Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5858

गर्लफ्रेंडला रात्रीच्यावेळी भेटायला त्याने केला ४५ कि.मी. सायकल प्रवास; माघारी आला तेव्हा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील जौनपूर हे कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे.येथील मीरगंज पोलीस स्टेशन परिसरातील लोकांना या लॉकडाउनमध्ये आपल्या घरातच राहायला भाग पाडले जात आहे,पण तरीही असे काही लोक आहेत जे आपल्या मैत्रिणीला किंवा भावी पत्नीला भेटण्याच्या इच्छेने लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत.अशीच एक घटना या जिल्ह्यात समोर आली आहे.येथे एक तरुण आपल्या भावी पत्नीला भेटण्यासाठी रात्रीच ४५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तिच्या घरी पोहोचला.

पण परत आल्यावर मात्र तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही.जेव्हा पोलिसांनी त्याला थांबवले तेव्हा त्याने खूप विनवणी करण्यास सुरवात केली, त्यानंतर पोलिसांनी त्याला कडक शब्दांत समझ दिली आणि मग तो तेथून निघून गेला.खरं तर, जलालपूरचा हा तरुण मंगळवारी रात्री मीरगंजमधील एका गावात सायकल चालवत आपल्या पत्नीला भेटायला आला. यानंतर,तो रात्री तीन वाजण्याच्या सुमारास परत येत होता,तेव्हा अडारी येथे डॉयल ११२ पोलिसांना तो दिसला.

जेव्हा पोलिसांनी त्याला थांबवले तेव्हा त्याने सगळे सत्य सांगितले.लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणे अवघड असल्याचे तो म्हणाला.त्यामुळे तो रात्रीच घराबाहेर पडला आणि ४५ कि.मी.चा प्रवास करून तो आपल्या भावी पत्नीला भेटायला आला.या युवकाने सांगितले की त्याची भावी पत्नी आजारी आहे, त्यामुळे तिला औषध देण्यासाठी आलो होतो.बरीच विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी त्याला समज दिली.ज्या मुलीची भेट घेण्यासाठी तो तरुण पोहोचला होता तिच्याबरोबर लग्न होणार असल्याचे पोलिसांनी त्याने सांगितले. मात्र लॉकडाऊनमुळे लग्नाला उशीर होणार आहे म्हणून तो उशिरा रात्री तिला भेटायला सायकलवरून तिच्या घरी पोहोचला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनाचा सोन्यावर मोठा परिणाम, मागणीत ३६ टक्क्यांनी घट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत ३६ टक्क्यांनी घट झाली आहे.एका अहवालानुसार सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार आणि कोरोना विषाणूमुळे होणारी आर्थिक अनिश्चितता यामुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशातील सोन्याची मागणी घटून १०१.९ टन झाली आहे.या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दागिने व सोन्याच्या गुंतवणूकीची मागणीही कमी झाली आहे.जोपर्यंत ज्वेलरी उद्योगाचे कारागीर कामावर परत येत नाहीत आणि पुरवठा साखळी लवकरात लवकर सुरू केली जात नाही,तोपर्यंत सोन्याचे भविष्य ‘आव्हानात्मक’ राहण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) देशाच्या सोन्याच्या मागणीचा ३७,५८० कोटी रुपयांचा आढावा घेतला.२०१९ च्या याच तिमाहीत ४७,००० कोटी रुपयांच्या सोन्याच्या मागणीपेक्षा हे २० टक्के कमी आहे. डब्ल्यूजीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर म्हणाले की,आढावा कालावधीत देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली.सीमा शुल्क आणि करांची गणना न करता सोन्याचे मूल्य प्रति १० ग्रॅम सुमारे २५ टक्क्यांनी वाढून ३६,८७५ रुपये झाले. मागील वर्षी याच कालावधीत ही किंमत २९,५५५ रुपये होती.

