Monday, December 22, 2025
Home Blog Page 5842

टोकियो ऑलिम्पिकमधून शिकून भविष्यातील जागतिक कसोटी स्पर्धेचे नियोजन केले पाहिजे – सचिन तेंडुलकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठी खरे आव्हान म्हणजे कसोटी क्रिकेट हे होय,परंतु याक्षणी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व देशांचे दौरे पुढे ढकलले गेले आहेत आणि त्यामुळे जागतिक कसोटी चँपियनशिपचे भवितव्य मध्यातच अडकले आहे.२०२१ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे खेळल्या जाणार्‍या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडे यावर एक तोडगा आहे.

आयएएनएसशी बोलताना सचिन म्हणाला की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओए) कडून हे प्रकरण एक वर्षासाठी कसे पुढे ढकलले याविषयी जाणून घेता येईल.सचिनला वाटते की चॅम्पियनशिपची पहिली आवृत्ती कोणत्याही त्रास न घेता पूर्ण करण्याची खात्री करण्यासाठी काही योजना आखल्या पाहिजे.

Sachin Tendulkar- India TV

तो पुढे म्हणाला की, “मला वाटते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल काही गणित करावी लागेल. ऑलिंपिकदेखील एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे पण तरीही त्यास टोकियो ऑलिम्पिक २०२० असेच नाव दिले जाईल,अर्थात ते २०२१ मध्ये खेळले जाईल.तशाच प्रकारे,आपल्याला सर्व वेळ खेळवता येऊ शकतील आपल्याला असा वेळ शोधून काढायला हवा,म्हणजे भविष्यात हे सामने आपल्याला कसे खेळता येतील हे पाहावे लागेल.”

ते म्हणाले, “पुन्हा सुरुवात करणे ही मोठी गोष्ट ठरेल. जर आपण काही सुरू केले असेल तर ते अगदी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केले पाहिजे ज्यामुळे आपण सर्व उर्वरित सामने खेळू शकू आणि प्रत्येकाला योग्य ती संधी देऊ शकू. ही मर्यादा वाढु शकते कारण टूर्स पूर्णपणे रद्द झालेले नाहीत, त्यांना पुढे ढकलण्यात आले आहेत.त्यामुळे स्पर्धेसह दौर्‍यासह तहकूबही केले गेले आहे. “

Sachin Tendulkar reacts to India's win over Pakistan and rates ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

४२ वर्षांपूर्वी आम्ही पाकिस्तानी भूमीवर भारतीय फिरकीपटूंच्या चिंधड्या उडविल्या होत्या-जावेद मियांदाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९७८-७९ मध्ये बिशनसिंग बेदी,चंद्रशेखर भागवत आणि इरापल्ली प्रसन्ना यांच्या भारतीय फिरकी त्रिकुटाने क्रिकेट मैदानावर आपले वर्चस्व गाजवले होते.परंतु पाकिस्तानच्या जावेद मियांदादने सांगितले की या फिरकी त्रयीनविरुद्ध त्याने आणि झहीर अब्बासने धावांचा जोरदार पाऊस पाडला होता. ज्यामुळे पाकिस्तानला ही मालिका २-० ने जिंकता आली.

मियांदादने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “चंद्रशेखर, बेदी आणि प्रसन्ना यांची फिरकी भारतीय संघाची ताकद होती आणि त्यांनी जगभरात चांगली कामगिरी केली होती पण जेव्हा ते पाकिस्तानमध्ये आले तेव्हा आमच्या खेळाडूंनी त्याच्या जोरदार हल्ला करून भरपूर धावा लुटल्या. “

Javed Miandad- India TV

फैसलाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यास आठवत मियांदाद म्हणाला,”मला आठवते की चंद्रशेखर झहीर भाईला त्रास देत होते.त्यानंतर त्यांनी मला सांगितले की,माझ्यासाठी याला तू खेळून काढ. मी ठीक आहे बोललो. दुसऱ्या बाजूने झहीर भाई बेदी आणि प्रसन्ना यांच्या गोलंदाजीवर धावा काढत होते. “

तो म्हणाला, “मग मी त्यांना म्हणालो की झहीरभाई मलाही काही धावा करायला आवडेल.मीसुद्धा त्यांच्याविरूद्ध फूटवर्कचा वापर करणार आहे. मी येथे अडकलो आहे.शेवटच्या चेंडूवर मी एक धाव घेईन.”

