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४०८ (२६)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३१५ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३२४ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २५ हजार ९२२ (९७५)

भारतात १६ मे रोजी येणार चक्रीवादळ; हवामान खात्याने दिली चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावेळी भारतासमोर आता आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागावर हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या तयार झाले आहे, असे हवामान विभाग सांगत आहे आणि यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. आणि हे वादळ बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि पश्चिम मध्य प्रदेशाच्या दिशेने १६ मे रोजी सरकेल, या कमी दाबाच्या क्षेत्राचे नाव आहे अम्फान.

‘चक्रीवादळा’साठी केला हाय अलर्ट जारी
इतकेच नाही तर हवामानाशी संबंधित असलेले बरेच मॉडेल्सही हे सूचित करत आहेत की १५ मे नंतर २०२० मधील पहिले ‘चक्रीवादळ’ तयार होऊ शकेल. मात्र, अद्यापही त्याचा मार्ग, त्याची क्षमता आणि त्याचे लँडफॉल या संदर्भात परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.

‘चक्रीवादळा’ बद्दल गोंधळ अजूनही कायम आहे
यापूर्वी स्कायमेटने असे सांगितले होते की १ मे ते ३ मे दरम्यान हे ‘चक्रीवादळ ‘ येऊ शकेल, परंतु नंतर ते मंदावले, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात याचा प्रभाव वाढू लागलेला आहे, असे मानण्यात येते कि वर्षातून किमान दोनदा असे घडते जेव्हा ‘चक्रीवादळ’ येण्याची शक्यता असते.

पावसाळा
पहिली संधी पावसाळ्याच्या आधी आणि दुसरी पावसाळ्या नंतर येते आणि मान्सूनचा हंगाम साधारणत: जूनच्या पहिल्या महिन्यात सुरू होतो, यावेळी मात्र पावसाळा येण्याच्या आधीच हे वादळ येण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचे म्हणजे नेमके असते काय ?
भारत आणि जगभरातील किनारपट्टीवरील भागात चक्रीवादळ नेहमीच येत असते. चक्रीवादळ वादळांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे ठेवली जातात. सायक्लोन, हरिकेन आणि टायफून हे तिन्ही चक्रीवादलाचे तीन प्रकार आहेत. उत्तर अटलांटिक महासागर आणि ‘ईशान्य प्रशांत महासागरात या चक्रीवादळांना हरिकेन असे म्हणतात. उत्तर-पश्चिम प्रशांत महासागरात या ‘चक्रीवादळाला’ टायफून म्हणतात तर हिंद महासागरातील फून आणि दक्षिणी पॅसिफिक येथे या वादळांना “सायक्लोन” असे म्हणतात, भारतातील चक्रीवादळ हे दक्षिण पॅसिफिकहून येते आणि म्हणूनच हिंदी महासागराला “सायक्लोन” म्हणतात.

‘चक्रीवादळ’ का येतात?
पृथ्वीच्या वातावरणामध्ये हवा असते, समुद्राच्या वरही पृथ्वीसारखीच हवा असते, ही हवा नेहमीच उच्च दाब ते कमी दाब असलेल्या भागातून वाहते. जेव्हा हि हवा गरम होते, ती फिकट होते आणि ती वाढण्यास सुरवात होते, जेव्हा समुद्राचे पाणी गरम होते तेव्हा तिथली हवा देखील गरम होते आणि वाढू लागते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास सुरवात होते, त्यासभोवती थंड हवा भरण्यासाठी हे कमी दाब असलेल्या क्षेत्राच्या दिशेने जाऊ लागते. परंतु पृथ्वी आपल्या अक्षावर एका टट्टूप्रमाणे फिरत राहते, ज्यामुळे ही हवा सरळ दिशेने फिरण्यास सुरवात होते आणि फिरत फिरत पुढे सरकू लागते, ज्याला ‘चक्रीवादळ’ असे म्हणतात.

