Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5821

पाकिस्तान मध्ये आज पासून लाॅकडाउन हटणार; इम्रान खान म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आजपासून आपल्या देशातील लॉकडाउन हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला आहे असे मुळीच नाही. परंतु इम्रान खान यांचा असा युक्तिवाद आहे की जर पाकिस्तानमध्ये लॉकडाउन सुरु ठेवण्यात आला तर व्हायरसपेक्षा मोठा विनाश होईल कारण सरकारकडे पुरेसे पैसेच नाही आहे.

भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये पाच आठवड्यांनंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊन हटवण्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमध्ये परिस्थिती चांगली नसल्याचे इम्रानने सांगितले. सरकार आधीच मुश्किलीने चालू होते, त्यातच आम्ही सर्वांना पैसे देऊ शकत नाही. भारताशी तुलना केल्यास त्यांची परिस्थिती ही आमच्यापेक्षा चांगली होती, आम्ही बरीच रक्कम दिली आहे, परंतु आम्ही किती काळ पैसे देऊ शकतो. म्हणून आम्हाला लॉकडाउन हटवावा लागेल यातच शहाणपण आहे.

लॉकडाऊन उघडण्याची घोषणा करताना इम्रान भारताचा उल्लेख करायला विसरला नाही आणि त्याचा एकच हेतू होता की जनतेला हे दाखविणे कि पाकिस्तान हा भारतापेक्षा आपल्या जनतेची जास्त काळजी घेतो. पण इम्रान हे विसरला की २२ कोटी लोकसंख्या असलेला पाकिस्तान त्यांना हाताळण्यास सक्षम नाही आणि १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताशी आपली तुलना करत आहे. कोरोना विषाणूचा भारत कसा सामना करीत आहे, याचा आदर्श संपूर्ण जग घेत आहे. भारताच्या पंतप्रधानांची उदाहरणे दिली जात आहेत.फक्त ५ आठवड्यांचा लॉकडाउनही पाकिस्तान सहन करू शकला नाही.

पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनमुळे आतापर्यंत अडीच दशलक्ष कोटींचे नुकसान झाले आहे तर पंचवीस लाख रोजगार गमावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील प्रत्येक देशासाठी कोरोना विषाणूचा सामना करणे एक आव्हान बनले आहे. परंतु पाकिस्तान हा उपासमारीच्या मार्गावर असलेला देश आहे, जिथे गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगारीमुळे तसेच महागाईमुळे लोकांना त्रास झालेला आहे. आता या लॉकडाऊनमुळे पाकिस्तान सरकारचे कंबरडे मोडले गेले आहे.

८ मे पर्यंत पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची २५ हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत तर जुलैच्या मध्यापर्यंत पाकमध्ये कोरोना संसर्गाची २ लाख रुग्णांची नोंद होण्याचा अंदाज आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत,परंतु एक सत्य हे ही आहे की कोणताही देश कायमचा लॉकडाउन ठेवू शकत नाही कारण प्रत्येकाला आपली अर्थव्यवस्था देखील चालवावी लागते. इम्रान सरकारने लॉकडाऊन वेगवेगळ्या टप्प्यावर उघडण्याची घोषणा केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रेडझोन औरंगाबादेतून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांचेही निलंबन होणार का?

जालना प्रतिनिधी । जिल्हाधिकाऱ्यांनी खोटारडेपणा उघडकीस आणलेल्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय जिल्ह्यांच्या सीमा ओलांडू नयेत अशा सूचना असतानादेखील बदनापूरचे गटविकास अधिकारी व्ही.एन.हरकळ हे रेड झोन असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य धोक्यात टाकत असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी मागील आठवड्यात बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार आणि भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. आता अशीच कारवाई सदर गटविकास अधिकाऱ्यांवर होणार का असा प्रश्न जालना वासियांना पडला आहे.

जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जालना जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद व बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून हे दोन्ही जिल्हे राज्य शासनाने रेडझोन घोषित केले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जालना येथे मुख्यालयी वास्तव्य करून रहावे असे आदेश जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बजावले होते. असे असतांनाही बदनापूरचे गटविकास अधिकारी व्ही.एन.हरकळ हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दररोज रेडझोन असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून सर्रासपणे दररोज अपडाऊन करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

याबाबत खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी तीन दिवसापूर्वी बदनापूर बीडीओच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कुठे आहेत अशी विचारणा केल्यानंतर हरकळ हे औरंगाबाद येथे असतांनाही आपण बदनापूर येथेच असल्याचे खोटे उत्तर देऊन जिल्हाधिकारी बिनवडे यांना थाप मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासकीय कामकाजाचा अनुभव पाठीशी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हरकळ यांची फिरकी घेत मोबाईल लोकेशन पाठविण्याचे आदेश देताच बोबडी वळलेल्या बीडीओनी सत्य जिल्हाधिकारी बिनवडेजवळ सत्य ओकले होते. त्यामुळे हरकळ यांना तात्काळ जालना येथे हजर होण्याचे आदेश श्री बिनवडे यांनी दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा यांची देखील कोणतीही परवानगी हरकळ यांनी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा यांनी हरकळ यांना काल शुक्रवारी सकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, अशाच कारणांमुळे जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी मागील आठवड्यात बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार आणि भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दोन बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली असली तरी अन्य कार्यालयाकडून अद्याप अशी धाडसी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हरकळ यांच्या विरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अरोरा या नेमकी काय कारवाई करतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

..अन्यथा गृहमंत्री शहांनी ममता दीदींची माफी मागावी- तृणमूल काँग्रेस

कोलकाता । गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, स्थलांतरीत मुजरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य प्राप्त होत नसल्याची तक्रार केली होती, यावर तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं. अमित शहांनी केलेले खोटे आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा पलटवार केला आहे.

तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्या पत्रावर प्रतिकिया देताना म्हणाले कि , ‘या संकटकाळात आपलं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरणारे केंद्रीय गृह मंत्री कित्येक आठवड्यांनंतर गप्प राहून आता बोलत आहेत… खोट्या वक्तव्यांसहीत लोकांची दिशाभूल करत आहेत. विडंबना म्हणजे याच सरकारनं लोकांना वाऱ्यावर सोडून दिलंय. शहांनी आपले खोटे आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी’ असं ट्विट केलं आहे.

काय म्हणाले होते पत्रात अमित शहा दीदींना
गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहलेल्या पत्रात स्थलांतरी मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली होती. ‘प्रवासी मजुरांसोबत पश्चिम बंगाल पोहचणाऱ्या रेल्वेला राज्य सरकारकडून परवानगी नाकारण्यात येतेय. या मजुरांना आपल्या राज्यात परतू न देणं हा अन्याय आहे. यामुळे त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो’ असं अमित शहा यांनी म्हटलं होतं.प्रवासी मजुरांच्या प्रश्वावर ममता बॅनर्जी गप्प का आहेत? त्यांनी मजुरांसाठी योग्य ती पावलं उचलावीत, पश्चिम बंगालमध्ये प्रवासी मजूर अधिक चिंतेत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यात आलं आहे. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालचे प्रवासी मजुरही आपल्या राज्यात जाण्यासाठी व्याकूळ आहेत. त्यांची जाण्याची व्यवस्थाही केंद्रानं केलीय. परंतु, मला दु:ख आहे की पश्चिम बंगाल सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, असंही अमित शहा यांनी म्हटलं पत्रात आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

भारतात कोरोनाचे कम्युनिटी ट्रांन्समिशन सुरु? रोज सापडतायत ३ हजार हून अधिर रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण प्रकरणे सुमारे ६० हजारांपर्यंत पोहोचली आहेत. भारतातील पहिल्या प्रकरणाच्या नोंदी नंतर पुढील ३० दिवस तुलनेने शांत राहिले. त्यानंतर मात्र या प्रकरणांच्या संख्येत हळूहळू वाढ झाली.पहिल्या ५० दिवसांत भारतात २०० पेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच प्रकरणांच्या वाढीस वेग आला आहे आणि मेच्या सुरुवातीच्या दिवसांत तर भारतात दररोज २,००० हून अधिक संक्रमणाच्या रिपोर्ट्स येत आहेत, जे आता गेल्या ३-४ दिवसांत ३००० च्या वर गेले आहेत.

९ मे रोजी भारतातील कोरोना विषाणूच्या साथीचा आज १०० वा दिवस आहे.३० जानेवारीला केरळमधील थ्रिसूरमध्ये एका वैद्यकीय विद्यार्थी चीनच्या वुहानमधून परत आला आणि त्याने ताप तसेच घशाला सूज आल्याची तक्रार केली.या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली. भारतातील कोरोनाचे हे पहिले प्रकरण होते. आता दररोज ३,००० हून अधिक रिपोर्ट्स समोर येत आहेत.