त्या सामन्यात मियांदाद आणि अब्बास यांनी अनुक्रमे १५४ आणि १६६ धावा केल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जपानमध्ये आणीबाणीचा कालावधी ‘मे’च्या अखेरपर्यंत वाढविण्यात आला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू झालेल्या आणीबाणीची मुदत मे अखेरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबद्दल तज्ज्ञांच्या मूल्यांकनाचा संदर्भ देताना अ‍ॅबे म्हणाले की, कोरोना विषाणूची लागण होणाच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाहीये आणि रूग्णालयात अजूनही क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण आहेत म्हणून सद्यस्तिथीत ही आणीबाणी सुरु राहिली पाहिजे.ते म्हणाले की मेच्या मध्यापर्यंतच्या आकडेवारीत सुधारणा झाली तर आपत्कालीन तरतुदींना थोडे शिथिल करता येईल.

Japan to declare state of emergency over coronavirus - France 24

यापूर्वी जपानचे आर्थिक व्यवहार मंत्री यासुतोशी निशिमुरा म्हणाले होते की कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस देशात आणीबाणी वाढविण्याच्या योजनेला तज्ञांनी पाठिंबा दर्शविला आहे.७ एप्रिल रोजी अ‍ॅबे यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती.सुरुवातीला याची अंमलबजावणी टोकियो व इतर सहा शहरी प्रांतांमध्ये करण्यात आली होती परंतु नंतर याची अंमलबजावणी हि देशभरात करण्यात आली आणि लोकांना सामाजिक हानी ८० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती करण्यात आली.

Japan declares 'state of emergency' as coronavirus cases soar

मात्र,पंतप्रधानांनी हा व्यवसाय थांबविण्याचा आदेश जारी करण्यास नकार दिला.जपानमध्ये आतापर्यंत कोविड -१९ च्या १५,००० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे आणि सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानमधील कोरोना विषाणूची लागण होणारी एक तृतीयांश लोक एकट्या राष्ट्रीय राजधानी टोकियोमध्ये आहेत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रशियामध्ये कोरोनाचा हाहाकार;गेल्या २४ तासांत १०,००० पेक्षा जास्त नवीन संसर्गाची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची १०,००० पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली.यासह,या देशात प्रथमच कोविड -१९ रूग्णांच्या संख्येत एका दिवसात पाच अंकी वाढ झाली आहे.येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की १०,६३३ नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे हि मॉस्कोमधून समोर आलेली आहेत.यामुळे मॉस्कोची वैद्यकीय सुविधा बिघडण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे.उल्लेखनीय हे आहे की रशियामध्ये कोरोना विषाणूची लागण १,४४,००० लोकांना झाल्याची नोंद आहे तर १,४२० लोकांचा मृत्यू झाला आहे.

एका निवेदनात असे म्हटले आहे की,रविवारी या साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा हा ५८ वरून १,४२० वर आला आहे, तर १६,६३९ लोक यातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत बरे झालेल्या १,६२६ लोकांचा समावेश आहे.मॉस्को हे देशातील सर्वात अधिक संक्रमित शहर बनले आहे. गेल्या २४ तासांत येथे ५,४९८ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. त्याचवेळी, शहरात कोरोनाची लागण होण्याची संख्या ६८,६०६ वर पोहोचली आहे.