SO Musings: The Gold Problem in India - Spontaneous Order

या कारणांमुळे ही मागणी कमी झाली.या काळात भारताची सोन्याची मागणी कमी होण्याची अनेक कारणे असल्याचे ते म्हणाले. उच्च आणि अस्थिर किंमतींमुळे तसेच बंदमुळे हालचालींवर निर्बंध, वाहतुकीची समस्या आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे ही मागणी कमी झाली आहे.

दरम्यान, दागिन्यांची एकूण मागणी ४१ टक्क्यांनी घसरून ७३.९ टनांवर गेली आहे, तर मागील वर्षी ती १२५.४ टन होती. रुपयांची ही मागणी २७टक्क्यांनी घसरून २७,२३० कोटी रुपयांवर आली आहे. गेल्या वर्षी याच काळात ती ३७,०७० कोटी रुपये इतकी होती.त्याच वेळी, गुंतवणूकीसाठी सोन्याची मागणी या काळात १७ टक्क्यांनी घटून २८.१ टन झाली.मात्र,रुपयांमधील हे मूल्य वार्षिक आधारावर चार टक्क्यांनी वाढून १०,३५० कोटी रुपये झाले आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमध्ये प्रचंड गडबड आहे.ऐतिहासिकदृष्ट्या कच्च्या तेलाचे दर कमी पातळीवर राहिले आहेत.अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पहात आहेत.वार्षिक आधारावर,जागतिक स्तरावर सोन्याची मागणी जानेवारी-मार्चमध्ये एक टक्क्याने वाढून १,०८३.८ टन झाली आहे. गेल्या वर्षी सोन्याची जागतिक मागणी १,०७०.८ टन होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कराड तालुक्यात १० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह, 44 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 34 कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 44 कोविड-19 बाधित रुग्ण आढळले आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12 असे एकूण 44 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच आज कराड तालुक्यात सापडलेला कोरोनाबाधित रुग्ण हा वनवासमाची या गावाचा रहिवासी असल्याचे समजत आहे.

आज दि.30 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 10, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 47, ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 1 व कोरेगाव येथे 14 असे एकूण 72 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका कोविड बाधित रुगणाचा 14 दिवसानंतर दुसरा नमुना असे एकूण 73 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

२४ तासात कोरोनाने ६७ जणांचा मृत्यू; रुग्णांची संख्या ३४ हजारांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असून मृत्यूही नोंदवले जात आहेत. मागील २४ तासांच्या आकडेवारीनुसार देशभरात १ हजार ८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ हजार ७५वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या २४ तासात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंदींनंतर देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत वाढलेल्या ३३ हजार ६१० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८ हजार २७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. येत्या ३ मेला लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपणार असून कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही नाही. तूर्तास भारतात रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अखेर आज सोन्याच्या किंमती वाढल्या; चांदीहि वधारली! जाणुन घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान सलग तीन दिवस सोन्याच्या दरामध्ये सुरू असलेली सततची घसरण आज संपुष्टात आली.गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या स्पॉट किंमतीत किंचितसी वाढ झाली आहे.बुधवारीच्या तुलनेत दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ६० रुपयांनी वाढून ४५९६४ रुपये इतका झाला, तर बुधवारी तो १० ग्रॅम प्रति ४५ रुपयांसह ४५,९३४ रुपये होता. दुसरीकडे जर २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे झाले तर तेही ६० रुपयांनी वाढले आहे आणि ते प्रति १० ग्रॅम ४५७८० रुपयांवर पोचले आहे.

लॉकडाऊनमुळे सराफा बाजार आणि ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत.अशावेळी इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार सोन्या-चांदीची स्पॉट किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी राहिली.इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर दररोज अपडेट्स होत असलेल्या देशातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीची किंमत घेऊन सरासरी दर तयार केला जातो.३० एप्रिलच्या किंमतीबद्दल बोलताना,९९.९ टक्के शुद्धतेसह सोन्याची किंमत आज प्रति १० ग्रॅम ४५,९६४ रुपये होती.त्याचबरोबर ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती प्रति १० ग्रॅम ४५,७८० रुपये होती. त्याचबरोबर चांदीचा दरही २७० रुपयांनी वाढून ४२,३०० रुपये प्रति किलो झाला.

