Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5822

सोन्या चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊन असूनही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने मोठा बदल होत आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर बुधवारीच्या तुलनेत ३५७ रुपयांनी वाढून ४६२२१ रुपये झाले. जर आपण २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे तर शुक्रवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याच्या ९१६ ची किंमत ४२३३८ रुपये होती.बुधवारी पूर्णिमाच्या दिवसामुळे बाजार काल बंद झाला होता.

शुक्रवारी एमसीएक्सवर चांदीचा वायदा ०.७१ टक्क्यांनी वधारला. चांदीची मागणी वाढल्यामुळे जुलैमध्ये चांदीचा वायदा दर किलोला ४३,४३१ रुपये झाला. शुक्रवारी ३०८ रुपयांच्या वाढीसह ६,६८२ लॉटची विक्री झाली. सप्टेंबरच्या वितरणातही ३७१ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या वायदामध्ये ४३८९४ रुपये प्रति किलो दराने एकूण ४३ लॉटला व्यापार झाला.

घरी बसून सोन्यात गुंतवणूक करा भारत सरकारच्या सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा दुसरा हप्ता सुरू होणार आहे. ११ मे ते १५ मे दरम्यान गुंतवणूकीसाठी उघडले जाईल.सॉवरेन गोल्ड बाँड योजना ८ सप्टेंबरपर्यंत सहा हप्त्यांमध्ये गुंतवणूकीसाठी खुली होईल. एप्रिलमध्येही या योजनेचा पहिला हप्ता सुरू करण्यात आला होता. सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात गुंतवणूक करून तुम्हाला वार्षिक २.५% पर्यंत व्याज मिळेल.

खरे सोने कसे ओळखावे?
हॉलमार्क केलेल्या दागिन्यांमध्ये हॉलमार्कचे गुण आणि काही अंक ९९९,९१६, ८७५ आहेत. आपल्या सोन्याच्या शुद्धतेचे रहस्य या गुणांमध्ये आहे. लक्षात ठेवा,९९९ क्रमांकासह सोन्याचे दागिने हॉलमार्कच्या चिन्हासह २४ कॅरेटचे आहेत.९९९ म्हणजे त्यातील सोन्याची शुद्धता ही ९९.९ टक्के आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे २३ कॅरेट सोन्याचे ९५८, तर २२ कॅरेट सोन्याचे ९१६, २१ कॅरेट सोन्याचे ८७५, १८ कॅरेट सोन्याचे ७५० गुण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रामदास आठवलेंचा अपेक्षाभंग! मित्रपक्ष भाजपाने एकही तिकीट न दिल्यानं केलं नाराजीचं ट्विट

मुंबई । राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीत भाजपने ४ पैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं होतं. मात्र, भाजपने चारही जागांवर आपले उमेदवार उभे केल्यानं रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट करत आपण नाराज भाजपवर असल्याचं म्हटलं आहे.

रामदास आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात २१ मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील एक जागा भाजपाने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइंची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपाइंला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत” अशा शब्दात आठवलेंनी भाजपवर नाराज असल्याची जाहीर प्रतिक्रिया दिली.

विधानपरिषदेच्या निवडणूक होणाऱ्या ९ जागांपैकी पैकी ४ जागा भाजपाला येणे निश्चित झाले असून त्यापैकी एक जागा रिपाइंला द्यावी असा आग्रह आठवले यांनी धरला होता. त्यावर भाजपला केवळ ४ जागा मिळणार असून राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे या जागांसाठी चर्चेत आहेत. इच्छुकांची मोठी रीघ लागली आहे. तरीही एक चांगला मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला एक जागा सोडण्याबाबत निश्चित विचार करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आठवले यांनी दिली होती. मात्र जाहीर झालेल्या यादीत रिपाइंला एकही जागा देण्यात आलेली नाही.

भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या ४ नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

चीनमधील वुहान येथील नर्सचे डोनाल्ड ट्रम्प यांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या हुबेई प्रांतात वुहान येथून परत आलेल्या एका नर्सने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक खुले पत्र लिहिले आहे. नर्सने या पत्रात असे लिहिले की त्यांनी साथीच्या वेळी वुहानला मदत करणाऱ्या उर्वरित ४२,००० अन्य डॉक्टरांसह रात्रंदिवस रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न केला.पत्रात, तिने वुहानचा आपला वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे. तिने लिहिले आहे की त्यांना पीपीई किट काढायचा नव्हता म्हणून ते जेवणही करायचे नाहीत किंवा शौचालयातही जायचे नाहीत. ते पत्र खालील प्रमाणे आहे:

‘आम्ही खाल्लेही नाही तसेच शौचालयातही गेलो नाही’
नर्सने यात लिहिले आहे की, ‘ वुहानच्या जातेवेळी चीनमध्ये वसंतोत्सवाची पूर्वसंध्या होती जी अमेरिकेच्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्ये सारखी असते. या वेळी, मी, उर्वरित ४२,००० डॉक्टरांसह वुहानला गेलो आणि कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यात गुंतलो. सुरुवातीला आमच्याकडे वैद्यकीय पुरवठ्यांची कमतरता होती. सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला आमचे संरक्षणात्मक कपडे काढायचे नव्हते, म्हणून आम्ही काही खाल्लेही तसेच शौचालयातही गेलो नाही. माझ्या लक्षात आले की अमेरिकेतील काही डॉक्टरांना संरक्षणात्मक कपडे म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या घालाव्या लागत आहेत. ‘

Over 1,700 frontline medics likely infected with coronavirus in ...

‘सर्वात कठीण काळ आता गेला आहे’
नर्सने पुढे लिहिले की, “तसेच मी पाहिले की अनेक अमेरिकन डॉक्टरांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे, ज्यामुळे मला खूप वाईट वाटले. पण ही सर्वात आनंदाची हि गोष्ट आहे कि सर्वात कठीण वेळ आता निघून गेली आहे. जास्तीत जास्त रूग्ण आता रूग्णालयातून बरे होत आहेत. आमच्या पालकांप्रमाणेच आम्ही सर्व वृद्ध रुग्णांची काळजी घेतो. आम्ही हुबेई प्रांतात ३६०० हून अधिक वृद्ध लोकांवर उपचार केले, ज्यांपैकी बहुतेक हे ८०वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ही माझ्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. वुहानमध्ये, लहान मुलांपासून ते १०८ वर्षांपर्यंतच्या सर्वावर आम्ही शक्य ते उपचार केले आहेत. अध्यक्ष, ही आहे वुहानची कहाणी.

Meet a Doctor Who is Treating Coronavirus Outbreak Patients in ...

नर्सने अमेरिकन्सना दिल्या शुभेच्छा
नर्सने पुढे लिहिले की, ‘मला माहिती आहे की याक्षणी बरेच अमेरिकन लोकही या विषाणूंविरूद्ध लढत आहेत.अनेक अमेरिकन चिकित्सक उपचारांच्या आघाडीवर संघर्ष करीत आहेत. बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांची काळजी घेत आहेत. त्यांना मी अभिवादन करते ! अमेरिकन लोकांना माझ्या मनापासून शुभेच्छा! ‘

Preparation for COVID-19 - NPAQ

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘त्या’ १६ मजुरांचा समावेश कोरोना बळींच्या यादीत करा; सामनातून शिवसेनेची मागणी

मुंबई । मालगाडीखाली चिरडून मरण पावलेल्या १६ स्थलांतरित मजुरांची नोंद करोना बळींमध्ये करायला हवी, अशी मागणी सामानाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केली आहे. ‘औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले १६ स्थलांतरित मजूर हे करोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. त्यामुळं त्यांच्या मृत्यूची ‘अपघाती’ म्हणून नोंद न करता करोना बळींच्या यादीत त्यांचा समावेश व्हायला हवा,’ अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत सातत्यानं वाढ होत असल्यामुळं जालन्यातून काही स्थलांतरित मजूर मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे रेल्वे रुळांवरून पायी चालत निघाले होते. मात्र, शुक्रवारी त्यांचा मालगाडीखाली येऊन चिरडून अपघाती मृत्यू झाला. त्यामुळं देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं व रेल्वे प्रशासनानं आता अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना मदतीच्या घोषणा झाल्या आहेत. पण गेलेल्या जीवांचं काय?, स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत सरकारनं नेमकं केलं काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून ‘लॉकडाऊन’ केलं, पण मजूरवर्ग लॉकडाऊनमध्ये एक तर उपासमारीने मरत आहे, नाहीतर अशा पायदळ प्रवासात चिरडून किंवा दमून मरत आहे. हे सुद्धा करोनाचे आणि लॉकडाऊनचे बळी आहेत. रेल्वेखाली चिरडून मारल्या गेलेल्या मजुरांना कोरोना संक्रमणाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांना थंडी भरून ताप आला नाही. त्यांना सर्दी-खोकला नव्हता. त्यांना श्वास घेण्यास अडथळे नव्हते. त्यांची प्रकृती चांगली होती तरीही ते कोरोनाचे बळी आहेत व त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेवटी सरकारवरच येते. रोजच्या रोज कोरोनाच्या नव्या मृतांचे आकडे प्रसिद्ध होत असतात. त्यात या १६ जणांचा समावेश व्हायला हवा,’ असं अग्रलेखात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