मॉस्कोचे महापौर सेजू सोब्यनिन यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की मॉस्कोमधील सुमारे २ टक्के लोकसंख्या म्हणजेच २३.५३ दशलक्ष लोकांना कोरोनाव्हायरसची लागण होऊ शकते. रशियामध्ये आतापर्यंत सुमारे ४० लाख लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. यापूर्वी रशियाने गेल्या २० दिवसात कोरोना रुग्णांसाठी १० हजार बेडचे एक रुग्णालय बांधून चीनचा विक्रम मोडला आहे.

रशियामध्ये तात्पुरती स्मशानभूमी देखील बांधली जात आहे. परिस्थिती बिघडणार आहे की नाही याबद्दल काहीशी भीती पसरली आहे. सध्या देशात अशाप्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही जिच्यामध्ये बरे झाल्यावर रुग्णाला पुन्हा संक्रमण झाले आहे.आता समोर असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकार मोठी तयारी करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात ३१ मेपर्यंत ग्रीन झोनची संख्या वाढलीच पाहिजे; मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना

मुंबई । राज्याचे अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे नेता येईल हे पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाउनचे योग्य पालन होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. ”थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे काही शहरांमधील दृश्य गंभीर होते. पोलीस आणि प्रशासनाने गर्दीही होणार नाही आणि सुरक्षित अंतर राहिल हे पाहिलेच पाहिजे,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको
ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये आपण उद्योग-व्यवसाय काही प्रमाणात सुरू केले मात्र याठिकाणी रेड झोनमधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. घाई गर्दीने आपल्याला काहीही करायचे नाही. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतेच आहे पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हेही त्यांनी स्पष्ट केले.

नॉन कोविड रुग्णास दुर्लक्षित करू नका
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. आपापल्या भागातील डॉक्टर्सना , वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

रुग्ण माहिती अद्ययावत ठेवावी
यावेळी बोलताना मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले की, शहरी भागात असलेला करोना राज्याच्या ग्रामीण भागात शिरकाव होऊ न देणे महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी करोनाविषयक रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत ठेवायची आहे. तसेच चाचण्यांचे अहवाल वेळेत मिळतील याकडे बारकाईने लक्ष द्यायचे आहे. आयसीएमआरचा डाटा हाच प्रमाण मानला जाईल. यात कुठेही चूक होता कामा नये असे त्यांनी सांगितले. कंटेंटमेंट क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष द्यायचे आहे. हे क्षेत्र जितके लहान ठेवता येईल तितके ठेवा तसेच क्षेत्राच्या सीमा पूर्णत: बंद असतील, तसेच क्षेत्राच्या आतमध्ये देखील वेळच्यावेळी तपासण्या, सुरक्षित अंतर, फवारणी , जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहील व तेथील लोक हे पाळतील हे पाहावे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या
प्रधान सचिव राजीव जलोटा यांनी यावेळी कोरोना बाबतीत जिल्ह्यांची आकडेवारी आणि निष्कर्ष यांचे संगणकीय विश्लेषण केले आणि ५ दिवसांची सरासरी सादर केली. प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनीही याला अनुसरून माहिती दिली. देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ३१ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत तसेच देशातील एकूण मृत्यूच्या ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी असून रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी वाढून ९.३ दिवस इतका झाला आहे. देशात रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी ११.३ दिवस इतका आहे. मृत्यू दर देशात ३.२३ टक्के आहे तर महाराष्ट्रात देखील तो कमी होऊन ४.२२ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रात दर दशलक्ष १२२५ चाचण्या महाराष्ट्रात होतात त्या देशात सर्वाधिक आहेत, असे सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

३० मे पर्यंत औरंगाबाद मधून कोरोनाला हद्दपार करु – महापालिका आयुक्त

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील नागरिकांनी आम्हाला साथ दिली तर आम्ही 30 मे पर्यंत कोरोनाला शहरातून हद्दपार करू असा विश्वास महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबादेतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर ते आज बोलत होते. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त की.