सोने ९९९ काय आहे ते जाणून घ्या
हॉलमार्क केलेल्या दागिन्यांमध्ये हॉलमार्कचे गुण आणि काही अंक जसे की ९९९,९१६,८७५ आहेत.आपल्या सोन्याच्या शुद्धतेचे रहस्य या मुद्द्यांमध्ये आहेत. लक्षात ठेवा,९९९ क्रमांकासह सोन्याचे दागिने हॉलमार्कच्या चिन्हासह २४ कॅरेटचे आहेत.९९९ म्हणजे त्यातील सोन्याची शुद्धता ९९.९ टक्के आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे २३ कॅरेट सोन्याचे ९५८, तर २२ कॅरेट सोन्याचे ९१६, २१ कॅरेट ८७५,१८ कॅरेट ७५० गुण आहेत.

पहिल्या तिमाहीत २५% सोने वाढले
जानेवारी ते मार्च २०२० च्या पहिल्या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत ३६ टक्क्यांनी घट झाली आहे.त्याच वेळी सोन्याच्या किंमतीत चढउतार होत राहिले.जर आपण तिमाहीबद्दल बोललो तर पहिल्या तिमाहीत सोन्याच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशातील सोन्याची मागणी १०१.९ टनांवर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा फैसला आता मुंबई हायकोर्टात; याचिका दाखल

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरून राज्यावर राजकीय अस्थिरतेचे ढग असतानाच याप्रश्नी आज मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर निर्णय घेण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दिरंगाई करत आहेत. भाजपच्या राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक मागील २० दिवसांपासून हा विलंब केला जात आहे, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ही तातडीची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाचे सदस्य नसल्याने येत्या २८ मेपर्यंत त्यांना कोणत्यातरी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे. याबाबतचा चेंडू सध्या राज्यपालांच्या कोर्टात असल्याने व राज्यपाल कोणताच निर्णय घेत नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थतीत उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मुद्दा मुंबई हायकोर्टात पोहचला आहे. सध्या राज्य कोरोनाच्या आपत्तीला तोंड देत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही त्यात झोकून देऊन काम करत आहेत. असे असताना त्यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात असल्याचा संदेश समाजात जाऊन राज्य प्रशासन सैरभैर होणे खूप धोक्याचे आहे म्हणून उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्न निकाली लावावा असं सुरिंदर यांनी याचिकेत म्हटलं आहे.

याचबरोबर मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीचा विचार करून निर्णय घेण्यासाठी राज्यपाल हे बांधीलच असतात. उद्धव ठाकरे हे पात्रतेच्या निकषात बसत असताना आणि त्यांच्याविषयीची शिफारस नाकारण्यासाठी घटनेतील तरतुदींप्रमाणे कोणतेही कारण नसताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे केवळ भाजपच्या राजकीय स्वार्थासाठी विलंब करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर निर्णय घेण्याचे आणि उद्धव ठाकरे यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती सुरिंदर अरोरा यांनी ज्येष्ठ वकील अड. सतीश तळेकर यांच्यामार्फत तातडीची रिट याचिका करून केली आहे. याविषयी पुढील आठवड्यात हायकोर्टात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे तातडीची सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कामगारांची घरवापसी रेल्वेने की बसने? गृहखाते म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतर काही राज्ये केंद्र सरकारकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी करत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे.मात्र, गुरुवारी गृह मंत्रालयाने कोविड १९ च्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की,सध्या फक्त बसेसद्वारे लोकांना त्यांच्या डेस्टिनेशनवर पाठवले जाऊ शकते.

