Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5828

धक्कादायक! मुंबईमधील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरुंगातील एका स्वयंपाकीच्या माध्यमातून एकाच बॅरेकमधील या ७२ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कोरोनाबाधित कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

तुरुंगात असलेल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाउनच्या काळात ८ तुरुंगामध्ये लॉकडाउनची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अशा तुरुंगामध्ये या काळात कुणालाही आत-बाहेर जाण्याची मुभा देण्यात आली नव्हती. तरी देखील एका स्वयंपाकीला झालेल्या कोरोना संसर्गामुळे आर्थर रोडमधील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.

राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या तुरूंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची संख्या असल्याने सुनावणी दरम्यान (अंडरट्रायल)च्या स्थितीत असलेल्या सुमारे साडे ५ हजार कैद्यांना यापूर्वीच जामिनावर सोडून देण्यात आले आहे. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी नसलेल्या इतर सुमारे साडे 5 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडून देण्याचे राज्य सरकारने निर्णय घेतला असून या निर्णयामुळे राज्यातील विविध तुरुंगातील 11 हजार कैदी संख्या कमी होईल असे गृहमंत्री पुढे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इम्रान खान यांना पडत आहेत भारताच्या सर्जिकल स्ट्राइकची भीतीदायक स्वप्न

वृत्तसंस्था । मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय जवानांच्या दहशतवाद्यांसोबत चकमकी सुरू आहेत. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे आतापर्यंत ८ जवान शहीद झाले आहेत. तर हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी पाकिस्तानला सडेतोड ऊत्तर देण्याचा कडक इशारा दिला होता. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठबळ देणे सुरू असेपर्यंत आम्ही योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे भारताने स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकची भीती वाटू लागली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर रियाज नायकू यालाही कंठस्नान घातले. या चकमकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या संभाव्य कारवाईची धास्ती घेतली आहे. इम्रान खान ट्विट करत भारतविरोधी सूर आवळला आहे. दक्षिण आशियातील शांतता भारतामुळे धोक्यात येण्याआधी आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करण्याची मागणी इम्रान यांनी ट्विटरवर केली. काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटना या स्थानिक असल्याचा दावा इम्रान यांनी केला असून पाकिस्तानचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचे सांगतिले.

याआधी भारतीय लष्कराने उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली होती. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानी हद्दीत शिरून सीमेलगतचे दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर दुसऱ्यांदा पुलवामा येथील प्राणघातक हल्ल्यात शहिद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘IFSC केंद्राबाबतचा तुमचा वकिली बाणा गेला खड्यात’; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ

मुंबई । मोदी सरकानं मुंबईत प्रस्तावित असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या निर्णयावरून राज्यातील राजकारणही बरंच तापलं आहे. एकीकडे भाजपा IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाला काँग्रेसचं जबाबदार असल्याचं सांगत केंद्राचा बचाव करण्याचा प्रयन्त करत आहे. तर राज्यातील इतर नेते केंद्रानं मुंबईवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली आहे. अशात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. यावेळी राऊत यांनी IFSC केंद्रावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे न घेता त्यांच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला.

‘तुमचा वकिली बाणा गेला खड्यात, महाराष्ट्रावर जर अन्याय होतोयतर त्यांनी आवाज उठवला पाहिजे. जर IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे, असं कोणाला वाटत नसेल, तर तुम्ही या महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात,  अशी तोफ संजय राऊत यांनी एका मुलाखतीत डागली आहे.

”राज्याच्या इतिहासात मला प्रथमच असा विरोधी पक्ष दिसतोय, जो कुठल्याही प्रश्नावर महाराष्ट्राची बाजूच घेत नाही. तो महाराष्ट्राच्या विरोधात घडणाऱ्या घटनांची आणि त्यांच्या नेत्यांची बाजू घेत आहे. नरेंद्र मोदी आमचेही नेते आहेत. देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. आमचं त्यांच्याशी वैयक्तिक भांडण असूच शकत नाही. पण, हा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रश्न आहे. अधिकाराचा, अस्मितेचा प्रश्न आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष, त्यांचे नेते पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. यासाठी त्यांचा आत्मा तळमळला पाहिजे. तुमचा वकिली बाणा गेला खड्यात, त्यांनी महाराष्ट्रावर हा अन्याय होतोय म्हणून आवाज तरी उठवला पाहिजे. जर हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, असं कोणाला वाटत नसेल, तर तुम्ही या महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात,” अशा तिखट शब्दात राऊत यांनी फडणवीस यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अमरावतीत ब्रेडला लाळ लावून Tik-Tok व्हिडिओ बनणार्‍याला अटक

अमरावती प्रतिनिधी | अचलपूरातील एका बेकरीमध्ये काम करणार्‍या अल्पवयीन युवकाने खोडसाळ पणा करत ब्रेडला लाळ लावत त्याचा Tik-Tok व्हिडिओ सोशल मीडीयावर बनवुन टाकल्याचे काही नागरीकांना लक्षात आहे.