शहरात फक्त 36 मूळ कोरोना संक्रमित रुग्ण असून शहराचे नागरिक त्यांच्या संपर्कात आल्यामुळे रुग्णांची संख्या तीनशेच्या उंबरठ्यावर असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले. पुढील काही दिवसात ही संख्या अशीच वाढेल व त्यानंतर कमी होईल असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी घरीच राहावे आणि प्रशासनाला मदत करावी असे आवाहन पांडेय यांनी केले आहे.

तहसीलदारांना महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याच्याकडून मारहाण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून तहसील कार्यालय आवारामध्ये विटयाचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा विटा तहसील कार्यालयात आवारात तहसीलदारांना झालेल्या मारहाणीच्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये इन्सीडेंट कमांडर म्हणून कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान ७ एप्रिल रोजी महसूल विभागाच पथकाने कराड रस्तवरील रिलान्स पेट्रोलपंपाजवळ दोन वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले होते. दोन्ही डंपरला प्रत्येकी ३ लाख ७१ हजार असा एकूण ७ लाख ७२ हजार रुपांचा दंड ठोठावला होता. दंडाची प्रत पै. चंद्रहार पाटील याला बजावली होती. त्यानंतर १ मे रोजी चंद्रहार पाटील हा तहसील कार्यालयात येऊन तुम्ही मला एवढा दंड का केला? माझा दंड रद्द करा, माझी वाहने सोडून द्या अशी मागणी प्रांताधिकारी शंकर बर्गे यांच्या समोर चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार शेळके यांच्याकडे केली होती.

आज दुपारी तहसीलदार ऋषिकेत शेळके आणि तालुका वैद्यकी अधिकारी डॉ.अनिल लोखंडे हे विटा शहरातील कोरोना पार्श्वभू’ीवर कोव्हीड सेंटरची पाहणी करणसाठी दुपारी दीड वाजणच सुमारास निघाले होते. सरकारी वाहनात बसत असताना तिथे चंद्रहार पाटील हा एका साथीदारासह आला. वाळूच वाहनावर केलेल कारवाईचा रागातून तहसीलदार शेळके यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. त्यामुळे वैद्यकी अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी चंद्रहार पाटील याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मारहाण करत ढकलून दिले. तहसील कार्यालयातच भरदिवसा तहसीलदार आणि वैद्यकी अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर चंद्रहार पाटील हा पसार झाला असून पै. चंद्रहार पाटील याच्यासह अन्य एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

केरळ विजयाच्या उंबरठ्यावर! ४९९ पैकी ४६५ कोरोनाबाधित झाले बरे; एकही नवा रुग्ण नाही

तिरुअनंतपुरम । देशात कोरोनाने सर्वात आधी ज्या राज्यातून घुसखोरी केली होती ते राज्य म्हणजे केरळ. मात्र, आता केरळ कोरोनाच्या लढाईत विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. केरळ लवकरच या विषाणुला राज्यातून हद्दपार करणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. आता केरळमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून, गेल्या काही दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे ४९९ पैकी ४६५ जण ठणठणीत बरे होऊन पुन्हा घरी परतले आहे.

सोमवारी (४ एप्रिल) केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील करोनाविषयीच्या स्थितीची माहिती दिली. केरळमध्ये एकही नवीन करोनाग्रस्त रुग्ण सापडला नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर राज्यात ४९९ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी फक्त ३४ जणच सध्या उपचार घेत आहे, असं मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितलं. केरळ सरकारच्या उपाय योजनांमुळे तब्बल ४६५ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. केरळनं कोरोनाविरोधात दिलेला लढा यशस्वी ठरला आहे.

देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. कोरोनाचा शिरकाव झाल्याचं लक्षात येताच केरळ सरकारनं या विषाणू विरुद्ध कंबर कसली. लॉकडाउनच्या काळात केरळ सरकारनं केलेल्या उपाययोजना चांगल्याच प्रभावी ठरल्या. केरळमध्ये आता करोना बाधित रुग्णांची संख्या शेकड्यावरून चाळीशीच्या आत आली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढतेय पण केरळमध्ये आता कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता शून्य झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

हॉलिवूडच्या प्रसिद्ध हॉरर चित्रपट दिग्दर्शकाची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक जॉन लाफिया यांचा नुकताच मृत्यू झाला आहे.जॉन हे ६३ वर्षांचे होते.variety.com या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी २९ एप्रिल रोजी आत्महत्या केली आहे. लॉस एंजेलिस कंट्री कॉर्नर या ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही आहे.

स्टिफन किंग,अ‍ॅल्फेड हिचकॉक, जॉर्ज रोमेरो,यांसारख्या दिग्दर्शकांच्या पावलांवर पाउल ठेवत जॉन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. जॉन हे देखील हॉरर चित्रपटांसाठीच प्रसिद्ध होते.त्यांनी आजवर ‘द रॅट्स’, ‘मॅन्स बेस्ट फ्रेंड्स’, ‘चाईल्ड प्ले’, ‘मॉन्स्टर’ यांसारख्या अनेक सुपरहिट हॉरर चित्रटांच्या पटकथा लिहिल्या आहेत.

John Lafia Dead: 'Child's Play' Co-Screenwriter Was 63 – Variety

ते खऱ्या अर्थाने ‘चाईल्ड प्ले २’ या चित्रपटामुळे प्रकशी झोतात आले होते. ‘चाईल्ड प्ले’ या हॉरर चित्रपट मालिकेतील हा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. १९९० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्याकाळी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जवळपास ३.५८ कोटी अमेरिकी डॉलर्सचा व्यायसाय केला होता. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण हॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.त्यांच्या चाहत्यांनीही त्यांना सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! मुंबईत डाॅक्टरकडून कोरोनाबाधित रुग्णाचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो आहे.कोरोनाविरोधात सुरू असलेल्या या लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अगदी अग्रभागी उभे राहून लढा देत आहेत. ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचे कौतुक करीत आहे.अशातच मुंबईतून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे, जिथे एका डॉक्टरवर कोरोना संसर्गित रुग्णावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरलाही हा संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एक ४४ वर्षीय कोरोना-संसर्गित व्यक्तीला दक्षिण मुंबई येथील एका नामांकित हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.यावेळी आरोपी डॉक्टरने पीडितांच्या रूममध्ये प्रवेश केलाआणि तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरवात केली.त्यांनतर रुग्णाने अलार्म वाजविला,ज्यामुळे बाकीचे वैद्यकीय कर्मचारी तिथे पोहोचले.या घटनेच्या एकच दिवस आधी तो डॉक्टर रुग्णालयात दाखल झाला होता.यावर रुग्णालय प्रशासनाने त्याला तातडीने नीलंबित केले आणि याविषयी पोलिसांना कळविले.

रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्यात येथील ८० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यानंतर हे रुग्णालय बंद ठेवण्यात आले होते .मात्र २३ एप्रिल रोजी प्रशासनाने ते पुन्हा उघडण्यास परवानगी दिली.खबरदारी म्हणून रुग्णालय प्रशासनाने आपल्या येथील वृद्ध डॉक्टरांना ड्युटीवर येण्यास नकार दिला.आरोपी डॉक्टरने नुकताच मुंबईतील मेडिकल कॉलेजमधून एमडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.जो ३० एप्रिल रोजी नुकताच ड्युटीवर जॉईन झाला होता.

१ मे रोजी ही घटना घडली.आता रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोलिसांनी आयपीसी कलम ३७७,२६९ आणि २७० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा असा संशय आहे की आरोपीही कोरोना पॉझिटिव्ह असू शकतो, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली नाहीये.पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे.त्याचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्याला अटक केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.