 

त्याचवेळी तेलंगणाचे मंत्री तलासणी श्रीनिवास यादव यांनीही रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी ते म्हणाले, ‘लोकडाउनमुळे सुमारे दोन कोटी लोकं ही विविध राज्यात अडकून पडले आहेत.केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे चांगली नाहीत.इतक्या उन्हात लोक ३ ते ४ दिवस बसमध्ये प्रवास कसा करू शकतील. बसेसपेक्षा रेल्वे गाड्या हा एक चांगला पर्याय आहे.

 

 

या लाखो श्रमिक तसेच प्रवासी कामगारांच्या सुरक्षित घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने कोणताही विलंब न करता विशेष गाड्या सुरु कराव्यात,असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधानांकडे केले आहे.

बुधवारी गृह मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आणि लॉकडाउनमुळे अडकलेल्या या लोकांच्या जाण्या-येण्यास सशर्त परवानगी दिली जात असल्याचे राज्यांना सांगितले.राज्यांनी त्यांच्यासाठी बस पुरवाव्यात आणि या बसेस पूर्णपणे स्वच्छ केल्या जाव्यात आणि सोशल डिस्टंसिंगची विशेष काळजी घेतली जावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

‘या’ चित्रपटात ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी एकत्र काम केले होते,व्हिडिओ क्लिप होते आहे व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड जगाने अवघ्या २ दिवसात आपले मोठे स्टार्स गमावले आहेत.बुधवारी इरफान खानच्या निधनानंतर ऋषी कपूरने मुंबईच्या रूग्णालयात या जगाला निरोप दिला.इरफानच्या मृत्यूने जशी लाखो चाहत्यांची मने मोडली त्याचप्रमाणे ऋषी कपूर यांच्या अकाली निधनानेही त्यांच्या देश-विदेशातील चाहत्यांना धक्का बसला आहे.यामुळे बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.ऋषी कपूर आणि इरफान खान हे दोघेही ‘डी डे’ या चित्रपटात एकत्र दिसले आहेत.या चित्रपटातील दोन्ही सीनचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होतो आहे.

इरफान खानने एका मुलाखतीत ऋषी कपूरचे कौतुक केले होते.त्याने सांगितले की डी डे चे शूटिंग संपल्यानंतर आम्ही सर्वजण ऋषी कपूरच्या सभोवती बसायचो.ऋषी कपूर यांच्या जवळ बर्‍याच कथा असायच्या.मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल असे कधी वाटले नव्हते.

अथिया शेट्टीने त्यांच्या या डी-डे चित्रपटाचतील हे छायाचित्र शेअर करून लिहिले हे छायाचित्र मला रडवत आहे.

 

 

 

 

ऋषी कपूर आणि इरफान खान यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. हा एक योगायोग आहे की कर्करोगाच्या उपचारानंतरही दोन्ही अभिनेते परदेशातून उपचार घेऊन २०१९ मध्ये भारतात परत आले होते.यासह, ही एक विचित्र गोष्ट आहे की २४ तासांच्या आत या दोन महान व्यक्तींनी या जगाला निरोप दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

फक्त ‘या’ कारणाने ‘व्हाइट हाऊस’नं केलं पंतप्रधान मोदींना अनफॉलो

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी ‘व्हाइट हाऊस’च्या ट्विटर हँडलवरून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीसह ६ भारतीय ट्विटर अकाउंट्सना अचानक अनफॉलो केलं. काहीच दिवसांपूर्वी व्हाइट हाऊसने पंतप्रधान मोदींना ट्विटवर फॉलो केल्यांनतर भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाल्याचे भारतात म्हटलं जात होत. व्हाइट हाऊसच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदी हे एकमेव राजकीय नेते होते. परंतु, व्हाइट हाऊसने त्यांना अचानक अनफॉलो केल्यांनतर भारतातून नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही व्हाइट हाऊसच्या कृतीवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना व्हाइट हाउसनं अनफॉलो केल्यामुळे मी खूप निराश झालोय. परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. दरम्यान, अचानक पंतप्रधान मोदींना अचानक अनफॉलो करण्याचा निर्णय का घेण्यात आला यासंदर्भात व्हाइट हाऊसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