 

वादळांची नावे अशी ठेवली जातात
वास्तविक १९४५ च्या पूर्वी कोणत्याही चक्रीवादळाचे नाव नव्हते, त्यामुळे हवामानशास्त्रज्ञांना खूप त्रास झाला. जेव्हा ते आपल्या अभ्यासामध्ये चक्रीवादळाचा तपशील देत असत किंवा त्यावर चर्चा करत असत, तेव्हा त्याचे वर्ष लिहायचे होते आणि वर्षात जर थोडीशी घसरण झाली असेल तर सर्व गणितच बदलले असायचे. या समस्येवर उपाय म्हणून जागतिक हवामान संघटनेने १९४५ पासून या चक्रीवादळांची नावे ठरविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आलेल्या सर्व चक्रीवादळांना वेगवेगळी नावे दिली गेली.

अगदी मोजलेल्या वर्षात वादळांची नावे
पूर्वी असे सांगितले जात असत की या वादळांची नावे नाविक त्यांच्या प्रेमिकांच्या नावावर ठेवायचे, आणि म्हणूनच सुरुवातीला या वादळांचे औपचारिकरित्या ठेवलेली नावे ही स्त्रियांची असत, ही परंपरा ७० च्या दशकापासून बदलली आणि वादळाला स्त्रि आणि पुरुष या दोघांचेही नाव देण्यात आले. चक्रीवादळ स्त्रियांची नावे ही समान वर्षांमध्ये तर पुरुषांची नावे ही विषम वर्षांमध्ये आढळतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनावर शशी थरुर म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या भाषणात स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्तर देताना त्यांनी तेच जुने शेर नव्या नावाने पुन्हा विकले असे,म्हंटले आहे . यासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने एक ग्राफिक शेअर केला आहे. या ग्राफिकमध्ये मेक इन इंडियाचा लोगो असून तो एक कामगार दुरुस्त करीत आहे असे दिसत आहे. शशी थरूर यांनी हे ट्वीट करून लिहिले आहे की मेक इन इंडिया आता स्वावलंबी भारत झाला आहे, काही नवीन होते का?

मंगळवारी पंतप्रधानांनी असे आवाहन केले की आजपासून प्रत्येक भारतीयाला केवळ स्थानिक उत्पादने खरेदी करण्यासाठीच नव्हे तर अभिमानाने प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या स्थानिकांसाठी ‘वोकल’ व्हावे लागेल. मला विश्वास आहे की आपला देश हे करू शकतो.पीएम मोदी पुढे म्हणाले की, आपण नेहमीच स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आपण त्यांच्याकडून खरेदी करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली पाहिजे. पीएम मोदी आणखी म्हणाले की आपण त्यांना लोकल पासून ग्लोबल बनवले पाहिजे. पंतप्रधान आपल्या भाषणात असेही म्हणाले की आजपासून प्रत्येक भारतीयांनी तेच विकत घ्यायचे आहे आणि त्याचा प्रचार करण्यासाठी लोकल साठी वोकल बनले पाहिजे.

 

आणखी एका आर्थिक पॅकेजची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जाहीर करण्यात आलेले आर्थिक पॅकेज जर आपण जोडले तर ते सुमारे २० लाख कोटी रुपये इतके आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या सुमारे १० टक्के आहे. ते म्हणाले की, या माध्यमातून देशातील विविध घटकांना, आर्थिक व्यवस्थेच्या दुव्यांना २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य्य मिळेल . २० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज २०२० मध्ये देशाच्या स्वावलंबी भारत अभियानाच्या विकासाच्या प्रवासाला एक नवीन गती देईल.

पंतप्रधान पुढे म्हणाले की स्वावलंबी भारताचा संकल्प सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, तरलता आणि कायदे या सर्वांवर जोर देण्यात आला आहे. हे आर्थिक पॅकेज आपल्या कॉटेज उद्योग, गृह उद्योग, लघुउद्योग, आमचे एमएसएमई यासाठी आहे जे लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे एक साधन आहे, जे एक स्वावलंबी भारताच्या आपल्या संकल्पनेचा भक्कम पाया आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.