Chhattisgarh reports likely community-transmission case of COVID ...वेगाने वाढणाऱ्या या घटनांमुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे की भारतात कम्युनिटी ट्रांन्समिशन सुरु झाला आहे का? त्या दृष्टीने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) देशातील जवळपास ७५ जिल्ह्यांमध्ये याचा अभ्यास सुरू करण्याचा विचार करीत आहे जिथे बहुतेक कोविड -१९ ची प्रकरणे आढळून आली आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी ट्रांन्समिशन सुरु झाले आहे की नाही हे शोधण्यासाठीचा हा अभ्यास आहे.

सर्व ७५ हे जिल्हे रेड झोनचा भाग आहेत. त्यात दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, आग्रा, अहमदाबाद यासारख्या शहरांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, केवळ मुंबईतच १२ हजाराहून अधिक प्रकरणे आहेत. दिल्लीत ६ हजारांहून अधिक आणि अहमदाबादमध्ये ५ हजारांहून अधिक प्रकरणे आहेत. पुणे आणि ठाण्यात तब्बल २ हजाराहून अधिक प्रकरणे आहेत. इंदूरमध्ये १७०० पेक्षा जास्त, जयपूरमध्ये एक हजाराहून अधिक, जोधपूर आणि सूरतमध्ये ८००-८०० पेक्षा जास्त आणि आग्रामध्ये ७०० पेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणे आहेत.

Coronavirus outbreak: Sporadic cases not enough to say India in ...

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची ३३२० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर १३०७ लोक यातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी पहाटेपर्यंत देशभरात एकूण कोरोना विषाणूचे प्रमाण वाढून ५९,६६२ झाले आहे.

या प्रकरणांमध्ये अशी १७८४६ प्रकरणे अशी आहेत जी कोरोना विषाणूचा पराभव करून पूर्णपणे बरे झाली आहेत, जरी या प्राणघातक विषाणूने देशभर १९८१ लोकांचा बळी घेतला आहे. शुक्रवारी सकाळी पर्यंत, देशभरात कोरोना विषाणूची एकूण संख्या ५६,३४२ झाली आहे आणि बरे झालेल्या लोकांची संख्या ही १६,५३९ झाली आहे.

Covid-19 in India: Govt says not to panic, as no community ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चिंता वाढत आहे! देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ६० हजारांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचत आहे. सुरुवातीला धीम्या गतीनं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता झपाट्यानं वाढू लागला आहे. अर्थात देशाच्या काही भागांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे हे नाकारता येणार नाही. असं असलं, तरीही रुग्णांचा वाढता आकडा हा देशाचा वाढता धोका अधोरेखित करत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या देशात आता ६० हजारांचा आकडा गाठण्याच्या मार्गावर आहे.

सध्या कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५९ हजार ६६२ वर पोहोचली आहे. देशातील या हजारो कोरोनाबाधितांमध्ये ३९ हजार ८३४ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर. १७ हजारहून अधिक रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. कोरोनामुळं जीव गमावलेल्यांचा आकडा १९८१ च्या घरात पोहोचला आहे. मागील चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या प्रसाराचा वेग पाहता, जवळपास ३३२० नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तर, चोवीस तासांच्या कालावधीत ९५ जणांना जीव गमवावा लागला.

एकिकडे कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आरोग्य सेवा, शासनाच्या तणावास कारण ठरत असतानाच दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा काही अंशा का असेना पण, दिलासा देऊन जात आहे. शिवाय देशातील ४२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्यामुळे ही सुद्धा प्रोत्साहनपर बाब ठरत आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीचं पालन केल्यास परिस्थिती बऱ्याच अंशी सुधारू शकते, ज्यामुळं प्रशासनही कोरोनाबाधित क्षेत्रांवर जास्त लक्ष केंद्रीत करु शकतं हा मुद्दा इथे अधोरेखित केला जाणं गरजेचं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कास्टिंग काउच बाबत चित्रांगदा सिंहचा मोठा खुलासा; माझ्या सोबत सुद्धा ‘हे’ झाले पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक असलेल्या चित्रांगदा सिंगने तिच्याबरोबर झालेल्या कास्टिंग काउचिंगचा अनुभव नुकताच शेअर केला आहे. त्याबद्दल तिने सांगितले की आपल्याला बर्‍याच वेळा याचा सामना करावा लागला आहे.ती म्हणाला की, “असे लोक सर्वत्र आहेत. माझ्या मॉडेलिंगच्या काळापासून ते माझ्या बॉलीवूडमध्ये माझ्या पदार्पणापर्यंत मी बर्‍याचदा अशा लोकांना सामोरे गेली आहे. कॉर्पोरेट उद्योगाबाबतही असेच आहे. होय माझ्या बाबतीतही हे घडले आहे, परंतु चित्रपट उद्योग ही एक अशी जागा आहे जिथे कोणीही कोणालाही हे करायला भाग पाडत नाही. प्रत्येकास येथे पुरेसे स्थान आहे जेथे प्रत्येकजण स्वत: चा निर्णय घेऊ शकतो. जेव्हा या कारणास्तव एखादी संधी आपल्यापासून दूर नेली जाते तेव्हा मात्र आपणास वाईट वाटते. पण ही तुमची चॉईस आहे. ”