व्हाइट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनं नाव न सांगण्याच्या अटींवर ‘पीटीआय’ला यासंदर्भात आता माहिती दिली. “व्हाइट हाऊसचे ट्विटर हँडल अमेरिकनं सरकारच्या इतर ट्विटर हँडलचं अनुकरणं करते आणि त्यानुसारच काम केलं जातं. उदारणार्थ राष्ट्रध्यक्षांचा एखाद्या देशात दौरा असेल, तर त्या दौऱ्यापूर्वी यजमान देशातील महत्त्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो केलं जातं. कारण दौऱ्याविषयीचे यजमान देशाच्या अधिकृत ट्विटर हँडल करण्यात आलेले ट्विट रिट्विट केले जातात. त्यानंतर पुन्हा अनफॉलो केलं जातं. केवळ दौऱ्यादरम्यान मर्यादित कालावधीसाठी असं केलं जातं,” असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारीतील नियोजित भारत दौऱ्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे ट्विटर हँडल, अमेरिकेच्या भारतातील दूतावासाचे ट्विटर हँडल आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांचं ट्विटर हँडल फॉलो केलं होतं. २९ एप्रिल रोजी अनफॉलो करण्यात आलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

नवरीला घरी आणण्यासाठी नवरा बनला पेशंट; अ‍ॅम्ब्युलन्स मधून केला ८० कि.मी. चा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरूच आहे.दरम्यान,सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी आहे.मात्र तरीही काही लोक या नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत अशातच प्रशासन लोकांना सोशल डिस्टंसिंग करण्याचे आवाहन करत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे हि घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरची आहे,जेथे एका कुटुंबाने पहिले पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी रूग्णवाहिका घेतली. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरूद्धही गुन्हा दाखल केला आहे.

नवरदेवाने वधूला रुग्णवाहिकेतून आणले
मुझफ्फरनगरमधील खतौली येथे राहणाऱ्या या नवरदेवाने आपल्या वधूला आणण्यासाठी निवड करण्यासाठी अ‍ॅम्बुलन्समधून ८० किमीचा प्रवास करून गाझियाबाद गाठले.संपूर्ण महामार्गावर असलेल्या पोलिस पॉइंट्सवर रुग्णवाहिका असल्यामुळे पोलिसांनी तपासणी केली नाही.लग्नानंतर नवरदेव रुग्णवाहिका घेऊन खतौलीला पोहोचले.रुग्णवाहिकेत वधू-वर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ९ लोक होते.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला वधूबरोबर क्वारंटाइन केले आहे.पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरूद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे.तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाइन केले आहे.

How a village in West Bengal campaigned to get its own ambulance ...

प्रयागराजमध्येही केले लग्न,गुन्हा दाखल
कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाउन दरम्यान कोणत्याही प्रकारच्या समारंभावर बंदी घालण्यात आली आहे.अलीकडेच प्रयागराजच्या किडगंज भागात सरकारी आदेशाचे उल्लंघन करत लग्न झाले होते.याप्रकरणी पोलिसांनी कठोर पवित्रा घेत वधू-वराविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. वधू -वराच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यूपीमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे
उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.उत्तर प्रदेशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दोन हजारांच्या पुढे गेलेली आहे. प्रधान सचिव अमित मोहन प्रसाद यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात आतापर्यंत २११५ संक्रमित रुग्ण आढळले असून त्यापैकी १६०२ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत हे संक्रमण ६० जिल्ह्यात पसरले आहे तसेच ७ जिल्ह्यात सक्रीय संसर्गग्रस्त रुग्ण नाहीत.आतापर्यंत ४७७ रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना सोडण्यात आले आहे,तर कोरोनामुळे ३६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.