औंरगाबादेत कोरोनाचा कहर; जिल्ह्यात नवीन 17 रुग्णांची भर, रुग्णसंख्या 495 वर

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद शहरात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या 495 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना चाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 477 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पुन्हा रात्री उशीरा 30 वर्षीय करीम कॉलनी, रोशन गेट येथील महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या 100 रुग्णांची भर पडल्याने काल (दि.8 रोजी) एकूण 478 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर आज (दि.9 रोजी) सकाळी नव्याने 17 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 495 झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

आज वाढलेले शहरातील कोरोनाबाधित संजयनगर, मुकुंदवाडी (६), कटकट गेट (२), बाबर कॉलनी (४), आसेफीया कॉलनी (१), सिल्क मिल कॉलनी (१), रामनगर-मुकुंदवाडी (१), भवानीनगर, जुना मोंढा (२) या परिसरातील आहेत. यामध्ये सात पुरूष आणि 10 महिलांचा समावेश असल्याचेही रूग्णालयाने कळवले आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्याची मजुराला मारहाण; ट्रेनचे तिप्पट भाडे आकारल्याचा विचारला होता जाब

अहमदबाद । लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेले कामगार,मजूर यांना घरी जाण्याची मुभा सरकारने दिली असता त्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या घटना घडत आहेत. गुजरातमधील एक भाजपा कार्यकर्ता स्वगृही जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून तिप्पट रेल्वे भाडं घेत असून विरोध करणाऱ्या एका मजुराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गुजतमधील काँग्रेस नते सरल पटेल यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एक पीडित व्यक्ती भाजपा कार्यकर्ता राजेश वर्मा स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे तिकीटासाठी अतिरिक्त पैसे आकारत असल्याचं सांगत आहे.

या व्हिडीओत एका व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचंही दिसत आहे. मारहाण करणारी व्यक्ती भाजपा कार्यकर्ता राजेश वर्मा आणि त्याचे सहकारी असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेस नेते सरल पटेल यांनी ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, “सुरतमधील धक्कादायक व्हिडीओ. गुजरातमधील भाजपा कार्यकर्ता राजेश वर्माने झारखंडच्या १०० स्थलांतरित कामगारांकडून ट्रेन तिकीटसाठी आधीच पैसे घेतले आहेत. तीन पट पैसे त्यांच्याकडून घेण्यात आले. त्याच्या घरी निषेध करण्यासाठी गेले असता मारहाण करण्यात आली”.

या व्हिडिओत मारहाण झालेला व्यक्ती म्हणतो, “मी तिकीट घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही त्याला एक लाख १६ हजार रुपये दिले होते. पण आता तो पैसे किंवा तिकीट काहीच देणार नसल्याचं सांगत आहे. दोन हजार रुपयाला एका तिकीटाची विक्री तो करत आहे. मी विरोध केला असता त्याच्या माणसांनी मला मारहाण केली,” असं व्हिडीओतील व्यक्ती सांगताना दिसत आहे.

रक्तबंबाळ अवस्थेत दिसणारी ही व्यक्ती पुढे सांगत आहे की, “राजेश वर्माने मला सर्वात जास्त मारहाण केली. मला प्रचंड वेदना होत असून डोकं काम करत नाही आहे. त्याला पैसे दिल्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. आमच्याकडे तिकीटाचे टोकन आहेत, पण तरीही तिकीट देत नाही आहे”.