Chitrangada Singh #MeToo Support Tanushree Dutta Shares Her ...

मीसुद्धा बरेच प्रोजेक्ट्स गमावलेत पण …
चित्रांगदा सिंह आपल्या अनुभवाबद्दल म्हणाली, “मला वाईट वाटते आणि मी बरेच प्रोजेक्ट्स गमावले आहेत, परंतु त्याच वेळी जर ते करण्यास खूष असाल तर तुम्ही त्याबरोबरच जा. मला येथे कोणालाही जज करायचे नाही आहे. मी नाही. हे फक्त यौन शोषणासाठी नाही तर लोकांना पाहिजे असलेल्या इतर गोष्टींसाठी देखील हे होते आहे.जगाने तसे केले आहे म्हणून आपण आपल्या गोष्टी स्वतःच निवडा आणि आपल्याला जगायचा मार्ग आपणच निवडा.”

Chitrangda Singh turns producer for Soorma: How actresses are ...

चित्रांगदा लवकरच एक शॉर्ट फिल्म घेऊन येणार आहे
चित्रांगदा लवकरच एक शॉर्ट फिल्म घेऊन येणार आहे, ज्याचे नाव ‘लागू’ असे असून सध्या ती या चित्रपटाची कथा लिहिण्यात व्यस्त आहे. त्याचबरोबर तिने स्वत: हून याविषयी माहितीही शेअर केली आहे. ती म्हणाली की लॉक-डाऊनमुळे, तिच्याकडे यावेळी खूप मोकळा वेळ आहे आणि अशा परिस्थितीत तिला त्याचा फायदा घ्यायचा आहे. चित्रांगदा म्हणाली की मी ही कथा मोठ्या प्रेमाने आणि मनापासून लिहित आहे.

चित्रांगदा सिंह ने बताया पूर्व ...

आयुष्माननेही शेअर केला आपला अनुभव
या आठवड्यात चित्रांगदापूर्वी अभिनेता आयुष्मान खुरानानेही आपल्याला आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. त्याने सांगितले की एका कास्टिंग डायरेक्टरने मुख्य भूमिकेच्या बदल्यात त्याच्याकडे अशी मागणी केली ज्यामुळे आयुष्मान अस्वस्थ झाला. तथापि, त्याने या परिस्थितीचा सामना अगदी नम्रपणे केला.तो म्हणाला, “मला कास्टिंग डायरेक्टरने सांगितले होते, जर तू मला तुझे टूल दाखवले तर मी तुला मुख्य भूमिका देईन.” मी अगदी स्पष्टपणे त्यांस नकार दिला. ”

चित्रांगदा सिंगचे वर्कफ्रंट
या अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना चित्रांगदा लवकरच अभिषेक बच्चनसोबत ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानचा प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. बॉब बिस्वास बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट सुजॉय घोषच्या ‘कहानी’ चा स्पिन ऑफ आहे. तुम्हाला आठवत असेल, या चित्रपटातील कॉन्ट्रेक्ट किलर बॉब बिस्वास होता, ज्याची भूमिका शाश्वत चटर्जी यांनी केली होती. या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत होती. बॉबचे हे पात्र त्यावेळी खूपच प्रसिद्ध झाले होते.