या बेकरीतील युवक हा अशाप्रकारचा किळसवाणा प्रकार करून जनतेमधे साथीचा आजार फैलावा या ऊद्देशाने हा व्हिडिओ केल्यासारखे भासवत होता. त्यामुळे नागरीकांनी व्हिडिओ बनवणार्‍यावर आक्षेप घेतला. तर ही बेकरी अचलपूरातील असल्याचे लक्षात आले. बेकरीच्या मालकाला जेव्हा ही बाब लक्षात आली. तेव्हा त्यांनी अचलपूर पोलीसांत या बेकरीतील कामगाराविरूद्ध तक्रार केली. तसेच हा युवक माझ्याच बेकरीत कामगार असल्याचे सांगितले.

तेव्हा अचलपुरचे ठानेदार सेवानंद वानखडे यांनी ताबडतोब आरोपींना त्याब्यात घेत त्याच्या विरूद्ध ४ गुन्ह्यांसह माहीती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन करणे गुन्हा असून असे वर्तन करणाऱ्यांवर पोलीसांची बारीक नजर असल्याचे पोलीसांनी सांगितले.

आईचं झाली वैरिणी ! 4 दिवसाचे नवजात बाळ घाटी परिसरात सोडून निर्दयी माता पसार

औरंगाबाद प्रतिनिधी | चार दिवसाच्या नवजात बाळाला घाटी रुग्णालयाच्या ग्रंथालयाजवळ ठेवून माता पसार झाल्याची घटना बुधवारी दुपारी समोर आली. बाळाला मुंग्या लागल्याने त्याच्या रडण्याचा आवाजाने सुरक्षा रक्षकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

घाटी रुग्णालयाच्या ग्रंथालया जवळील झुडुपातून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षक तेथे गेले. तेव्हा झुडुपाच्या सावलीखाली तीन ते चार दिवसाचे बाळ बेवारस अवस्थेत टाकल्याचे दिसले. बाळाच्या अंगाला मुंग्या चावू लागल्याने ते बाळ रडत होते.

या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना कळवून बाळाला घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये दाखल करण्यात आले आहे.बाळाची प्रकृती चांगली असून त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

विशाखापट्टणम वायू गळतीला ईश्वरच जबाबदार ; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

मुंबई | ईश्वर जगातील प्रत्येक गोष्ट निर्माण करतो. त्याच्या इशाऱ्याशिवाय व्हायरस किंवा गॅस पसरु शकत नाही. मात्र आपण घटनांना देवाला जबाबदार धरत नाही, कारण आपण त्याला घाबरतो. अस ट्विट करत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी विशाखापट्टणम वायू गळतीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचं हे ट्विट सद्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आज LG कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना घडली. या घटनेत 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडोजण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. या घटनेवर राम गोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी वी विनय चंद हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांनी सांगितले की, काहीजणांना श्वसनास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन दिला जात आहे. या दुर्घटनेमुळे बेशुद्ध पडलेले तसेच श्वसनास त्रास होऊ लागलेल्या शेकडो जणांना शहरातली किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे ‘मास्क’ विनाच

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते मंत्रालयात उपस्थित झाले होते. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. मात्र या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयामध्ये पोहचलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क शिवाय दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते. मात्र या नियमांचे आज राज यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.

मुंबई महानगरपालिकेने मास्क घालणे बंधनकारक केलं असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला १ हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलं आहे. देशभरातील अनेक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. संसर्गजन्य कोरोनावर आळा घालण्यासाठी सार्जजनिक ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहे. असं असतानाही राज्यातील एका प्रमुख पक्षाच्या नेत्यानेच अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन केल्याचे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज यांनी मास्क का घातलं नव्हतं याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची माहिती समोर आली आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लागेल. तर सरकारी आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी छोटे दवाखाने सुरु करावे लागतील. तसेच परप्रांतीय मजूर जे बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन पुन्हा महाराष्ट्रात घ्यावं. तर MPSC विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पोहोचवावं. अनेक विद्यार्थी आज कुठेनाकुठे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवे आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तर लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. मात्र या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयामध्ये पोहचलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क शिवाय दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते. मात्र या नियमांचे आज राज यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेने मास्क घालणे बंधनकारक केलं असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला १ हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलं आहे. देशभरातील अनेक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. संसर्गजन्य कोरोनावर आळा घालण्यासाठी सार्जजनिक ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहे. असं असतानाही राज्यातील एका प्रमुख पक्षाच्या नेत्यानेच अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन केल्याचे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज यांनी मास्क का घातलं नव्हतं याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची माहिती समोर आली आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लागेल. तर सरकारी आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी छोटे दवाखाने सुरु करावे लागतील. तसेच परप्रांतीय मजूर जे बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन पुन्हा महाराष्ट्रात घ्यावं. तर MPSC विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पोहोचवावं. अनेक विद्यार्थी आज कुठेनाकुठे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवे आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तर लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनाचा थेट मंत्रालयावर हल्ला; एका प्रधान सचिवाला कोरोनाची बाधा