यावेळी तिथे उपस्थित एक व्यक्ती ज्यांच्याकडे टोकन नंबर आहे त्यांना तिकीट दिलं जात नसून, टोकन नसलेले मात्र प्रवास करत असल्याचा दावा करत आहे. “आम्ही पैसे दिले आहेत, त्यामुळे तिकीट मिळालं पाहिजे. आम्ही सर्व मोठ्या अडचणीत आहोत. घरी जाण्यासाठी आमच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. आम्हाला तिकीट द्या जेणेकरुन घरी जाऊ शकतो,” असं ही व्यक्ती बोलताना ऐकू येत आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मध्यप्रदेशच्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या ; खासदार इम्तियाज जलील यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | मध्यप्रदेशच्या त्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या कऱण्यात आली आहे. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये रेल्वेच्या पटरीवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी खाली येवून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी दुपारी या घटना स्थळावर जाऊन घटनेची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.

दरम्यान जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाले होते. रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच त्यांनी पथारी पसरली आणि झोपी गेले. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले.

https://www.facebook.com/719366294805607/posts/2974933399248874/

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जळगाव जिल्ह्यात नवीन ३२ कोरोना रुग्ण सापडले, एकूण रुग्णांची संख्या १५७ वर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शनिवारी सकाळी आणखी ३२ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या १०३ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापैकी ७१ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये अडावद, चोपडा येथील एक, अमळनेर येथील कंटेन्मेंट झोनमधील अंदारपुरा, कसाली, मरीमाता मंदिर, मढी चौक येथे हे ३१ रुग्ण सापडले आहेत. आज सापडलेल्या ३२ रुग्णांमुळे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १५७ इतकी झाली असून त्यापैकी १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पोहोचला 196 वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि परिसरात शुक्रवारी नव्याने 14 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये आठ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 196 झाली आहे. एका दिवसात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरातील 56 वर्षीय महिलेला 25 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 एप्रिल रोजी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान त्या महिलेचा आठ मे रोजी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. कोरोनामुळे दुसरी मृत पावलेली व्यक्ती ही ७६ वर्षीय असून ते रंगभवन परिसरात रहात होते. 5 मे रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात या व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. सात मे रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान आज पहाटे दोन वाजता त्यांचे निधन झाले.

शुक्रवारी नव्याने आढळलेल्या 14 रुग्णांमध्ये गवळी वस्ती जुना कुंभारी रोड येथील एक पुरुष, शास्त्री नगर येथील एक पुरुष, हुडको नंबर 3 कुमठा नाका येथील एक पुरुष, समर्थ नगर सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे येथील एक महिला, गीता नगर न्यू पाछा पेठ येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथील एक महिला, कुमठा नाका परिसरातील संजय नगर येथील एक पुरुष, रविवार पेठेतील एक महिला, न्यू पाच्छा पेठ येथील दोन पुरुष व एक महिला, मोदीखाना येथील एक महिला, सदर बझार येथील एक महिला व सिद्धेश्वर पेठेतील एक पुरुष अशा 14 जणांचा समावेश आहे.

केगाव येथील क्वारंटाइन कॅम्पमधून आज एकशे दहा जणांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात कोरोना चाचणीचे 170 रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यातील 156 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही 209 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अमरावतीत रात्री ऊशीरा पुन्हा २ पुरूष कोरोना पोझीटीव्ह, एकूण रुग्णसंख्या ७८ वर

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विदर्भातही कोरोनाने चांगलेच पाय पसरले असून अमरावती शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अमरावतीत पुहा २ नवीन रुग्णांची भर पडली असून आता जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या ७८ वर पोहोचली आहे.

अमरावती मधे काल रात्री ऊशीरा प्राप्त अहवालानुसार मसानगंज व हैदरपूरा या भागातील २ पुरूषांचा कोरोना अहवाल पोझीटीव्ह आलेला आहे. सदर दोनही पुरूष हे ५३ वर्षे व ३६ वर्षे वयाचे आहेत. सदर दोघेहि कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. कोरोना बाधितांचे निकटवर्तीय म्हणून यापूर्वीच त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.

दरम्यान, अमरावतीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. आत्तापर्यंत अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ११ जणांचा बळी गेला आहे. वाढती रुग्णसंख्य अमरावतीकरांची चिंता वाढवणारी ठरत आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”