कास्टिंग काउच म्हणजे काय ?
कास्टिंग काउच म्हणजे एखाद्याला काम मिळवून देण्याच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी करणार्‍या अनैतिक आणि बेकायदेशीर वर्तनाचा संदर्भ असतो. बरेचदा सीनियर लोक नवीन आलेल्या जूनियर्स कडून अशी मागणी करतात. कास्टिंग काउचच्या कल्पनेशी संबंधित लोक चित्रपट जगतात संबंधित असलेल्या कथांमुळे असले तरी असे कोणत्याही क्षेत्रात घडू शकते. जर आपण शाब्दिक अर्थाकडे गेलात तर ते समजणे सोपे होईल. काउच म्हणजे एक सोफा. ते दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या कार्यालयातील एका काउच कडे लक्ष देतात ज्यात इच्छुक कलाकार आणि अभिनेत्रींची मुलाखत घेतली जाते. कास्टिंग म्हणजे एखाद्यास आपल्या चित्रपटाचा भाग बनविणे किंवा त्याला कास्ट करणे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अरे वा वा वा! बिग बझारकडून आता घरपोच किराणा मालाची डिलिव्हरी

मुंबई । लॉकडाऊनमधून बिग बझारसारख्या स्टोअर वगळण्यात आलं आहे. काही ठरविक कालावधीत काही निर्बंध आणि अटींसह केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्रीसाठी ही रिटेल स्टोअर ग्राहकांच्या सेवेसाठी सुरु असतात. मात्र, कोरोनाचा संसर्गामुळं लोकांची स्टोरमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी आहे. यातून वाट काढत बिग बझारने लॉकडाउनच्या काळात Shop.BigBazaar.com ही मोबाइल साइट सुरू केली आहे. या साईटवरून ग्राहक आता घर बसल्या बिग बझारमधून सामानाची ऑनलाईन ऑर्डर करू शकता. यासाठी ग्राहकांना फक्त आपल्या भागाचा पिन कोड टाकून आपल्या जवळचे बिग बझार स्टोअर निवडून आवश्यक वस्तू कार्ट मध्ये भरायच्या आहेत. त्यानंतर ग्राहकांना संपर्कविरहित आणि सुरक्षित ऑर्डर घरपोच दिली जाईल.

या व्यतिरिक्त ग्राहक फोन कॉलद्वारेही ऑर्डर देऊ शकतात. व्हॉट्सअप करूनही घरपोच ऑर्डर मिळवू शकतील. याव्यतिरिक्त, ग्राहक कोणत्याही बिग बझार स्टोअरमध्ये खरेदीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी, स्टोअर पिक-अप पर्याय निवडू शकतात. त्यात ते ऑनलाइन पैसे भरू शकतील आणि फक्त ऑर्डर घेण्यासाठी स्टोअरला भेट द्यावी लागेल. मोठ्या सोसायट्यांसाठी बिग बझारने ऑन व्हील्स सेवा सादर केली आहे.

या अंतर्गत जीवनावश्यक खाद्यपदार्थ आणि किराणा आवश्यक सामान ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. बिग बझारच्या होम डिलेव्हरी सेवा ग्राहकांना देण्यामागे बाजारातील स्पर्धा सुद्धा एक कारण आहे. बिग बास्केट आणि ग्रोफर्स सारख्या कंपन्या रिटेल सामानाची डिलिव्हरी घरपोच करत आहेत. त्यामुळं स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बिग बझारने ऑनलाईन डिलिव्हरीची सेवा सुरु केली आहे असं बाजारातील सूत्रांचा म्हणणं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीची पुन्हा सरावास सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला बऱ्याच दिवसानंतर फुटबॉलचा सराव करताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंददायक भावना होती. शुक्रवारी स्पॅनिश लीगमधील इतर काही खेळाडूंसह त्याने खासगी सराव सत्रात भाग घेतला. कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे स्पेनमधील लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू जवळजवळ दोन महिने ग्राउंडवर उतरू शकलेले नाहीत.

खेळाडूंचा सराव सुरू होणे म्हणजे देशांतर्गत फुटबॉलमधील अव्वल ‘ला लीगा’ लीग सुरु होण्याचे संकेत आहेत.कोरोनामुळे ‘ला लीगा’ला १२ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले होते, तर १४ मार्च रोजी खेळाडूंच्या सरावावर बंदी घालण्यात आली होती.

स्पॅनिश सरकारकडून सूट मिळाल्यानंतर बार्सिलोना, सेविला आणि व्हिलारियल या संघांनी प्रथम सराव करण्यास सुरवात केली. शनिवार पासून अ‍ॅटलेटिको माद्रिद आपले कामकाज पुन्हा सुरू करणार आहे तर सोमवारी रिअल माद्रिदचे खेळाडू संघाच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतील.