मुंबई । मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. अशा गंभीर स्थितीत सरकारतर्फे मोठ्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. मात्र जिथून या उपाययोजनांची सूत्र हलवली जातात त्या मंत्रालयात आता कोरोनानाने शिरकाव केला आहे. मंत्रालयात एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष बाब म्हणजे परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या सचिवांच्या विशेष गटात या अधिकाऱ्याचा समावेश होता. संबंधित अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

या आधीच मंत्रालयत ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. प्रधान सचिवांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता मंत्रालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी सहावर गेली आहे. मुंबईत कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. रस्त्यावर २४ तास ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे अशातच आता मंत्रालयात देखील कोरोनाने घुसखोरी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

औरंगाबादमध्ये बनावट देशी- विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | विदेशी दारू कंपनीचे लेबल लावून स्पिरिट आणि केमिकलच्या साह्याने बनावट दारू बनविणाऱ्या गल्लेबोरगाव शिवारातील एका कारखान्यावर औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यात पोलिसांनी तब्बल पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.

महागड्या विदेशी कंपनीची दारू छुप्या पद्धतीने गल्लेबोरगाव शिवारातील एका शेतात असणाऱ्या कारखान्यात तयार केली जात आहे. अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.या माहिती वरून पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सापळा रचून गल्लेबोरगाव शिवारातील शेतात छापा टाकला. त्यावेळी एवढा मोठा साठा पाहून पोलीस देखील चक्रावून गेले. पोलिसांनी संजय कचरू भागवत, महेश भागवत, योगेश डोंगरे या तिघांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. तर अंधाराचा फायदा घेत 8 ते 10 जण फरार झाले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून 18 ड्रम स्पिरिट, 79 देशी दारूचे बॉक्स, एक ट्रक सह तीन चारचाकी,दोन दुचाकी, बनावट स्टिकर, विविध कंपनीच्या दारूच्या बॉटलचे झाकण असे सुमारे 63 लाख 83 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडणं हे दुर्दैव; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

अहमदनगर । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आधी केंद्रनं आणि नंतर राज्य सरकारनं दारूची दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे बाकी असताना केवळ महसूल मिळावा म्हणून दारूची दुकाने सुरू करणे ही सकारची विनाशकाले विपरित बुद्धी आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला फटकारले आहे

‘दारू ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. ती मिळाली नाही तर लोक उपाशी मरणार नाहीत. मग सरकारला असा निर्णय अचानक का घ्यावा लागला? सध्याच्या परिस्थितीत सरकार दारू विक्री करून काय साध्य करणार? दारूतून मिळणाऱ्या महसूलापेक्षा करोनाचा धोका अधिक वाढणार असेल तर याचा काय उपयोग? गेले महिना दीड महिना दारू विक्री बंद होती. दारू न पिल्यामुळे कोणते नुकसान झाले? उलट दारू मिळत नसल्यानं नाइलाजाने का होईना लोक दारूपासून परावृत्त होऊ लागले होते, असं हजारे यांनी म्हटलं आहे. ‘तुम्ही लोकांना वाचवण्याचा विचार करणार की महसूल गोळा करण्याचा,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

लॉकडाउनच्या काळात उपासमार होत असलेल्या गरीब लोकांना रेशन व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यास सरकारनं प्राधान्य द्यायला हवं. सध्या हातावर पोट असलेली हजारो कुटुंबं बेरोजगार झाली आहेत. त्यांना रेशन नाही. इतर कोणताही आधार नाही. त्यांना आधार द्यायचा सोडून सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली. दारूमुळे भांडण-तंटे, मारामाऱ्या, चोऱ्या, महिलांवरील अत्याचार अशी गुन्हेगारीत होत असते असा इतिहास आहे. लॉकडाउनच्या काळात दुकाने बंद असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे घटल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत दारुची दुकाने उघडणे आजिबात योग्य नव्हते,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”