Lionel Messi and Barcelona get back to work - Barca Blaugranes

जूनमध्ये चाहत्यांविना या लीगचे सामने पुन्हा सुरू होईल.कोरोना विषाणूच्या साथीमुळे, संपूर्ण जगात अनेक क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. यामुळे विविध खेळांशी संबंधित बोर्ड आणि फेडरेशनचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे.

अशा परिस्थितीत, सुरक्षितता लक्षात घेऊन बंद दरवाज्या दरम्यान खेळ पुन्हा सुरु करण्यासाठी अनेक देश तयार आहेत. त्याचबरोबर, खेळाडूंनीही मैदानात उतरून आपला सराव सुरू केला आहे त्यामुळे लवकरच आपल्याला अनेक फुटबॉल सामने पाहायला मिळतील अशी अशा आहे.

वाढत्या आर्थिक बोज्यामुळे जर्मन सरकारने ‘बंदेस्लिगा’लीग तसेच कोरियामधील ‘के लीग’ सुरु करण्याला परवानगी दिली आहे.या व्यतिरिक्त, क्रीडा संयोजकांसमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की कोविड -१९ च्या या अशा परिस्थितीत क्रीडा स्पर्धा पूर्ण दक्षतेने पूर्ण करणे.

FC Barcelona News: 25 November 2019; Lionel Messi set for 700th ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कृष्णा रुग्णालयातील आणखी 6 रुग्ण कोरोनामुक्त ; रुग्णांना पुष्पगुच्छ देवून निरोप

सातारा प्रतिनिधी | कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. कृष्णा रुग्णालयातील कोरोनाचे 6 रुग्ण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या सहा जणांचे डॉक्टर्स, नर्स यांनी टाळ्या वाजवून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे. अशी माहिती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

कराड तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ८६ वर पोहचली असून, त्यात सर्वाधिक ३६ रुग्ण कराड नजीकच्या वनवास माचीतील आहेत. तर, निष्पन्न झालेल्या रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण हे कराड व मलकापूर शहरासह त्यालगतच्या १० किलोमीटरमधील असून, या रुग्णसाखळीने करोनाबाधितांची संख्या धडकी भरवणारी ठरली आहे. हे सर्व रुग्ण कृष्णा हॉस्पीटल व येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.

कृष्णा रुग्णालयातून आजवर १२ करोनाग्रस्त उपचारांती सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. त्यात डेरवण (ता. पाटण) येथील १० महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात ४० हून अधिक करोनाबाधित उपचार घेत असून, हे सर्व रुग्ण लवकरात लवकर उत्तम आरोग्यस्वास्थ्य घेऊन पुन्हा घरी परततील असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केंद्राची घोषणा! राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांना आयकरात सूट

नवी दिल्ली । अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी दान देणाऱ्यांना यापुढे आयकरात विशेष सूट मिळू शकणार आहे. केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढून तशी घोषणाच केली. देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणा दरम्यान अर्थ मंत्रालायाकडून हा एक नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना करात सूट दिली जाणार आहे. ही सूट केवळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आर्थिक मदत केल्यानंतरच मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून, आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० जी नुसार ही सूट देण्यात येईल.

अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची निर्मिती याच वर्षी करण्यात आली आहे. मंदिर उभारणीसाठी देशातील अनेक भाविक भरभरून मदत करत आहेत. या दानावर आयकरातून सूट मिळवण्यासाठी ट्रेस्टला दिल्या गेलेल्या देणगीची पावती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यामध्ये ट्रस्टचं नाव, पत्ता, पॅन क्रमांक, दान देणाऱ्याच्या नावाचा उल्लेख आणि दानाची राशी नमूद केलेली असायला हवी.

कलम ८० जीनुसार, सर्व धार्मिक ट्रस्टला सूट दिली जात नाही. धार्मिक ट्रस्टला अगोदर कलम ११ आणि १२ नुसार, आयकरातील सूटसाठी रजिस्ट्रेशन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर कलम ८० जी नुसार ही सूट दिली जाते. अर्थ मंत्रालयानं तीर्थक्षेत्राचा उल्लेख ऐतिहासिक महत्त्वाचं स्थान तसेच सार्वजनिक पूजेचं प्रसिद्ध स्थान म्हणून केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”